VVCMC Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिका येथे भरती.

VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिका येथे रिक्त पदांकरिता भरती घेण्यात येणार आहे. सदरील भरती ची जाहिरात वसई-विरार महानगरपालिकेत द्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. सदरील भरती मध्ये एकूण 21 जागा रिक्त आहेत. स्टाफ नर्स ( महिला ) आणि स्टाफ नर्स ( पुरुष) या पदांकरिता ही भरती होणार आहे. सदरील भरती करिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. महानगरपालिके द्वारे दिलेल्या पत्त्यावर ती आपला अर्ज पोहोचवायचा आहे. 13 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

VVCMC Bharti 2024

  • वसई-विरार महानगरपालिकेची ही भरती एकूण 21 जागांकरिता होणार आहे.
  • स्टाफ नर्स ( महिला ) आणि स्टाफ नर्स ( पुरुष) या पदांकरिता सदरील भरती होणार आहे.

Table of Contents

VVCMC Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिकेच्या भरती करिता शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  • वरील भरती करिता अर्ज करणारा उमेदवार 12 वी विज्ञान उत्तीर्ण असावा. प्रमाणे उमेदवाराकडे नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी उमेदवाराकडे असावी.
  • वसई-विरार महानगरपालिकेच्या सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 66 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला प्रति महा 34800 इतके वेतन देण्यात येईल. याचे विवरण शासनाकडून रुपये 20,000 आणि महानगरपालिकेकडून 14800 रुपये असे आहे.
  • सदरील भरतीतून निवडून येणारा उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे वसई-विरार राहील.
  • वसई-विरार महानगरपालिकेच्या या भरती करिता कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही.
  • वसई-विरार महानगरपालिकेच्या या भरती करिता पत्राद्वारे अर्ज करायचा आहे किंवा दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन अर्ज करायचा आहे.
  • वसई-विरार महानगरपालिकेच्या या भरती करिता 13 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • वसई-विरार महानगरपालिके द्वारे सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. उमेदवारांनी जाहिरात करून पहावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपला अर्ज “वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू)” या पत्त्यावरती करावा.

VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिकेच्या भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी खालील सूचना.

  • या भरती करिता ऑफलाइन अर्ज म्हणजेच दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत वसई-विरार महानगरपालिकेत द्वारे राबवलेली नाही.
  • अर्ज करत असताना उमेदवाराने सर्व माहिती व्यवस्थित भरायचे आहे. त्यामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की पत्रव्यवहाराचा पत्ता, चालू मोबाईल नंबर, चालू ईमेल आयडी, जन्मतारीख यांसारख्या गोष्टी बरोबर लिहायच्या आहेत. जर यातील कोणतीही गोष्ट लिहिताना चुकली तर त्यास वसई-विरार महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
  • 13 मार्च 2024 ही वसई विरार महानगरपालिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत लिहिलेली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचावी.

VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिकेच्या भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • वसई-विरार महानगरपालिकेच्या भरती करिता अर्ज केलेले उमेदवार भरतीसाठी पात्र असतील.
  • वसई-विरार महानगरपालिकेत द्वारे भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराकडून कळत नकळत अनुचित प्रकार घडल्यास त्या उमेदवारावरती वसई-विरार महानगरपालिके द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीला अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे वसई-विरार महानगरपालिकेत द्वारे ठरवले जाईल.
  • वसई-विरार महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती सदरील भरती संदर्भात अधिक माहिती उपलब्ध आहे उमेदवारांनी ती वाचावी आणि मगच अर्ज करावा.
VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिकेच्या भरतीसाठी उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना खालीलप्रमाणे.
  • सदरील भरती मधील होणारे बदल हे वेळोवेळी वसई-विरार महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या संकेतस्थळावरती सांगितले जातील. अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराला वैयक्तिक सांगणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला भरती मध्ये झालेला बदल सांगण्यात येणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेत स्थळाला भेट देत राहणे.
  • 11 महिने 29 दिवस च्या कालावधी करिता सदरील भरतीतील पदे कंत्राटी स्वरूपात भरायची आहेत. यातील कोणतेही पद कायमस्वरूपी भरायचे नाही. 2023-24 च्या कृती आराखड्यात जर या पदांना मंजुरी मिळाली नाही. तर आपोआप संस्थेतून रद्द होतील.
  • सदरील भरती मधील रिक्त पदे यांचा महाराष्ट्र शासनातील पदांची काही संबंध नाही. शासनातील नियमित असणाऱ्या पदांना जालियनवाला लागू होतात त्या नियम व अटी कंत्राटी द्वारे भरलेल्या पदांकरिता लागू होणार नाहीत. त्यामुळे उमेदवाराने कंत्राटी पद्धतीने काम करत असताना कायमस्वरूपी याच पदावर काम करण्याची मागणी करू नये.
  • सदरील भरती मधील पदांचे मानधन किंवा वेतन हे जाहिरातीमध्ये दिलेले आहेत तेच राहील. संपूर्ण कंत्राटी कालावधीमध्ये हाच पगार उमेदवाराला देण्यात येईल. त्यामध्ये वाढ दिली जाणार नाही.
  • वसई विरार महानगरपालिका येथील रिक्त पदे भरायची झाल्यास सदरील भरती मध्ये दिलेल्या रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकतो.
  • सदरील भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा किंवा भरती रद्द करायची किंवा दिल पदांची संख्या कमी-जास्त करायची याचा पूर्णपणे अधिकार माननीय आयुक्त वसई-विरार महानगरपालिका यांच्याकडे आहे.
  • उमेदवारांना अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर त्याने कार्यालयास भेट देऊन विचारावी. जर उमेदवारा द्वारे अपूर्ण भरलेला अर्ज किंवा वाचता न येणारा अर्ज केला गेला तर असा अर्ज बात करण्यात येईल आणि त्याला पूर्णपणे जबाबदार उमेदवार असेल. त्यामुळे नंतर उमेदवाराने महानगरपालिकेकडे तक्रार करू नये.
  • सदरील भरती करिता निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र दिल्यानंतर उमेदवारांनी 7 दिवसाच्या आत मध्ये आपली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन कामाच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे फसवे कागदपत्र आढळल्यास त्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल. उमेदवाराने कोणत्याही राजकीय तंत्राचा उपयोग करून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्या उमेदवाराला तात्काळ भरतीतून बाद करण्यात येईल.
VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिका भरतीसाठी अर्ज भरण्याच्या सूचना खालील प्रमाणे.
  • उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव लिहिताना 10वी बोर्ड सर्टिफिकेट वर जे नाव आहे तेच लिहायचे आहे. त्यानंतर सर्टिफिकेट अर्जासोबत जोडायचे आहे.
  • उमेदवाराच्या माध्यमिक शाळेतील कागदपत्रांवरती म्हणजेच मार्कशीट किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच अर्जात नमूद करावी.
  • अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराने विवाह प्रमाणपत्र त्याचबरोबर बदललेल्या नावाचे राजपत्र अर्जासोबत जोडायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचे वय वर्ष, महिने, दिवस या स्वरूपात लिहायचे आहे. जाहिरात सुरू झाल्यापासून च्या तारखेपर्यंत चे हे वय असावे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा चालू ईमेल आयडी लिहायचा आहे त्याचबरोबर दुसरा एक पर्यायी ईमेल आयडी सुद्धा लिहायचा आहे. उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि त्याचबरोबर दुसरा पर्याय मोबाईल नंबर सुद्धा लिहायचा आहे. जे उमेदवार या भरतीतून पात्र ठरतील त्यांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती देण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपल्या जातीचा तपशील काळजीपूर्वक नमूद करावा.
  • अर्जदाराने पत्ता नमूद करत असताना सध्या वास्तव असणारा पत्ता नमूद करावा आणि त्याचबरोबर स्वतःचा कायमस्वरूपी चा पत्ता ही लिहावा.
VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिका येथे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अनुभव खालील प्रमाणे पाहिजे.
  • सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर त्याने केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. यामध्ये निमशासकीय, शासकीय आणि खाजगी संस्थेच्या ठिकाणी अनुभव ग्राह्य धरले जातील. उमेदवारा जवळ अनुभव प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. जर अनुभव प्रमाणपत्र नसेल तर अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. अनुभवाचा असणारा कालावधी अनुभव प्रमाणपत्र मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला असावा.
  • उमेदवाराने अर्जामध्ये अनुभवाचा तपशील लिहीत असताना नियुक्ती ची तारीख आणि निवृत्तीची तारीख काळजीपूर्वक लिहावी. अर्जामध्ये लिहिलेली तारीख आणि अनुभव प्रमाणपत्रावरती असणारी तारीख यामध्ये तफावत आढळली तर सादर केलेले प्रमाणपत्र हे बोगस आहे असे ग्राह्य धरले जाईल.
  • उमेदवाराने भरतीतील ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. उमेदवाराकडे या व्यतिरिक्त असणारा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिका येथील रिक्त जागांचे विवरण आरक्षणानुसार खालील प्रमाणे.
  • स्टाफ नर्स ( स्त्री ) या पदासाठी एकूण 18 जागा रिक्त आहेत. त्यातील एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. तीन जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. एक जागा विमुक्त जाती ( अ ) साठी आहे. एक जागा भटक्या जाती ( ब ) साठी आहे. भटक्या जाती ( क) साठी एक ही जागा नाही. एक जागा भटक्या जाती ( ड) साठी आहे. विविध मागास प्रवर्गासाठी एक जागा शिल्लक आहे. इतर मागास प्रवर्गासाठी तीन जागा आहेत. ईडब्ल्यूएस साठी चार जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी तीन जागा आहेत.
  • स्टाफ नर्स ( पुरुष ) या पदासाठी एकूण तीन जागा आहेत. त्यातील एक जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे. इतर मागासवर्ग करिता एक जागा आहे. खुल्या गटासाठी एक जागा आहे.
VVCMC Bharti 2024 | वसई-विरार महानगरपालिकेतील भरतीसाठी वया संदर्भाच्या अटी खालीलप्रमाणे.
  • जर एखाद्या उमेदवाराचे वय दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी असेल तर अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याचे वय पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचे आहे.
  • अर्ज करणारा कोणताही उमेदवार शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम नसेल तर त्या उमेदवाराला कधीही निलंबित करण्यात येईल. किंवा शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सबल नसणाऱ्या उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करू नये.

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेतील आणि इतर सरकारी संस्थेतील सर्व भरतीच्या अपडेट साठी आमच्या नोकरी फस्ट या संकेतस्थळाला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment