[ Gillette Blade ] जिलेट ब्लेड संदर्भात माहिती खालील प्रमाणे
[ Gillette Blade ] दैनंदिन आयुष्यात लागणारे दाढीची ब्लेड हे आपल्याला किरकोळ वाटत असेल. पण हेच दाढीचे ब्लेड बनवणाऱ्या जिलेट या कंपनीने 25 देशांत ब्लेड बनवायचे कारखाने काढलेले आहेत. दरवर्षी जगभरात जिलेट च्या उत्पादनाची विक्री 1000 कोटी डॉलर्स इतकी आहे. शेअर बाजारामध्ये जिलेट या कंपनीची किंमत 53 हजार कोटी डॉलर च्या जवळपास आहे. पण जिलेट चे एवढे मोठे साम्राज्य कसे निर्माण झाले ? याबाबत बऱ्याच लोकांना कल्पना नाही. फारच गमतीशीर पणे या अवाढव्य साम्राज्याची सुरुवात झाली होती हे थोड्याच लोकांना माहीत आहे. 1901 रोजी किंग कॅम्प जिलेट याने जिलेट कंपनी सुरु केली होती. या कंपनीचं नाव आज जगभरात झालेले आहे यातून प्रचंड पैसा ही कंपनीने कमावलेला आहे.
[ Gillette Blade ] किंग जिलेट याच्याबद्दल माहिती
अमेरिकेतील विस्कॉन्सिन मध्ये जिलेट चा निर्माता किंग जिलेट याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव जॉर्ज वॉलकॉट जिलेट हे होते. पोस्टमास्टर, वर्तमानपत्राचा संपादक आणि इतर विविध स्वरूपाची कामे त्याच्या वडिलांनी आयुष्यभर केली. सतत काहीतरी नवीन नवीन संशोधन करायचं असं वेड जिलेट च्या वडिलांना लागलेलं होतं. आणि नवीन नवीन पदार्थ बनवायचं वेळ त्याच्या आईला होतं. नवीन गोष्टीचा संशोधन करणे ही सवय किंग जिलेट ला लहानपणीच लागलेली होती. किंग जिलेट हा चार वर्षाचा असतानाच आई-वडिलांसोबत शिकागोला स्थायिक झाला. शिकागोमध्ये वडिलांनी हार्डवेअर चा नवीन व्यवसाय सुरू केला. पण 1871 रोजी जिलेट कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली, आग लागल्यामुळे त्यांच्या व्यवसायास सहित सर्व काही जळून गेले.
यानंतर किंग ने सेल्समन म्हणून काम करणं सुरू केलं त्याने शिकागो, न्यूयॉर्क, कॅन्सस आणि लंडन येथे सेल्समॅन म्हणून काम केले. शेवटी त्याने ” क्राऊन कॉर्क आणि सील” या न्यूयॉर्क मधील कंपनीमध्ये नोकरी पकडली. बाटल्यांचे कॅप्स आणि बुच तयार करण्याचे काम ही कंपनी करत होती. डिस्पोजल बाटल्या आणि बुच हे किंग ने पहिल्यांदाच आयुष्यात पाहिलं. त्याकाळी बुच चा शोध लावणारा विल्यम पेंटर हा किंगचा मित्रच होता.
किंगनेही स्वतःची बुद्धी वापरून नवीन गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पाण्याची वॉल आणि इलेक्ट्रिक केबल या वस्तू निराळ्या तऱ्हेने बनवण्याचे पेटंट्स किंग ने घेतले होते. पण त्याच्या या कृतीचा त्याला काहीच फायदा झाला नाही. पाणी कार्बोनेट करण्यासाठी त्याने 19000 डॉलर्स वाया घालवले, एवढे सगळे करून त्याच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळे किंग निराश झाला. पण त्याने हार मानली नाही खचून न जाता पुढील काम करायला सुरु केलं .
[ Gillette Blade ] समस्याचा शोध आणि ब्लेड ची निर्मिती.
1915 रोजी किंग दाढी करत असताना त्याला खूपच त्रास झाला, त्यावेळेस दाढी करण्यासाठी ब्लेड बनवावे हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि याच कल्पनेमुळे त्याचे भाग्य उजळले. याआधी कारखान्यात काम करताना डिस्पोजल गोष्टी विषयी तो शिकला होता. ज्या पद्धतीने डिस्पोजल बाटल्या असतात त्याच पद्धतीने आपण डिस्पोजल ब्लेड बनवू शकतो अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली. आणि लगेचच त्याने या कल्पनेचा पेटंट घेतल. पण डिस्पोजल ब्लेड बनवणे वाटतंय तेवढं सोपं नव्हतं. असे ब्लेड बनवायच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक आव्हाने आणि अडचणी खूप होत्या. त्या मग निकरसन नावाच्या त्याच्या मित्राने सोडवल्या. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरीच वर्षे निघून गेली. ब्लेड बनवण्यासाठी लागणाऱ्या यंत्राची डिझाईन निकरसन या त्याच्या सहकारी मित्राने बनवली.
निकरसन आणि किंग जिलेट या दोघांच्या भागीदारीमध्ये 1901 रोजी ही कंपनी सुरू झाली. आणि 1902 रोजी कंपनीचे उत्पादन ही सुरू झाले. अशा प्रकारचे ब्लेड्स मार्केटमध्ये नवीन असल्यामुळे कोणीही विकत घेईना. कंपनी सुरू झालेल्या वर्षी म्हणजेच पहिल्या वर्षी फक्त 168 ब्लेड्स आणि 51 रेझर विक्री झाले होते. प्रत्येक व्यवसायाप्रमाणे हा ही व्यवसाय फसला असे किंगला वाटू लागले. पण त्याने न खचता व्यवसाय चालूच ठेवला. परिणामी दुसऱ्या वर्षी हा आकडा 123,648 ब्लेड्स आणि 884 रेझर पर्यंत पोहोचला. पुढे कंपनीची वाढ अशीच होत राहिली.
1904 रोजी एकूण 1 कोटी ब्लेड्स विकली तेव्हा जिलेट ला समाधान मिळाले. जाहिरात केल्यानंतर विक्री वाढते हे जिलेट च्या लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या उत्पादनाची जाहिरात करायला सुरुवात केली. पण फक्त जाहिरात न करता जिलेट ला स्वतःचा ब्रँड तयार करावा वाटत होतं. म्हणजे ब्लेड म्हटलं की जिलेट अशी ख्याती त्याला पाहिजे होते. वॅगनर नावाच्या बेसबॉल खेळाडूंनी 1910 रोजी जिलेट ब्लेड ची जाहिरात केली तेव्हापासून खेळाडूंनी जाहिरात करण्यास सुरुवात केली आणि पुढे ती परंपरा चालू झाली.
1917 सालापर्यंत बऱ्यापैकी लोक दाढी करण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा वापर करत. त्यामुळे जिलेट च्या डिस्पोजल ब्लेड ला पारशी मागणी नव्हती. पण सैन्यदलात प्रत्येक सैनिकांकडे स्वतःचे दाढी करण्याचे किट असले पाहिजे असा नियम अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांनी काढला आणि याचा फायदा जिलेट कंपनीला झाला. कंपनीने सैनिकांसाठी दाढी करण्याचे एक किट तयार केले. या डब्याचा कलर खाकी रंगाचा होता तर त्याच्यावरती अमेरिकन नौदल आणि लष्कर या दोन्हीचे शिक्के होते. सुमारे 11 लाख किट ची विक्री यावर्षी झाली. एक किट मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करात प्रसिद्ध झाले.
[ Gillette Blade ] जिलेट ब्लेड चे कार्य
ज्यावेळेस पहिले महायुद्ध सुरू झाले त्यावेळेस महायुद्धाच्या कालावधीत जिलेट ने अमेरिकन लष्कराला ब्लेड्स पुरवले. जिलेट च्या या कृत्यामुळे दिवसेंदिवस प्रसिद्धी वाढू लागली. याच कालावधीत कंपनीने युरोपमध्ये आपली विक्री करण्यास सुरुवात केली. किंग जिलेट याचे स्वप्न जागतिक पातळीवर ती सर्वात मोठी कंपनी उभारण्याचे होते. त्याने कधी संकुचित वृत्ती ठेवली नाही. जिलेट च्या यशस्वी होण्यामागे त्याच्या जाहिराती, ब्रँडिंग आणि ग्लोबल कंपनी या गोष्टी होत्या. यापुढे 1930 रोजी जाहिरात करण्यासाठी जिलेट ने रेडिओचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला तर पुढे 1950 रोजी टीव्ही चॅनल्स मोठ्या प्रमाणात जीलेटन जाहिराती दाखवायला सुरुवात केली.
मर्दानगी च आणि सेक्सी असण्याचं लक्षण म्हणजे जिलेट ब्लेड वापरणं होय अशी जाहिरात करण्यात आली. खरंतर जाहिरातीचा आणि ब्लेड चा काल्पनिक संबंध जोडून लोकांसमोर आकर्षक चित्र उभा करून जाहिरात करण्यात आली. काही काळातच या ब्लेड ची विक्री 100 कोटींच्या वर गेली. या जिलेट ब्लेडच्या पाकिटा वरती किंग जिलेट याचं चित्र छापलेलं असायचं. किंग जिलेट चा चेहरा आता घरोघरी पोहोचला होता. पण पाकिटा वरती फोटो असणारा चेहरा हा जाहिरात करणाऱ्या एखाद्या अभिनेत्याचा आहे असं लोकांना वाटायचं. पण हा जिलेट ब्लेड चा मालकच आहे हे समजल्यावर ती लोकांनाही धक्का बसला.
याच काळात किंग जिलेट याने कंपनीच्या कामातून लक्ष काढून घेतलं. आणि आपल्या पत्नीसोबत जग प्रवास करायला त्याने सुरुवात केली. कित्येक ठिकाणी हे दोघेजण वर्ष वर्ष राहत असत. या काळात किंग जिलेट हा कंपनीचा अध्यक्ष होता.
[ Gillette Blade ] किंग जिलेट याची कंपनी मधून निवृत्ती.
जिलेट कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर किंग जिलेट याने अर्थशास्त्राचे लक्ष वळवलं त्यामध्ये त्याने चांगला पैसा कमावला आणि प्रचंड नाव कमावले, लोकांना वाटले कि किंग जिलेट हा खाजगी मालमत्तेवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचा खरं तर मोठा समर्थ असायला हवा होता. पण सगळं काही याविरुद्ध होतं. तो एक कट्टर समाजवादी बनला. भांडवली अर्थव्यवस्थेवर तो टीका करायला झाला. समाजामध्ये वाढती गुन्हेगारी, गरिबी, अडाणीपणा, फसवणूक आणि आजारपण या सगळ्याला कारणीभूत भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे असे त्याचे म्हणणे होते. लोकांनी पैशासाठी स्पर्धा करू नये. त्याच्या इतकी दुसरी वाईट बातमी कोणती नाही असे त्याचे ठाम मत होते. पण जिलेट स्वतःच्या तत्त्वांशी प्रामाणिक नव्हता. त्याच्या विचारात आणि वागण्यात फार तफावत जाणवत होती.
भांडवल व्यवस्थेवर एका बाजूने टीका करायची आणि दुसरीकडे मोठ्या भांडवल असणाऱ्या कंपन्यांचे समर्थांनी करायचे. असे विचार असणाऱ्या जिलेट ची नक्की समाजाकडून काय अपेक्षा आहे हे समजणं अवघड होतं ? त्याच्या विचारांचे विश्लेषण त्याने लिहिलेल्या ” मेट्रो पोलीस” या पुस्तकात थोड्याफार प्रमाणात सापडते. त्यात त्याने जगात एकच शहर असावं अशी कल्पना सांगितली आहे म्हणजे सगळ्या राष्ट्रांचा मिळून एकच शहर असावं.
त्याने यामध्ये बऱ्याच गोष्टी स्वप्नाळू पद्धतीने लिहिलेले आहेत. जसं की या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला पहिली पाच वर्षे बिन पगारी काम करावे लागेल. नायगारा नदीतून निर्माण होणाऱ्या विजेवर हे शहर चालेल. जगातील सर्व लोकसंख्या बसेल यासाठी तेथे 25 मजली इमारती उभा करण्यात आल्या होत्या. जिलेट वर्ल्ड असं त्याने या शहराला नाव दिलं होतं आणि या शहराच्या अध्यक्षपदासाठी त्यांना टेडी रोज बेल्ट ला 10 लाख डॉलर्स पगारावर काम करण्याची ऑफर दिली होती. पण टेडी नाही वापर नाकारली.
जॉन जोईस या जिलेट च्या जुन्या मित्राने जिलेट कंपनीचा ताबा घेतला होता. त्याने किंगच्या जास्त नादाला न लागता कंपनीची भरभराट केली. त्याकाळी रेझर आणि दाढीचे ब्लेड बनवणाऱ्या कंपनीची माहिती एखाद्या मॅक्झिन मध्ये छापून येणे खूपच दुर्मिळ होते पण जिलेट कंपनीची माहिती त्याकाळी मॅक्झिन च्या मुख्य पृष्ठावरती आलेली होती. फोर्ब्स ने प्रसिद्ध केलेल्या मासिकात 1991 रोजी जिलेट कंपनीचं रेझर छापून आलेलं होतं ही खूप अभिमानास्पद गोष्ट होती.
[ Gillette Blade ] जिलेट कंपनीची प्रसिद्ध उत्पादने
दुहेरी ब्लेड पासून जिलेट कंपनीने ‘ट्विन’ रेझर बनवले होते. या रेझरची मार्केटमध्ये जोरदार विक्री झाली. ‘ ट्विन ब्लेड्स’ बनवण्यासाठी खूप वेळ लागत असे त्यामुळे बाजारातील मागणीला तेवढाच पुरवठा देणे कंपनीच्या दृष्टीने कठीण जाऊ लागले. पण उत्पादन वेगाने वाढवून कंपनीने बाजारातील मागणी पूर्ण केली.
[ Gillette Blade ] दोन पातीच्या ब्लेड मध्ये ट्रॅक-2 (Track 2 ) नावाचं ब्लेड सुरु करताना दाढी कशी चांगली होईल याच्याकडे भर दिला. त्यासाठी दोन पात्या मध्ये किती अंतर असावे ? यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले. 15 कोटी डॉलर्स इतके पैसे ” सेंसर” ब्लेडच्या संशोधनावर खर्च केले गेले. हे ब्लेड तयार करण्यासाठी एकूण पाच वर्षे गेली. संशोधना पासून निर्मितीपर्यंत 40 कोटी डॉलर्स इतके पैसे सुरुवातीला खर्च झाले. हे ब्लेड्स मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घालू लागले 2.4 कोटी ब्लेड्स पहिल्याच वर्षी विकले गेले. दाढी साठी लागणारा साबण, आफ्टर शेव लोशन इत्यादी वस्तू सुद्धा जिलेट आज बनवत आहे.
‘ प्रॉक्टर अँड गॅम्बल’ या कंपनीने 2005 रोजी जिलेट कंपनीला विकत घेतले. यामुळे स्वतंत्र असं जिलेट कंपनीचा अस्तित्व उरलं नाही. पण लोकांमध्ये जिलेट हा ब्रँड फेमस झाल्यामुळे आणि त्याची लोकप्रियता लक्षात घेता ब्लेड, रेझर, आफ्टर शेव लोशन आणि इतर दाढीचे सामान जिलेट नावानेच विकले जाते. जिलेट या नावामुळेच दाढीचा साबण, आफ्टर शेव, डिओड्रंट या गोष्टी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खपत असत याचा फायदा खरे तर ‘ प्रॉक्टर अँड गॅम्बल’ यांना झाला.
नवीन तरुण वयात आल्यानंतर आपल्या वडिलांचा सल्ला घेत नाहीत हे जिलेट च्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये एक नवीन ॲप लॉन्च केलं. 2017 रोजी हे ॲप मार्केटमध्ये आले. वडील ज्या पद्धतीने समस्या सोडवतात. त्याच पद्धतीने हे ॲप तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करते.
तंत्रज्ञानाचा योग्य ते वापर, जगभरात पसरण्याचा दृष्टिकोन, स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचे धाडस, आणि आत्मविश्वास या जोरावर जिलेट ने आजपर्यंत यशाची शिखरे गाठली आहेत.