ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या संस्थेने रिक्त पदाकरिता भरती घोषित केलेली आहे. सदरील भरतीची जाहिरात संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2024 आहे. तांत्रिक अधिकारी- बी आणि तांत्रिक अधिकारी- सी या दोन पदाच्या रिक्त जागा भरण्याकरिता भरती आयोजली आहे. सदरील भरती करिता उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती ही आठ रिक्त जागा भरण्याकरिता होणार आहे.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे तांत्रिक अधिकारी- अ आणि तांत्रिक अधिकारी- ब या दोन पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय परिषद येथील भरती करिता शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.
- तांत्रिक अधिकारी- बी या पदाकरिता उमेदवाराकडे तांत्रिक प्रतिष्ठापन, वैद्यकीय उपकरणांची तपासणी आणि देखभाल, वैद्यकीय उपकरणाची दुरुस्ती या क्षेत्रामध्ये एक वर्ष काम केलेला अनुभव पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराची बायोमेडिकल अभियांत्रिकी ची द्वितीय श्रेणी पदवी पाहिजे.
- तांत्रिक अधिकारी- सी या पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून स्थापत्य अभियंता शाखेची प्रथम श्रेणी पदवी मिळाली पाहिजे.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येथील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी वेतन नियमानुसार असेल.
- सदरील भरती मधून पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहील.
- सदरील भरती करिता ₹500 प्रवेश शुल्क घेण्यात येईल. त्याचप्रमाणे एससी, एसटी, महिला, अपंग आणि माझी कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही.
- सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याद्वारे दिलेल्या संकेतस्थळावरती अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- या भरती करिता 8 मार्च 2024 ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याद्वारे देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संस्थेद्वारे जाहीर केलेली जाहिरात वाचावी. जाहिरात पहा
- या भरती करिता संस्थेद्वारे ऑनलाइन पोर्टल अर्ज करण्याकरिता दिलेला आहे. अर्ज करा
ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- उमेदवारांनी सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद द्वारे ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबवली नाही.
- उमेदवाराने ऑनलाइन आपला अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये स्वतःचा चालू मोबाईल नंबर, चालू ईमेल आयडी, पूर्ण नाव, शिक्षणाचा तपशील यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची चूक झाली. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद त्याला जबाबदार राहणार नाही.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीची 8 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येथे अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना पहा.
- सदरील भरती करिता अर्ज केलेले उमेदवार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या संस्थेमध्ये निवडले जातील.
- अर्ज करणाऱ्या किंवा सदरील भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA/DA दिला जाणार नाही.
- सदरील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवाराने भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद द्वारे करण्यात येईल.
- सदरील भरतीची प्रक्रिया ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या निवड समितीद्वारे ठरवण्यात येईल.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या संस्थेबद्दल आणि तेथील कार्यरत पदांसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येथे उमेदवाराची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे.
- अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज पडताळून त्यामध्ये उमेदवारांनी लिहिलेल्या माहितीनुसार त्याचे वर्गीकरण करण्यात येईल.
- सदरील अर्जान मधून निवड केलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. आणि त्यातील उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाईल.
- संगणकावरती आधारित उमेदवाराची 80 मार्काची परीक्षा घेण्यात येईल. आणि 20 मार्क मुलाखतीचे असतील. संगणकाच्या 80 मार्क पैकी 60 प्रश्न हे उमेदवाराच्या शाखेचे संदर्भात असतील. उर्वरित 20 प्रश्न हे संगणकाचे ज्ञान, सामान्य विज्ञान, बायोमेडिकल विज्ञान, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज यांसारख्या घटकावर आधारित असतील.
- संगणकावर आधारित असणारी चाचणी मध्ये 80 मार्काची मल्टिपल चॉइस प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल. जर तुमचा कोणताही प्रश्न चुकला तर त्यासाठी 0.25 मार्क वजा केले जातील. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल. संगणकावर आधारित चाचणी करिता 80 मिनिट वेळ उमेदवाराला दिला जाईल.
- सदरील भरती मधील ज्या उमेदवाराकडे संशोधन आणि प्रयोगशाळा क्षेत्रातील अनुभव सरकारी संस्थेमधून आहे आशा उमेदवारांना 5 मार्क वाढवून दिले जातील. हे मार्क उमेदवाराचा इंटरव्यू झाल्यानंतर दिले जातील. त्याचप्रमाणे गुणवत्ता यादी मध्ये हे मार्क पकडले जातील.
- संगणकावर आधारित असणाऱ्या चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवाराकडे कमीत कमी 50% गुण मिळालेले पाहिजेत.
- जर पात्र उमेदवारांची संख्या जास्त झाली तर उमेदवाराचा अनुभव ग्राह्य धरून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येथे अर्ज करणाऱ्या अपंग उमेदवारा करिता सूचना.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांना कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेले आहे आशा उमेदवारांसाठी जागा रिक्त आहेत. यामध्ये डोळ्याने काहीच न दिसणे किंवा कमी दिसणे , कानाने ऐकू न येणे किंवा ऐकायला कमी येणे, शारीरिक दृष्ट्या सक्षम नसणारा उमेदवार, ऍसिड अटॅक झालेला उमेदवार, दोन्ही पाय गमावलेला उमेदवार, एक हात आणि एक पाय गमावलेला उमेदवार यांचा समावेश आहे.
- अर्ज करणाऱ्या अपंग उमेदवारांपैकी 40% अपंगत्व किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांनाच फीमध्ये सवलत मिळेल. त्याचप्रमाणे वयाच्या अटी मध्ये सवलत मिळेल आणि निवड प्रक्रियेतील जागा आशा उमेदवाराला मिळतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैध अपंगत्वाचा दाखला असणे गरजेचे आहे. हा दाखला महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्या मेडिकल बोर्ड द्वारे प्रमाणित केलेला असावा. कोणत्याही खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा अपंगत्वाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याचे अपंगत्व मेडिकल बोर्ड द्वारे तपासले जाईल.
- अर्ज करणाऱ्या अपंग उमेदवाराला जर सहाय्यक लेखक हवा असेल तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद द्वारे लेखक पुरवला जाईल. त्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन फॉर्म मध्ये स्वतःची मागणी व्यवस्थित लिहिली पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखका व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने सहाय्यक लेखकाची संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्ज मार्फत द्यायची आहे.
- एका डोळ्याने ज्या उमेदवारांना दिसते किंवा अंधुक दिसणाऱ्या उमेदवारांना जर भिंगाचा उपयोग करून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका व्यवस्थित दिसत असेल. तर त्या उमेदवाराने सहाय्यक लेखक घेऊ नये. त्याऐवजी चाचणी ला येताना बरोबर भिंग घेऊन येणे आणि त्याचा उपयोग करणे.
- सदरील भरती करिता अपंगांसाठी रिक्त असणाऱ्या पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फि सवलतीमध्ये सूट दिली जाईल.
ICMR Bharti 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येथील भरतीसाठी अटी खालीलप्रमाणे.
- भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा अर्ज करत असताना उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी म्हणजेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट यांसारख्या अटी उमेदवाराने पूर्ण केल्या पाहिजेत. ज्या उमेदवारांना या अटी पूर्ण करता येणार नाहीत त्या उमेदवारांचा अर्ज रद्द केला जाईल.
- https://recruit.icmr.org.in/ उमेदवारांनी सदरील संकेतस्थळाद्वारे स्वतःचा अर्ज ऑनलाइन भरायचा आहे त्याचबरोबर ऑनलाइन फी सुद्धा भरायची आहे.
- अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक अर्ज करायचा असेल तर त्या उमेदवाराला प्रत्येक अर्ज सेपरेट करावा लागेल आणि प्रत्येक अर्जासाठी वैयक्तिक परीक्षा फी द्यावी लागेल.
- कोणत्याही कारणास्तव उमेदवाराने जर स्वतःचा अर्ज अर्ज करायच्या शेवटच्या तारखेनंतर भरला तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्ज अपूर्ण भरला असेल किंवा उमेदवाराने भरलेला अर्ज वाचता येत नसेल किंवा अर्जाबरोबर जोडलेले डॉक्युमेंट अटेस्टेड नसतील तर उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराची महत्त्वाची कागदपत्रे म्हणजेच शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे वेबसाईट वरती अपलोड केलेली पाहिजेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जर निवड समिती वरती कोणत्याही प्रकारचा राजकीय व इतर दबाव आणायचा प्रयत्न केला. तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- https://main.icmr.nic.in/ या संकेतस्थळावरती भरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अपडेट करण्यात येईल. अर्ज केलेल्या उमेदवारांनी वारंवार या वेबसाईटला भेट देऊन भरती संदर्भातील अपडेट तपासावे.
- सदरील भरतीतील जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या पदा मध्ये कोणत्याही प्रकारचा झालेला वाद उच्च न्यायालय नवी दिल्ली येथे सादर करण्यात येईल.
- करणाऱ्या उमेदवाराचा अनुभव हा त्याने पूर्ण केलेल्या शैक्षणिक पात्रते प्रमाणेच असावा.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याकडे सदरील भरती रद्द करण्याचे, भरती मधील जागा कमी जास्त करण्याचे त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया बदलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.
- लेखी परीक्षा घेण्याकरिता एजन्सी ची नेमणूक करण्याचा अधिकार डीजी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याकडे पूर्णपणे राहील.
- डीजी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याकडे भरतीतील जागा कमी जास्त करण्याचा अधिकार पूर्णपणे राहील.
- सदरील माहिती जाहिरातीमध्ये दिलेली रिक्त पदे ही प्राथमिक स्वरूपाची दिलेली आहेत यामध्ये बदल होऊ शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या सरकारी संस्थेमधील भरत्या त्याचप्रमाणे खाजगी संस्थेमधील भरती यांच्या विषयी अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी आमच्या नोकरी फस्ट या संकेतस्थळाला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.