NHM Palghar Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील भरती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे पालघर जिल्ह्यामध्ये 80 जागांसाठी भरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 7 मार्च 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत 11 मार्च 2024 रोजी होणार आहे. या भरतीमध्ये 24 विविध प्रकारची पदे आहेत. या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील भरती संदर्भात विस्तृत माहिती खालील प्रमाणे आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मधील 80 जागा पालघर जिल्हा करिता भरण्यासाठी भरती निघालेली आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत होणाऱ्या भरतीतील पदांची नावे खालील प्रमाणे आहेत.
NMH Palghar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे रिक्त असणारी पदे खालील प्रमाणे
- हृदयरोगतज्ञ या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- बालरोगतज्ञ या पदासाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत.
- भूलतज्ञ या पदासाठी चार जागा रिक्त आहेत.
- स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ या पदासाठी पाच जागा रिक्त आहेत.
- फिजिशियन पदासाठी 04 जागा रिक्त आहेत.
- मानसोपचारतज्ञ पदाकरिता एक जागा रिक्त आहे.
- नेत्रतज्ञ पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- वैद्यकीय अधिकारी पदासाठी 26 जागा रिक्त आहेत.
- पीअर सपोर्टर ( NVHCP अंतर्गत) या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- कीटकशास्त्रज्ञ पदासाठी सहा जागा रिक्त आहेत.
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदासाठी सहा जागा रिक्त आहेत.
- CPHC सल्लागार पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- DEIC व्यवस्थापक पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- वैद्यकीय अधिकारी ( पुरुष) या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
- ऑडिओ लॉजिस्टिक आणि स्पीच थेरपिस्ट या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
- श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- सुविधा महाव्यवस्थापक- ई- एचएमआयएस ( अंमलबजावणी अभियंता ) या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत.
- पोषण तज्ञ या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- फिजिओथेरपिस्ट या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- सिकलेस समन्वयक या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- दंत तंत्रज्ञ या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- क्षयरोग आरोग्य अभ्यागत या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
NHM Palghar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील पदांकरिता शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे.
- हृदयरोगतज्ञ या पदासाठी एमडी कार्डिओलॉजिस्ट ही पदवी असणे गरजेचे आहे.
- बालरोगतज्ञ या पदासाठी एमडी पेडेस्ट्रीयन / डीसीएच / डीएनबी या पदवीची आवश्यकता आहे.
- भूलतज्ञ या पदासाठी एमडी Anesthiasis / डीए / डीएनबी या पदवीची आवश्यकता आहे.
- स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ या पदासाठी MD / MS , MD Gynecologist / DPM / DNB या पदवीची आवश्यकता आहे.
- फिजिशियन या पदासाठी MD Medicine/DNB या पदवीची आवश्यकता आहे.
- मानसोपचारतज्ञ या पदासाठी MD / MS , MD Phychiatry / DPM / DNB या पदवीची आवश्यकता आहे.
- नेत्रतज्ञ या पदासाठी MS Opthmaologist/DOMS या पदवीची आवश्यकता आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी MBBS या पदवीची आवश्यकता आहे.
- पीअर सपोर्टर ( NVHCP अंतर्गत) या पदासाठी Hepatites B किंवा C बाधित व्यक्ती. किंवा त्याच्या कुटुंबातील नातेवाईक
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी ची माहिती पाण्यासाठी जाहिरात पहा.
- कीटकशास्त्रज्ञ या पदासाठी एम.एस्सी. प्राणीशास्त्र, 5 वर्षांचा अनुभव या पदवीची आवश्यकता आहे.
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ या पदासाठी कोणतेही वैद्यकीय पदवीधर MHA/MPH/MBA हेल्थ केअरमध्ये,1वर्षांचा अनुभव या पदवीची आवश्यकता आहे.
- CPHC सल्लागार या पदासाठी कोणतेही वैद्यकीय पदवीधर MHA/MPH/MBA हेल्थ केअरमध्ये,1वर्षांचा अनुभव या पदवीची आवश्यकता आहे.
- DEIC व्यवस्थापक या पदासाठी कोणतेही वैद्यकीय पदवीधर MHA/MPH/MBA हेल्थ केअरमध्ये,1वर्षांचा अनुभव या पदवीची आवश्यकता आहे.
- वैद्यकीय अधिकारी ( पुरुष) या पदासाठी कोणतेही वैद्यकीय पदवीधर MHA/MPH/MBA हेल्थ केअरमध्ये,1वर्षांचा अनुभव या पदवीची आवश्यकता आहे.
- ऑडिओ लॉजिस्टिक आणि स्पीच थेरपिस्ट या पदासाठी BAMS/BUMS या पदवीची आवश्यकता आहे.
- श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक या पदासाठी Audiologist या पदवीची आवश्यकता आहे.
- सुविधा महाव्यवस्थापक- ई- एचएमआयएस ( अंमलबजावणी अभियंता ) या पदासाठी 12 वी विज्ञान शाखेतून पास झालेला पाहिजे. तसेच सहा महिन्याची फ्रेंडशिप त्याबरोबरच श्रवण भाषा आणि भाषणात डिप्लोमा झालेला पाहिजे.
- पोषण तज्ञ या पदासाठी बीएससी न्यूट्रिशन त्याबरोबरच दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
- फिजिओथेरपिस्ट या पदासाठी दोन वर्षाच्या अनुभवासह फिजिओथेरपीमध्ये पदवी पाहिजे.
- सिकलेस समन्वयक या पदासाठी MSW पदवी पाहिजे.
- डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी सायन्स व डिप्लोमासह 10 + 2 किंवा डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र पाहिजे.
- दंत तंत्रज्ञ या पदासाठी 12 वी सायन्स मधून उत्तीर्ण पाहिजे, डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स झालेला पाहिजे, त्याचबरोबर राज्य दंत परिषदेकडे नोंदणी पाहिजे.
- क्षयरोग आरोग्य अभ्यागत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये पहा.
- या सर्व पदांकरिता वयाची अट 70 वर्षापर्यंत आहे.
- या भरतीमध्ये निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना पगार हा 17000 रुपये ते 1,25,000 रुपये इतका असणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर या भरतीमध्ये निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचे नोकरीचे ठिकाण हे पालघर असणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर या भरती करिता उमेदवारांना कोणत्याही प्रकार ची परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.
- ” जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.
- 7 मार्च 2024 ही या भरती करिता अर्ज करायची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर या ठिकाणी होणाऱ्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रथमता ती जाहिरात वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
- या भरती मधून उमेदवारांची निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. 11 मार्च 2024 या तारखेला मुलाखत आहे.
NHM Palghar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे होणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर [ NHM Palghar Bharti 2024 ] येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता दिलेला आहे.
- या भरतीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही लिंक दिलेली नाही.
- या भरतीसाठी अर्ज करताना आपले नाव, कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत ते पद, स्वतःचे शैक्षणिक शिक्षण, शिक्षणाचा पुरावा, जन्मतारीख, वैयक्तिक माहिती या गोष्टी अर्जावर ती अचूक भरायचे आहेत. यात काही चुकले तर त्यास राष्ट्रीय आरोग्य विभाग, पालघर जबाबदार राहणार नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे 7 मार्च 2024 ही भरतीची अंतिम तारीख सांगण्यात आलेली आहे.
- अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
NHM Palghar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर येथे भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील माहिती वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर येथे मुलाखतीसाठी फक्त अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
- या होणाऱ्या मुलाखतीसाठी कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला TA/PA दिला जाणार नाही. अशी घोषणा राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर यांनी केली आहे.
- 11 मार्च 2024 रोजी ” नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर” या ठिकाणी अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार केला. तर उमेदवारावर ती कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदरील भरती करता कोणत्या पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत. आणि त्या जागांसाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे. हे राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर यांच्यामार्फत सांगितलेले आहे. त्यानुसारच उमेदवारांनी अर्ज करावेत.
NHM Palghar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे
- शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारा विरोधात कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसला पाहिजे.
- संबंधित भरती मध्ये टेक्निकल पदे भरण्याकरिता उमेदवाराकडून त्या क्षेत्रातील कौन्सिलची नोंदणी असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संबंधित कौन्सिलला नोंदणीसाठी केलेल्या अर्जाची पावती अर्जाबरोबर असणे गरजेचे आहे. कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र हे नूतन असावे. जुने किंवा रद्द झालेले प्रमाणपत्र असल्यास उमेदवाराचा अर्ज अपात्र केला जाईल.
- या भरतीमध्ये मुलाखतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर द्वारे दिलेल्या नियम व अटी मान्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी ₹100 च्या स्टॅम्प पेपर वरती लिहून द्यावे लागेल.
- संबंधित भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराला जर दोन पेक्षा अधिक मुल असतील तर त्या उमेदवाराची निवड केली जाणार नाही. म्हणूनच स्वतःचे कुटुंब लहान असल्याचा प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- अर्ज सादर करत असताना बरोबर आवश्यक कागदपत्रांच्या प्रति जोडणे गरजेचे आहे. त्यानंतर जर उमेदवाराची निवड झाली. तर त्याची ओरिजनल कागदपत्रे पडताळणीसाठी निवड समितीकडे जमा करावी लागतील. जर कागदपत्रांमध्ये फसवणुकीचा प्रकार आढळला तर कायदेशीर कारवाई केली जाईल. व त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
- नेमणूक केलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण तपासण्या करिता प्रतिरोध ₹300 इतके मानधन दिले जाईल.
- एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची जर वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली तर त्याचे मानधन हे राज्य स्तरावरील सूचनांचे पालन करून त्याला सोपवण्यात येईल.
- या भरती करिता वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत आहे. पण 60 वर्षापुढील उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून आपण शारीरिक दृष्ट्या सदृढ आहे याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागातील भरती [ NHM Palghar Bharti 2024 ] , पोलीस भरती, आर्मी भरती त्याचप्रमाणे भारत सरकारच्या सर्व खात्यांमधील भरत याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या . वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा