[ Parker Pens ] पार्कर पेन चे यश

[ Parker Pens ] पेनाच्या निर्मिती पूर्वीचे जग

[ Parker Pens ]  पुरातन काळामध्ये लिहिण्यासाठी पेन किंवा लेखणी नव्हती त्यावेळीस लोक मातीमध्ये निरनिराळे आकृत्या आणि निरनिराळी चिन्हे काढून लिहायला सुरुवात केली होती. असं म्हणलं जातं. आपल्याला आज विविध प्रकारचे जे पेन मिळत आहेत तिथपर्यंत पोहोचायचा प्रवास हा सोपा नव्हता. लिहिण्याचा पेन सहज उपलब्ध व्हावा याच्यासाठी बराच काळ उलटून जावा लागला आहे. सर्वात प्रथम फाउंटन पेन म्हणजेच शाईचा पेन अस्तित्वात आला . एल. इ. वॉटरमन यान शाई पेन म्हणजेच फाउंटन च्या पेनचा 1884 रोजी शोध लावला. त्याच्या या शोधामुळे सर्वत्र खळबळ माजली. सुमारे 50 वर्षांपासून असा पेन तयार करण्याची धडपड सुरू होती.

यातून गळणारी शाई आणि शाईचा पुरवठा सतत कमी जास्त होत होता आणि यावर उपाय कोणालाच सापडत नव्हता. वॉटरमन ने या सर्व समस्यांवर काळजीपूर्वक अभ्यास केला आणि बहुतांशी समस्या सोडवण्यात त्याला यश आलं. तरीसुद्धा कधीकधी वॉटरमन याने तयार केलेल्या पेना मधून शाही गळतच असे. चार वर्ष सतत यात समस्यांचा अभ्यास करून सुद्धा त्याला काहीही समजत नव्हते. शेवटी त्याने पेनातील शाई निप पर्यंत नेण्यासाठी एका छोट्याशा नळीचा उपयोग केला. नळीची एक बाजू शाई साठ्या जवळ असायची तर दुसरी बाजू निब जवळ असायची . लोकांना वॉटरमन ची ही कल्पना इतकी आवडली की पेन चा खप मोठ्या प्रमाणात वाढू लागला. जॉर्ज एस. पार्कर या तारयंत्राविषयी प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीने 1982 रोजी ” पार्कर पेन” ही पेन निर्मितीची कंपनी सुरू केली.

[ Parker Pens ] पार्कर पेनाची निर्मिती

संवाद साधण्याच्या कल्पनेमध्ये पारकर ला रस होता शिवाय तो तारयंत्राविषयी प्रशिक्षण ही देत होता. आपल्या डोक्यातील कल्पना आपण इतरांपर्यंत कशी पोहोचू शकतो याचा पारकर विविध अंगांनी विचार करत असत. याच कल्पना कागदावर लिहून ठेवण्यासाठी काय करता येईल याचा तो विचार करू लागला. पेनाचा उपयोग करून या कल्पना आपण लिहू शकतो हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने शाई पेन तयार करणाऱ्या कंपनीची निर्मिती केली. आपला पेन कोणत्याही भाषेत लिहू शकतो असा दृष्टिकोन त्याने आपल्या मित्रांसमोर ठेवला. 1930 रोजी पारकर ने तयार केलेल्या पार्कर पेन याला अमेरिकेमध्ये यश मिळायला लागलं त्यानंतर त्यानं युरोपमध्ये आपल्या पेनाची विक्री करायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये तर संपूर्ण जगामध्ये पार्कर पेन प्रसिद्ध झाले . कंपनीच्या एकूण नफ्या पैकी अर्ध्यापेक्षा जास्त नफा हा अमेरिका सोडून बाहेरच्या देशातून यायला लागला.

[ Parker Pens ]  पार्कर चे लक्ष हे नेहमी पेनच्या दर्जा वरती असत. पेनचा दर्जा हा उत्कृष्ट असला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. हवेचा दाब, शाईचा दाटपणा, पृष्ठभागावर ची ऊर्जा, कागदा मधील अतिसूक्ष्म छिद्रे अशा सर्व गोष्टींचा अभ्यास तो बारकाईने करत असे व आपल्या कामगारांनाही करायला लावत असते.

प्रत्येक पेन निर्मितीनंतर त्याचा दर्जा तपासून पाहण्यात पारकर आग्रही असे मग तो पेनाच्या वेगवेगळ्या चाचण्या घेत असे या चाचण्यांमध्ये विविध प्रकारच्या कागदावरती पेन नीट चालतो का याचे परीक्षण करत, वेगवेगळ्या हस्ताक्षरासाठी आणि वेगवेगळ्या लेखनशैली साठी पेन व्यवस्थित चालतो का नाही हे पाहत असत. 1918 रोजी पहिले महायुद्ध सुरू झाले आणि पार्कर पेनाला अमेरिकेमध्ये प्रचंड मागणी वाढली. याचं कारण होतं लोक प्रचंड प्रमाणात पत्र लिहू लागले होते आणि अनेक गोष्टी नोंद करण्यासाठी पेनाचा उपयोग होत असत. त्यामुळे पार्कर पेनाचा खप मोठ्या प्रमाणात वाढत होता.

[ Parker Pens ] पार्कर पेन मध्ये करण्यात आलेले बदल

[ Parker Pens ] आपल्या पेना मध्ये चांगले बदल करण्यासाठी आणि सुधारणा करण्याकडे पार्कर चा कल होता. पार्कर ची दोन्ही मुलं रसेल आणि केनेथ त्याच्या व्यवसायात त्याला मदत करू लागली होती. पार्कर कंपनीचा ” ड्युओ फोल्ड” हा नवीन पेन त्यांनी बाजारात आणला. या पेनाचे वैशिष्ट्य म्हणजे या पेना मध्ये इतर पेनाच्या तुलनेत दुप्पट शाई बसत असे. पार्कर चे सर्व पेन हे ब्लॅक रंगाचे होते. पण हा पेन लालसर होता. त्यामुळे या पेना बाबत लोकांच्यात कुतूहल निर्माण झाली होती. पारकर ने या रंगाच्या पेनाचा चक्क पेटंट घेतलेले होते. पेन इतका लोकप्रिय झाला की त्याने बाजारात नुसता धुमाकूळ घातला.

दुकानांमध्ये पारकर चा हा पेन घेण्याकरिता नुसती झुंबड उडत असे. यानंतर पारकरणे विविध रंगाचे पेन बाजारात आणले. पेनाच्या विविध रंगांवरून पारकर ला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या उदाहरणार्थ. हिरवा रंग हा भारतामध्ये अशुभ मानला जातो त्यामुळे भारतात हिरव्या रंगाचे पेन चालणार नाहीत. तर चीनमध्ये पांढरा रंग हा शोक व्यक्त करण्यासाठी वापरला जात असल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या पेनाचा तेथे खप झाला नाही.

पारकर चा पेन खिशाला असणे हा सन्मानाचा प्रश्न झालेला होता. त्यामुळे काही मंडळी फक्त पार्कर पेनाचे टोपण खिशाला लावून अभिमानाने मिरवत असे. पुढे 1932 रोजी पारकर ने विमानात चालणारा पेन तयार केला. विमानात हवामानाचा दाब कमी जास्त होत असल्याने पेनातील शाई बाहेर येण्याची शक्यता जास्त असते कधीकधी पेनाची गळती होत तर कधी त्यांचा स्फोट ही होत. या सर्व समस्या लक्षात घेऊन प्रकरणी हा पेन बनवलेला होता.

[ Parker Pens ] बॉल पेन ची निर्मिती

1945 रोजी पहिला बॉल पेन तयार झाला. यामुळे पार्कर पेना वरती जणू संकटच कोसळले. त्याकाळी पाण्यामध्ये ही लिहू शकणारा पेन अशी बॉल पेन ची जाहिरात केलेली होती. त्याकाळी 12.50 डॉलर्सला हा पेन मिळत असे. आता बॉल पेन बनवणाऱ्या कंपन्या वाढू लागल्या होत्या. त्याकाळी जवळपास 250 कंपन्या डॉल्फिन बनवण्याच्या स्पर्धेत उतरल्या होत्या. पार्कर कंपनीने मात्र यामध्ये सहभाग घेतला नाही. स्वतःच्या ध्येयापासून आणि धोरणापासून दूर जाणे कंपनीने अजिबात स्वीकारले नाही. कालांतराने बॉलपेन बनवणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धांमुळे बॉलपेन ची किंमत अर्ध्या डॉलर वर आली. त्याच वेळी 1954 रोजी चांगला अभ्यास करून आणि तयारी करून पारकर ने स्वतःचा पहिला बॉल पेन तयार केला आणि बाजारात आणला.

Parker Pens

या पेनाचे नाव “जॉटर” असे ठेवण्यात आले. हा पेन बाजारात मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला. स्वस्तात बॉलपेन विकणाऱ्या कंपन्यांना तोंड देण्यासाठी पारकर ने अशीच एक कंपनी विकत घेतली. पण स्वतःच्या पेनाची किंमत कधीही कमी होऊन दिली नाही आणि त्याचा दर्जा हा उत्कृष्ट ठेवला. पेनाचा दर्जा चांगला असल्यामुळे उच्चभ्रू लोकांमध्ये पार्कर चे पेन हे खूपच प्रसिद्ध होत. पारकर ने सोन्यापासून सुद्धा पेन तयार केले या पेन ची किंमत 1000 डॉलर इतकी होती. आता पार्कर ची तिसरी पिढी व्यवसायात आलेली होती. त्यावेळीस कंपनीचे एकूण उत्पन्न 15 कोटी डॉलर्स इतका होता.

अनेक सुप्रसिद्ध साहित्यिकांनी, लेखकांनी आणि कवींनी आपले लेखन पारकर च्या पेनने केले आहे. अनेक देशांच्या राष्ट्रपतींनी पारकर च्या पेनाला पसंती दिली महत्त्वाचे करार आणि त्यावर ती स्वाक्षरी करण्याकरिता पारकर च्या पेनाचा उपयोग केला गेला. जॉर्ज एस. पारकरच स्वप्न पूर्ण झालं.

[ Parker Pens ] पार्कर पेनाची लोकप्रियता

मित्रांनो आज तुम्ही पार्कर पेन बिझनेस मॅन आणि ऑफिशियल व्यक्तींच्या जवळ पाहत असाल. पण 1880 रोजी अमेरिकेच्या एका तार यंत्राविषयी प्रशिक्षण देणारे जॉर्ज एस. पारकर हे एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असत. आणि अधिक पैसे कमावण्यासाठी ते जॉन हॉलंड या कंपनीचा फाउंटन पेन विकत असत. पण अशा प्रकारच्या पेनामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत असे. जसं की पेन दीर्घकाळ टिकत नसत, त्याची शाही लगेच संपून जात असत.

या सर्व समस्यांना पाहून जॉर्ज पारकर याने सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी काही साहित्य खरेदी केलं आणि त्यांच्या साहाय्याने पेन नीट करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता पारकर यांनी सर्व पेन दुरुस्त केले. यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना ज्या समस्या पूर्वी येत होत्या त्या आता यायच्या बंद झाल्या होत्या. स्वतःच्या व्यावसायिक बुद्धीचा उपयोग करत पारकर यांनी फाउंटन पेनाच्या शाई गळतीच्या समस्येला सोडवून त्याचे पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतले.

जॉर्ज एस. पारकर आता पेन निर्मितीच्या व्यवसायात यायचा विचार करत होते. पण सर्व नवीन व्यावसायिकांना असते ती अपयशी होण्याची भीती जॉर्ज एस. पारकर यांनाही तशीच भीती होती. या भीतीला पळवून लावून जॉर्ज पारकर हे फाउंटन पेनाच्या समस्या करण्यासाठी मेहनत घेऊ लागले. दिवस-रात्र मेहनत घेऊन त्यांनी Lucky Curve Fed. नावाचं एक सोल्युशन शोधून काढलं. त्याचा उपयोग करून पेनातील जादा किंवा नको असलेली शाई काढता येत असे.

त्यामुळे लोक आता हा पेन खिशात घालून फिरू शकत होते. पूर्वी खिशात पेन ठेवल्याने शाई गळती होत असे. आता ही समस्या पूर्णपणे संपलेली होती. या शोधाला सुद्धा त्यांनी पेटंट करून घेतले. त्यानंतर 1818 रोजी त्यांनी स्वतःची पारकर कंपनी सुरु करण्याचे ठरवले. एका तार यंत्र शिवणाऱ्या शिक्षकांनी कंपनी सुरू करणे अवघड होते कारण त्यांना सुरुवातीला खूप अवघड समस्यांना सामोरे जावे लागले.

कंपनी सुरू केली पण त्यांच्याकडे उत्पादन निर्मितीचा अनुभव होता ना मार्केटिंगचा अनुभव होता. पण म्हणतात ना मनापासून इच्छा असल्यास काहीही अशक्य नसते. त्याचप्रमाणे त्यांनी ही कामाला सुरुवात केली. स्वतःचा पहिला पेन जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा तो ग्राहकांची पसंती बनला पाहिजे पण त्याच वेळी बाजारात काही अमेरिकी आणि युरोपमधील कंपन्या आपले पाय रोवून उभ्या होत्या. या सर्व स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पारकर यांना भांडवलाची गरज होती.

त्यांच्या याच गरजेला पूर्ण केलं W. F. PAMAR यांनी त्या बदल्यात पारकर यांनी W. F. PAMAR यांना पार्टनरशिप ऑफर केली आणि PAMAR यांनी ती ऑफर स्वीकारली. 1898 पर्यंत ही कंपनी एका छोट्याशा घरामध्ये होती. पण 1899 रोजी ही कंपनी चार मजली इमारतीत बनली होती. त्यावेळेस जगभरात परकर चे 100 विक्रेते होते. 1954 रोजी कंपनीने पहिला बॉल पेन सुरू केला जो ग्राहकांची पसंती बनला. त्याचं नाव जेटर हे होतं. 1937 सली कंपनीचे मालक जॉर्ज एस. पारकर यांचा मृत्यू झाला. आज कंपनीची सर्व सूत्रे NEWELL BRANDS कडे आहेत.

[ Gillette Blade ] जिलेट ब्लेड चे यश

Leave a Comment