[ NHM Nagpur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे विविध पदांसाठी भरती.

NHM Nagpur Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर या ठिकाणी निघालेल्या भरती संदर्भात विस्तृत माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. ही भरती एकूण तीन जागांसाठी होणार आहे. त्यामध्ये वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी आरोग्य अभ्यागत या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पत्राद्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2024 ही आहे. या तारखेनंतर पत्राद्वारे आलेला कोणताही अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर या भरती बद्दल माहिती जाणून घेणे गरजेची आहे. सदरील भरती बद्दल माहिती खालील प्रमाणे.

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर द्वारे होणारी भरती ही फक्त तीन जागांकरिता आहे.
  • या भरतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदांची नावे खालील प्रमाणे.

NHM Nagpur Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर द्वारे होणाऱ्या भरती मधील पदे आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  1. वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  2. टीबी आरोग्य भागत पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
  • वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक या पदासाठी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवीधर किंवा डिप्लोमा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष. ही पदवी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी दुचाकी चालवण्याचा परवाना आणि दुचाकी चालवण्यास सक्षम असावा. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला संगणक चालवण्याचे ज्ञाना असावे ( कमीत कमी दोन महिन्याचा कोर्स झालेला असावा)
  • टीबी आरोग्य अभ्यागत या पदासाठी विज्ञान शाखेमध्ये पदवीधर असावे. किंवा इंटरमिजिएट (10 + 2) विज्ञान आणि कामगार म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा आरोग्यामध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र असावे. टीबी ओळखण्यास संदर्भातील कोर्स झालेला असावा. संगणक चालवण्याचे ज्ञान असावे ( संगणकाचा कमीत कमी दोन महिने कोर्स झालेला असावा )
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथील भरती मधून निवडून आलेल्या उमेदवारांना वेतन 15,500 रुपये ते 20,000 रुपये प्रतिमहा देण्यात येणार आहे.
  • या भरती मधून निवडून आलेल्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाण हे नागपूर राहील.
  • या भरती करिता कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारण्यात आलेली नाही.
  • “शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोग निदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसिडेंट रोड, महानगरपालिका नागपुर – 440001” या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज पत्राद्वारे, कुरियर द्वारे किंवा समक्ष हजर राहून भरावा. ई-मेल द्वारे केले गेलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचप्रमाणे अंतिम तारखेनंतर पत्राद्वारे मिळालेला अर्ज सुद्धा ग्राह्य धरला जाणार नाही.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या या भरतीची अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 मार्च 2024 ही आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथील कर्मचारी भरतीसाठी अर्ज करण्या अगोदर प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अटी आणि शर्ती व अर्जाचा नमुना कसा असावा..? याबद्दलची माहिती   www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरती उपस्थित आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी अर्जाचा नमुना नक्की पहावा आणि त्यानुसारच अर्ज करावा.

NHM Nagpur Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील नियम वाचा .

  • सदरील भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. त्याचबरोबर हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर कुठे जाऊन जमा करा. किंवा पोस्टाने किंवा कुरियरने दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज जमा करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर यांच्याद्वारे राबविण्यात आलेली नाही. तरी उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता तसेच कोणत्याही ऑनलाइन पोर्टल किंवा लिंक वरती क्लिक करून अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नये.
  • अर्ज भरत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड करू नये. त्याच पद्धतीने स्वतःची वैयक्तिक माहिती म्हणजेच स्वतःचे नाव, पत्ता, पिन कोड, जन्मतारीख, शिक्षण यांसारखी कोणतीही माहिती चुकीची टाकू नये. असे झाल्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर यासाठी जबाबदार राहणार नाही.
  • 13 मार्च 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • भरती करिता अर्ज करण्याअगोदर प्रसिद्ध केलेली जाहिरात व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. ही जाहिरात पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे. जाहिरातीची पीडीएफ डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Nagpur Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी [ NHM Nagpur Bharti 2024 ] अर्ज केलेले उमेदवारच पुढील भरतीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
  • या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपुर द्वारे TA/PA देण्यात येणार नाही.
  • या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला. तर त्या उमेदवारावर राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ती भेट द्या. नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ- www.nmcnagpur.gov.in
NHM Nagpur Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. ज्या उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहोचवणे शक्य आहे. आशा उमेदवारांनी समक्ष उपस्थित राहून अर्ज जमा करावा.
  • नागपूर शहरापासून दूर अंतरावर किंवा महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये राहणारा उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर रजिस्टर डाक द्वारे किंवा कुरियर द्वारे पोहचवावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज पोहोचवण्याचे ठिकाण “शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोग निदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसिडेंट रोड, महानगरपालिका नागपुर – 440001” हे आहे.
  • दिनांक 1 मार्च 2024 ते 13 मार्च 2024 पर्यंत सकाळी 10:00 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज जमा करू शकता. यामध्ये कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज स्वतःच्या मनाने न लिहिता. जो अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसारच अर्ज करावा.
  • ई-मेल द्वारे आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने ई-मेल द्वारे अर्ज करू नये.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथील भरतीसाठी केले जाणारे अर्ज 13 मार्च 2024 नंतर पत्राद्वारे आले. किंवा समक्ष उमेदवाराने येऊन जमा जमा करण्याचा प्रयत्न केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. अशा प्रकारचे अर्ज बाद केले जाते.
  • आरोग्य विभागातील ही सर्व पदे नागपूर महानगरपालिकेत द्वारे कंत्राटी स्वरूपाने येणार आहेत. त्यामुळे काही उमेदवाराने महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी नोकरीची हमी बाळगू नये.
  • ज्यादिवशी नागपूर महानगरपालिकेला या पदाची आवश्यकता वाटणार नाही. त्यादिवशी कोणतीही पूर्व नोटीस उमेदवाराला कामावरून कमी करण्याचा हक्क महानगरपालिकेकडे आहे. त्याचे उर्वरित मानधन हे त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
  • राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण करण्याकरिता राबविण्यात आलेल्या अभियानात लागणाऱ्या पदांकरिता ही भरती काढण्यात आलेली आहे.
  • नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर या दोन संस्थेच्या मार्फत ही भरती आयोजित केली आहे.
NHM Nagpur Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात माहिती खालील प्रमाणे

राष्ट्रीय आरोग्य अभियान हे अभियान भारत सरकारद्वारे चालवले जाते. या अभियानाची स्थापना 2005 मध्ये झालेली होती. राष्ट्रीय आरोग्य अभियान स्थापना होण्याअगोदर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी अभियान असे दोन वेगवेगळे अभियान होते. या दोन अभियानाला एकत्र करून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना झाली होती. या संस्थेचे काम देशातील ग्रामीण आणि शहरी लोकांचे आरोग्य सुधारण्याचे आहे. यामध्ये नवजात बालकांचे आरोग्य, तारुण्य अवस्थेतील आरोग्य, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार या सर्व प्रकारच्या आजारांवर काम करणे आणि लोकांमधून हे आजार कमी करायचे काम राष्ट्रीय आरोग्य अभियान करत आहे. ही सेवा देत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे गुणवत्तेमध्ये काहीही कमी केली जात नाही. त्याचप्रमाणे कमी खर्चामध्ये या सर्व सोयी दिल्या जातात. समाजातील गरजू लोकांना याचा खूप फायदा झालेला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर याच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. (nhm.gov.in ) या अभियानाची सुरुवात देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू असताना देशातील ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य तपासण्यात आले. त्यामध्ये लोकांच्या आरोग्यात कमतरता असलेली जाणवली. त्यानंतर त्यावेळचे देशाचे राष्ट्रपती मनमोहन सिंग यांनी निर्णय घेऊन राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान याची सुद्धा सुरुवात केली. देशातील सर्व राज्यांमध्ये ही अभियाने सुरू केली. त्यानंतर उत्तर पूर्व राज्यांमध्ये सुद्धा हे अभियान रुजू झाले. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये स्पेशल फॉर्स सहित राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले. आरोग्या सोबतच लोकांना स्वच्छता, पिण्याचे पाणी, सांडपाणी, शिक्षण, पोषण युक्त आहार, सामाजिक समानता, लैंगिक समानता याबद्दल सुद्धा लोकांना माहिती देण्याचे काम या अभियानाने केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींची संख्या वाढलेली आहे. या आरोग्य प्रतिनिधींचे काम म्हणजे लोक आणि आरोग्य सेवा एकत्र आणणे होय. आरोग्य प्रतिनिधींची संख्या दिवसेंदिवस प्रत्येक राज्यात वाढत चाललेली आहे. यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा आहे. प्रत्येक 1000 लोकसंख्ये पाठीमागे एक आरोग्य सेवक आहे. भारतातील ग्रामीण भागातील दुर्गम भागात सुद्धा आरोग्य सेवा देण्याचे काम आरोग्य प्रतिनिधी करत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे फायदा मिळालेल्या लोकांची आकडेवारी आपण पाहूया. 2012-13 यावर्षी फायदा मिळालेल्या लोकांची संख्या 1 कोटी 6 लाख 57 हजार 91 इतकी आहे. त्यानंतर 2013-14 यावर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा फायदा मिळाला आहे अशा लोकांची संख्या 1 कोटी 6 लाख 48 हजार 487 इतकी आहे. 2014-15 या वर्षात फायदा मिळालेल्या लोकांची संख्या 1 कोटी 4 लाख 38 हजार 905 इतकी आहे.

इथून पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानामध्ये कोणत्याही प्रकारची भरती निघाल्यावर त्या भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या – क्लिक करा

 

Leave a Comment