[ Symptoms of Malaria ] मलेरिया ची लक्षणे आणि कारणे .

Table of Contents

[ Symptoms of Malaria ] मलेरिया म्हणजे काय ?

[ Symptoms of Malaria ] प्लास्मोडियम नावाच्या प्रोटोजोआ या परपोषी च्या संक्रमणामुळे मलेरिया होतो. आणि हा विषाणू एनोफिलस (मादी) मच्छरामुळे पसरत असतो यामुळे मलेरिया नावाचा जीवघेणा आजार होत असतो. हा जगातील आरोग्य व्यवस्थे पुढील एक मोठा प्रश्न आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती,बालक आणि गर्भवती महिला यांचा मृत्यू दर जास्त आहे.

दर वर्षी, १२.५ करोड प्रवाश्यांसहित २०० करोड लोकांना मलेरिया आजाराचा धोका असतो. त्यामुळे दर वर्षी १५ ते २७ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० आणि २०२१ च्या आकडेवारी नुसार २४.६ करोड लोकांना मलेरिया ची लागण झाली होती. त्यापैकी ६.२२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

[ Symptoms of Malaria ] मलेरियाची लक्षणे

मलेरिया या आजारामध्ये प्लास्मोडियम ने संक्रमित झालेला मादी मच्छर चावल्यावर दोन आठवड्यांच्या आतमध्ये ताप हे लक्षण दिसायला लागते. सर्दी, डोकेदुखी,थंडी वजने आणि ताप येणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसला लागतात. ज्या लोकांना पूर्वी मलेरिया होऊन गेला आहे अश्या लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. किंवा दिसत हि नाहीत.

Symptoms of Malaria

[ Symptoms of Malaria ] मलेरिया च्या तापामध्ये खासकरून खालील लक्षणे दिसतात.

  • खूप थकवा जाणवतो.
  • श्वास घ्यायला त्रास होतो.
  • उलटी
  • खोकला
  • पोट दुखी
  • सांधे दुखी
  • लघवीतून रक्त जाणे
  • भास होणे
  • डोळे आणि त्वचेचा रंग पिवळा पडणे

[ Symptoms of Malaria ] गर्भावस्थेत झालेल्या मलेरिया ची खास लक्षणे

  • शरीरात सतत ताप वाढणे
  • डोकेदुखी
  • उलटी
  • मांसपेशी दुखणे

[ Symptoms of Malaria ] गर्भ अवस्थेतील मलेरिया

सामान्य महिला पेक्षा गर्भवती महिलांमध्ये मलेरिया होण्याची शक्यता तिप्पट असते. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांमद्ये प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे मलेरिया अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच मलेरियाची लागण झालेल्या गर्भवती महिलांमध्ये मृत्यू दार ५०% इतका आहे. तसेच गर्भपात, अंतर्गर्भाशयातील मृत्यू, वेळे पूर्वी बालकाचा जन्म, जन्मवेळेस मुलाचे वजन कमी,नवजात बालकांचा मृत्यू या सर्व समस्या गर्भवती मातेला मलेरिया झाल्यावर उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य वेळेस उपचार आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

गर्भावस्थेतील महिलांना मलेरिया होण्याच एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे प्लास्मोडिया फॅल्सीपेरियम हे आहे. नाळेच्या माध्यमातून पसरणारा हा आजार बालक आणि मातेच्या मृत्यूला कारणीभूत आहे. मलेरिया मधील विशेष प्रकार असणारा वार VAR2CSA ला प्रतिकार करण्यासाठी अँटीबॉडी पुरेश्या प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळे रुग्णाची अवस्था अजून बिकट होते.

[ Symptoms of Malaria ] मलेरिया रोगाचे संक्रमण

मलेरियाचे मच्छर ज्या ठिकाणी आहेत अश्या ठिकाणी प्रवास करणे किंवा राहणे यामुळे हा रोग होण्याची शक्यता आहे. हवामानातील होणार बदल आणि यामुळे निर्माण झालेल्या मच्छर मुळे मलेरिया हा आजार होतो. त्यामुळे वातावरण बदलल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे आहे. मलेरिया आजाराचे संक्रमण होणारी स्थाने खालीलप्रमाणे .

  • जुने तलाव आणि झरे
  • अस्वच्छ भागात फिरणे
  • मच्छर असणारे भाग

[ Symptoms of Malaria ] खालील व्यक्तींमध्ये मलेरिया होण्याची शक्यता जास्त असते.

