Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे भरती.

Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता 6 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डेप्युटी मॅनेजर ( मेकॅनिकल ), डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ), असिस्टंट मॅनेजर ( मेकॅनिकल ), असिस्टंट मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ), असिस्टंट मॅनेजर (CSR) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रता तारा उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

Goa Shipyard Limited Bharti 2024

  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे एकूण 20 पदांसाठी भरती होणार आहे.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरती मध्ये घेण्यात येणाऱ्या पदांची नावे खालील प्रमाणे.

Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे.

  1. डेप्युटी मॅनेजर ( मेकॅनिकल )
  2. डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल )
  3. असिस्टंट मॅनेजर ( मेकॅनिकल )
  4. असिस्टंट मॅनेजर ( इलेक्ट्रिकल )
  5. असिस्टंट मॅनेजर (CSR)
  • डेप्युटी मॅनेजर ( मेकॅनिकल ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ रेग्युलर बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी असणे आवश्यक आहे.
  • डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ रेग्युलर बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट मॅनेजर ( मेकॅनिकल )  या पदासाठी बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी मेकॅनिकल शाखेतून मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पाहिजे. पदवी मिळवलेल्या महाविद्यालयाकडे एआयसीटीई ची मान्यता असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मध्ये पूर्णवेळ बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी यापैकी कोणतीही एक पदवी पाहिजे. मिळालेली पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळालेली पाहिजे. पदवी ज्या महाविद्यालयातून मिळाली त्या महाविद्यालयाकडे एआयसीटीई चे मान्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट मॅनेजर (CSR) या पदाकरिता एमबीए, एमएसडब्ल्यू, पीजी पदवी, यापैकी कोणतीही एक दोन वर्षे नियमित अभ्यासक्रमापासून मिळवलेली पदवी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदरील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मिळवणे गरजेचे आहे. सदरील पदवी ही कामगार आणि समाज कल्याण, सामाजिक कार्य, ग्रामीण विकास, ग्रामीण व्यवस्थापन यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी 33 वर्षापर्यंत असले पाहिजे. एससी आणि एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट राहील. तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट राहील.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरती करिता पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन 40000 रुपये ते 1,60,000 रुपये एवढे मिळेल.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे गोवा, दिल्ली आणि मुंबई असेल.
  • सदरील भरती करिता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क ₹500 गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून आकारण्यात येणार आहे. तर एससी, एसटी, अपंग, माजी कर्मचारी यापैकी कोणाकडूनही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करण्याकरिता गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी दिलेल्या संकेतस्थळावरून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • सदरील भरती करिता गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून 6 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याद्वारे सदरील भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात पहा.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून अर्ज करण्याकरिता ऑनलाइन लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून सर्वांनी अर्ज भरावा. अर्ज करा.

Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • सदरील भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • भरती मध्ये अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरत असताना त्यामध्ये काही चूक झाली आणि त्यामुळे जर अर्ज बाद करण्यात आला तर तर त्याला गोवा शिपयार्ड लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
  • 06 एप्रिल 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी डाऊनलोड करून वाचावी.

Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालीलप्रमाणे.

  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरतीसाठी [ Goa Shipyard Limited Bharti 2024 ]  ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांच्यातूनच योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड येथील परीक्षा केंद्रावर कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार घडला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • उमेदवाराने परीक्षा केंद्रावर येण्यापूर्वी ऑनलाइन हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची एक प्रत परीक्षेला येताना घेऊन येणे गरजेचे आहे.
  • सदरील भरती करिता उमेदवारांना जर अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी गोवा शिपयार्ड लिमिटेड या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Goa Shipyard Limited Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • असिस्टंट मॅनेजर हे पद सोडून इतर सर्व पदांसाठी नेमणूक मुलाखतीद्वारे होणार आहे. कोणत्याही पदासाठी शैक्षणिक पात्रता वाढवणे हे पूर्णपणे व्यवस्थापकांच्या हातामध्ये राहील. उमेदवारांची निवड करण्यासाठी पात्रता ठरवण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा ही कॉम्प्युटर बेस टेस्ट असेल किंवा पेन पेपर बेस टेस्ट असेल.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा 60 मिनिटांची असेल. या परीक्षेमध्ये प्रश्न इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये असतील. सदरील परीक्षा ही मल्टिपल चॉइस क्वेश्चन प्रमाने असेल.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात शिस्ती संदर्भात प्रश्न असतील त्यासाठी एकूण 60 गुण असतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये जनरल मॅनेजमेंट ॲटीट्यूड टेस्ट असेल त्यामध्ये मेंटल एबिलिटी, रीजनिंग, इंग्लिश, डाटा एनालिसिस, न्यूमरिकल ॲबिलिटी यांसारख्या विषयांवर प्रश्न असतील. यासाठी 25 मार्क असतील. संपूर्ण लेखी परीक्षा करिता 85 गुण असतील.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना 50% गुण मिळतील आणि एससी/ एसटी/ ओबीसी/ अपंग या कॅटेगरीत 45% ज्यांना गुण मिळतील आशा उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेण्यात येणारी मुलाखत 15 गुणांसाठी असणार आहे. सदरच्या मुलाखतीमध्ये पास होण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. एससी / एसटी / ओबीसी / अपंग या उमेदवारांकरिता पास होण्याकरिता कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड करताना लेखी परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यानुसार आरक्षणाचे नियम पाहून निवड यादी तयार करण्यात येते.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धत सोडून इतर कोणत्याही पद्धतीने केले गेलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडे पोहोचला नाही तर त्याला गोवा शिपयार्ड लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
  • सदरील भरतीसाठी असणारी परीक्षा शुल्क ₹500 उमेदवाराने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ई- पे द्वारे भरावे. त्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग यांचा उपयोग करावा. सदरील भरतीसाठी दिलेली परीक्षा शुल्क उमेदवाराला परत कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क दिलेल्या पद्धतीनुसारच भरायचे आहे. इतर कोणत्याही पद्धतीने उमेदवाराने परीक्षा शुल्क भरली असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरती करिता ज्या उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी वैयक्तिक अर्ज आणि वैयक्तिक परीक्षा फी भरायची आहे.
  • या भरतीमध्ये कोणत्याही पदासाठी जागा वाढवण्याचे आणि कमी करण्याचे पूर्णपणे हक्क व्यवस्थापन समितीकडे आहेत. सदरील भरतीमध्ये जर भविष्यात गरज असणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात आली तर त्यासाठी वाढीव जागा देण्यात येतील. सदरील भरती कोणतेही कारण न सांगता रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार व्यवस्थापन समितीकडे आहे.
  • भरती मध्ये रिक्त पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता पेक्षा जास्त पात्रता अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी एखाद्या उमेदवाराकडे असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचे प्राधान्य देण्यात येणार नाही. किंवा त्याची थेट पदासाठी नियुक्ती होणार नाही.
  • जे उमेदवार भारत सरकार मध्ये किंवा इतर कोणत्याही राज्य सरकारच्या सरकारी पदावर काम करत आहेत आशा उमेदवारांनी अर्ज करत असताना दिलेल्या पॅनलच्या थ्रू अर्ज करावा. मुलाखतीला येताना किंवा कागदपत्र पडताळणी ला येताना उमेदवारांनी ना हरकत दाखला घेऊन येणे आवश्यक आहे.
  • जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील त्या उमेदवारांकरिता एसीचे रेल्वेचे तिकीट येण्या जाण्याकरिता देण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी जवळच्या रेल्वे स्टेशन नमूद करणे गरजेचे आहे.
  • सदरील भरती करिता भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. त्याच पद्धतीने निवड समितीमधील कोणत्याही अधिकाऱ्याला असे करण्यास भाग पाडू नये. अशा उमेदवाराला भरतीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही.

[ Goa Shipyard Limited Bharti 2024 ] भारतातील सर्व राज्य सरकारच्या कोणत्याही खात्यातील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment