Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथे भरती.

Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ या पदांसाठी सदरील उमेदवारांची भरती होणार आहे. तरी भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी उमेदवारांनी गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक पाहायची आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

Gokhale Education Society Bharti 2024

  • गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरती 105 जागांसाठी होणार आहे.
  • गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ यासाठी जागा भरण्यात येणार आहेत.

Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • टीचिंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा मॉन्टेसरी कोर्स, डीएड, बीएड, एटीडी, बीएससी, बीएससी बीएड, बीए बीएड, बीपीएड यापैकी कोणताही एक कोर्स पूर्ण असावा.
  • नॉन टीचिंग स्टाफ या पदासाठी B.Lib, बीकॉम, 12 वी सायन्स उत्तीर्ण, नववी पास, चौथी पास यापैकी कोणताही एक कोर्स पूर्ण असावा.
  • 15 एप्रिल व 16 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी यायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण जाहिराती मध्ये दिलेले आहे.
  • सदरील भरतीसाठी वयाची अट पाहण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात पहावी.
  • सदरील भरती मध्ये वयोमर्यादा पाहण्यासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पगार नियमानुसार मिळेल.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक राहील.
  • या भरतीसाठी उमेदवाराकडून ₹200 परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीसाठी पत्ता जाहिरात मध्ये दिलेला आहे.
  • 16 एप्रिल 2024 यादिवशी शेवटची मुलाखत घेण्यात येणार आहे. या तारखेनंतर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहू नये.
  • गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी संस्थेद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • ” Sir Dr. M.S. Gosavi Institute for Entrepreneurship Development, Prin. T.A Kulkarni Vidyanagar, Nashik – 5 ” या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी उमेदवारांनी थेट मुलाखत पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत गोखले एज्युकेशन सोसायटी द्वारे राबवण्यात आलेली नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
  • सदरील भरती करिता उमेदवारांनी अर्ज भरताना स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक करायची आहे. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची चूक झाली आणि उमेदवाराची मुलाखत रद्द करण्यात आली. तर त्याला गोखले एज्युकेशन सोसायटी जबाबदार राहणार नाही.
  • 16 एप्रिल 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.

  • गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरती संदर्भात उमेदवारांना काही शंका असतील तर उमेदवारांनी (0253) 2574682 या फोन नंबर वर संपर्क करायचा आहे.
  • उमेदवाराने मुलाखतीसाठी येताना स्वतःचा संपूर्ण बायोडाटा, ओरिजनल आणि झेरॉक्स कागदपत्रे, जातीचा दाखला, पदवी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी भाषा येणे बंधनकारक आहे.
  • गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरती 2024 – 25 वर्षासाठी आहे.
  • दिलेल्या तारखेला मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांसाठी सकाळी 10:00 वाजल्यापासून ते 11:00 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन टाइमिंग आहे.
  • मॉन्टेसरी शिक्षक या पदासाठी एकूण 13 जागा रिक्त आहेत. त्यापैकी नऊ जागा इंग्लिश मीडियम साठी आहेत. तर चार जागा मराठी मिडीयम साठी आहेत.
  • हेड मास्टर या पदासाठी चार जागा रिक्त आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इंग्लिश मीडियम मध्ये काम केलेला पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • प्राथमिक शिक्षक या पदासाठी एकूण 16 जागा रिक्त आहेत. त्यातील 12 जागा इंग्रजी मीडियम साठी आहेत. तर चार जागा मराठी मिडीयम साठी आहेत.
  • प्राथमिक शाळा यासाठी चार जागा कला शिक्षक पदासाठी रिक्त आहेत. या पदासाठी आर्ट टीचर डिप्लोमा उमेदवाराचा पूर्ण पाहिजे.
  • कॉम्प्युटर शिक्षक प्राथमिक साठी दोन जागा रिक्त आहेत. या पदासाठी उमेदवाराचे बीएससी ( कॉम्प्युटर सायन्स ) पूर्ण झालेले पाहिजे.
  • माध्यमिक शिक्षक या पदासाठी 22 जागा रिक्त आहेत. यामध्ये गणित आणि विज्ञान विषयासाठी 10 जागा रिक्त आहेत. इंग्रजी विषयासाठी पाच जागा रिक्त आहेत. हिंदी आणि सामान्य विज्ञान या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. संस्कृत या विषयासाठी एक जागा रिक्त आहे. मराठी आणि समाजशास्त्र या विषयासाठी चार जागा रिक्त आहेत.
  • शारीरिक शिक्षण शिक्षक माध्यमिक विभाग या पदासाठी तीन जागा रिक्त आहेत.
  • ग्रंथपाल या पदासाठी तीन जागा रिक्त आहेत.
  • जूनियर क्लर्क या पदासाठी नऊ जागा रिक्त आहेत.
  • प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. या पदासाठी उमेदवाराने 12 वी विज्ञान शाखेतून पास केली पाहिजे.
  • शिपाई या पदासाठी नऊ जागा रिक्त आहेत या पदासाठी उमेदवारांनी कमीत कमी नववी पास केलेली पाहिजे.
  • आया या पदासाठी 14 जागा रिक्त आहेत. सदरील पदासाठी उमेदवाराने चौथी पास असणे गरजेचे आहे.
  • सफाई कर्मचारी या पदासाठी पाच जागा रिक्त आहेत. सदरील पदाकरिता उमेदवार चौथी पास असणे आवश्यक आहे.
  • गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सेक्रेटरी डॉ. डी. पी. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील भरती चे नियोजन केलेले आहे.

Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे.

19 फेब्रुवारी 1918 रोजी गोखले एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झालेली आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त सदरील सोसायटीची स्थापना झालेली आहे. या संस्थेचे माझी प्राचार्य आणि ज्येष्ठ समाजसेवक टी. ए. कुलकर्णी यांनी संस्थेची स्थापना केलेली आहे. आज संस्थेने यशस्वी रित्या 100 वर्षे पूर्ण केलेली आहेत. संस्थेच्या एकूण 140 शाखा आहेत. त्यामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे – पालघर या विभागांचा समावेश आहे. लोकांची जीवनशैली शिक्षणाच्या द्वारे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून उंचावणे हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटी सज्ज आहे. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारे दुवा तयार करणे या सर्वांच्या माध्यमातून संस्था विद्यार्थ्यांना सर्वोच्च सेवा देत आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटी ही संस्था शिक्षकांद्वारे चालवली जाते. संस्थेच्या बॉडी वर असणारा प्रत्येक व्यक्ती शिक्षक असणे गरजेचे आहे. संस्थेमध्ये 60 सदस्यांची बॉडी आहे. त्यापैकी 50 हून अधिक सदस्य शिक्षक आहेत. सोसायटीचे सर्व महाविद्यालय NAAC मान्यताप्राप्त आहेत. त्याचप्रमाणे सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालय, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा या ISO 9001 : 2015 सर्टिफाइड आहेत. समाजातील आदिवासी आणि मागास घटकांकरिता केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देण्याचे काम सदरील संस्था करते.

गोखले एज्युकेशन सोसायटी येथील शिक्षकांना संशोधन आणि विकासासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. पीएचडी साठी संस्थेची महाविद्यालय प्रसिद्ध आहेत. संस्थेकडे प्रयोगशाळा आणि वाणिज्य म्युझियम स्वातंत्र्य पद्धतीने आहे. उच्च शिक्षण पद्धतीसाठी सेमिनार, ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट वर्क, प्लेसमेंट सेल, रिसर्च आणि इनोवेशन सेंटर या पद्धतींचा उपयोग केला जातो.

गोखले एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी एम फिल आणि पीएचडी साठी संशोधन सुविधा उपलब्ध आहे. कला शाखेमध्ये इंग्लिश, मराठी आणि हिंदी पीएचडी कोर्स उपलब्ध आहे. तर विज्ञान विषयामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, मायक्रो बायोलॉजी, बॉटनी यांसारखे पीएचडी कोर्सेस उपलब्ध आहेत. वाणिज्य विषयांमध्ये अकाउंटन्सी, कॉस्टिंग, बिझनेस प्रॅक्टिस, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि लॉ यासंदर्भात पीएचडी कोर्स उपलब्ध आहेत.

सदरील संस्थेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी उपलब्ध आहे. यामध्ये एमएससी या पदवीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, मायक्रो बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, अनलिटिकल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर एप्लीकेशन यांसारखे विषय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे एमकॉम या पदवीसाठी कॉमर्स, कॉमर्स विथ ॲडव्हान्स कम्प्युटिंग, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड बिझनेस, कॉम्प्युटर एप्लीकेशन, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंटन्सी, मॅनेजमेंट अकाऊंट अँड एडिटिंग, मार्केटिंग यांसारखे विषय उपलब्ध आहेत. एमबीए या कोर्स साठी मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस स्टडी, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, पर्सनल मॅनेजमेंट, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स, फायनान्स यांसारखे विषय आहेत. एमए या पदवीसाठी मराठी, हिंदी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, इकोनॉमिक्स, जर्नालिझम, सायकॉलॉजी, जिओग्राफी, हिस्टरी, सोसिओलॉजी, संगीत यांसारखे विषय उपलब्ध आहेत.

बीएससी या कोर्स करिता संस्थेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, मायक्रो बायोलॉजी, स्टॅटिस्टिक, मॅथेमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, जिओग्राफी, हॉर्टीकल्चर, एग्रीकल्चर, होम सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नर्सिंग यासारख्या शाखा आहेत.

[ Gokhale Education Society Bharti 2024 ] संस्थेमध्ये खालील डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत.

  1. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट
  2. डिप्लोमा इन कॅपिटल मार्केट मॅनेजमेंट.
  3. डिप्लोमा इन इम्पॉर्टंट एक्सपोर्ट मॅनेजमेंट.
  4. डिप्लोमा इन मटेरियल अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट.
  5. डिप्लोमा इन फ्रुट प्रोडक्शन
  6. डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रोडक्शन.
  7. डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग
  8. डिप्लोमा इन हॉर्टीकल्चर
  9. डिप्लोमा इन ॲग्रो टुरिझम
  10. डिप्लोमा इन एग्रीकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट.
  11. डिप्लोमा इन इंटेरियर डेकोरेशन अँड मॅनेजमेंट.
  12. डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग एंड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग.
  13. डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.

[ Gokhale Education Society Bharti 2024 ] सरकारी नोकर भरतीतील अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment