NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिका येथे भरती.

NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिकेत द्वारे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. निघालेल्या भरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीचे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2024 ही आहे. क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षण आणि क्षयरोग आरोग्य पाहुणे या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून. आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचा आहे. नागपूर महानगरपालिकेतील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

NMC Nagpur Bharti 2024

 • नाशिक महानगरपालिकेची सदरील भरती ही चार जागांकरिता होणार आहे.
 • या भरतीमध्ये दोन जागा क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांच्यासाठी आहेत. आणि दोन जागा आरोग्य पाहुणे त्यांच्यासाठी आहे.

NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिकेतील भरतीतील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा खालील प्रमाणे.

 • क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कायमस्वरूपी दुचाकी चालवण्याचा परवाना असावा त्याचप्रमाणे उमेदवार दुचाकी चालवण्यास सक्षम असावा. उमेदवाराने NTEP मध्ये काम केलेला एक वर्षाचा अनुभव असावा.
 • क्षयरोग आरोग्य पाहुणे या पदासाठी उमेदवारांनी विज्ञानात इंटरमिजिएट (10+2) आणि त्याचबरोबर MPW / LHV / ANM / आरोग्य कर्मचारी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे आरोग्य शिक्षण / काउंसलिंग यामध्ये काम केलेल्या अनुभव पाहिजे. त्याचबरोबर MPW किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्ससाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे.
 • वरील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत पाहिजे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवाराचे वय 43 वर्षापर्यंत पाहिजे.
 • नागपूर महानगरपालिका येथील सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 रुपये ते 20000 रुपये मासिक वेतन मिळेल.
 • नागपूर महानगरपालिकेतील सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडून कोणतीही शुल्क घेण्यात येणार नाही.
 • भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज “शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसीडेंसी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर 440001.” या पत्त्यावर पाठवावा.
 • नागपूर महानगरपालिकेतर्फे 13 मार्च 2024 ही अर्ज करण्यासाठी दिलेली शेवटची तारीख आहे.
 • नागपूर महानगरपालिके द्वारे सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • उमेदवाराने अर्ज पाठवत असताना 13 मार्च 2024 या अंतिम तारखेच्या आत मध्ये अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे. अंतिम तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील नियम वाचा.

 • नागपूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत नागपूर महानगरपालिकेत द्वारे राबविण्यात आलेली नाही.
 • उमेदवाराने अर्ज करत असताना आधार कार्ड वरती असणारे स्वतःचे नाव, जन्मतारीख, पत्ता, पिनकोड आणि स्वतःच्या वैयक्तिक माहिती ऑफिशियल कागदपत्रांवर आहे तसेच भरावी. यात काही चुकी झाली तर त्याला नागपूर महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
 • 13 मार्च 2024 ही नागपूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेत द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • नागपूर महानगरपालिका भरती साठी अर्ज केलेले उमेदवार फक्त पात्र असतील.
 • नागपूर महानगरपालिका कोणत्याही उमेदवाराला TA/DA देणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती नागपूर महानगरपालिके द्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल.
 • सदरील भरती मध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करायची याची पूर्णपणे जबाबदारी नागपूर महानगरपालिका असेल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला प्रथम भेट देऊन काळजीपूर्वक माहिती वाचावी.
NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिका भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
 • नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्यावा.
 • डाउनलोड केलेला अर्ज काळजीपूर्वक भरावा. त्यामध्ये स्वतःचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि स्वतःची वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी.
 • हा अर्ज डाउनलोड करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेत द्वारे दिलेल्या https://www.nmcnagpur.gov.in/key-information/nuhm या पोर्टल वरती जाऊन डाऊनलोड करावा.
 • डाउनलोड केलेला अर्ज भरल्यानंतर तो पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून. नागपूर महानगरपालिका यांच्या द्वारे दिलेल्या “शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसीडेंसी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर 440001.” या पत्त्यावर पोहोचवावा.
 • या भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड करायची प्रणाली नागपूर महानगरपालिकेत द्वारे ठरवण्यात येईल. आणि त्यानुसार उमेदवाराची निवड केली जाईल
NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिका 2024 भरती संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे.
 • नागपूर महानगरपालिकेत द्वारे होणारी ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानासाठी होणार आहे.
 • राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम यासाठी सदरील पदांची भरती होणार आहे.
 • कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेल्फेअर सोसायटी, आरोग्य विभाग, सिविल लाईन, नगरपालिका नागपुर यांच्याद्वारे ही भरती आयोजित केलेली आहे.
 • सदरील भरतीतील पदे ही कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.
 • दिनांक 01 मार्च 2024 ते दिनांक 13 मार्च 2024 यादरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
 • शासकीय सुट्ट्या च्या दिवशी उमेदवारांनी आपले अर्ज जमा करण्यास करिता दिलेल्या पत्त्यावर येऊ नये.
 • दिलेल्या अंतिम तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • www.nmcnagpur.gov.in हे संकेतस्थळ नागपूर महानगरपालिकेचे ऑफिशियल संकेत स्थळ आहे.
 • उमेदवाराने आपला अर्ज आणि आवश्यक प्रमाणपत्रे ( ट्रू कॉपी ) दिलेल्या पत्त्यावर ती पोहोचवाव्यात.
 • सदरील भरती ही आरक्षणानुसार म्हणजेच जातीच्या प्रवर्गाच्या जागांना अनुसरून होणार आहे.
 • वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदासाठी एक जागा रिक्त आहे. ही जागा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारा करीत आहे.
 • टीबी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी एकूण दोन जागा आहेत. या दोन जागा विमुक्त जाती (A) या प्रवर्गात आहे.
 • ई-मेल द्वारे आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करू नये.
NMC Nagpur Bharti 2024 | नागपूर महानगरपालिके संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

1948 रोजी अस्तित्वात आलेला नागपूर महानगरपालिका अधिनियम याच्या द्वारे नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम द्वारे नागपूर महानगरपालिका नियंत्रणात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना नागरी सुविधा देण्याचे काम नागपूर महानगरपालिकेचे आहे. यामध्ये पाणीपुरवठा करणे, सांडपाण्याचे नियोजन करणे, कचऱ्याचे नियोजन करणे, झोपडपट्टी सुधारणा करणे, राखीव जागेचे नियोजन करणे, रस्ते बनवणे आणि त्याची देखरेख करणे, रस्त्यावर लाईटची सुविधा देणे, बाग बगीचा यांचे नियोजन सांभाळणे, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा देणे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त हे महानगरपालिकेचे मुख्य असतात. नागपूर महानगरपालिकेला इतर संस्थांशी संलग्न होऊन काम करावे लागते. त्यामध्ये एनआयटी, म्हाडा, एमएसआरटीसी, ट्राफिक पोलीस, एमपीसीबी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.

महानगरपालिकेची स्थापना ही 1951 रोजी झालेली आहे. आज नागपूर महानगरपालिकेला 73 वर्षे झालेले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे कमिशनर डॉ. अभिजीत चौधरी आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या एकूण 151 जागा नगरसेवक पदाचे आहेत. सध्या निवडून आलेला उमेदवारांचा कार्यकाल संपल्यामुळे सरकारी नियमाखाली नागपूर महानगरपालिका काम करत आहे.

सुरुवातीला नागपूर हा बॉम्बे स्टेट चा भाग होता. 1864 रोजी नागपूर मुन्सिपल कौन्सिलची स्थापना झालेली होती. सुरुवातीला 15.5 sq.km इतक्या क्षेत्रफळाचा भाग नागपूर महानगरपालिकेमध्ये येत होता. त्यानंतर 1951 रोजी नागपूर मुन्सिपल कौन्सिलची नागपूर महानगरपालिकेत रूपांतर झाले. 1960 रोजी नागपूर महानगरपालिका महाराष्ट्र राज्याचा एक घटक झाली.

नागपूर महानगरपालिका 10 विभागामध्ये विभागलेली आहे. हे 10 विभाग खालील प्रमाणे आहेत.

 1. लक्ष्मीनगर
 2. धरमपेठ
 3. हनुमान नगर
 4. धंतोली
 5. नेहरू नगर
 6. गांधीबाग
 7. सतरंजीपुरा
 8. लकडगंज
 9. अशी नगर
 10. मंगळवारी

नागपूर महानगरपालिकेत द्वारे नगरसेवक निवडीकरिता निवडणुका घेतल्या जातात. महापौर पदाची निवड ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यांच्याद्वारे केली जाते. नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 38 वार्ड आहेत. प्रत्येक वर्गामध्ये चार नगरसेवक आहेत.

2017 रोजी झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाचे 108 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 29 नगरसेवक निवडून आले. बहुजन समाज पार्टीचे 10 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नगरसेवक निवडून आला. आणि अपक्ष एक नगरसेवक निवडून आला. असे एकूण 151 नगरसेवक आहेत.

1948 रोजी आलेल्या सीएनसी ॲक्टनुसार नागपूर महानगरपालिकेकडे नागपूर शहरातील नागरिकांना नागरी आणि शहरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यातील जबाबदारीची कामे खालील प्रमाणे.

 1. नागरिकांकरिता रस्ता, पूल बांधणे आणि त्याची निगराणी करणे.
 2. शालेय शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या शाळा उभा करणे.
 3. पाण्याचे शुद्धीकरण करणे आणि पुरवठा करणे.
 4. हॉस्पिटल सेवा देणे.
 5. रस्त्यावरील लाईट लावणे.
 6. मोकळ्या जागा आणि बगीचे यांची देखभाल करणे.
 7. शहरांमध्ये स्वच्छता ठेवणे आणि कचऱ्याचे योग्य नियोजन करणे.
 8. शहरातील नवीन भागाची सुधारणा करणे.
 9. जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणे.

नागपूर महानगरपालिका येणारा महसूल खालील प्रमाणे आहे

 1. लोकल बॉडी टॅक्स
 2. मालमत्ता कर
 3. मनोरंजन कर
 4. व्यवसाय कर
 5. जाहिरात कर

नागपूर महानगरपालिका करा व्यतिरिक्त येणारा महसूल खालील प्रमाणे.

 1. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून येणारा निधी
 2. पाणी वापराचे बिल
 3. कागदपत्रांसाठी घेतलेली फी
 4. महानगरपालिकेच्या मालमत्ता चे भाडे
 5. महानगरपालिका करारा पासून मिळणारे फंड.

सध्या नागपूर महानगरपालिकेचे 217.56 sq.km इतके क्षेत्रफळ आहे. शहराची सध्याची लोकसंख्या 31 लाख इतकी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर महाला महानगरपालिकेचे मुख्यालय हे सिव्हिल लाईन, नागपूर येथे आहे. नागपूर महानगरपालिकेत संदर्भात अधिक माहितीसाठी www.nmcnagpur.gov.in या महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.

नागपूर महानगरपालिके प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर कोणत्याही महानगरपालिकेच्या पदांच्या भरतीसाठी अधिक माहितीसाठी आमच्या नोकरी फस्ट या संकेतस्थळाला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment