Indian Bank Bharti 2024 | बँकिंग च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण इंडियन बँक येथे दोन पदांसाठी जागा रिक्त आहे. रिक्त जागा भरण्याकरिता इंडियन बँक द्वारे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. 16 मार्च 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. तरी इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्राध्यापक आणि कार्यालयीन सहाय्यक या दोन पदासाठी सदरील भरती आहे. या भरतीसाठी एप्लीकेशन फॉर्म ऑनलाइन संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरती संदर्भातील खालील माहिती वाचा.
- इंडियन बँक या संस्थेची भरती दोन पदांसाठी होणार आहे.
- इंडियन बँक द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये प्राध्यापक आणि कार्यालयीन सहाय्यक ही पदे भरायचे आहेत.
Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे.
- इंडियन बँक भरती मध्ये प्राध्यापक पदाची एक जागा आणि कार्यालयीन सहाय्यक पदाची एक जागा रिक्त आहे.
- प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पुढील शाखेमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर असला पाहिजे. MSW/ MA ग्रामीण विकासात/ MA समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ B.Sc. (पशुवैद्यकीय), बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी. (Agri.), B.Sc. (कृषी. विपणन)/ बी.ए. B.Ed यापैकी कोणतीही एक पदवी उमेदवारा जवळ पाहिजे. याचबरोबर उमेदवाराला इतरांना शिकवण्याची आवड पाहिजे. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. उमेदवारा जवळ BSW/ BA/B.com यापैकी कोणती एक पदवी असावी. उमेदवारा जवळ संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारा जवळ अकाउंटिंग चे ज्ञान आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल.
- इंडियन बँक या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 वर्षे ते 40 वर्ष च्या दरम्यान पाहिजे.
- इंडियन बँक च्या भरती मधून पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतन हे 12,000 रुपये ते 20000 रुपये मासिक इतके देण्यात येईल.
- भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे पश्चिम बेगुनी ( पश्चिम बंगाल) हे राहील.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज शुल्क इंडियन बँक द्वारे घेण्यात येणार नाही.
- या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर दिलेला अर्ज भरावा. आणि तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जासाठी येथे क्लिक करा
- पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 ही आहे. यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती करिता इंडियन बँक द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- उमेदवारांनी आपला अर्ज “ The Director, Indian Bank RSETI, Vill- PaschimBeguni, PO- Chakshyampur, PS- Debra, Dist- Paschim Mediaipur, PIN- 721124, West Bengal.” या पत्त्यावर ती पाठवावा.
Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक भरती साठी अर्ज करण्यापूर्वी खालील नियम वाचा.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा कुरियर द्वारे अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली इंडियन बँक द्वारे राबविण्यात आलेली नाही.
- उमेदवाराने अर्ज भरत असताना आपली वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, वडिलांचे नाव या सर्व गोष्टी काळजीपूर्वक भराव्या. जर यात कोणत्याही प्रकारची चूक झाली तर त्याला इंडियन बँक जबाबदार राहणार नाही.
- इंडियन बँक द्वारे घेण्यात येणाऱ्या भरती ची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम इंडियन बँक द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- इंडियन बँक द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी [ Indian Bank Bharti 2024 ] अर्ज केलेले उमेदवारच पात्र आहेत.
- इंडियन बँक द्वारे कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवाराने लेखी परीक्षेसाठी येताना इंडियन बँकेद्वारे देण्यात आलेले हॉल तिकीट घेऊन येणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने लेखी परीक्षा दरम्यान किंवा मुलाखतीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार केला. तर त्याच्यावर इंडियन बँक द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- इंडियन बँक द्वारे घेण्यात येणाऱ्या सदरील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता ऑफलाइन पद्धतीचा उपयोग करायचा आहे. पण अर्जाचा नमुना इंडियन बँक द्वारे संकेत स्थळावर दिलेला आहे. तो डाऊनलोड करून, अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा कुरियर द्वारे पाठवायचा आहे.
- या भरतीचा अर्ज मिळवण्यासाठी इंडियन बँक द्वारे देण्यात आलेल्या लिंक वरती क्लिक करा.
- लिंक ओपन झाल्यानंतर वरती डाव्या कोपऱ्यामध्ये इंडियन बँक चा लोगो आणि नाव दिसेल. त्यानंतर खाली करंट ओपनिंग असे हेडिंग दिसेल. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या पर्यायावर क्लिक करा. तेव्हा तुम्हाला एडवर्टाइजमेंट आणि एप्लीकेशन फॉर्म या दोन पर्यायापैकी एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक करा.
- एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ तुमच्यासमोर येईल. उजव्या कोपऱ्यात डाउनलोड बटना वरती क्लिक करून हा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. डाउनलोड केलेला अर्ज प्रिंट काढून भरायला सुरुवात करावी.
- इंडियन बँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असे हेडिंग त्या फॉर्म वरती तुम्हाला दिसेल. यानंतर अर्ज भरताना स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, वय आणि जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी ही सर्व माहिती उमेदवाराने व्यवस्थित भरावी. त्यानंतर उजव्या बाजूला स्वतःचा आयडेंटिटी फोटो चिकटवा.
- यानंतर उमेदवाराला कोणत्या भाषा येत आहेत. याची माहिती उमेदवाराने भरावी. कोणत्या भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येतात यासंदर्भातील माहिती लिहावी.
- उमेदवाराने आपला वैवाहिक स्टेटस, नॅशनॅलिटी फॉर्म मध्ये भरावी.
- यानंतर उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक तपशील भरावा. त्यामध्ये केलेल्या कोर्सची माहिती, स्पेशलायझेशनचा विषय, ज्या संस्थेमधून आणि विद्यापीठातून पदवी मिळवली त्याची माहिती लिहावी. पदवी प्राप्त झालेले वर्ष आणि मिळालेली टक्केवारी लिहावी.
- सदरील भरती करिता लागणारे टेक्निकल स्किल म्हणजेच टायपिंग स्किल आणि संगणक चालवण्याचे स्किल उमेदवारा जवळ असेल तर योग्य पर्यायावर टिक करावी.
- यानंतर उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा अनुभव लिहायचा आहे. त्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काम केले. कोणत्या कोणत्या काम केले. नोकरीचे स्वरूप काय होते. किती कार्य काळासाठी काम केले या सर्वांविषयी माहिती लिहायची आहे.
- यानंतर उमेदवारांनी दिलेली माहिती बरोबर दिलेली आहे याचे सेल्फ डिक्लेरेशन द्यायचे आहे. तारीख आणि स्थळ लिहून स्वतःची सही करायची आहे.
- लिहिलेला अर्ज पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे “The Director, Indian Bank RSETI, Vill- PaschimBeguni, PO- Chakshyampur, PS- Debra, Dist- Paschim Mediaipur, PIN- 721124, West Bengal” या पत्त्यावर 16 मार्च 2024 च्या अगोदर पाठवायचा आहे. या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक भरती चे नियम खालील प्रमाणे आहेत.
- इंडियन बँक द्वारे घेण्यात येणारी भरती ही इंडियन बँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथील पदांकरिता आहे.
- या भरतीतून निवड होणाऱ्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे पश्चिम बंगालमधील पश्चिम बेगुनी जिल्हा पश्चिम मेदिनीपुर हे असणार आहे.
- सदरील भरती मध्ये भरण्यात येणारी प्राचार्य आणि सहाय्यक कर्मचारी ही पदे कंत्राटी स्वरूपाने इंडियन बँक द्वारे भरण्यात येणार आहेत.
- इंडियन बँक ट्रस्ट द्वारे ग्रामीण भागातील विकासाकरिता एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग सेंटर हे मुख्य जिल्ह्यांमध्ये चालवले जात आहे.
- या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारा पैकी ज्या उमेदवाराला या कामाचा अनुभव पूर्वीपासून आहे. त्याला प्राधान्य दिले जाईल.
- या भरतीमध्ये ज्या उमेदवाराला स्थानिक भाषेमध्ये संवाद साधता येईल त्याला प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवाराला इंग्रजी भाषा स्पष्ट बोलता आली पाहिजे. उमेदवाराला हिंदी भाषेचे सुद्धा ज्ञान असले पाहिजे.
- इंडियन बँक द्वारे देण्यात येणाऱ्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना स्थानिक भाषेमध्ये टायपिंग आले पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी भाषेत टायपिंग येत असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
- निवड झालेल्या उमेदवाराला पगार 15 ते 20 हजार प्रतिमा दिला जाईल. त्याचप्रमाणे या पगारामध्ये दरवर्षी 10% वाढ होईल. त्याचप्रमाणे उमेदवाराला प्रवासाचा खर्च दिला जाईल. EPF आणि ग्रॅज्युएटी या सोयींचा उमेदवारांना लाभ होईल. वर्षातील नियोजित सुट्ट्या व्यतिरिक्त उमेदवाराला ठराविक सुट्ट्या देण्यात येतील.
- सदरील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला तीन वर्ष कंत्राटावर काम करायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे काम बघून हा कंत्राटी करार वाढवला जाईल.
- अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराचे निवड करण्यासाठी लेखी चाचणी, मुलाखत आणि प्रेझेंटेशन या तीन चाचण्या घेतल्या जातील. आणि त्यावरून उमेदवाराची संबंधित पदावर नेमणूक केली जाईल.
- उमेदवारांमध्ये टेक्निकल स्किल असणे गरजेचे आहे. त्यामध्ये MS Office ( Word & Excell) , Internet and Tally, टायपिंग स्किल या गोष्टी उमेदवाराला येणे गरजेचे आहे.
- उमेदवाराची लेखी चाचणी ही सामान्य ज्ञान आणि संगणका विषयी असलेल्या ज्ञाना संदर्भात होणार आहे.
- मुलाखतीमध्ये उमेदवाराची संभाषण क्षमता, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व, समस्या सोडवण्याची कला या गोष्टींकडे पाहिले जाणार आहे. आणि योग्य उमेदवाराची नेमणूक केली जाणार आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना जागा रिक्त मिळाली नाही. तर पुढील पदांच्या भरती करिता त्यांना वेटिंग वरती ठेवण्यात येईल.
- इंडियन बँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर यांच्या आदेशानुसार भरती झालेल्या उमेदवारांना काम करावे लागेल.
- भरती झालेल्या उमेदवारांना इतर कोणत्याही ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी इंडियन बँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारे देता येत नाही.
- भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15 दिवसाच्या आत मध्ये नोकरीसाठी जॉईन व्हायचे आहे.
भारतातील सर्व खाजगी आणि सरकारी बँकांच्या रिक्त पदांसाठी निघालेल्या भरती करिता अर्ज करण्यासाठी आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या. – क्लिक करा.