Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथे भरती.

Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 ही आहे. सदरील भरती मध्ये स्वयंसेवक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

Maharashtra Education Department Bharti 2024

  • महाराष्ट्र शिक्षण विभाग भरती येथे 200 रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत.
  • सदरील भरतीमध्ये स्वयंसेवक पदाच्या जागा भरायचे आहेत.

Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • वरील भरती मध्ये 10वी पास असणाऱ्या स्वयंसेवक करिता 20 जागा रिक्त आहेत.
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A /B.COM / B.Sc ) यांच्याकरिता स्वयंसेवक पदाच्या 50 जागा रिक्त आहेत.
  • D.ed / A.T.D / B.ed / B.ped / M.S.W / B.S.W हे शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी एकूण 100 जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरती मधील पदांकरिता वयाची अट पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरती मध्ये पदावरती नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरती मध्ये पदावरती नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण जालना जिल्हा राहील.
  • सदरील भरती मध्ये स्वयंसेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष हजर राहून अर्ज करायचा आहे.
  • 15 एप्रिल 2024 पर्यंत महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील.
  • स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून “महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना.” हा पत्ता देण्यात आलेला आहे. पात्र उमेदवारांनी सदरील पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील नियम वाचावे.

  • सदरील भरती करिता ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून कोणत्याही पद्धतीची ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत राबविण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. त्यामध्ये जन्मतारीख, संपूर्ण नाव, पत्ता यासारख्या गोष्टी बरोबर करायचे आहेत. जर अर्ज भरताना काही चुकी झाली आणि त्यामुळे अर्ज बाद करण्यात आला तर त्याला महाराष्ट्र शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.

  • सदरील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांची निवड करण्याचे काम महाराष्ट्र शिक्षण विभाग करणार आहे.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा TA/DA उमेदवाराला देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरती मध्ये परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार उमेदवाराकडून करण्यात आला. तर त्या उमेदवारावर महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग येथे भरतीसाठी निवड प्रक्रिया महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्याकडून ठरवण्यात येईल. यामध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये.
  • सदरील भरती करिता आवश्यक अभ्यासक्रम महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे उमेदवाराने संकेतस्थळाला भेट द्यावी.
Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
  • सदरील भरती ही एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर, ता.मेहकर, जि. बुलढाणा यांच्या अंतर्गत असणाऱ्या आणि केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या नवभारत साक्षरता अभियान ( प्रौढ शिक्षण ) त्यांच्या कामाकरिता जालना जिल्ह्यामध्ये स्वयंसेवक कंत्राटी स्वरूपात भरायचे आहेत.
  • सदरील भरती मधील पदे ही गावानुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या गावांमध्ये निरक्षर लाभार्थ्यांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी जास्त स्वयंसेवक भरण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी संख्या कमी असेल त्या ठिकाणी कमी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येईल.
  • 1 एप्रिल 2024 या दिवसापासून सदरील भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने अर्ज स्वीकारण्या शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 पोस्टाद्वारे राहील. सदरील भरती मध्ये शेवटची तारीख संपून गेल्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • महाराष्ट्र शिक्षण विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस सकाळी 9:00 वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज जमा करायचा आहे.
  • www.education.maharashtra.gov.in ज्या उमेदवारांना सदरील भरती संदर्भात अधिक माहिती पाहिजे आहे आशा उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • उमेदवाराने अर्जासोबत चिकटवला जाणारा फोटो जास्तीत जास्त तीन आठवडे जुना असावा. अर्जासोबत लावण्यात येणारा पासपोर्ट साईज फोटो कलर असावा.
  • सदरील भरती ही महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत मंत्रालय, मुंबई यांच्याद्वारे घेण्यात येणार आहे.
  • सदरील भरती मध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांना निरक्षर लाभार्थी यांना शिकवण्याचे काम असणार आहे.
Maharashtra Education Department Bharti 2024 | महाराष्ट्र शिक्षण विभाग याच्या संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

[ Maharashtra Education Department Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शाळा आहेत. शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा अशा दोन प्रकारांमध्ये शाळेचे प्रमुख वर्णन केले जाते. शिक्षण अधिकाऱ्यांच्या देखरेख खाली शाळा चालत असतात. प्राथमिक शाळा करिता गटशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची नेमणूक केलेली असते तर माध्यमिक शाळांसाठी गट शिक्षण अधिकारी माध्यमिक यांची नियुक्ती केलेली असते. यांच्याद्वारे शाळेचा विकास केला जातो.

शाळा चालवत असताना बऱ्याच बाबींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये शाळेच्या अनुदानाचा प्रकार, शाळेसाठी मंजुर इयत्ता, शाळेचे व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार प्रशासनाला करावा लागतो. त्यानुसारच शाळा प्रणाली चालत असते. शिक्षक पद भरती, संच मान्यता, समायोजन, RTE 2019 याच्या द्वारे 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणे यासाठी शाळा प्रणालीचा उपयोग होत असतो. शाळा प्रणालीचा उपयोगामुळे शाळेची संपूर्ण माहिती मिळण्यास आणि शाळेचे व्यवस्थापन सोपे होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. शाळेचे पडले गेलेले प्रकार यामध्ये शाळा कोणत्या प्रकारात येते यासंदर्भात माहिती शाळेला मिळणार आहे.

शाळेच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध व्यवस्थापनाच्या माध्यमातून शाळा चालवल्या जातात. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सुद्धा शाळा चालवल्या जातात. त्याचप्रमाणे कटक मंडळ आणि खाजगी संस्था द्वारे सुद्धा शाळा चालवल्या जातात. त्याचप्रमाणे काही अधिनियमानुसार संस्थांना शाळा चालवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्था अधिनियम 1860 , बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अधिनियम 1950, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, कंपनी कायदा 2013 या द्वारे विविध संस्थांना आणि कंपनींना शाळा चालवण्याची परवानगी मिळालेली आहे.

अशा संस्था द्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळांची माहिती मिळवण्यासाठी संस्था प्रणाली निर्माण झालेली आहे. याद्वारे संस्थेची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे झाली, संस्थेचे नाव काय, संस्थाप्रमुख कोण आहे, संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा या सर्वांची माहिती संस्था प्रणाली द्वारे मिळणे सोपे झाले. सदरील संस्था प्रणालीचा उपयोग विविध घटकांकरिता होत आहे. ज्यामध्ये शिक्षक भरती, शैक्षणिक योजना नियमित राबवणे, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या सर्वांची माहिती मिळणे सोपे झाले आहे.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या पदांच्या भरतीसाठी काही नियम आहेत. शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानीत,अंशत: अनुदानीत,विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळा या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची असणारी संख्या पाहिल्यानंतर त्या आधारेच शिक्षक भरती आणि कर्मचारी भरती केली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ठरवण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सप्टेंबर महिन्यात 30 सप्टेंबर रोजी असणारी विद्यार्थ्यांची संख्या शाळेची विद्यार्थी संख्या मानली जाते.

ही संख्या विचारात घेऊन शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळां असणाऱ्या संच मान्यता गटशिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या लोगिन वरती उपलब्ध आहेत. शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे सर्व शाळांना संच मान्यता देण्यात येते. त्यानुसार शाळेच्या व्यवस्थापनाला किंवा प्रशासनाला ऑनलाइन परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई करता येते.

महाराष्ट्रातील ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार मिळतो अशा शाळांची संख्या 86375 इतकी आहे. महाराष्ट्रातील एकूण 94 शाळेमध्ये शालेय पोषण आहार दिला जात नाही.

1 जानेवारी 1966 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ याची स्थापना करण्यात आली. स्थापना करण्यात आलेला संस्थेचा मुख्य उद्देश भारतातील माध्यमिक शिक्षणासंदर्भात काही बाबी नियंत्रणात ठेवणे हा होता. सदरील बोर्डाचे मुख्य काम हे इयत्ता 10वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेची आयोजित करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हा आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये घेतल्या जातात आणि त्यांचा निकाल जून मध्ये लावला जातो. महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ बोर्ड आहेत. त्या बोर्डामध्ये पुणे, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, रत्नागिरी, लातूर, नागपूर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनातील कोणत्याही प्रकारची भरती आणि त्यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment