South East Central Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे 733 जागा रिक्त.

South East Central Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 ही आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी विविध जागांकरिता सदरील भरती होणार आहे. तरी जे उमेदवार भरतीसाठी पात्र आहेत त्या उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

South East Central Railway Bharti 2024

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती एकूण 733 जागांसाठी होणार आहे.
  • प्रशिक्षणार्थी पदासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये रिक्त असलेल्या जागा खालील प्रमाणे.

South East Central Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती मध्ये पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  1. कार्पेंटर
  2. कोपा
  3. ड्राफ्टमॅन ( सिविल )
  4. इलेक्ट्रिशियन
  5. इलेक्ट्रिशियन ( मेकॅनिकल )
  6. फिटर
  7. मशिनिस्ट
  8. पेंटर
  9. प्लंबर
  10. मेकॅनिक ( रॅक )
  11. एसएमडब्ल्यू
  12. स्टेनो ( इंग्लिश )
  13. स्टेनो ( हिंदी )
  14. डिझेल मेकॅनिक
  15. टर्नर
  16. वेल्डर
  17. वायरमन
  18. केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट
  19. डिजिटल फोटोग्राफर
  • अर्ज करणारा उमेदवार 10 + 2 या प्रक्रियेने 10वी पास असला पाहिजे किंवा त्याच्या समतुल्य पाहिजे. आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून उमेदवाराने ITI कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • 12 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराने 15 वर्षे वय पूर्ण केलेले पाहिजे. उमेदवाराचे वय 24 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. एससी / एसटी कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांकरिता पाच वर्ष वयामध्ये सूट राहील. ओबीसी कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांकरिता तीन वर्षे वयामध्ये सूट राहील. अपंग आणि माझी कर्मचारी दोघांसाठी 10 वर्षे वयामध्ये सूट राहील.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे शिक्षणाची म्हणून निवड होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी [ South East Central Railway Bharti 2024 ] अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची शुल्क रेल्वे कडून आकारण्यात येणार नाही.
  • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी एथे क्लिक करा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून घोषित करण्यात आलेली आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्याअगोदर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी संस्थेद्वारे ऑनलाइन लिंक दिलेली आहे. त्या लिंग चा उपयोग करूनच उमेदवाराने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

South East Central Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे राबवलेली नाही.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली तर याला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे जबाबदार राहणार नाही.
  • 12 एप्रिल 2024 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख रेल्वेद्वारे देण्यात आलेली आहे.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरचा अर्ज करावा.

South East Central Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड होण्याकरिता उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून देण्यात आलेली हॉल तिकीट घेऊन उपस्थित राहणे गरजेचे आहे.
  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केल्यावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • वरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
South East Central Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • सदरील भरती मध्ये उमेदवाराला जर वयाच्या अटी मध्ये सूट पाहिजे असेल तर त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना एक वर्षासाठी प्रशिक्षण कालावधी मधून जावे लागणार आहे. प्रशिक्षण कालावधी मध्ये उमेदवाराला योग्य मानधन मिळेल.
  • सदरील भरतीमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड होण्याकरिता गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी तयार करताना त्यामध्ये 10वीच्या गुणांची टक्केवारी आणि आयटीआय मधील गुणांची टक्केवारी या दोन्ही गुणांच्या अवरेज नुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांचे निवड होणार आहे.
  • प्रशिक्षणार्थी कायदा 1961 आणि प्रशिक्षणार्थी नियम 1992 नुसार निवड झालेल्या उमेदवाराला कागदपत्रे पडताळणी च्या वेळेस मेडिकल सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक राहील. उमेदवाराची मेडिकल सर्टिफिकेट हे गव्हर्मेंट ऑथॉरिटी डॉक्टर यांच्याकडून सही केलेले पाहिजे. सेंट्रल हॉस्पिटल किंवा स्टेट हॉस्पिटल येथील असिस्टंट सर्जन यापेक्षा कमी पदाच्या डॉक्टरांकडून मेडिकल प्रमाणपत्र सही करून घेऊ नये.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी निवड झालेला उमेदवार अल्पवयीन असेल तर त्या विद्यार्थ्याच्या पालका सोबत करार केला जाईल.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी पदावर काम केलेल्या कोणत्याही उमेदवाराला कायमस्वरूपी च्या नोकरीची हमी संस्थेद्वारे देण्यात येणार नाही. याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
  • माझी कर्मचाऱ्यांकरिता रिक्त जागांपैकी एकूण 10% जागांवर आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये सुद्धा एससी, एसटी, ओबीसी या कॅटेगरी नुसार आरक्षण देण्यात येणार आहे. लष्कर दलातील सैनिकांच्या कल्याण साठी सुद्धा यामध्ये जागा देण्यात आलेले आहेत. त्याची कॅटेगरी खालील प्रमाणे. कामावर दुखापत होऊन अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी, माझी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी, सर्विंग ऑफिसर यांची मुले, माझी कर्मचारी, लष्करी जवानांच्या मुलांसाठी
  • प्रशिक्षणार्थी पदासाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत ऑफलाइन जमा करू नये.
  • प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार SC/ST/OBC कॅटेगरी चे आहेत त्या उमेदवाराकडे जात पडताळणी केलेल्या चा दाखला असला पाहिजे.
  • सदरील भरतीमध्ये निवड होण्याकरिता उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यावर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी पदावर काम करत असताना कोणत्याही प्रकारचा प्रवासी खर्च आणि निवासी खर्च संस्थेद्वारे देण्यात येणार नाही.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरत असताना स्वतःचा स्कॅन केलेला कलर पासपोर्ट साईज फोटो, स्कॅन केलेली सही आणि इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे वेबसाईट वरती अपलोड करायचे आहेत.
  • प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही प्रकारचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्याचा पूर्णपणे हक्क दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडे आहे.
  • सदरील भरती करिता निवड झालेल्या उमेदवारांना निवड झालेल्या ची बातमी संस्थेद्वारे कोणत्याही माध्यमातून कळवण्यात येणार नाही. उमेदवाराने संस्थेची वेबसाईट चेक करत रहावे. त्यामध्ये निवड यादी सादर करण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी जे उमेदवार अपंग आहेत आणि त्यांना अपंगत्वाच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. त्या उमेदवाराकडे 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. सदरील अपंगत्वाचा दाखला राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या मेडिकल बोर्ड द्वारे मिळालेला असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीमध्ये उमेदवाराची निवड करणे, उमेदवाराला कामावर रुजू करणे , उमेदवाराला कामावरून कमी करणे याबाबतचे सर्व निर्णय रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशन कडे राहतील. आणि त्यांनी घेतलेले निर्णय अंतिम असतील.
  • ज्या उमेदवारांना EWS / Ex-Serviceman यापैकी कॅटेगरी मधून अर्ज करायचा असेल त्या उमेदवारांनी SC/ST/OBC यापैकी कोणत्या कॅटेगरीत स्वतः बसत आहे ते निवडून पुढील अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट संस्थेकडे जमा करायचे आहे.
  • उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत आहेत किंवा ज्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शंका आहे. आशा उमेदवारांनी 9752876639 या मोबाईल नंबर वरती संपर्क करू शकता. टीप – सदरील मोबाईल वरती फोन करताना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:00 वाजल्यापासून सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत उमेदवारांनी फोन करायचा आहे.
  • सदरील भरती ही पर्सनल डिपार्टमेंट, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस, बिलासपुर यांच्या नेतृत्वात होत आहे.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपुर येथे अप्रेंटिस कायदा 1961 नुसार आणि अप्रेंटिस नियम 1962 नुसार प्रशिक्षणार्थी पदाची सदरील भरती निघालेली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपुर येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करण्यासाठी https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या ऑनलाइन पोर्टल चा उमेदवारांनी उपयोग करावा.
  • सदरील भरती मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या अपंगासाठी एकूण 28 जागा रिक्त आहेत.
  • माझी कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षणार्थी पदासाठी एकूण 74 जागा रिक्त आहेत.
  • प्रशिक्षणार्थी पदासाठी एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता 53 जागा रिक्त आहेत.
  • एससी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता प्रशिक्षणार्थी पदासाठी एकूण 113 जागा रिक्त आहेत.
  • ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता प्रशिक्षणार्थी पदासाठी एकूण 197 जागा रिक्त आहेत.
  • ईडब्ल्यूएस कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता प्रशिक्षणार्थी पदासाठी एकूण 74 जागा रिक्त आहेत.
  • डिजिटल फोटोग्राफर या पदासाठी एकूण चार जागा रिक्त आहेत.
  • केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरिता आठ जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरतीमध्ये 80 जागा वायरमन पदासाठी रिक्त आहेत.
  • 187 जागा प्रशिक्षणार्थी पदाच्या फिटर करिता रिक्त आहेत.
  • 25 जागा प्लंबर पदासाठी रिक्त आहेत. तर 42 जागा पेंटर पदासाठी रिक्त आहेत.
  • कार्पेंटर पदासाठी 38 जागा रिक्त आहेत. तर कोपा पदासाठी 100 जागा रिक्त आहेत.

South East Central Railway Bharti 2024 | सदरील भरती प्रमाणे भारतातील सर्व सरकारी आणि खाजगी संस्थेमध्ये निघणाऱ्या मेगा भरती संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment