[ SECR Bharti 2024 ] दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती 2024.

[ SECR Bharti 2024 ] दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 1 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदासाठी सदरची भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. साठी इच्छुक उमेदवारांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती संदर्भातील खालील महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.

SECR Bharti 2024

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती मध्ये एकूण 1113 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
  • प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटिस ) या पदासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याद्वारे भरती घेण्यात आलेली आहे.

SECR Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदासाठी उमेदवार 50% गुणासह 10वी उत्तीर्ण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराचा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण झाला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवाराचे 2 एप्रिल 2024 रोजी वय 15 ते 24 वर्षापर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे एससी / एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी पाच वर्षे वयामध्ये सूट देण्यात येईल. ओबीसी कॅटेगरी चा उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती मधून 1113 जागांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन नियमानुसार मिळेल.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण रायपुर विभागात असेल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करा. 
  • सदरील भरती करिता 1 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून ऑनलाइन लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक चा उपयोग करून उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

SECR Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याद्वारे ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत राबवलेली नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने कोणतीही माहिती चुकीच्या स्वरूपात भरू नये. असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल आणि त्याला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे जबाबदार राहणार नाही.
  • 1 मे 2024 ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात वाचावी.

SECR Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात वाचावे.

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची नोंद प्रत्येक उमेदवाराने घ्यावी.
  • सदरील भरती मध्ये परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • परीक्षा केंद्र हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याद्वारे ठरवण्यात येईल त्यामुळे या प्रक्रियेत इतर कोणीही हस्तक्षेप करू नये.
  • सदरील भरतीसाठी अधिक माहिती आणि आवश्यक अभ्यासक्रम दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवाराने संकेतस्थळाला भेट द्यावी.
SECR Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
  • अनआरक्षित उमेदवाराची जन्मतारीख 2 एप्रिल 2000 ते 2 एप्रिल 2009 पर्यंत पाहिजे.
  • अनुसूचित जातीच्या उमेदवाराची जन्मतारीख 2 एप्रिल 1995 ते 2 एप्रिल 2009 पर्यंत पाहिजे.
  • अनुसूचित जमाती च्या उमेदवाराची जन्मतारीख 2 एप्रिल 1995 ते 2 एप्रिल 2009 पर्यंत असली पाहिजे.
  • इतर मागासवर्गीय कॅटेगरी च्या उमेदवाराची जन्मतारीख 2 एप्रिल 1997 ते 2 एप्रिल 2009 पर्यंत पाहिजे.
  • दिव्यांग आणि माझी सैनिक उमेदवार करिता जन्मतारीख 2 एप्रिल 1990 ते 2 एप्रिल 2009 पर्यंत पाहिजे.
  • ज्या उमेदवारांना जातीय आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आशा उमेदवारांनी अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
  • सदरील भरती मधील अप्रेंटिस पदाचा कार्यकाळ सर्व शाखांसाठी एक वर्षाचा राहील या एक वर्षामध्ये उमेदवाराला नियमानुसार मानधन मिळेल. उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत उमेदवाराला मानधन मिळेल. अप्रेंटिस पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी सुद्धा संपून जाईल.
  • सदरील भरती मध्ये उमेदवाराची निवड करताना गुणवत्ता यादी तयार केली जाईल या गुणवत्ता यादी मध्ये 50% मार्क उमेदवाराला दहावीला मिळालेले गुण असतील त्याचप्रमाणे 50% गुण उमेदवाराला आयटीआय दरम्यान मिळालेले असतील.
  • अप्रेंटिस ॲक्ट 1961 नुसार आणि अप्रेंटिस कायदा 1992 नुसार कागदपत्र पडताळणी च्या वेळेस उमेदवाराला मेडिकल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. मेडिकल सर्टिफिकेट गव्हर्मेंट अथोरिझेड डॉक्टर यांच्याकडून सही केले पाहिजे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांमधून निवड केलेल्या उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा लहान असेल तर करार अल्पवयीन उमेदवाराच्या पालका सोबत केला जाईल.
  • अर्ज केलेल्या उमेदवाराने एकदा प्रशिक्षणार्थी पदावर काम केल्यानंतर त्या उमेदवाराला इतर ठिकाणी कामासाठी मागणी घालण्यात येईल. पण उमेदवाराने योग्य निर्णय घेऊन प्रशिक्षणार्थी पदाला न्याय द्यायचा आहे.
  • माझी कर्मचाऱ्यांसाठी भरतीतील एकूण पदांमध्ये 10% आरक्षण उमेदवारांना देण्यात आलेले आहे. उमेदवाराच्या योग्य त्या कॅटेगिरी मध्ये त्याला या पदासाठी आरक्षण दिलेले दिसेल. लष्करी सेवेत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना सुद्धा सदरील भरती मध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे.
  • 2 एप्रिल 2024 पासून ते 1 मे 2024 पर्यंत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरती [ SECR Bharti 2024 ] मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार SC / ST / OBC कॅटेगरीमध्ये आहेत त्या उमेदवारांनी स्वतःच्या जातीचा दाखला जमा करणे गरजेचे आहे.
  • सदरील भरती मध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवाराने राजकीय त्याचप्रमाणे इतर कोणत्याही पद्धतीने निवड समितीवर कसल्याही प्रकारचा दबाव आणू नये. अशा प्रकारे दबाव आणणाऱ्या उमेदवारावर कारवाई केली जाईल.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला प्रवासी खर्च आणि निवासी खर्च देण्यात येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी स्वखर्चाने भरतीसाठी यावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत.
  • सदरील रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारा द्वारे खोटी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे वेबसाईटवर अपलोड करण्यात आली तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्याचा पूर्णपणे अधिकार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडे आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांची कोणत्याही उमेदवाराची पदावर निवड झाली तर त्या उमेदवाराला यासंदर्भात माहिती कळवण्याचे काम दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याद्वारे कळवण्यात येणार नाही. माहिती मिळवण्यासाठी उमेदवाराने सतत वेबसाईटला भेट द्यावी.
  • उमेदवारा द्वारे अर्ज भरताना झालेल्या चुका उमेदवाराला लक्षात आणून देण्याचे काम दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांची नाही.
  • ज्या अपंग उमेदवाराचे अपंगत्व 40% हून जास्त आहे अशा उमेदवारांनाच अपंगत्वाच्या संधीचा लाभ घेण्यात येणार आहे.
  • सदरील भरती संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचे पूर्णपणे अधिकार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडे असतील. यांच्याद्वारे घेतला जाणारा निर्णय सर्व उमेदवारांसाठी अंतिम राहील.
  • कार्मिक विभाग, रायपुर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याद्वारे सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.
  • सदरील भरती मध्ये डीआरएम ऑफिस आणि वॅगन रिपेअर शॉप रायपूर या दोन ठिकाणी विविध शाखेतील अप्रेंटिस पदाच्या जागा रिक्त आहेत.
  • वेल्डर या पदासाठी 65 जागा रिक्त आहेत. टर्नर या पदासाठी 22 जागा रिक्त आहेत, फिटर या पदासाठी 83 जागा रिक्त आहेत, इलेक्ट्रिशन या पदासाठी 85 जागा रिक्त आहेत, स्टेनोग्राफर ( इंग्लिश ) या पदासाठी सहा जागा रिक्त आहेत, स्टेनोग्राफर ( हिंदी ) या पदासाठी तीन जागा रिक्त आहेत, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅम असिस्ट या पदासाठी चार जागा रिक्त आहेत.
  • हेल्थ आणि स्टेशनरी इन्स्पेक्टर या पदासाठी 10 जागा रिक्त आहेत, मशिनिस्ट या पदासाठी सहा जागा रिक्त आहेत, मेकॅनिकल डिझेल या पदासाठी 66 जागा रिक्त आहेत, मेकॅनिकल रेफ्रिजरेटर आणि एसी साठी आठ जागा रिक्त आहेत, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी 14 जागा रिक्त आहेत.
  • डीआरएम ऑफिस रायपुर डिव्हिजन या ठिकाणी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 339 जागा रिक्त आहेत.
  • वॅगन रिपेअर शॉप या ठिकाणी फिटर पदाच्या 44 जागा आहेत, वेल्डर पदाचा 44 जागा आहेत, मशिनिस्ट पदाच्या सहा जागा आहेत, टर्नर पदाच्या 6 जागा आहेत, इलेक्ट्रिशन पदाच्या 6 जागा आहेत, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट या पदाच्या दोन जागा रिक्त आहेत, स्टेनोग्राफर ( इंग्लिश ) या पदाच्या एक जागा रिक्त आहे. स्टेनोग्राफर (मराठी) या पदाची एक जागा रिक्त आहे.
  • वॅगन रिपेअर शॉप, रायपुर या ठिकाणी एकूण 110 जागा प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त आहेत.
  • सदरील भरतीसाठी दिलेल्या तारखेला उमेदवाराने आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. जर कोणत्याही उमेदवाराने दिलेली तारीख निघून गेल्यानंतर सुद्धा शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली नसेल. तर अशा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

[ SECR Bharti 2024 ] संपूर्ण देशातील सरकारी खात्यातील नोकरी संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment