Army Public School Bharti | आर्मी पब्लिक स्कूल येथे भरती.

Army Public School Bharti | आर्मी पब्लिक स्कूल येथे रिक्त पदांकरिता भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सदरील भरतीची जाहिरात आर्मी पब्लिक स्कूल द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 15 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. TGT ( प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) आणि लॅब अटेंडंट या पदांकरिता रिक्त जागा आहेत. या भरती करिता उमेदवाराने आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहेत. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा . अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

Army Public School Bharti 2024

 • आर्मी पब्लिक स्कूल ची भरती चार जागांसाठी होणार आहे.
 • आर्मी पब्लिक स्कूल द्वारे घेण्यात येणारी भरती TGT ( प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) आणि लॅब अटेंडंट या पदासाठी होणार आहे.

Army Public School Bharti | आर्मी पब्लिक स्कूल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.

 • TGT ( प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) SST आणि संस्कृत या पदाकरिता उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवी असणे गरजेचे आहे. या पदाकरिता उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणासह बीएड पूर्ण असावे. CSB आणि CTET पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
 • लॅब अटेंडंट या पदाकरिता 10 + 2 विज्ञान आणि संगणक साक्षर असणे गरजेचे आहे.
 • सदरील भरती करिता वयोमर्यादा नवख्या उमेदवारा करिता 40 वर्षे आहे. तर अनुभवी उमेदवारा करिता 57 वर्षे आहे.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी पदावर ती निवड होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
 • आर्मी पब्लिक स्कूल भरती करिता उमेदवाराने प्रवेश शुल्क ₹100 डिमांड ड्राफ्ट च्या माध्यमातून भरायचे आहे.
 • आर्मी पब्लिक स्कूल भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे कामठी असेल.
 • सदरील भरती करिता उमेदवारांनी आर्मी पब्लिक स्कूल जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावरती अर्ज करावा.
 • सदरील भरती करिता 15 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आर्मी पब्लिक स्कूल द्वारे सांगण्यात आलेली आहे.
 • आर्मी पब्लिक स्कूल द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. जाहिरात पहा.
 • उमेदवारांनी आपले अर्ज ” आर्मी पब्लिक स्कूल, कामटी कन्टोनमेंट – 441 001 , जिल्हा नागपूर” या पत्त्यावर पत्राद्वारे पाठवावे.

Army Public School Bharti | आर्मी पब्लिक स्कूल येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

 • आर्मी पब्लिक स्कूल येथील भरती करिता ऑफलाइन अर्ज करायचे आहेत.
 • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत रिपब्लिक स्कूल द्वारे राबवलेली नाही.
 • उमेदवाराने पत्राद्वारे अर्ज भरत असताना आपली वैयक्तिक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, जन्मतारीख, स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, पिन कोड यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यामध्ये काही चुकी झाली तर त्यास आर्मी पब्लिक स्कूल जबाबदार राहणार नाही.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आर्मी पब्लिक स्कूल द्वारे 15 मार्च 2024 ही दिलेली आहे.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आर्मी पब्लिक स्कूल द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात पूर्वक वाचायची आहे.

Army Public School Bharti | आर्मी पब्लिक स्कूल येथे अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • आर्मी पब्लिक स्कूल येथे अर्ज केलेले उमेदवार भरतीसाठी पात्र असतील.
 • आर्मी पब्लिक स्कूल द्वारे अर्ज करणाऱ्या किंवा भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही.
 • आर्मी पब्लिक स्कूलच्या भरतीमध्ये परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार उमेदवाराने केला तर त्या उमेदवारावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीची प्रक्रिया आणि मुलाखतीची तारीख आणि ठिकाण ठरवण्याचे काम हे आर्मी पब्लिक स्कूल द्वारे केले जाईल.
 • आर्मी पब्लिक स्कूल च्या संकेतस्थळावरती भरतीसाठी लागणारी सर्व माहिती दिलेली आहे तरी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
Army Public School Bharti | आर्मी पब्लिक स्कूल येथील भरतीसाठी अटी खालीलप्रमाणे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे सर्व शिक्षण इंग्लिश मीडियम मधून झालेले पाहिजे.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखतीची तारीख ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात असण्याचे तात्पुरत्या स्वरूपात सांगण्यात आले आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता आर्मी पब्लिक स्कूल येथे व https://www.apskamptee.in/ या संकेतस्थळावरती अर्जाचा नमुना दिलेला आहे. उमेदवाराने तो अर्ज भरून 15 मार्च 2024 दुपारी 2 वाजायच्या आत मध्ये आर्मी पब्लिक स्कूल येथे पोहोचवायचा आहे.
 • सदरील भरतीची प्रवेश शुल्क ₹100 उमेदवाराने डिमांड ड्राफ्ट च्या स्वरूपात भरायचे आहेत. डिमांड ड्राफ्ट बनवताना ” Army Public School, Kamptee Payable at Kamptee ” या नावाने बनवायचा आहे.
 • उमेदवाराने सर्व प्रमाणपत्र, मार्कशीट, वयाचा पुरावा, अनुभवाचा पुरावा या सर्वांच्या प्रति अर्जासोबत जोडायचे आहेत.
 • उमेदवाराचे सध्याचे काढलेले दोन पासपोर्ट साईज फोटो अर्जाबरोबर हवे आहेत.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. जर कोणी ई-मेल आणि कुरियर अर्ज पाठवला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
 • सदरील भरती मध्ये मेरीट मध्ये असणाऱ्या उमेदवारांना आर्मी पब्लिक स्कूल कडून कसल्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
 • जर एकाच उमेदवाराला दोन पदासाठी कसं करायचं असेल तर उमेदवारांनी दोन वैयक्तिक अर्ज करावेत. आणि यासाठी प्रवेश फी सुद्धा दोनदा भरावी.
 • आर्मी पब्लिक स्कूल येथील भरतीसाठी येणाऱ्या अर्जा मधून अर्ज निवडले जातील आणि निवडलेल्या अर्जांच्या उमेदवारांनाच भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या इंटरव्यू ला बोलावले जाईल.
 • सदरील भरतीमध्ये निवड करण्यात आलेली पदेही तात्पुरत्या स्वरूपाची आहेत.
 • आर्मी पब्लिक स्कूल या संस्थेचा armyschoolkmt@gmail.com हा ई-मेल ऍड्रेस आहे. उमेदवारांना काही त्रुटी असतील तर यावरती मेल करावा.
 • सदरील भरती संदर्भात अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर 9284858092 या भ्रमणध्वनी वर संपर्क करा.
Army Public School Bharti  | आर्मी पब्लिक स्कूल या संस्थेबद्दल माहिती खालील प्रमाणे.

आर्मी पब्लिक स्कूल, या संस्थेचे नाव सुरुवातीला गरुडा पब्लिक स्कूल असे होते यामध्ये पहिली ते सहावी पर्यंत वर्ग होते. सदरील संस्था गरुडा रेजिमेंटल सेंटर कामठी द्वारे चालवली जात होती. पण एप्रिल 2007 मध्ये याच शाळेची पुनर्रचना करून त्याचे नाव आर्मी पब्लिक स्कूल असे देण्यात आले. यानंतर ही संस्था आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी च्या छत्राखाली आली. त्यानुसार 2011 पासून उर्वरित सातवी ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.

आर्मी पब्लिक स्कूल कामठी या संस्थेचे पुनर नामांकन करून APS कामठी असे नाव देण्यात आले. या संस्थेचा अभ्यासक्रम सीबीएससी नवी दिल्ली यांच्याशी संलग्न आहे. आर्मी पब्लिक स्कूल या संस्थेला 2014 मध्ये अकरावी आणि बारावी सर्व शाखांमध्ये सुरू करण्याची परवानगी मिळाली. सध्या या शाळेमध्ये पहिलीपासून 12 वी पर्यंत शिक्षण दिले जाते. 12 वी मध्ये सायन्स आणि कॉमर्स या शाखा आहेत. आर्मी पब्लिक स्कूल या संस्थेला सुसज्ज असे क्रीडा संकुलन आहे. विद्यार्थ्याच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यास आर्मी पब्लिक स्कूल सक्षम आहे. सर्व

सदरील शाळेचे ठिकाण हे कँटोनमेंट कामठी हे आहे. सध्या या शाळेमध्ये एकूण 942 विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे 52 शिक्षक आहेत. इतर 11 कर्मचारी आहेत. आणि याची वाढ दिवसेंदिवस होत आहे.

सदरील शाळा ही शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना सहकार्य करणारी आहे. त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिस्त, चांगल्या सवयी, गुण, क्रीडा यांसारख्या गोष्टींना महत्व आहे. आर्मी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना शिकवण्याची भाषा ही इंग्रजी आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना इंग्लिश व्यवस्थित बोलायला शिकवणे आणि व्याकरण नुसार इंग्रजी शिकवणे हे संस्थेचे ध्येय आहे. देशाची राष्ट्रीय भाषा असणारी हिंदी भाषा सुद्धा इथे शिकवली जाते. कला, क्रीडा, संगीत, संगणक प्रयोगशाळा, समुपदेशन, डिजिटल वर्ग या सर्व मूलभूत सुविधा. आर्मी पब्लिक स्कूल कडे आहेत.

Army Public School Bharti  | आर्मी पब्लिक स्कूल शाळेचे ध्येय, दूरदृष्टी आणि उद्दिष्टे खालील प्रमाणे.

पर्यावरणासंदर्भातील शिक्षण आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक, प्रामाणिक बनवण्याचे ध्येय आर्मी पब्लिक स्कूल यांचे आहे. विविध कामांमध्ये रस असणाऱ्या हुशार अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणे आणि त्यांच्या कामाला चालना देणे हे काम आर्मी पब्लिक स्कूल करत आहे. नवीन पिढीला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याचं काम ज्ञानाच्या प्रकाशा द्वारे आर्मी पब्लिक स्कूल करत आहे.

नवीन पिढीला संपूर्ण जगासमोर सामोरे जाण्याकरिता तयार करण्याचे काम आर्मी पब्लिक स्कूल करत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता शाळेला चांगले वातावरण तयार करायचे आहे. त्यामध्ये उत्कृष्ट, नवीनता, सर्जनशीलता या घटकावर ती काम करून विद्यार्थी घडवायचे काम आर्मी पब्लिक स्कूल करत आहे. विद्यार्थ्यांचा निकाल पाहून त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्या आवडता क्षेत्रामध्ये त्यांना काम करून देणे हे काम शाळा करते. माणसाची समाजाच्या प्रति असणारी सामाजिक जबाबदारी विद्यार्थ्यांना शिकवणे शाळेचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थी, पालक आणि आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी यांची स्वप्न पूर्ण करण्याचे काम येथील विद्यार्थी करत असतात.

शाळेची संपूर्ण इमारत अशा प्रकारे बनवली आहे की यामध्ये विद्यार्थ्यांचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता मन लागेल. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण परवडणाऱ्या फी मध्ये देण्याचे काम आर्मी पब्लिक स्कूल करत आहे.सदरील शाळा आर्मी पब्लिक स्कूल ही इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्याचप्रमाणे सीबीएससी नवी दिल्ली या अभ्यासक्रमावर आधारलेली आहे. आर्मी वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून ही शाळा चालवली जाते. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी कन्टेन्ट मेंट या ठिकाणी सदरील शाळा आहे. armyschoolkmt@gmail.com, principalapskamptee@awesindia.edu.in, apskamptee@awsindia.edu.in या आर्मी पब्लिक स्कूल च्या ई-मेल आयडी आहेत. शाळेला संपर्क करताना या ईमेल आयडी वरती मेल करावा.

संपूर्ण भारतातील सरकारी संस्थांच्या, आर्मी, नेव्ही, पोलीस भरतीच्या माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. क्लिक करा

 

Leave a Comment