NALCO Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे निघालेल्या भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे 277 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 02 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी सदरील भरती निघालेली आहे. एकूण सहा शाखेतील अभियंत्यांसाठी ही भरती आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी, केमिकल, केमिस्ट्री या अभियांत्रिकी शाखांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज हे फक्त ऑनलाइन पोर्टल द्वारे स्वीकारले जातील. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या संस्थेमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड साठी होणारी भरती ही एकूण 277 जागांसाठी होणार आहे.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी भरती होणार आहे.
NALCO Bharti 2024 | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मार्फत उपलब्ध रिक्त पदे खालील प्रमाणे.
- उपलब्ध सर्व पदे ही पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी आहेत. पण त्यांची विभागणी अभियांत्रिकी शाखा प्रमाणे खालील प्रमाणे आहे.
- मेकॅनिकल या शाखेसाठी 127 जागा रिक्त आहेत.
- इलेक्ट्रिकल या शाखेसाठी 100 जागा रिक्त आहेत.
- इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेसाठी 20 जागा रिक्त आहेत.
- मेटलर्जी या शाखेसाठी 10 जागा रिक्त आहेत.
- केमिकल या शाखेसाठी 13 जागा रिक्त आहेत.
- केमिस्ट्री (YC) या शाखेसाठी सात जागा रिक्त आहेत.
- वरील पदांकरिता शिक्षणाची अट ही 65% गुणासह बी.ई / बी.टेक किंवा एमएससी ( केमिस्ट्री) प्राप्त झालेली असावी. SC, ST, PWD या कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांसाठी 55% गुणांनी सदरील पदवी प्राप्त झालेली असावी. त्याचप्रमाणे उमेदवाराने 2023 सालची रोजी GATE ची एक्झाम दिलेली असावी.
- 02 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असले पाहिजे. SC/ST कॅटेगिरी च्या उमेदवारांना पाच वर्ष वयाची सूट राहील. त्याचप्रमाणे OBC कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष सूट राहील.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 40,000 ते 1 लाख 40 हजार रुपये पर्यंत असेल.
- निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी करण्याचे ठिकाण भुवनेश्वर असेल. हे ठिकाण ठरवण्याचे काम नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड द्वारा केले आहे.
- सदरील भरतीसाठी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या संस्थेने परीक्षा फी फक्त ₹500 ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे SC,ST आणि PWD कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी परीक्षा फी ही फक्त ₹100 आहे.
- या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड दिलेल्या ऑनलाइन. पोर्टल चा उपयोग करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे भरतीसाठी ( NALCO Bharti 2024 ) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांनी या तारखेच्या आत अर्ज करावेत.
- या भरतीसाठी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड द्वारा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या संस्थेद्वारे अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक दिलेली आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा
NALCO Bharti 2024 | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे घेण्यात येणाऱ्या भरती साठी खालील नियम वाचा.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे अर्ज करण्याची फक्त ऑनलाइन पद्धत उपलब्ध आहे.
- कंपनीद्वारे अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत राबविण्यात आलेली नाही. याची नोंद सर्वांनी घ्यावी.
- भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, आपला शैक्षणिक तपशील, अनुभवाचे प्रमाणपत्र ही माहिती बरोबर लिहिलेली आहे का हे तपासूनच अर्ज भरावा. यामध्ये जर काही चुकीचे आढळले तर याला ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
- भरती साठी अर्ज करताना उमेदवारांनी दक्षता घ्यावी. 2 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात अर्ज करण्याअगोदर सर्वांनी वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
NALCO Bharti 2024 | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड द्वारे उमेदवारांना कोणताही TA/PA दिला जाणार नाही. याची दखल उमेदवारांनी घ्यावी.
- उमेदवारांनी परीक्षेसाठी आल्यानंतर शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावरील नियमांचे पालन करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार केला गेला. तर त्या उमेदवारावर नॅशनल ॲल्युमिनियम लिमिटेड द्वारा कायदेशीर कारवाई केली जाईल.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या आधी काही दिवस परीक्षा केंद्र कळवले जाईल. त्याचप्रमाणे परीक्षेला बसण्याकरिता हॉल तिकीट सुद्धा पुरवले जाईल.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये येणे गरजेचे आहे.
NALCO Bharti 2024 | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड द्वारा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली लिंक वरती क्लिक करा.
- एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोच्या उजव्या कोपऱ्यात नालको असे मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहिलेले दिसेल. त्याच्या खालील असलेला फॉर्म भरूनच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड च्या वेबसाईटला जर तुम्ही या आधी रजिस्ट्रेशन केले असेल तर डायरेक्ट युजरनेम, पासवर्ड आणि कॅपच्या भरून लॉगिन करू शकता.
- जर तुम्ही या वेबसाईट वरती नवीन असाल तर तुम्हाला न्यू यूजर म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी फार्मच्या डाव्या कोपऱ्यामध्ये न्यू युजर रजिस्ट्रेशन असे ज्या ठिकाणी लिहिलेले आहे. तेथे क्लिक करा
- यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. त्या विंडोच्या डाव्या बाजूला रजिस्ट्रेशन करताना काय काळजी घ्यायची आहे. हे लिहिलेले आहे. तर उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन करण्याचा फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म भरण्याआधी रजिस्ट्रेशन साठी काय काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूया.
- नवीन उमेदवारांनी स्वतःला रजिस्टर करताना स्वतःचा चालू असणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चा वापर करावा.
- उमेदवाराने स्वतःचा आधार कार्ड नंबर बरोबर टाकावा आणि शाळेच्या दाखल्या वरील जन्मतारीख जी आहे तीच टाकावी.
- नवीन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना वापरलेला युजर आयडी आणि ईमेल आयडी हे दोन्ही सारखेच असायला हवेत.
- उमेदवाराचे पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख 12 वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरील, युजर आयडी आणि मेल आयडी, पासवर्ड आणि पासवर्ड चे कन्फर्मेशन, मोबाईल नंबर वरील ओटीपी, सुरक्षा प्रश्न आणि त्याचे उत्तर इत्यादी गोष्टी उमेदवाराने रजिस्ट्रेशन करताना फार्म मध्ये भरायचे आहेत.
- उमेदवाराने स्वतःचा प्रोफाइल फोटो अपलोड करत असताना सध्याचा पासपोर्ट साईज फोटो वापरावा. त्या फोटोचा फॉरमॅट jpg/jpeg असावा. या फोटोची साईज 100kb पेक्षा कमी असावी. फोटोची लांबी रुंदी ही दिलेल्या नियमाप्रमाणे असावी (100 px X 100 px )
- मी स्वतःचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्वतःचे अकाउंट ऍक्टिव्हेट करणे गरजेचे आहे. हे अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी रजिस्टर ई-मेल आयडी वरती ॲक्टिवेशन लिंक पाठवलेली असते. त्या लिंक वर क्लिक करून उमेदवारांनी आपले अकाऊंट ऍक्टिव्हेट करून घ्यायचे आहे. जर असे केले नाही तर तुमचे अकाउंट हे कायमस्वरूपी डी ऍक्टिव्हेट होणार त्यामुळे तुम्हाला लॉगिन करता येणार नाही.
- अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर उमेदवार लॉगिन करू शकतात. त्यासाठी युजरनेम म्हणजेच उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या फील करावा आणि लॉगिन बटनावर क्लिक करून लॉगिन व्हावे.
NALCO Bharti 2024 | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड संदर्भात माहिती खालील प्रमाणे.
नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड ही भारत सरकारची संस्था आहे. सेक्टर कंपनीमधील ही कंपनी खाणकाम, धातू, ऊर्जा या क्षेत्रामध्ये काम करत आहे. 51.28% इतका कंपनीमध्ये शेअर भारत सरकारचा आहे. भारत सरकारच्या खान मंत्रालय द्वारे ही संस्था नियंत्रित केली जाते. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय हे भुबनेश्वर, ओडिसा या ठिकाणी आहे. या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीधर पत्रा हे आहेत. या कंपनीद्वारे बॉक्साईट, ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम हायड्रेट या खनिजांचे उत्खनन केले जाते. वार्षिक महसूल कंपनीचा 1410 कोटी पर्यंत जातो. त्यातून कंपनीला 2955 कोटी इतका नफा राहतो. कंपनीची एकूण मालमत्ता 14550 कोटी इतकी आहे. या कंपनीमध्ये एकूण 6500 कामगार आहेत.
बॉक्साईट आणि ॲल्युमिनियमच्या उत्खननात ही देशातील एक नंबरची कंपनी आहे. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम वरती प्रक्रिया करणे, वीज निर्मिती, रेल्वे आणि बंदर सांभाळण्याची कामे या कंपनीकडे आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वात कमी किमतीत बॉक्साईट आणि ॲल्युमिनियम उपलब्ध करून देणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे. कंपनीच्या एकूण कमाईच्या 42% उत्पन्न हे कंपनीला उत्पादन एक्सपोर्ट करून मिळते.
नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड ही कंपनी आता रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी पवनचक्कीच्या माध्यमातून 198 MW इतकी वीज निर्माण केली आहे. कंपनीचे विंड पॉवर तयार करण्याचे प्लांट हे देशात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यापैकी आंध्र प्रदेशातील गांधीकोटा, राजस्थान मधील जैसलमेर, महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी कंपनीने पवनचक्की उभारलेले आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय हे भुवनेश्वर येथे आहे. तर कंपनीची रिजनल कार्यालय हे कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बेंगलोर या ठिकाणी आहेत. विंड पॉवर व्यतिरिक्त कंपनी थर्मल पावर, को-जनरेशन पावर, सोलर पावर क्षेत्रातून सुद्धा ऊर्जा निर्माण करत आहे.
नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड रिपब्लिक सेक्टर मधील कंपनी असल्यामुळे राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत लोकांकडून कंपनीला विविध शंका आणि प्रश्न विचारले जातात. या सर्वांची योग्य उत्तरे देणे कंपनीला बंधनकारक आहे.
भारतातील सरकारी, खाजगी, पब्लिक सेक्टर मधील संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांकरिता निघालेल्या भरती बद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट जा वेबसाईट ला भेट द्या- क्लिक करा