[ Whey Protein ] आजच्या युगात लोक सुदृढ शरीरयष्ठी बनवण्यासाठी वेडे झालेले आहेत. त्यासाठी व्हे-प्रोटीन महत्वाचे आहे. व्हे-प्रोटीन चे वेगवेगळे प्रकार आहेत पण लोक सप्लिमेंट च्या स्वरूपात असणाऱ्या व्हे-प्रोटीन चे अधिक सेवन करताना दिसतात. त्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. व्हे-प्रोटीन हे दुधापासून बनवले जाते. दुधामध्ये दोन प्रकारचे प्रोटीन असते एक म्हणजे कॅसिन प्रोटीन आणि दुसरे म्हणजे व्हे-प्रोटीन होय. दुधातील व्हे-प्रोटीन दुधापासून वेगळे केले जाते.
दुधाच्या लोण्याबरोबर निघणाऱ्या पदार्थाला व्हे-प्रोटीन म्हणतात. त्याला मराठी भाषेत मठ्ठा असे सुद्धा म्हणतात. निसर्गातून मिळणाऱ्या इतर प्रोटीन पेक्षा व्हे-प्रोटीन हे अतिशय उपयोगी असते कारण यामध्ये ९ प्रकारचे अमिनो ऍसिड उपलब्ध असतात. त्यामुळे व्हे-प्रोटीन च्या मदतीने शरीराला बळकटी मिळते आणि शरीरातील मांसपेशी सुधारतात. त्यामुळे जे लोक बॉडी बिल्डिंग करतात किंवा खेळाडू आहेत अशी लोक व्हे-प्रोटीन चा उपयोग करतात. वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मदत करते त्यामुळे व्हे-प्रोटीन हे एक महत्वाचे सप्लिमेंट आहे. व्यायाम जास्त करणाऱ्यांसाठी किंवा शारीरिक कामे करणाऱ्या लोकांमध्ये प्रोटीन ची गरज भरून काढण्यासाठी व्हे-प्रोटीन सप्लिमेंट एक महत्वाचा स्रोत आहे.
[ Whey Protein ] सध्या बाजारात शारीरिक ताकद वाढवणारे अनेक सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत पण त्यातील व्हे-प्रोटीन हे सर्वात प्रसिद्ध आणि फायदेमंद सप्लिमेंट आहे. कारण आपण या सप्लिमेंट ला सहज आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. व्हे-प्रोटीन चे सप्लिमेंट्स हे पाणी,दूध आणि दही सोबत मिक्स करून सेवन करू शकता. आहार तज्ज्ञांच्या म्हणण्या नुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या वजनाच्या एव्हडे सप्लिमेंट ग्रॅम मध्ये घेणे गरजेचे आहे. उदा. एखाद्या व्यक्तीचे वजन हे ७० किलो आहे तर त्याला ७० ग्रॅम प्रोटीन दररोज घेणे गरजेचे आहे.
व्हे-प्रोटीन हे एक परिपूर्ण प्रोटीन आहे. ज्यामध्ये ग्लुटामाइन, अमिनो ऍसिड चेन आणि बरेच आवश्यक घटक उपलब्ध असतात. हे सर्व घटक शरीराच्या आणि मांसपेशींच्या विकासासाठी उपयोगी असतात. तुम्ही बऱ्याच वेळा पहिले असेल किंवा तुम्हाला माहित असेल सुद्धा कि खेळाडू आणि व्यायामपट्टु व्यायामांनंतर व्हे-प्रोटीन चे सेवन करतात. व्हे-प्रोटीन चे प्रमाण हे खेळाडूच्या वजनानुसार ठरवून दिले जाते.
शरीर पिळदार बनवनासाठी आणि बळकटी वाढवण्यासाठी व्हे-प्रोटीन आवश्यक आहे. बॉडी बनवण्यासाठी व्यायामाबरोबर योग्य आहार आणि सप्लिमेंट्स ची आवश्यकता आहे. व्हे-प्रोटीन सुद्धा एक प्रकारचे सप्लिमेंट आहे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मांसपेशी चा आकार वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे वजन,शुगर चे प्रमाण, हार्ट रेट, रक्तातील चरबीचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. शरीरातील ताण कमी होतो आणि झोप चांगली लागते.
[ Whey Protein ] व्हे-प्रोटीन चे फायदे
- मांसपेशी मजबूत होतात : व्हे-प्रोटीन हे मांसपेशींसाठी फायदेमंद आहे. मांसपेशी मजबूत आणि बळकट बनतात. ज्यामुळे ज्या लोकांची मसल लहान आहेत त्यांना व्हे-प्रोटीन फायदेमंद आहे. व्हे-प्रोटीन च्या दररोज सेवनामुळे मांसपेशी बळकट बनतात आणि वजन उचलण्याची क्षमता वाढते.
- शरीराची वाढ होते : शरीरच्या वाढीसाठी सर्वोत्तम व्हे-प्रोटीन आहे. शरीराच्या उत्तम वाढीसाठी अमिनो ऍसिड हे महत्वाचे असते. शरीराची वाढ थांबण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील अमिनो ऍसिड ची कमी आहे. शरीरात अमिनो ऍसिड ची कमी झाल्यांनतर शरीराची वाढ होत नाही. शरीराच्या वाढीसाठी अमिनो ऍसिड हे महत्वाचे मानले जाते. व्हे-प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे शरीरात अमिनो ऍसिड ची कमी होत नाही. त्यामुळे शरीर चांगली वाढ घेते.
- मांसपेशी रिकव्हर होतात : व्यायामानंतर मांसपेशींना रिकव्हरीची गरज असते त्यासाठी व्यायामांनंतर व्हे-प्रोटीन पिण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने मांसपेशी रिकव्हर होतात. त्यामुळे व्हे-प्रोटीन व्यायाम झाल्यांनतर लगेच प्यावे. पचनासाठी चांगले असल्यामुळे व्हे-प्रोटीन शरीरात लगेच शोषले जाते. आणि तात्काळ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.
- साखर नियंत्रणात ठेवते : ज्या रुग्णांना शुगर ची समस्या आहे अश्या रुग्णांना व्हे-प्रोटीन फायदेशीर आहे. ज्या रुग्णांना टाईप २ चा डायबिटीज आहे अश्या रुग्णांना व्हे-प्रोटीन पिल्यानन्तर फायदा मिळतो. मधुमेहा ची औषधे बनवताना सुद्धा व्हे-प्रोटीन चा वापर केला जातो. व्हे-प्रोटीन चा वापर केल्यांनतर शरीरातील इन्सुलिन चे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. व्हे-प्रोटीन च्या वापरामुळे शरीरात फॅट आणि कार्बोहायड्रेड वाढत नाहीत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणारे घटक व्हे-प्रोटीन मध्ये आहेत त्यामुळे साखर नित्रणासाठी फायद्याचे आहे.
- पचनक्रिया सुधारते : व्हे-प्रोटीन पचन होण्यास सोपे असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते आणि सुधारते. शरीरातील इंफ्लेमेशन कमी करण्यासाठी व्हे-प्रोटीन ची मदत होते. त्यामुळे व्हे-प्रोटीन आहारात सामील केले जाते.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते : शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी व्हे-प्रोटीन चा उपयोग होतो. त्याचप्रमाणे रक्ताभिसरण चांगले होते. लहान मुलांनी जर व्हे-प्रोटीन चे सेवन केले तर अस्थमा होत नाही. आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते.
- मानसिक तणाव कमी होतो : दररोज च्या धावपळीच्या जीवनशैली मुळे माणसाला तणावाला समोर जावे लागू शकते. तणाव कमी करण्यासाठी झोपेची आवश्यकता असते. व्हे-प्रोटीन मध्ये ट्रिप्टोफैन नावाचा घटक असतो, ज्यामुळे गाढ झोप लागते. डोक्यावरील ताण कमी होऊन शांत होते. आनंदी हार्मोन्स तयार होतात. तणाव संपून जातो.
- आय.बी.एस साठी फायदेशीर : इंफ्लामेंट्री बॉवेल सिंड्रोम या आजाराशी लढताना सुद्धा व्हे-प्रोटीन चा फायदा होतो. आय.बी.एस हा आजार असणाऱ्या पेशंट च्या शरीराला अन्नातील घटक लागत नसतात त्यामुळे शरीराला दैनंदिन काम करण्यासाठी ऊर्जा मिळत नसते. दैनंदिन कामासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी पेशंटला बाहेरील सप्लिमेंट वर निर्धारित राहावे लागते. सप्लिमेंट मध्ये व्हे-प्रोटीन सर्वश्रेष्ठ असल्यामुळे याचा वापर फायदेशीर ठरतो.
- केस गळती थांबते : केस गळतीची बरीच कारणे असू शकतात. त्यापैकी शरीरातील व्हिटॅमिन ची पातळी कमी होणे. डोक्याची त्वचा कोरडी पडणे, कोंडा होणे यांसारख्या . व्हे-प्रोटीन चा सेवनामुळे आवश्यक व्हिटॅमिन ची कमी पूर्ण होते. त्याचप्रमाणे शरीर हायड्रेटेड राहिल्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही . आणि त्वचा कोरडी न पडल्यामुळे कोंडा होत नाही परिणामी केस गळती होत नाही.
- वजन कमी करण्यासाठी फायदेमंद : जर तुम्हाला तुमचे वाढते वजन नियोजित ठेवायचे असेल तर व्हे-प्रोटीन चे सेवन करावे. यामुळे शरीरातील प्रोटीन चे प्रमाण सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. व्हे-प्रोटीन मध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेड चे प्रमाण नाही च्या बरोबर असते त्यामुळे वजन नियोजित राहते. व्हे-प्रोटीन पचनाला हलके असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते.
- यकृताचे आरोग्य सुधारते : यकृत हा शरीरातला महत्वाचा अवयव आहे . यामुळे यकृताचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. व्हे-प्रोटीन मध्ये असे काही घटक आहेत त्यामुळे यकृत खराब होण्यापासून बचावले जाते. त्या घटकांना बीटा-लैक्टॉग्लोबिलिन आणि अल्फा-लैक्टॉग्लोबिलिन असे म्हणतात. यामुळे तुमचे यकृत खराब होण्यापासून वाचते. यामुळे यकृताची सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते.
- उच्च रक्तदाब कमी करते : व्हे-प्रोटीनच्या वापरामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी व्हे-प्रोटीन चे नियमित सेवन करावे. याचे कारण म्हणजे व्हे-प्रोटीन मध्ये ऍक्टिव्ह पेप्टाइड असतात ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर येण्यासाठी व्हे-प्रोटीन ची मदत होते. उच्च रक्त दाबामुळे येणार हार्ट अटॅक आणि फिट येणारे आजार सुद्धा कमी होईल मदत होते.
[ Whey Protein ] व्हे-प्रोटीन चे प्रकार
व्हे-प्रोटीन च्या कॉन्सन्ट्रेशन नुसार त्याचे तीन मुख्य प्रकार पडतात. कॉन्सन्ट्रेट, आयसोलेट आणि हायड्रोलाईज्ड असे तीन प्रकार पडतात. त्याबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे
- कॉन्सन्ट्रेट व्हे-प्रोटीन : सर्वात जास्त वापरले जाणारे हे व्हे-प्रोटीन आहे. यामध्ये प्रोटीन चे प्रमाण ८०% पर्यंत असते.
- आयसोलेट प्रोटीन : या प्रकारच्या व्हे-प्रोटीन मध्ये प्रोटीन चे प्रमाण ९० ते ९५ % इतके असते. हे प्रोटीन शरीरात जास्त प्रमाणात शोषले जाते. आणि लागेच रिझल्ट दिसतो.
- हायड्रोलाईज्ड प्रोटीन : इतर दोन प्रोटीन पेक्षा हे प्रोटीन किमतीने महाग आहे. यामध्ये १००% शुद्ध व्हे-प्रोटीन असते. हे प्रोटीन खासकरून खेळाडूंसाठी बनवले आहे कारण त्यांना जास्त प्रोटीन ची गरज असते. ज्यांना कमी काळात जास्त बॉडी बनवायची आहे असे लोक या प्रोटीन चा उपयोग करतात.
[ Whey Protein ] व्हे-प्रोटीन घेण्यासंबंधी नियम पहा
व्हे-प्रोटीन हे पावडर स्वरूपात असते. त्याला योग्य प्रमाणात पाण्यात किंवा दुधात मिसळून घ्यावे लागते. त्याचप्रमाणे काहीलोक याचे सेवन दह्यात किंवा मिल्कशेक सारख्या द्रव्य पदार्थात करतात. व्हे-प्रोटीन पाण्यात मिक्स केल्यांनतर शेकर ने मिक्स करावे किंवा मिक्सर मध्ये घुसळून घ्यावे.
[ Whey Protein ] कधी प्यावे
सकाळी उठल्यावर व्हे-प्रोटीन पिल्यामुळे शरीरात लगेच शोषले जाते. त्याचप्रमाणे व्यायाम करणार्यांनी व्यायामांनंतर व्हे-प्रोटीन घ्यावे. तयामुळे मसल्स रिकव्हर व्हायला मदत होते. ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन पिऊ नये. त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात.
लक्षात ठेवा
जर तुम्हाला व्हे-प्रोटीन घ्यायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्ताची तपासणी करून शरीरातील प्रोटीन चे प्रमाण चेक केले जाते. गरज किती आहे हे पहिले जाते त्यानुसार डॉक्टर सल्ला देतात. त्यानुसार ब्रँडेड कंपनीचे व्हे-प्रोटीन सप्लिमेंट घ्यावे.
[ Whey Protein ] अनुमान
स्वतःच्या मांसपेशी वाढवण्यासाठी बॉडी बिल्डर व्हे-प्रोटीन चा उपयोग करतात. सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनातील कार्य करण्यासाठी प्रोटीन योग्य पातळीत गरजेचे असते . प्रमाणापेक्षा अधिक प्रोटीन च्या सेवनामुळे सुद्धा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्याप्रमाणात प्रोटीनचा उपयोग करावा. प्रोटीन घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. रक्त आणि लघवीच्या आवश्यक चाचण्या करणे गरजेचे असते. व्हे-प्रोटीन चे अनेक फायदे आहेत. त्यापैकी मांसपेशी मजबूत बनतात, शरीराची वाढ होते, मधुमेहात फायदेमंद, रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवते, पचनशक्ती सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, वजन नियंत्रित ठेवते, लिव्हर चे आरोग्य सुधारावते इत्यादी फायदे व्हे-प्रोटीन चे आहेत.
नैराश्य संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.