NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन येथे 93 जागा रिक्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NBCC Bharti 2024 | मित्रांनो आज आपण नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन येथे 93 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन या संस्थेने 93 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 07 मे 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती ही महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( लॉ), कनिष्ठ अभियंता इत्यादी पदांसाठी होणार आहे. या भरती करिता ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या संकेतस्थळावरून अर्ज करावा.

NBCC Bharti 2024

  • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या संस्थेची भरती एकूण 93 जागांकरिता आहे.
  • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन संस्थेतील भरतीसाठी ची रिक्त पदे खालील प्रमाणे.

NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन येथील भरतीतील रिक्त पदे

  • 1] महाव्यवस्थापक पदासाठी तीन जागा रिक्त आहेत.
  • 2] अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
  • 3] उपमहाव्यवस्थापक पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  • 4] व्यवस्थापक पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
  • 5] प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी तीन जागा रिक्त आहेत.
  • 6] उपव्यवस्थापक पदासाठी सहा जागा रिक्त आहेत.
  • 7] उप प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
  • 8] वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी या पदाकरिता 30 जागा रिक्त आहेत.
  • 9] व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( लॉ) या पदासाठी चार जागा रिक्त आहेत.
  • 10] कनिष्ठ अभियंता या पदासाठी 40 जागा रिक्त आहेत.

NBCC Bharti 2024 | बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन येथील भरतीसाठी शिक्षणाची आणि वयाची अट खालील प्रमाणे

  • 1] महाव्यवस्थापक पदासाठी 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी ( सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / आर्किटेक्चर) त्याचप्रमाणे 15 वर्ष अनुभव गरजेचा आहे. या पदासाठी वयाची अट 49 वर्षापर्यंत आहे.
  • 2] अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी इंजिनिअरिंग पदवी ( आर्किटेक्चर) किंवा सीए/ ICWA / एमबीए ( फायनान्स) / PGDM (Finance ) ही शिक्षणाची अट आहे. त्याचप्रमाणे 12 वर्ष अनुभव गरजेचा आहे. या पदासाठी वयाची अट 45 वर्षापर्यंत आहे.
  • 3] उपमहाव्यवस्थापक पदासाठी 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी ( सिव्हील ) ही शिक्षणाची अट आहे. त्याचप्रमाणे नऊ वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयाची अट 41 वर्षापर्यंत आहे.
  • 4] व्यवस्थापक पदासाठी 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी (आर्किटेक्चर) ही शिक्षणाची अट आहे. त्याचप्रमाणे 06 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयाची अट 37 वर्षापर्यंत आहे.
  • 5] प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी ( सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ) त्याचप्रमाणे 06 वर्ष अनुभव गरजेचा आहे. या पदासाठी वयाची अट 37 वर्षापर्यंत आहे.
  • 6] उपव्यवस्थापक पदासाठी 60% गुणासह एमबीए / MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी / PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( सिव्हील / इलेक्ट्रिकल ) ही शिक्षणाची अट आहे. त्याचप्रमाणे 03 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयाची अट 33 वर्षापर्यंत आहे.
  • 7] उप प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी ( सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ) त्याचप्रमाणे 03 वर्ष अनुभव गरजेचा आहे. या पदासाठी वयाची अट 33 वर्षापर्यंत आहे.
  • 8] वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी या पदाकरिता 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी ( सिव्हील / इलेक्ट्रिकल ) त्याचप्रमाणे 02 वर्ष अनुभव गरजेचा आहे. या पदासाठी वयाची अट 30 वर्षापर्यंत आहे.
  • 9] व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लॉ) या पदाकरिता 60% गुणासह एलएलबी पदवी. या पदासाठी वयाची अट 29 वर्षापर्यंत आहे.
  • 10] कनिष्ठ अभियंता 60% गुणासह इंजिनिअरिंग डिप्लोमा ( Civil / Electrical ) पदवी. या पदासाठी वयाची अट 28 वर्षापर्यंत आहे.
  • 07 मे 2024 रोजी दिलेले वय पूर्ण पाहिजे. एस सी आणि एसटी कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे सूट आहे. तर ओबीसी साठी तीन वर्षे सूट आहे.
  • बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या भरतीमध्ये निवड झालेल्या 93 उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन साठी निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
  • या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क 500 ते 1000 रुपये राहील. त्याचप्रमाणे ST/SC/PWD साठी शुल्क राहणार नाही.
  • या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
  • बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या या संस्थेमार्फत अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 मे 2024 ही आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्याअगोदर नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या संस्थेने भरतीसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा
  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ने लिंक दिलेली आहे. त्यासाठी येथे क्लिक करा

NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती करिता खालील नियम वाचा.

  • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या करिता फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन च्या वतीने ठेवण्यात आलेली नाही.
  • भरती करिता अर्ज करण्यासाठी आपली जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, नाव आणि त्याचप्रमाणे इतर वैयक्तिक माहिती बरोबर आहे का तपासावी. माहिती चुकल्यास त्यास नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन जबाबदार राहणार नाही.
  • 07 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • जे इच्छुक उमेदवार नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी.
NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना पहा.
  • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या परीक्षेकरिता अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
  • TA/DA कोणत्याही प्रकारे मिळणार नसल्याचा दावा नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन च्या वतीने करण्यात आला आहे.
  • कोणताही अनुसूचित प्रकार उमेदवाराने परीक्षा केंद्रावर केल्यास केंद्राद्वारे व नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन च्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन च्या वतीने देण्यात आलेले हॉल तिकीट घेऊनच परीक्षाला यावे. परीक्षा केंद्र हे संस्थेमार्फत ठरवण्यात येईल.
  • या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे.
NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
  1. सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा – https://nbccindia.in/rec/
  2. लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये डाव्या कोपऱ्यात NBCC चा लोगो असेल आणि Recruitment Portal अशी हेडलाईन मध्यभागी दिसेल. उजव्या बाजूला कॅंडिडेट लोगिन चा फॉर्म दिसेल. त्यामध्ये लॉगिन आयडी, पासवर्ड आणि कॅपच्या तुम्हाला भरणे गरजेचे आहे. जर तुमचे रजिस्ट्रेशन अगोदरच झाले असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता. पण नवीन कॅंडिडेट ना रजिस्टर करणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  3. न्यू रजिस्ट्रेशन बटना वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन टप्पे तुम्हाला दिसतील. पहिला म्हणजे पोस्ट सिलेक्ट करणे आणि दुसरा म्हणजे पर्सनल माहिती देणे. सुरुवातीला तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात ती पोस्ट सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट बटन वरती क्लिक करा.
  4. नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरण्यासाठी फॉर्म दिसेल. फॉर्म मध्ये आपले पूर्ण नाव, वडिलांचे नाव, कोणत्याही प्रकारचे असलेले अपंगत्व, कॅटेगरी, जन्मतारीख, वय, लिंग, वैवाहिक माहिती, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, आधार नंबर, धर्म यांसारखी माहिती भरायची आहे. त्यानंतर स्वतःचा पत्ता, राज्य, शहर आणि पिन कोड हे सुद्धा भरायचे आहे. त्यानंतर सेव्ह बटन वरती क्लिक करावे. तुम्ही टाकलेल्या ई-मेल वरती ओटीपी सेंड केला जाईल तो ओटीपी तपासून टाकावा.
  5. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज भरण्याकरिता दिलेल्या लिंक वरती क्लिक करावी तेथे आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावा. आणि आपला अर्ज भरावा
NBCC Bharti 2024 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन संस्थेबद्दल माहिती  खालील प्रमाणे

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ही एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी आहे. यालाच NBCC लिमिटेड असेही म्हणतात. गृहनिर्माण आणि शहरी व्यापार मंत्रालय भारत सरकार च्या नियंत्रणाखाली नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन काम करत असते. याची स्थापना भारतामधील नवी दिल्ली येथे झाली होती. सध्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि एमडी sh. K P M Swamy हे आहेत. तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राकेश गुप्ता हे आहेत.

या संस्थेचा वार्षिक महसूल 5210 कोटी इतका आहे. त्यातील एकूण उत्पन्न 80 कोटी इतकी आहे. संस्थेची मालमत्ता 7800 कोटी इतकी आहे. या संस्थेमध्ये एकूण 1496 कर्मचारी काम करत आहेत. तर याचा मालकी हक्क गृहनिर्माण आणि शहरी व्यापार मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे आहे. या संस्थेचे संकेतस्थळ www.nbccindia.in हे आहे.

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ही संस्था प्रामुख्याने तीन क्षेत्रांमध्ये सेवा देत आहे. त्यातील पहिली म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि ग्रामीण भागातील सरकारी प्रॉपर्टी अरे डेव्हलप करण्याचे काम करते. दुसरे काम म्हणजे इंजिनियर्स च्या सल्ल्यानुसार बांधकाम करते. आणि तिसरे काम म्हणजे मालमत्ता खरेदी मध्ये काम करते.

त्याचप्रमाणे मिनी रत्न हॉस्पिटल कन्सल्टन्सी ही वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेचे 100% शेअर हे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन कडे आहेत. हिंदुस्तान स्टील वर्क कन्स्ट्रक्शन लिमिटेड या संस्थेचे 51% शेअर्स नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन कडे आहेत. संपूर्ण भारतामध्ये संस्थेची एकूण 31 रिजनल कार्यालय आहेत. आणि मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. भारत सोडून इतर देश म्हणजे आफ्रिका, दुबई, ओमान, यमन, मालदीव, टर्की, मोरेसिस, नेपाळ, इराक, लिबिया या देशांमध्ये संस्थेचे काम सुरू आहे. त्यामध्ये रोड बनवणे, रेल्वे स्टेशन उभा करणे, हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बनवणे, पूल बांधणे, औद्योगिक आणि पर्यावरणासंदर्भात असणाऱ्या इमारती बांधणे ही कामे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ही संस्था करते.

भारत सरकारचे अटल मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट यांसारख्या मिशनमध्ये नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन चा सहभाग आहे.

नोकरी संदर्भात भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या- क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment