[ Widal Test ] विडाल टेस्ट बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Widal Test ] विडाल टेस्ट म्हणजे काय ?

[ Widal Test ] विडाल टेस्ट हि एक अशी टेस्ट आहे ज्यामध्ये टायफॉईड आणि आंतरिक तापाबद्दल माहिती मिळते. हि टेस्ट सर्वात प्रथम जॉर्जीस फर्डिनंड विडाल याने १८९६ मध्ये केली होती. पुढे त्याच्या नावानेच हि टेस्ट ओळखली जाऊ लागली.

विडाल टेस्ट हि एक अत्याधुनिक टेस्ट आहे त्यामध्ये अँटीबॉडी चे प्रमाण लक्षात येते. ह्या अँटीबॉडी टायफॉईड च्या तापाला कारणीभूत असणाऱ्या सालमोनेला ब्याक्टेरिया बरोबर लढण्यास मदत करतात. रुग्णाच्या शरीरातून रक्ताचे नमुने काढले जातात आणि त्यातील ओ आणि एच अँटीबॉडी पाहिल्या जातात. ही टेस्ट जीवघेना  आजार टायफॉईड साठी केली जाते. यासाठी विडाल टेस्ट चा रिपोर्ट पाहून योग्य अंदाज लावणे गरजेचे असते.

[ Widal Test ] टायफॉईड चा ताप आणि विडाल टेस्ट

टायफॉईडचा ताप ज्याला आंतरिक ताप असे सुद्धा म्हणले जाते. सालमोनेला या बॅक्टेरिया मुळे होणारी हि एक गंभीर समस्या आहे. दूषित पदार्थ खाण्यामुळे किंवा दूषित पाणी पिल्यामुळे या ब्याक्टेरिया पचनतंत्रावर प्रभावित करते.

टायफॉईड ग्रस्त व्यक्ती मध्ये थकवा, तीव्र ताप, डोके दुखी, जुलाब, पोटदुखी, वजन कमी होणे इत्यादी समस्या असतात. टायफॉईड च्या तापाचे लवकरात लवकर निदान करून त्यावर उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे आतड्याला जखमा होणे थांबते आणि रक्त प्रवाह होत नाही. आणि गंभीर समस्या पासून वाचले जाऊ शकते.

टायफॉईडच्या तापाचे निदान करण्यासाठी विविध तपासन्या केल्या जातात. त्यामध्ये स्टूल कल्चर,बोन मॅरो इत्यादी. पण विडाल टेस्ट एकमेव टेस्ट आहे त्यामुळे अँटीबॉडी चे प्रमाण समजते . या अँटीबॉडी टायफॉईडच्या तापासाठी कारणीभूत असलेल्या सालमोनेला या बॅक्टरीया सोबत लढतात.

सालमोनेला बॅक्टरीया हा टायफॉईडच्या तापासाठी कारणीभूत बॅक्टेरिया आहे. खराब अन्न आणि पाणी यामुळे या बॅक्टेरियाची लागण होते. याचे मूळ दोन प्रकार पद्धतीत

  • सालमोनेला टायफी ज्याला  एस.टायफी असे म्हणले जाते .
  • सालमोनेला पेराटायफी ज्याला  एस.पेराटायफी असे म्हणले जाते .

एस.टायफी ब्याक्टेरियाचे दोन प्रकार असतात .

  • एस.टायफी o (TO), प्राथमिक अँटीजेन
  • एस.टायफी H  (TH), दुय्यम  अँटीजेन

त्याचप्रमाणे एस.पेराटायफी चे दोन प्रकार

  • एस.पेराटायफी  ए
  • एस.पेराटायफी  बी

विडाल टेस्ट  रिपोर्ट  मधील मूल्यांकन पाहण्यासाठी , आणि त्यातील आकडे पाहण्यासाठी आपण पुढे पाहणार आहोत.

[ Widal Test ] विडाल टेस्ट चा सिद्धांत

जेव्हा तुम्ही सालमोनेला ब्याक्टेरिया युक्त आहार घेता, तेव्हा हा ब्याक्टेरीया अँटीजेन च्या स्वरूपात शरीरात प्रवेश करतो. शरीरातील पाचन यंत्रा पर्यंत पोहचल्यावर शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती याच्या विरोधात अँटीबॉडी बनवायला सुरुवात करते. त्यामुळे ताप येतो आणि पुढे तपासणीतून टायफॉईड झाल्याचे निष्पन्न होते.

या टेस्ट मधून शरीरातील अँटीबॉडी बद्दल माहिती मिळते. एका खास प्रकारच्या ब्याक्टेरिया बरोबर लढताना या अँटीबॉडी तयार होतात. जर टायफॉईड चा ताप आला असेल तर तुमच्या सर्व शरीरातील रक्तात अँटीबॉडी सापडतील. त्या अँटीबॉडी वरून समजेल कि सालमोने चा ब्याक्टेरिया शरीरात आलेला आहे.

विडाल टेस्ट चा खरा सिद्धांत हा आहे कि रक्ताच्या नमुन्यात जर काही अँटीबॉडी असतील तर खास अँटीजेन ला संबोधित केलेले असेल. आणि रिपोर्ट वरती त्याला संबोधले सुद्धा असेल.

Widal Test

[ Widal Test ] विडाल टेस्ट ची तयारी

विडाल टेस्ट करण्यासाठी आपल्याजवळ खालील सामग्री असणे गरजेचे आहे.

  1. रुग्णाच्या रक्ताचे नमुने
  2. पिपेट
  3. सिरम
  4. एस.अँटीजेन (O,H,AH,BH)
  5. स्लाईड
  6. स्टिक मिक्स करण्यासाठी
  7. घड्याळ

अँटीजेन संदर्भात माहिती मिळवण्यासाठी रिएजंट ची आवश्यकता आहे. जसे कि O  Ag, H  Ag, AH Ag, BH Ag इत्यादी.

[ Widal Test ] विडाल टेस्ट हि दोन टप्प्यामध्ये केली जाते.

  1. क्वालिटेटिव्ह विडाल टेस्ट – या टेस्ट मध्ये ६ रिअक्शन सर्कल  आपण वापरणार आहोत. ज्यामध्ये अनुक्रमे O, H, AH, BH, PC आणि NC अशी नावे असतात. टेस्ट सुरु करण्यासाठी खालील प्रक्रिया पहा.
  • रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचे चार थेम्ब O,H,AH,BH या सर्कल  वर प्रत्येकी एक-एक थेम्ब टाका.
  • पॉजिटीव्ह कंट्रोल चा एक थेम्ब PC सर्कल मध्ये टाका तर दुसरा थेम्ब NC सर्कल मध्ये टाका.
  • याच्या नंतर O अँटीजेन चा एक थेम्ब O सर्कल मध्ये टाका, P अँटीजन चा एक थेम्ब P सर्कल मध्ये टाका, AH अँटीजन चा एक थेम्ब AH  सर्कल मध्ये टाका आणि BH अँटीजन चा एक थेम्ब BH सर्कल मध्ये टाका.
  • यानंतर कोणताही अँटीजन चा म्हणजेच O,H,AH,BH यांना PC आणि  NC सर्कल मध्ये टाका.
  • यानंतर सिरम आणि अँटीजन ला सर्कल मध्ये चांगल्या पद्धतीने मिसळा जेणेकरून मिश्रण सर्कल च्या बाहेर गेले नाही पाहिजे. आणि स्लाईडला स्पर्श करा.
  • त्याचप्रमाणे एक मिश्रण दुसऱ्या मिश्रणात मिक्स झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी . कारण यामुळे प्रयोगाचा अनुमान चुकू शकतो.
  • शेवटी स्लाईडला गोल गोल फिरावा त्यामुळे सिरम आणि रिएजंट व्यवस्थित एकत्र मिसळत.

एखादा ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला परिणाम दिसायला लागतील. जर टेस्ट पॉजिटीव्ह असतील तर टेस्ट PC ( +कंट्रोल सर्कल ) च्या समांतर असेल आणि टेस्ट नेगेटिव्ह असेल तर NC ( -VE कंट्रोल सर्कल ) च्या समांतर असेल. जर टेस्ट केल्यांनतर काही बदल झाला तर टेस्ट चा निकाल पॉजिटीव्ह असेल नाहीतर टेस्ट चा निकाल नेगेटिव्ह असेल.

जर टेस्ट चा निकाल पॉजिटीव्ह असेल तर पुढच्या टप्प्यात क्वांटॅटीव्ह टेस्ट केली जाते. टायफॉईडच्या तापाचा अंदाज लावण्यासाठी पॉजिटीव्ह अँटीजन चा रिएजंट घेतला जातो. जर क्वालिटेटिव्ह टेस्ट मध्ये O पॉजिटीव्ह असेल तर O चा रिएजंट क्वांटॅटीव्ह टेस्ट मध्ये घेतला जातो.

जास्त करून क्वांटॅटीव्ह टेस्ट हि O आणि H म्हणजेच एस.टायफी चे संक्रमण निश्चित करण्यासाठी केले जाते. क्वालिटेटिव्ह टेस्ट मध्ये खूप कमी लोकांचा AH किंवा BH पॉजिटीव्ह असतो.

२] क्वांटॅटीव्ह विडाल  टेस्ट – हि टेस्ट टायफॉईडचा झालेला प्रकार किती प्रमाणात पसरला आहे हे पाहण्यासाठी केली जाते. जर कोणी O पॉजिटीव्ह असेल तर O ची चाचणी केली जाते,जर कोणी H  पॉजिटीव्ह असेल तर H  ची चाचणी केली जाते, आणि O आणि H दोन्ही पॉजिटीव्ह असतील तर दोन्हीची तपासणी केली जाते.

  • ८ सर्कल च्या वेगवेगळ्या स्लाईड चा उपयोग आपण करणार त्यामध्ये चार O आणि चार H अँटीजेन साठी वापरणार
  • जर मागच्या टेस्ट मध्ये O पॉजिटीव्ह असेल तर हॉरीझॉन्टल पद्धतीने रुग्णाचे रक्ताचे नमुने ५ UL. पहिल्या O सर्कल मध्ये टाका. दुसऱ्यात १० UL, तिसर्यात २० UL आणि चौथ्यात ४० UL
  • याच पद्धतीने चारी सर्कल मध्ये रिएजंटचा एक-एक थेम्ब टाका .
  • निकाल मिळवण्यासाठी उजव्या हाताने व्हाल्यू मार्क करा पहिल्या सर्कल ला १:३२०, दुसऱ्या सर्कल ला १:१६०, तिसऱ्या सर्कल ला १:८० मार्क करा, चौथ्या सर्कल ला १:४० मार्क करा.

[ Widal Test ] विडाल टेस्ट चे विवरण

रक्ताचा नमुना आणि रिएजंट चांगल्या पद्धतीने मिसळा आणि स्लाईड पलटून ठेवा. आणि निकाल येई पर्यंत वाट बघा. जर O सर्कल मध्ये १०० पेक्षा जास्त पॉजिटीव्ह येत असतील आणि H सर्कल मध्ये २०० पेक्षा जास्त येत असतील तर केलेली टेस्ट हि पॉजिटीव्ह आहे.

जर अँटिबायोटिक्स, मलेरिया, डेंग्यू किंवा काही दिवसापासून जास्त ताप येणे या स्थितीत रिपोर्ट निगेटिव्ह पण असू शकतात.

आपण आपला रिपोर्ट खालील प्रमाणानुसार तपासू शकता.

  • जर एस.टायफी १:८० च्या कमी किंवा बरोबर असेल तर टेस्ट नेगेटिव्ह आहे. जर एस.टायफी १:१६० च्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर टेस्ट पॉजिटीव्ह आहे.
  • जर एस.पॅराटायफी १:८० च्या कमी किंवा बरोबर असेल तर टेस्ट नेगेटिव्ह आहे. जर एस.पॅराटायफी १:१६० च्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर टेस्ट पॉजिटीव्ह आहे.

जर एस.टायफी O पॉजिटीव्ह असेल तर तुम्हाला तीव्र ताप असू शकतो. जुन्या संक्रमणामुळे तुम्हाला हा ताप आलेला असू शकतो. ज्यावेळेस O आणि H सर्कल ची रेंज हि १:८० च्या बरोबर किंवा कमी असते त्यावेळेस विडाल टेस्ट निगेटिव्ह असते.

[ Widal Test ] विडाल ची ट्यूब टेस्ट

क्वालिटेटिव्ह आणि क्वांटॅटीव्ह विडाल टेस्ट च्या व्यतिरिक्त अजून एक विडाल टेस्ट करायची पद्धत आहे तिला विडाल टेस्ट ट्यूब मेथड असे म्हणतात. यामध्ये आठ ट्यूब घेतल्या जातात आणि त्यांना डायल्युट करून पहिले जाते. पहिली टेस्ट विडाल तापाची माहिती देतो. येणार ताप टायफॉईड चाच आहे हे विडाल टेस्ट ट्यूब पद्धतीने निश्चित होते.

टायफॉईड च्या तापाची माहिती मिळवण्यासाठी पहिल्या दोन टेस्ट ट्यूब चा उपयोग केला जातो.

  •  H एग्लुटीनेशन साठी ड्रेयर्स ट्यूब
  • O  एग्लुटीनेशन साठी फ्लेक्सि ट्यूब

आज काल O आणि H या दोन्ही एग्लुटीनेशन साठी ३ X ०.५ ML KAHN ट्यूब चा उपयोग होतो.

[ Widal Test ] विडाल टेस्ट ट्यूब पद्धतीसाठी खालील उपकरणे लागतात.

  • रक्ताचा नमुना
  • O,H,AH आणि BH अँटीजन
  • सलाईन
  • पिपेट
  • टेस्ट ट्यूब रॅक
  • टेस्ट ट्यूब
  • पाण्याचा फवारा

विडाल ची टेस्ट ट्यूब पद्धत करण्या अगोदर हि गोष्ट लक्षात ठेवा कि हि टेस्ट एक टेस्ट ट्यूब डायल्युशन पद्धत आहे. त्यामुळे व्यवस्थित पार पाडणे आवश्यक आहे. हि टेस्ट कशी करायची हे पाहूया.

  1. पहिल्यांदा टेस्ट साठी लागणाऱ्या ९ ट्यूब घ्या आणि रॅक मध्ये फिक्स करा. O साठी १ ते ९ असे टेस्ट ट्यूब ला मार्किंग करा.
  2. पहिल्या ट्यूब मध्ये ०.९ ML रक्ताचा नमुना आणि ०.१ ML सामान्य सलाईन मिक्स करा. आणि राहिलेल्या ट्यूब मध्ये ०.५ ML सलाईन मिक्स करा .
  3. यांच्यानंतर पहिल्या ट्यूब मधील ०.५ ML घेऊन दुसऱ्या ट्यूब मध्ये टाका. यामुळे पहिल्या टेस्ट ट्यूब मधील ०.५ ML सोल्युशन वाचेल आणि दुसऱ्या ट्यूब मध्ये १ ML सोल्युशन होईल.
  4. हीच प्रक्रिया परत करा. म्हणजेच मागील ट्यूब मधील ०.५ ML सोल्युशन आणि पुढील ट्यूब मध्ये मिसळत जावा. म्हणजे १ ML सोल्युशन बनेल. आठव्या ट्यूब मधील ०.५ ML सोल्युशन घ्या आणि त्याला एका वेगळ्याच ट्यूब मध्ये टाका.
  5. सगळ्या ट्यूब व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे आपल्याला सगळ्या ट्यूबचे डायल्युशन मिळून जाईल. १:१०, १:२०, १:४०, १:८०, १:१६०, १:३२०, १:६४० आणि १:१२८०
  6. ९ वा टेस्ट ट्यूब घ्या आणि त्यात पॉजिटीव्ह कंट्रोल मिक्स करा.
  7. यानंतर सगळ्या आठ ट्यूब मध्ये एका पाठोपाठ एक ०.५ML अँटीजन (O,H,AH,BH ) मिक्स करा. तयामुळे प्रत्येक ट्यूब मध्ये १ ML सोल्युशन होऊन जाईल.
  8. सगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएजंट मिक्स केल्यानंतर, आपल्याला पहिल्या ट्यूब पासून ते शेवटच्या ट्यूब पर्यंत फायनल डायल्युशन मिळून जाईल. जे कि १:२०, १:४०, १:८०, १:१६०, १:३२०, १:६४०,१:१२८० आणि १:२५८०
  9. याला चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि झाकून ठेवा, ट्यूब ला रात्रभर ३७ डिग्री तापमानात ठेवा. (१८ ते २४ तास )

 

[ Symptoms of Malaria ] मलेरिया ची लक्षणे आणि कारणे .

Leave a Comment