  • ५ वर्षा खालील बालक
  • गर्भवती महिला
  • प्रवासी आणि काळजी न घेणारे व्यक्ती
  • आजाराने ग्रस्त व्यक्ती
  • एचआयव्ही एड्स संक्रमित रुग्ण

[ Symptoms of Malaria ] मलेरिया रोगाचे प्रकार

Symptoms of Malaria

मलेरियाचे उपप्रकार हे ब्याक्टेरिया च्या प्रकारावर अवलंबून असतात. सामान्यपणे मलेरियाचे पाच प्रकार पडतात.

  • प्लाजमोडियम फाल्सीपेरम ( पी.फाल्सीपेरम )
  • प्लाजमोडियम विवैक्स ( पी.विवैक्स )
  • प्लाजमोडियम ओवले  ( पी.ओवले )
  • प्लाजमोडियम मलेरिया   ( पी.मलेरिया )
  • प्लाजमोडियम नोलेसी    ( पी.नोलेसी )

[ Symptoms of Malaria ] मलेरिया रोगाची कारणे

मलेरिया रोगाचे कारण हे प्लाजमोडियम प्रोटोजोआ हे आहे. प्लाजमोडियम प्रोटोजोआ चे विविध प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात लक्षण दिसण्याचा कालावधी हा वेगळा आहे.

  • पी.फाल्सीपेरम : ८ ते ११ दिवस
  • पी.विवैक्स : ८ ते १७ दिवस
  • पी.ओवले : १० ते १७ दिवस
  • पी.मलेरिया : १८ ते ४० दिवस
  • पी.नोलेसी : ९ ते १२ दिवस

ज्यावेळेस मलेरियाचा मच्छर माणसाला चावतो तेव्हा त्यातील मलेरिया पसरवणारा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. हा विषाणू परपोषी असल्यामुळे ७ ते ३० दिवसात मानवी शरीर लक्षणे दाखवायला सुरुवात करते. काही तासातच विषाणू याकरिता पर्यंत पोहचतो आणि त्याचा विकास करू लागतो. त्याची माहिती खालील प्रमाणे

  • स्पोरोजोईट एका तासात यकृतावर हल्ला करतो आणि स्वतःची संख्या वाढवतो तंत्र हा विषाणू संपूर्ण शरीरात पसरतो.
  • मेरोजोइट हा विषाणू सरळ लाल रक्त पेशींवर आक्रमण करतो. त्यामुळे रक्तपेशी संक्रमित बनतात. जमुळे ट्रोफोजोईट बनते.
  • लाल रक्त पेशीत ट्रोफोजोईट आपली जागा बनवतो आणि सिजोन्ट तयार होतात त्यामुळे लाल रक्तपेशी संक्रमित होतात, त्यामुळे पुढे जाऊन प्लिहा च्या माध्यमातून फोगोसायटोसीस प्रक्रियेतून जावे लागते.
  • प्लिहा च्या संक्रमित रक्त पेशींना फोगोसायटोसीस केल्यामुळे संक्रमण कमी होण्याची शक्यता असते. पण यामुळे गंभीर अनेमिया आणि फॉलिक ऍसिड ची कमी सारखे आजार होऊ शकतात.

मलेरिया रोगाच्या अवघड  गोष्टी

मलेरियाची गंभीर लक्षणे सुरु झाल्यापासून काही तासापासून ते काही दिवसापर्यंत बऱ्याच अवघड गोष्टी निर्माण होऊ शकतात. ते खालीलप्रमाणे

  • रक्त कमी होणे
  • रक्तातील साखर कमी होणे
  • फुफुस फुगणे
  • किडनी निकामी होणे
  • सेरेब्रल मलेरिया

[ Symptoms of Malaria ] गर्भावस्थेत मलेरिया झाल्यास होणारे परिणाम

गर्भावस्थेत मातेला मलेरिया झाल्यास गर्भाचा विकास थांबतो. वेळेपूर्वी जन्म होणे किंवा जन्माला आलेल्या बाळाचे वजन कमी असते. नवजात बालकाचा मृत्यू दर  वाढणे. अजून काही समस्या खालील प्रमाणे

  • मातेला ऍनिमिया होणे
  • गर्भपात
  • मृत्यू
  • जन्मजात मलेरिया

 बालकांना मलेरिया झालास येणाऱ्या समस्या

पहिल्यापासून एनिमिया, कुपोषण आणि प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या बालकांमध्ये मृत्यू होण्याची संभावना जास्त असते. तयाचप्रमाणे मलेरिया चे प्रमाण अधिक वाढल्यावर खालील समस्यांना सामोरे जावे लागते.

  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • रक्तातील साखर कमी होणे
  • यकृताचे कार्य कमी होते
  • शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते.
  • पेरासिटामिनिया चे प्रमाण वाढते

[ Symptoms of Malaria ] मलेरिया थांबवण्यासाठी उपाय

मलेरिया थांबवण्यासाठीच्या उपायांमध्ये मलेरिया रोधक औषधे खाणे. मच्छरांपासून बचाव करण्यासाठी उपाय करणे त्याचप्रमाणे खालील उपाय करावे.

  • पर्यावणाचा समतोल राखून मच्छरांपासून वाचवणारे कीटकनाशके वापरावे.
  • पूर्ण कपडे घालावे त्यामुळे मच्छरांपासून संरक्षण होईल.
  • कपड्यांवरती मच्छरांपासून वाचवणारे औषध लावावे.
  • रात्री झोपणाच्या अगोदर रूम मध्ये मच्छर येणार नाहीत अशी व्यवस्था करणे.
  • झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा.
  • पाण्याची भांडी उघडी ठेऊ नये, झाकून ठेवावी.
  • तुंबलेले पाणी वाहते करावे.

गर्भावस्थेत घ्यायची काळजी

गर्भावस्थेत महिलांनी मलेरिया पासून घ्यायची काळजी खालीलप्रमाणे

  • मच्छरदाणीचा उपयोग करावा.
  • आईपीटी उपचार करावे
  • गर्भावस्थेच्या २० आठवड्यांनंतर मलेरिया होऊ नये म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांचे सेवन करावे.

[ Symptoms of Malaria ] मलेरियाचे निदान कसे करावे ?

सर्वसामान्यपणे डॉक्टर हे रुग्णाची मेडिकल हिस्टरी विचारतात त्याचप्रमाणे मलेरियाच्या लक्षणांची तपासणी करतात.जसे कि

  • शेवटचा प्रवास कोठे केला होता ?
  • प्रवासात कोठे मच्छर चावले होते का ?
  • आजारी पडल्या नंतर कोणत्या औषधांचे सेवन केले होते ?

या विचारलेल्या प्रश्नावरून डॉक्टर मलेरिया झालाय कि नाही याचा अंदाज   लावतात . जर मलेरियाची लक्षणे दिसत असतील तर रक्ताची तपासणी करण्यास सांगतात. गर्भवती महिलांमध्ये याची तपासणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. खालील चाचण्या मलेरियाच्या निदानासाठी करतात.

  • मायक्रोस्कोपी
  • रॅपिड निदान तपासणी
  • सिरम विज्ञान तपासणी

मलेरियाचा उपचार

मलेरियाचा उपचार हा १ आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालू शकतो. सुरुवातीच्या काळातील मलेरिया हा लवकर बरा होऊ शकतो. पण गंभीर मलेरियाचा उपचार होण्यासाठी बराच काळ जाऊ शकतो आणि उपचार खर्चिक होऊ शकतो. यामध्ये अँटिबायोटिक टॅबलेट , इंजेक्शन आणि सलाईन चा उपयोग केला जातो. गंभीर मलेरिया मध्ये पेशंट ला अतिदक्षता वार्ड मध्ये भरती केले जाऊ शकते.

गर्भावस्थेत मलेरियाचा उपचार

  • सुरुवातीचा मलेरिया : सुरुवातीच्या मलेरियामध्ये डॉक्टर  रुग्णावर उपचार करताना औषधांचा भ्रूणावर काही परिणाम नाही होणार याची काळजी घेतात. WHO च्या प्रमाणानुसार जी औषधे रुग्णाला प्रमाणित केलेली आहेत त्याचाच उपयोग केला जातो.
  • गंभीर मलेरिया : गंभीर मलेरिया मध्ये उपचार सुद्धा दीर्घ काळ चालतो यामध्ये पहिल्या महिन्यापासून ते नऊ व्या महिन्यापर्यंत हा उपचार चालतो. पण यामध्ये पहिल्या तीन महिन्यात वेगळी उपचार पद्धती, पुढील तीन महिन्यात वेगळी आणि शेवटच्या तीन महिनात वेगळी उपचार पद्धती असते.

मलेरिया आणि कावीळ यांच्यातील फरक

फरकमलेरियाकावीळ
व्याख्याप्रोटोजोआ मुळे होणार गंभीर आजारवायरल विषाणूमुळे होणार आजार
विषाणू चा उगमप्लेजमोडिम मुळेफ्लेवीवायरस मुळे
प्रसारणमादी मच्छर मुळेदूषित अन्न, पाण्यामुळे
लक्षणेताप येणे, थंडी वाजणे आणि घाम येणेताप येणे, थंडी वाजणे, उलटी होणे

 

मलेरिया आणि वायरल तापातील अंतर

मलेरिया एक विशिष्ट विषाणू मुळे होणारा आजार आहे तर वायरल ताप हा विविध विषाणूच्या समूहामुळे होतो.

फरकमलेरियावायरल ताप
व्याख्याप्रोटोजोआ मुळे होणार गंभीर आजारवायरल विषाणूमुळे होणार आजार
प्रसारणमादी मच्छर मुळेहवा, पाणी
लक्षणताप येणे, थंडी वाजणे आणि घाम येणेताप येणे, सर्दी,खोकला, अशक्तपणा
औषधेमलेरिया विरोधी एन्टीबायोटीक्ससामान्य अँटिबायोटिक्स

 

मलेरिया आणि टायफॉईड मधील फरक

मलेरिया आणि टायफॉईड दोन्ही गंभीर आजार आहेत. दोघांना ऍनिमिया आणि पोट आणि आतड्याच्या आजारांबद्दल जोडले गेले आहे.

फरकमलेरियाटायफॉईड
व्याख्याप्रोटोजोआ मुळे होणार गंभीर आजारग्राम-नेगेटिव्ह-बॅक्टेरिया मुळे होणारा आजार
प्रसारणमादी मच्छर मुळेदूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारा
लक्षणेताप येणे, थंडी वाजणे आणि घाम येणेताप,जुलाब, छातीवर पुरळ येणे, कोरडा खोकला
लक्षणे उद्भवन्याचा वेळ१०-१५ दिवस६-३० दिवस
प्रकार
  • प्लाजमोडियम फाल्सीपेरम ( पी.फाल्सीपेरम )
  • प्लाजमोडियम विवैक्स ( पी.विवैक्स )
  • प्लाजमोडियम ओवले  ( पी.ओवले )
  • प्लाजमोडियम मलेरिया   ( पी.मलेरिया )
  • प्लाजमोडियम नोलेसी    ( पी.नोलेसी )
  • साल्मोनेल टायफी – १
  • साल्मोनेल टायफी – २
पसरण्याची साधनेशरीरातील रक्त, यकृत पचनयंत्र, आतडे
लसीकरणआरटीएस, एस/एएस०१Ty२१a, ViCPS

 

मलेरिया आणि डेंग्यू मधील फरक

मच्छर चावल्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू हे आजार होतात. या दोन्ही आजारांचा उपचार नाही केला तर मृत्यू होऊ शकतो.

फरकमलेरियाडेंग्यू
व्याख्याप्रोटोजोआ मुळे होणार गंभीर आजारडेंगी या वायरस मुळे होणार आजार.
प्रसारणमादी मच्छर मुळेएडिज इजिप्ती मच्छर मुळे
प्रकार
  • प्लाजमोडियम फाल्सीपेरम ( पी.फाल्सीपेरम )
  • प्लाजमोडियम विवैक्स ( पी.विवैक्स )
  • प्लाजमोडियम ओवले  ( पी.ओवले )
  • प्लाजमोडियम मलेरिया   ( पी.मलेरिया )
  • प्लाजमोडियम नोलेसी    ( पी.नोलेसी )
  • DENV 1
  • DENV 2
  • DENV 3
  • DENV 4
लक्षणे उद्भवन्याचा वेळ१०-१५  दिवस३-१४ दिवस
पसरण्याची साधनेशरीरातील रक्त, यकृतशरीरातील रक्त, यकृत
लसीकरणआरटीएस, एस/एएस०१CYD-TDV

 

व्हे प्रोटीन खाण्याचे फायदे

Leave a Comment