PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरती

PCMC Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे एक जागा साठी भरती निघाली आहे. संबंधित एक जागा ही सल्लागार पदासाठी रिक्त आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी नमूद केलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा समक्ष हजर राहून अर्ज करावा.

PCMC Bharti 2024

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे फक्त एक जागा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सल्लागार या पदासाठी ही भरती आहे.

PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी शिक्षणाची आणि वयाची अट खालील प्रमाणे

  • सल्लागार या पदासाठी रेप टाइल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी या क्षेत्रातील कामाचा कमीत कमी 10 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे, वन्यजीव सल्लागार म्हणून उमेदवाराने शासकीय स्तरावर काम केलेले अनुभव पाहिजे, साप आणि इतर वन्यजीव या क्षेत्रात काम केलेल्या चा किमान 10 वर्षे अनुभव पाहिजे.
  • पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत या पदाची भरती निघालेली आहे. या पदाचा कार्यकाल हा दोन वर्षा करिता आहे. जर हा कार्यकाल कमी करायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर याची पूर्ण जबाबदारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिके वरती राहणार आहे.
  • पिंपरी-चिंचवड येथील संभाजीनगर या ठिकाणी असणारे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय या ठिकाणी सल्लागार हे पद हंगामी स्वरूपात भरायचे आहे.
  • या भारती द्वारे निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड महानगरपालीके द्वारे मासिक मानधन 70,000 रुपये इतके देण्यात येणार आहे.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे सल्लागार पदासाठी नेमलेल्या उमेदवारासाठी संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड हे नोकरीचे ठिकाण राहील.
  • या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • “माननीय आयुक्त यांचे नवे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह ( कामगार भवन), नेहरू रोड, पिंपरी – 18” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी पत्राद्वारे किंवा समक्ष जाऊन अर्ज करावा.
  • चिंचवड महानगरपालिका येथे सल्लागार पदाच्या भरतीसाठी पत्राद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे.
  • या भरती करिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रसिद्ध केलेली जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  • या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे पत्राद्वारे आणि समक्ष हजर राहुन काळजीपूर्वक अर्ज करावा.

PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील सल्लागार पदासाठी फक्त ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रणाली ठेवण्यात आलेली नाही.
  • ऑफलाइन अर्ज करत असताना आपली वैयक्तिक माहिती आपले नाव, आपला पत्ता, जन्मतारीख, गाव, पिनकोड इत्यादी माहिती बरोबर लिहावी. जर चुकीची माहिती पुरवली गेली तर त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 4 मार्च 2024 आहे.
  • या भरती करता सल्लागार पदाची निवड करण्यासाठी 5 मार्च 2024 रोजी दुपारी एक वाजता उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
  • “मा. स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, महानगरपालिका मुख्य इमारत, जुना पुणे-मुंबई रोड, पिंपरी-चिंचवड , पिंपरी – 18” या पत्त्यावर दुपारी एक वाजता दिनांक 5 मार्च 2020 रोजी मुलाखतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी उपस्थित रहावे.

PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • भरतीसाठी [PCMC Bharti 2024] अर्ज केलेल्या उमेदवारांनाच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सल्लागार पदाच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहता येईल.
  • मुलाखतीला हजर राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा TA/DA उमेदवारांना मिळणार नाही. अशी सूचना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे देण्यात आली आहे.
  • ऑफलाइन अर्ज करायच्या ठिकाणी किंवा मुलाखतीच्या ठिकाणी उमेदवारांकडून कोणताही अनुचित प्रकार केला गेला तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीला येताना शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे.
  • सल्लागार पदासाठी ठरवून दिलेल्या पात्रते प्रमाणे मुलाखतीला प्रश्न विचारले जातील. त्यावरून सल्लागार पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाईल.
  • सल्लागार पदासाठी केली जाणारी नेमणूक ही तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने कायमस्वरूपी नोकरीची हमी बाळगू नये. हंगामी स्वरूपाच्या म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपाच्या केल्या जाणाऱ्या नेमणुकी मध्ये या पदाची नेमणूक आहे.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जेव्हा या पदाची गरज लागणार नाही. तेव्हा कोणत्याही नोटीस शिवाय उमेदवाराला या पदावरून दूर करण्यात येईल. आणि त्याचे मासिक मानधन थांबवण्यात येईल.
  • उमेदवाराचे दोन रंगीत फोटो अर्जासोबत जोडावे. अर्ज लिफाफ्यात घालून त्या लिफाफ्यावर सल्लागार पदासाठी अर्ज असे नमूद करावे.
  • उमेदवाराने आपल्या झालेल्या शिक्षणाचा पुरावा म्हणून शैक्षणिक कागदपत्रांची प्रत अर्जासोबत जोडावी.
  • उमेदवाराकडे आतापर्यंत असलेला अनुभव दाखवण्यासाठी. अनुभवाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
  • मुलाखतीला येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता उमेदवाराला दिला जाणार नाही. याची खबरदारी उमेदवारांनी घ्यावी.
PCMC Bharti 2024 | चिंचवड महानगरपालिका कलाकार पदासाठी भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरता ऑफलाइन पद्धतीचा वापर करावा. यासाठी पत्राने किंवा समक्ष हजर राहुन अर्ज करावा.
  • अर्ज लिहीत असताना उजव्या कोपऱ्यामध्ये चालू तारीख लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रति या ठिकाणी “माननीय आयुक्त यांचे नवे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह ( कामगार भवन), नेहरू रोड, पिंपरी – 18” हा पत्ता लिहावा.
  • यानंतर अर्जामध्ये विषय लिहावा त्यात सल्लागार पदासाठी नेमणूक करण्यासंदर्भात विषय लिहावा.
  • यानंतर अर्ज लिहायला सुरुवात करावा सुरुवातीला आपले नाव पत्ता इत्यादी गोष्टी सांगून आपण का अर्ज करत आहोत ? कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत? आपल्याला या भरती संदर्भात माहिती कोठून मिळाली? याबद्दल माहिती लिहावी. त्यानंतर उमेदवाराने आत्तापर्यंत जे शिक्षण घेतलेले आहे. त्या शिक्षणाचा संपूर्ण तपशील लिहावा. त्यानंतर आतापर्यंत कोणत्या प्रकारचे काम केले. व कोणत्या ठिकाणी केले यासंदर्भात माहिती लिहावी. आतापर्यंतचा आपला अनुभव किती वर्षाचा आहे? कोणत्या क्षेत्रांमध्ये अनुभव आहे? याबद्दल माहिती लिहावी. आपण सल्लागार पदासाठी इच्छुक असल्याची आणि त्यासाठीच अर्ज करत आहोत असे पत्राद्वारे सांगावे. त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे नाव आणि सही करावी.
  • अर्ज लिहून झाल्यानंतर अर्जाला स्वतःचे दोन कलर फोटो जोडावेत, त्यानंतर शिक्षणाचे प्रमाणपत्र अर्जाला जोडावे, आतापर्यंत घेतलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र सुद्धा अर्जाला जोडावे.
  • यानंतर अर्ज आणि इतर कागदपत्रे व दोन कलर फोटो हे सर्व एका लिफाफा मध्ये बंद करावे. लिफाफा त्याच्यावरती सल्लागार पदासाठी अर्ज असे लिहावे आणि तो अर्ज समक्ष सादर करावा. पत्राद्वारे अर्ज करणाऱ्यांनी लिफाफ्यावर ती पत्ता व्यवस्थित लिहावा आणि पोस्टाद्वारे पत्र पाठवावे.
  • अर्ज पाठवल्यानंतर उमेदवारांनी “मा. स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, महानगरपालिका मुख्य इमारत, जुना पुणे-मुंबई रोड, पिंपरी-चिंचवड , पिंपरी – 18” या पत्त्यावर दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
PCMC Bharti 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संस्थेबद्दल माहिती खालील प्रमाणे माहिती खालील प्रमाणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि पुण्याच्या उत्तर पश्चिम भागातील शहरे यांपासून बनलेली आहे. या महानगरपालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली आहे. या महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 181 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे. आणि लोकसंख्या ही 17 लाख 20 हजार इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सर्वाधिकार हे आयुक्तांकडे असतात. त्यांची नेमणूक महाराष्ट्र सरकार द्वारे केली जाते. त्याचप्रमाणे 128 नगरसेवक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत निवडून आलेले असतात. 2020 रोजी कोरोना काळात शेखर सिंह हे महापालिकेचे आयुक्त होते. भारतीय जनता पक्षाचे राहुल जाधव हे महापौर म्हणून निवडून आले होते. उपमहापौर म्हणून सचिन चिंचवडे निवडून आले होते. पालिकेचे कार्यालय जुन्या पुण्या-मुंबई हायवे लगत पिंपरी येथे आहे. www.pcmcindia.gov.in हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ऑफिशियल संकेतस्थळ आहे.

