[ Marchants Co-op Bank Bharti 2024 ] दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई लिमिटेड येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती द्वारे प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. भरती द्वारे एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई लिमिटेड [ Marchants Co-op Bank Bharti 2024 ] येथील भरतीसाठी एकूण 16 जागा रिक्त आहेत.
- प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक या पदांसाठी सदरील भरती आयोजित केलेली आहे.
- प्रशासकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराचा MS-CIT हा कोर्स पूर्ण झाला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे बँकिंग मधील काम केलेल्या चा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- लेखापाल या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराचा MS-CIT कोर्स पूर्ण झालेला पाहिजे. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये कनिष्ठ पदावर काम केलेल्या तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
- [ Marchants Co-op Bank Bharti 2024 ] शाखा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर MS-CIT प्रमाणपत्र पाहिजे. बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये काम केलेल्या कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केली पाहिजे. त्याचप्रमाणे MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. कामाचा कमीत कमी तीन वर्षे अनुभव पाहिजे.
- लिपिक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना तीन वर्षाचा बोंड बनवावा लागेल. तसेच 50,000 रुपये इतकी रक्कम बँकेत डिपॉझिट करावी लागेल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सटाणा ( नाशिक ) असेल.
- लिपिक पदासाठी [ Ma rchants Co-op Bank Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क 944 रुपये राहील. तर इतर सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 590 रुपये राहील.
- दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
[ Marchants Co-op Bank Bharti 2024 ] दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सदरील भरतीसाठी [ Marchants Co-op Bank Bharti 2024 ] ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
- 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 14 मे 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.