Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था येथे 139 जागांसाठी भरती.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्यात आलेले आहेत. या भरतीतील उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याकरिता ऑनलाइन प्रणाली ठेवलेली नाही. त्यासाठी उमेदवारांनी थेट मुलाखतीच्या स्थळी उपस्थित राहायचे आहे. प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/ समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला/ नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षक समुपदेशक यांसारख्या पदांकरिता ही भरती होणार आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेचे मार्फत प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. तसेच या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लेख वाचवा.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  • रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या 139 जागांसाठी ही भरती होणार आहे.
  • रयत शिक्षण संस्थेमार्फत होणाऱ्या भरतीतील पदांची नावे आणि त्यांची माहिती खालील प्रमाणे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेतील रिक्त पदे खालील प्रमाणे.

  1. प्राचार्य पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  2. उपप्राचार्य पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  3. पर्यवेक्षक/ समन्वयक पदासाठी 4 जागा रिक्त आहे.
  4. के.जी. शिक्षक पदासाठी 30 जागा रिक्त आहे.
  5. प्राथमिक शिक्षक पदासाठी 66 जागा रिक्त आहे.
  6. उच्च प्राथमिक शिक्षक पदासाठी 32 जागा रिक्त आहे.
  7. माध्यमिक शिक्षक पदासाठी 20 जागा रिक्त आहे.
  8. क्रीडा शिक्षक पदासाठी 05  जागा रिक्त आहे.
  9. कला/ नृत्य आणि संगीत शिक्षक पदासाठी 04 जागा रिक्त आहे.
  10. संगणक शिक्षक पदासाठी 06 जागा रिक्त आहे.
  11. ग्रंथपाल पदासाठी 04 जागा रिक्त आहे.
  12. शिक्षक समुपदेशक पदासाठी 02 जागा रिक्त आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेतील पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे.

  1. प्राचार्य पदासाठी B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed यापैकी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शिक्षक किंवा प्राचार्य म्हणून काम केलेल्या चा पाच ते सहा वर्षाचा अनुभव पाहिजे.
  2. उपप्राचार्य पदासाठी B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed यापैकी पदवी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शिक्षक किंवा उपप्राचार्य म्हणून काम केलेल्या पाच ते सहा वर्षाचा अनुभव पाहिजे.
  3. पर्यवेक्षक/ समन्वयक पदासाठी B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed. यापैकी शिक्षण पाहिजे त्याचप्रमाणे तीन ते चार वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  4. के.जी. शिक्षक पदासाठी के.जी. शिक्षक किंवा मॉन्टेसरी (प्रशिक्षित) किंवा अर्ली चाइल्डहुड आणि विशेष शिक्षणातील प्रमाणपत्र  असणे आवश्यक आहे.
  5. प्राथमिक शिक्षक पदासाठी H.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A.B.Ed यांपैकी पदवी पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराचा अनुभव दोन ते तीन वर्षाचा असावा.
  6. उच्च प्राथमिक शिक्षक पदासाठी B.Sc./B.A., B.Ed./D.El.Ed. यातील कोणतीही पदवी उमेदवाराकडे असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव असावा.
  7. माध्यमिक शिक्षक पदासाठी M.Sc./B.Sc./M.A./B.A.B.Ed./M.Ed.  हे शिक्षण उमेदवाराचे पूर्ण पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारा जवळ दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  8. क्रीडा शिक्षक पदासाठी उमेदवारा जवळ B.Sc./B.A., B.P.Ed. यातील कोणतीही डिग्री पाहिजे. त्याचप्रमाणे दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.
  9. कला/ नृत्य आणि संगीत शिक्षक ए.टी.डी. किंवा क्राफ्ट किंवा संगीत विशारद यातील पदवी उमेदवारा जवळ असणे गरजेचे आहे.
  10. संगणक शिक्षक या पदासाठी उमेदवारा जवळ बीसीए किंवा एमसीए किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स ही पदवी पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  11. ग्रंथपाल या पदासाठी बॅचलर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा लायब्ररीमध्ये डिप्लोमा ही पदवी पाहिजे. उमेदवारा जवळ अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
  12. शिक्षक समुपदेशक या पदासाठी उमेदवारा जवळ B.A/B.Sc/ मानसशास्त्र समुपदेशनातील मार्गदर्शन पदविका प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि उमेदवाराचे वय पाहण्यासाठी. संकेतस्थळाला भेट द्या.
  • रयत शिक्षण संस्थेमध्ये निघालेल्या 139 पदांच्या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
  • रयत शिक्षण संस्थेमध्ये निघालेल्या 139 पदांच्या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे सातारा असेल.
  • या पदांसाठी निघालेल्या भरती करिता शुल्क नाही.
  • पात्र उमेदवारांनी स्वतःची सर्व कागदपत्रे आणि रिझ्युम घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी यावे.
  • या भरती करिता मुलाखतीला उपस्थित राहण्या अगोदर उमेदवारांनी रयत शिक्षण संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  • रयत शिक्षण संस्थेमार्फत निघालेल्या भरतीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा.

  • कोणत्याही उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने न करता थेट मुलाखतीच्या स्थळी उपस्थित राहावे.
  • ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत किंवा पत्राद्वारे अर्ज करण्याची पद्धत संस्थेमार्फत राबवलेली नाही.
  • उमेदवारांनी आपले नाव, आपली जन्मतारीख, पत्ता, वय, पिनकोड आणि स्वतःची खाजगी माहिती रिझ्युम वरती योग्य भरावी. जर ही माहिती चुकीची निघाली तर या भरती मधून आपल्याला कधी ही रद्द केले जाऊ शकते.
  • या भरतीतील इच्छुक उमेदवारांचा डायरेक्ट इंटरव्यू घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी थेट मुलाखत स्थळी उपस्थित राहावे.
  • सदरील भरतीची जाहिरात आणि संस्थेचे संकेतस्थळ उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे. आणि त्यानुसारच मुलाखतीसाठी यावे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.
  • सदरील भरती ही रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे होणार आहे.
  • या भरतीतील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम शाळेतून झालेले असले पाहिजे. त्याचप्रमाणे त्याला इंग्लिश भाषा स्पष्ट बोलता यायला पाहिजे. उमेदवाराला हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत शिकवता आले पाहिजे. सीबीएससी मध्ये शिकवणाऱ्या उमेदवाराला आणि TET/CTET क्वालिफाईड उमेदवारांना संधी दिली जाईल. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी उमेदवाराने कोऱ्या कागदावरती लिखित स्वरूपात अर्ज करावा. त्या अर्जाबरोबर उमेदवारांनी स्वतःच्या मार्कशीट, आवश्यक प्रमाणपत्रे, जात पडताळणी प्रमाणपत्र , जातीचा दाखला यांच्या ट्रू कॉपी जोडाव्यात. ओरिजनल डॉक्युमेंट मुलाखतीच्या स्थळी व्हेरिफाय केले जाईल.
  • 3 मार्च 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा तालुका- सातारा, जिल्हा- सातारा पिनकोड- 415 001 या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल.
  • मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्ता आणि अनुभव यांच्या वरून त्याचे मासिक वेतन ठरवण्यात येईल.
  • या मुलाखती बाबत अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास उमेदवार 02162-234129 या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे www.rayatshikshan.edu या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेतील भरती मधील पदांचे आरक्षणानुसार विवरण खालील प्रमाणे.
  • एससी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता 18 जागा आहेत.
  • एसटी कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांकरिता एकूण 10 जागा आहेत.
  • व्हीजे -अ कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांसाठी चार जागा आहेत.
  • एनटी- बी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी तीन जागा आहेत.
  • एनटी- सी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी पाच जागा आहेत.
  • एनटी- डी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी तीन जागा आहेत.
  • एसबीसी च्या उमेदवारांसाठी भरती मध्ये तीन जागा आहेत.
  • ओबीसीच्या उमेदवारांकरिता एकूण 26 जागा आहेत.
  • ईडब्ल्यूएस कॅटेगिरी च्या उमेदवारांसाठी एकूण 14 जागा आहेत.
  • ओपन कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांसाठी 53 जागा आहेत.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थे बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे

1982 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची मागणी केली. 19 व्या शतकात महाराष्ट्र मध्ये बडोदा आणि मैसूर संस्थानिकांनी शाळा सुरू करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी शिक्षणात आरक्षण पद्धत आणली. या सर्व कामापासून प्रेरित होऊन भाऊराव पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण देण्याचे काम हाती घेतले. ऑक्टोबर 1919 मध्ये काले येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या मीटिंग मध्ये श्री. रामचंद्र भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी बागल मास्तर म्हणून प्रसिद्ध असणारे रामचंद्र बाबुराव बागल यांना रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या निवासी वसतिगृहाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले.

भाऊराव पाटील यांनी आपले पुस्तक ” कर्मवीर उपनिषद” यामध्ये असे म्हटले आहे की ” मी बागल मास्तर यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही” . कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्याकरिता वसतिगृह उभा केले. त्यानंतर त्यांनी शाळा, कॉलेज आणि शिक्षक ट्रेनिंग सेंटर सुरू केली. यामध्ये 38 वस्तीगृह, 578 शाळा, तीन कॉलेज आणि सहा ट्रेनिंग सेंटर आहेत. 1994 रोजी या संस्थेला डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

शिक्षण संस्था ही आशिया खंडातील पुढारलेली शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्रातील गरीब आणि सामान्य वर्गातील मुलांना शिक्षण देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली ही संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज जिल्हा कोल्हापूर येथे झाला. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये 700 संस्था असून 4 ते 5 लाख विद्यार्थी आज या संस्थेमध्ये शिकत आहेत. संस्थेमध्ये एकूण कर्मचारी बघितले तर 17000 इतके आहेत. महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये रयत शिक्षण संस्था ही सगळ्यात मोठी आहे. समाजामध्ये शिक्षणाची किती गरज आहे हे कर्मवीरांनी ओळखले. पाणी कोणताही समाज शिक्षणाशिवाय प्रगती करू शकत नाही. त्यामुळे लोकांची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. सुरू केलेल्या शिक्षण संस्थेचे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद त्याचप्रमाणे कमवा आणि शिका या योजनांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा झाला.

बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की कर्मवीरांनी आपल्या संस्थेला रयत हे नाव का दिले ? त्याचे उत्तर असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जनतेला रयत असे म्हणण्यात येई. त्यामुळे त्यांच्या संस्थेला रयत हे नाव देण्यात आले. या संस्थेमध्ये शिकणारी मुले ही रयतेची मुले होती. म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या मुलांना शिक्षण मिळवून देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले.

शिक्षण क्षेत्रातील संस्थांमधील भरती, सैन्यातील भरती त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि भारत देशातील सरकारी भरती बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या – क्लिक करा

 

Leave a Comment