महानगरपालिकेचे मुख्य काम हे लोकांना नागरी सुविधा आणि मूलभूत सोयी लोकांना उपलब्ध करून देणे. हे आहे. महापालिकेच्या प्रशासकीय कामाच्या दोन शाखा आहेत एक शाखा आयुक्तांना द्वारे पाहिली जाते. तर दुसऱ्या शाखेचे प्रतिनिधित्व महापौर यांच्याकडून केले जाते. महापालिकेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. त्यासाठीच पिंपरी-चिंचवड करिता वैयक्तिक पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले आहे. वाहतूक सुविधा साठी या शहरांमध्ये PMPL च्या बसेस आहेत. त्याचप्रमाणे मेट्रो सुद्धा साठी उपलब्ध आहे. महापालिकेचे आयुक्त हे PMPL आणि मेट्रो या दोन्हीचे डायरेक्टर असतात. हे शहर एकूण आठ भागांमध्ये विभागलेले आहे प्रत्येक विभागामध्ये 4 वॉर्ड आहेत. आणि त्यांची 4 क्षेत्रीय कार्यालय आहेत. या कार्यालयाचा कारभार महापालिकेच्या उपयुक्त द्वारे चालवला जातो.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्नाची साधने खालील प्रकारे

महसूल कर मोठ्या प्रमाणात गोळा करून त्याचा उपयोग विकास कामांसाठी केला जातो. खालील कर प्रामुख्याने वसूल केले जातात.

  • मालमत्ता कर
  • व्यावसायिक कर
  • मनोरंजन कर
  • जाहिरात कर
  • पाणीपट्टी
  • कागदपत्रांसाठी आकारलेली फी
  • महापालिकेच्या संपत्तीचे भाडे

यासारख्या करांमधून महापालिकेला उत्पन्न मिळते. या मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा हा कामगारांचे, कर्मचाऱ्यांचे पगार महापालिकेचा दैनंदिन खर्च यासाठी खर्च केले जातात. विकास कामे करण्यासाठी महापालिकेला नगरविकास खात्यातून निधी मिळतो. प्रत्येक वार्डातील विकास कामे करण्यासाठी हा निधी खर्च केला जातो. विकास काम मंजूर करून घेतल्यानंतर त्याचे ई टेंडर निघते आणि त्यानुसार ठेकेदारांना विकास कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर दिली जाते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही देशातील स्वच्छ शहरांपैकी एक शहर आहे. याचं पूर्ण श्रेय महापालिकेला आयुक्तांना, नगरसेवकांना आणि कर्मचाऱ्यांना मिळते. शहरातील रस्ते आणि रस्त्यावरील दिवे यांसारख्या सुविधा महापालिकेने खूप दर्जेदार दिलेले आहेत.

सरकारी नोकरी संबंधात अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – क्लिक करा

 

Leave a Comment