Gadchiroli Police Bharti 2024 | पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. गडचिरोली पोलीस भरती निघालेली आहे. गडचिरोली पोलिसांमार्फत या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये 742 जागा पोलीस शिपाई या पदाकरिता रिक्त आहेत. पोलीस शिपाई या पदासाठी तुम्ही 5 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात करू शकता. गडचिरोली पोलिसांमार्फत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही जाहीर केलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीचा वापर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी गडचिरोली पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावी. गडचिरोली पोलीस भरती करिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील गडचिरोली पोलीस भरती मध्ये एकूण 742 जागा आहेत.
- गडचिरोली पोलिसांमार्फत घेण्यात येणारी ही भरती पोलीस शिपाई पदासाठी होणार आहे.
Gadchiroli Police Bharti 2024 | गडचिरोली पोलीस भरती पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालील प्रमाणे.
- गडचिरोली पोलीस भरती ही पोलीस शिपाई या पदासाठी होणार आहे. या पदाच्या एकूण 742 जागा रिक्त आहेत.
- सदरील भरतीतील पोलीस शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे पाहण्याकरिता प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी.
- गडचिरोली पोलिसांकडून घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती करिता वयाची अट ही 18 वर्षे ते 28 वर्षापर्यंत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वयाची अट 18 ते 33 वर्षापर्यंत आहे.
- गडचिरोली पोलिस अंतर्गत पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या 742 उमेदवारांना वेतन हे नियमानुसार मिळेल.
- पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे गडचिरोली जिल्हा राहील.
- गडचिरोली पोलिसांच्या द्वारे घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी 450 रुपये शुल्क आहे. तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 350 रुपये शुल्क आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गडचिरोली पोलिसांमार्फत देण्यात आलेल्या लिंक वरती क्लिक करूनच आपला अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
- या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 मार्च 2024 ही आहे.
- पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा.
- गडचिरोली पोलिसांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
Gadchiroli Police Bharti 2024 | गडचिरोली पोलिसांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खालील नियम वाचा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता गडचिरोली पोलिसांकडून ऑनलाइन पोर्टल दिलेला आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धत म्हणजेच ऑफलाइन, पत्राद्वारे किंवा कुरियर द्वारे उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत.
- ऑनलाइन अर्ज भरत असताना स्वतःची माहिती जसे की जन्मतारीख, शिक्षण, पूर्ण नाव, वडिलांचे नाव, पत्ता, पिनकोड यांसारख्या गोष्टी उमेदवाराने काळजीपूर्वक भरायच्या आहेत. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली तर गडचिरोली पोलीस जबाबदार राहणार नाहीत.
- पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचावी. नंतरच ऑनलाइन लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा.
Gadchiroli Police Bharti 2024 | गडचिरोली पोलीस भरती साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना पहाव्या.
- गडचिरोली पोलीस अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
- गडचिरोली पोलिसांनी कोणत्याही उमेदवाराला TA/DA न देण्याचा घेतलेला आहे. त्यामुळे कोणालाही TA/DA मिळणार नाही.
- महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये होत असलेल्या भरतीमध्ये उमेदवाराकडून अनुचित प्रकार केलेल्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. गडचिरोली पोलिसांना अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये जर कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल.
- पोलीस शिपाई पदाच्या निवड परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी गडचिरोली पोलिसांमार्फत देण्यात आलेले हॉल तिकीट घेऊनच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
- गडचिरोली पोलिसांमार्फत होणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीची प्रक्रिया काय असेल. त्याचप्रमाणे यासाठी कोणता अभ्यास क्रम असेल. याबद्दलची सर्व माहिती संकेतस्थळावर ती उपस्थित आहे.
Gadchiroli Police Bharti 2024 | पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी.
- पोलीस सेवा प्रवेश मध्ये केलेल्या सुधारित तरतुदीनुसार म्हणजेच महाराष्ट्र पोलीस शिपाई ( सेवाप्रवेश) नियम 2011 अनुसार गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापने वरून 742 पोलीस शिपाईची पदे रिक्त आहेत. ते भरण्यासाठी ही भरती काढलेली आहे.
- पोलीस अधीक्षकांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या भरतीच्या पदाकरिता उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. पोलीस अधीक्षक यांचेकडून अर्ज करण्यासाठी www.policerecruitment2024.mahait.org हा ऑनलाइन पोर्टल देण्यात आलेला आहे.
- या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे.
- ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये. असे आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल.
- पोलीस शिपाई पदाच्या भरती करिता उमेदवाराच्या दोन टप्प्यात चाचण्या होणार आहेत. पहिली चाचणी ही शारीरिक चाचणी असणार आहे तर दुसरी चाचणी ही लेखी परीक्षेच्या स्वरूपात असणार आहे. शारीरिक चाचणी जी घेण्यात येणार आहे ती 50 मार्कांची राहील. आणि जी लेखी परीक्षा होणार आहे ती परीक्षा संपूर्ण पोलीस घटकात एकाच दिवशी राहील याची दखल उमेदवारांनी घ्यावी. आणि त्यानुसारच अर्ज भरावा.
- पोलीस शिपाई पदाच्या भरती मध्ये सुरुवातीला शारीरिक चाचणी घेण्यात येईल. या शारीरिक परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना किमान 50% गुण मिळतील आशा उमेदवारांना लेखी परीक्षा देण्यात येईल. लेखी परीक्षेचे एकूण 100 गुण असतील. लेखी परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या कमीत कमी 40 टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. 40% पेक्षा कमी गुण ज्या उमेदवाराला मिळतील ते उमेदवार अपात्र ठरवले जातील.
- शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी यामध्ये पास होण्याकरिता किती गुण पाहिजेत हे आपण पाहिले. या दोन चाचण्यांमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी काढण्यात येईल. गुणवत्ता यादी बनवून झाल्यानंतर उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल. ज्या उमेदवारांची सर्व कागदपत्रे पडताळणी द्वारे ग्राह्य धरली जातील आशा उमेदवारांचा तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होईल. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोघांचे एकत्रित गुण त्याचप्रमाणे कागदपत्र सर्व बरोबर असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
- www.policerecruitment2024.mahait.org या वेबसाईट वरती उमेदवारांनी भेट द्यावी कारण पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, आरक्षणाच्या तरतुदी, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख त्याचप्रमाणे अर्ज भरतीची सुरवातीची तारीख, अनाथांसाठी भरतीच्या एकूण पदांपैकी 1% आरक्षण देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळाला भेट द्यावी. आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी व त्यानंतरचा अर्ज करावा.
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार शारीरिक चाचणीला किंवा लेखी परीक्षेला उपस्थित राहिला नाही. तर त्याला या भरती मधून बाद करण्यात येईल. त्यामुळे ज्या तारखेला व ज्या वेळेला शारीरिक व लेखी चाचणी आहे. त्या ठिकाणी उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे.
- पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी प्रत्येक प्रवर्गात किती जागा आहेत. याचा विचार करूनच अर्ज करावा. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात अर्ज करता येईल. पण खुल्या प्रवर्गातील कोणत्याही इतरांना मागास प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही.
- सदरील भरतीमध्ये उपलब्ध असणारी रिक्त पदे यांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28306/2017 याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मुंबई उच्च न्यायालय यांनी जनहित याचिका क्रमांक 175/2018 त्याचप्रमाणे इतर संलग्न याचिका संदर्भात 27/06/2019 रोजी दिलेल्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजून समोर नसल्यामुळे पदांची संख्या मध्ये बदल होऊ शकतो.
- गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या पोलिसांना गोंडी आणि माडिया भाषा येणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रह विभाग, महाराष्ट्र शासन दिनांक 23 मार्च 2018 नुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 100 गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये पास होण्याकरिता उमेदवारांना कमीत कमी 35% गुणांची आवश्यकता आहे. शेवटची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्या यादीमध्ये या चा विचार केला जाणार नाही.
- ग्रह विभाग, महाराष्ट्र शासन दिनांक 23 मार्च 2018 या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करण्यात येईल. याकरिता उमेदवारां जवळ तहसीलदाराचा रहिवासी दाखला असणे बंधनकारक आहे. उमेदवाराने त्या दाखल्याची प्रत आपल्या अर्जासोबत जोडावी
- गडचिरोली जिल्ह्यात पोलीस शिपाई पदासाठी निवड केलेले उमेदवार हे गडचिरोली जिल्हा बाहेरील बदलीसाठी अपात्र असतील. त्यांची बदली ही गडचिरोली जिल्हा अंतर्गत होईल. असा आदेश महाराष्ट्र शासन गृह मंत्रालय दिनांक 23 मार्च 2018 नुसार महाराष्ट्र शासनाने सांगितलेला आहे.
Gadchiroli Police Bharti 2024 | गडचिरोली पोलीस संदर्भात माहिती खालील प्रमाणे.
देशामध्ये आणि राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस जबाबदार आहेत. त्याच पद्धतीने गडचिरोलीचे जबाबदार पोलीस सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत आहेत. गडचिरोली जिल्हा हा एकूण आठ पोलीस उपविभागात विभागलेला आहे. त्यामध्ये गडचिरोली, धनोरा, घोट, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली हे विभाग प्रामुख्याने आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 3000 पोलीस कर्मचारी आहेत. हे पोलीस 14 पोलीस ठाणे, 14 उप पोलिस ठाणे यामध्ये कार्यरत आहेत.
गडचिरोली जिल्हा हा पहिल्यापासूनच नक्षलवाद्यांची दहशत दहशत असलेला जिल्हा आहे. येथे पीपल्स वॉर ग्रुप चे नक्षलवादी खूपच घातक आहेत. दुर्गम भागात राहणे, घनदाट जंगलातून चालणे, लोकवस्तीपासून दूर राहणे यामुळे या नक्षलवाद्यांना पकडणे अवघड जाते.घनदाट जंगल आणि मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड यांच्या सीमा जवळ असल्यामुळे या भागाचा अंदाज घेणे अवघड जाते.
Gadchiroli Police Bharti 2024
पोलीस भरतीच्या विविध अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या – क्लिक करा