[ RITES Limited Bharti 2024 ] राइट्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे तर सदरील भरतीची जाहिरात राइट्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 28 एप्रिल 2024 ही राइट्स लिमिटेड या संस्थेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी सदरील भरती होणार आहे. असिस्टंट मॅनेजर हे पद विविध शाखेमधील उमेदवारांकरिता रिक्त आहे. त्याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे. सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जे उमेदवार सदरील भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी खालील माहिती वाचावी.
- राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी 72 जागा रिक्त आहेत.
- राइट्स लिमिटेड येथील भरती असिस्टंट मॅनेजर या पदासाठी होणार आहे.
RITES Limited Bharti 2024 | राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- असिस्टंट मॅनेजर ( मेकॅनिकल / मेटलर्जी ) – 34 जागा
- असिस्टंट मॅनेजर ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक ) – 28 जागा
- असिस्टंट मॅनेजर ( सिविल )- 08 जागा
- असिस्टंट मॅनेजर ( आयटी / सीएस ) – 02 जागा
- सदरील भरती मध्ये रिक्त पदावर भरती होण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / मेटलर्जी / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / सिविल / आयटी / सीएस यापैकी कोणत्याही शाखेमधून उमेदवाराने पूर्ण वेळ बॅचलर पदवी मिळवलेली पाहिजे.
- राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे. सरकारी सवलती नुसार उमेदवाराला वयामध्ये सूट दिली जाईल.
- राइट्स लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला प्रतिमहा 23,340 रुपये पगार मिळेल. त्याचप्रमाणे इतर अलाउन्स मिळतील.
- राइट्स लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 600 रुपये परीक्षा शुल्क राइट्स लिमिटेड यांच्याकडून आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, अपंग, महिला यांच्यासाठी शुल्क ₹300 असेल.
- सदरील भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी राइट्स लिमिटेड या संस्थेच्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- 28 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख राइट्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी राइट्स लिमिटेड त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
- सदरील भरतीसाठी राइट्स लिमिटेड यांच्याकडून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे त्याच्या द्वारेच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
RITES Limited Bharti 2024 | राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राइट्स लिमिटेड यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराकडून स्वतःची वैयक्तिक माहिती भरताना चूक झाली आणि उमेदवाराचा अर्ज त्यामुळे रद्द करण्यात आला तर याला राइट्स लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
- 20 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संस्थे कडून देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
- राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राइट्स लिमिटेड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली जाहिरात वाचावी.
RITES Limited Bharti 2024 | राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आशा उमेदवारांची भरती मध्ये निवड करण्यात येईल. इतरत्र कोणत्याही उमेदवाराला भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
- राइट्स लिमिटेड यांच्याकडून अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- सदरील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या निवड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर राइट्स लिमिटेड यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीचे परीक्षा केंद्र हे राइट्स लिमिटेड यांच्याकडून ठरविण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम राइट्स लिमिटेड यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे उमेदवारांना भरती संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
RITES Limited Bharti 2024 | राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- सदरील भरती [ RITES Limited Bharti 2024 ] करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण दिलेल्या पात्रते मध्ये बसत आहोत का याची दक्षता घ्यावी जर उमेदवार पात्र असतील तरच त्यांनी सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी http://www.rites.com या वेबसाईटचा करियर सेक्शन मध्ये जाऊन स्वतःचा अर्ज भरायचा आहे.
- ज्यावेळेस उमेदवार भरलेला अर्ज ऑनलाइन जमा करतील त्यावेळेस रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराला दिला जाईल. तो रजिस्ट्रेशन नंबर उमेदवारांनी लिहून ठेवायचा आहे. भविष्यातील येणाऱ्या अडचणीसाठी सदरील नंबर उपयोगी पडेल.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत भरत असताना आयडेंटी प्रूफ संबंधित संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि बरोबर भरायचे आहे. उमेदवाराने भरतीसाठी येताना सदरील आयडेंटी प्रूफ बरोबर घेऊन यायचे आहे.
- उमेदवाराने ऑनलाइन भरलेला फॉर्म ची प्रत सोबत ठेवायची आहे. जर उमेदवाराची निवड करण्यात आली तर भरलेल्या फॉर्म ची प्रत बरोबर घेऊन यायचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे सदरील भरती करिता जमा करायचे आहेत.
- जन्मतारखेच्या पुराव्या करिता 10वी बोर्ड सर्टिफिकेट
- शालेय आणि महाविद्यालयातील सर्व मार्कशीट. सर्व सेमिस्टर ची मार्कशीट.
- ईडब्ल्यूएस, एससी, एसटी आणि ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारां कडे भारत सरकार कडून मिळालेले प्रमाणपत्र असावेत.
- ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पत्त्याचा पुरावा यासाठी पासपोर्ट, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड ही कागदपत्रे असावेत.
- पॅन कार्ड
- उमेदवाराने एप्लीकेशन फॉर्म मध्ये नमूद केलेल्या अनुभवांची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- अपंगत्वाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्ज जमा करत असताना उमेदवाराला कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाहीत.
- सदरील भरती करिता उमेदवाराला मिळालेला पगार दाखवण्यासाठी उमेदवारांनी 16 नंबर फॉर्म चा पुरावा दाखवावा किंवा सॅलरी स्लिप पुरावा म्हणून दाखवावी.
- जातीचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे भारत सरकार द्वारे देण्यात आलेल्या प्रमाणातच असावे. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवाराकडे 12 महिन्यापेक्षा अधिक कालावधीत पूर्वीचे नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट नसावे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 12 महिन्याच्या आत मधलेच पाहिजे.
- उमेदवाराने कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सदरील संस्थेच्या ऑफिसवर पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे पाठवू नयेत.
- उमेदवाराच्या निवड प्रक्रिये वेळीस उमेदवारांनी सदरील डॉक्युमेंट्स ची ओरिजनल कॉपी आणि सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी बरोबर घेऊन यायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेला आहे म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा ग्रह उमेदवाराने करू नये. जर अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता सदरील भरतीसाठी योग्य नसेल तर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एका पदाकरिता एकच अर्ज भरायचा आहे. एकदा भरलेला अर्ज उमेदवाराला कोणत्याही पद्धतीने बदलता येणार नाही. उमेदवाराने स्वतःचा ई-मेल आयडी बरोबर लिहायचा आहे. कारण त्याद्वारे उमेदवारा बरोबर माहिती कळविण्यात येईल. जर उमेदवार आजच्या ई-मेल आयडी चुकीचा असल्यामुळे त्याला काही समजू शकले नाही तर याला राइट्स लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
- सदरील भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, स्वतःची शैक्षणिक माहिती, स्वतःचा अनुभव यासंदर्भात पूर्ण माहिती लिहायची आहे.
- जर उमेदवार द्वारे केलेला कोणताही दावा चुकीचा ठरला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीतील लेखी परीक्षेसाठी दिनांक 28-04-2024 रोजी उमेदवारांनी दिल्ली / गुडगाव या ठिकाणी हजर राहायचे आहे.
- सदरील भरती मध्ये बदल करण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार राइट्स लिमिटेड यांच्याकडे आहे.
- सदरील भरती मधील रिक्त पदांच्या जागा कमी जास्त होऊ शकतात.
- सरकारी कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सदरील भरती मध्ये पदावर नियुक्त होता येईल पण त्यासाठी त्यांनी पूर्वी ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणचा राजीनामा द्यावा लागेल.
- वरील भरती करिता उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे. त्या पदाची आवश्यक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे. त्या पात्रतेची पूर्तता उमेदवाराकडून होत असेल तरच उमेदवारांनी अर्ज करावा.
- जर भरती मध्ये काही बदल करण्यात आले तर ते बदल www.rites.com या वेबसाईटवर देण्यात येतील त्यामुळे उमेदवारांनी सदरील वेबसाईटला वारंवार भेट देत राहावे.
- उमेदवाराने कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेले असेल. किंवा कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेले असेल तर त्याचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- जर सदरील भरतीमध्ये काही वाद झाला तर तो दिल्लीमध्ये सोडवला जाईल.
- भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला रेल्वेचे तिकीट किंवा बसचे तिकीट दिले जाणार नाही.
- अर्ज भरायचा शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराने दिलेल्या पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- सदरील भरती करिता उमेदवाराला पदवी मध्ये स्पेशलायझेशन मिळवणे आवश्यक आहे. मिळवलेल्या स्पेशलायझेशन चे विद्यापीठाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी प्रत्येक शाखेचा अभ्यासक्रम जाहिरातीमध्ये दिलेला आहे. उमेदवाराने त्यानुसार तयारी करावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची आणि परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.
- 22 एप्रिल 2024 रोजी उमेदवारांनी एडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे.
- 28 एप्रिल 2024 रोजी सदरील भरतीची लेखी परीक्षा होणार आहे.
- 28 एप्रिल 2024 रोजी रात्री 10:00 वाजता सदरील परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तर पत्रिका देण्यात येईल.
- जर उमेदवाराला जाहीर केलेल्या प्रोविजनल उत्तरपत्रिकेमध्ये काही शंका असेल तर उमेदवाराने 30 एप्रिल 2024 रोजी पर्यंत संस्थेला कळवावी.
- 03 मे 2024 रोजी फायनल उत्तर पत्रिका जाहीर करण्यात येईल.
- 03 मे 2024 रोजी लेखी परीक्षेचे गुण सांगण्यात येतील.
- 04 मे 2024 रोजी पर्यंत उमेदवारांनी उत्तर पत्रिका परत तपासण्यासाठी पाठवू शकतात.
- 9 मे 2024 रोजी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
[ RITES Limited Bharti 2024 ] भारतातील खाजगी आणि सरकारी कंपन्यांच्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.