[ Home Remedies for Acne ] चेहऱ्यावर येणारे मुरूम हे दिसायला खूपच विचित्र दिसतात. आणि यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. तरुण वयातील युवक-युवती च्या चेहऱ्यावर मुरूम येणे नैसर्गिक आहे. पण जर सौंदर्य टिकवून ठेवायची असेल तर मुरमा वरती उपचार घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त क्रीम्स च्या साह्याने चेहऱ्यावरील मुरूम काही काळ जातात. पण नंतर ते पुन्हा यायला चालू होतात. आशा केमिकल युक्त क्रीम्स सतत लावल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होतात. जसे की चेहरा लाल होणे, चेहरा कोरडा पडणे, चेहऱ्यावर डाग पडणे यामुळे बरेच लोक घरगुती उपायांना प्राधान्य देत असतात.
मध्यम आणि हलके मुरूम घरगुती उपचाराने [ Home Remedies for Acne ] लवकर बरे होऊ शकतात. त्याच्याविरुद्ध जे मुरूम खूप दिवसापासून आहेत आणि जुने झालेले आहेत असे मुरूम आणि त्यांचे डाग घालवण्यासाठी योग्य तो उपचार तज्ञांकडून घ्यावा लागतो. मध्यम आणि हलके मुरूम ठीक करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये मिळून जातील. त्यातील काही सामान्य पदार्थ म्हणजे काकडी, ओट्स, द्राक्ष, दही, या सर्वांचा उपयोग करून फेशियल मास्क तयार केला जातो. ज्याचा उपयोग चेहऱ्या वर लावण्यासाठी होतो. यामुळे त्वचा ग्लोविंग, मॉइश्चरायझर आणि आरोग्यदायी बनते.
[ Home Remedies for Acne ] मुरमा साठी घरगुती उपचार खालील प्रमाणे
- द्राक्षांचा उपयोग – द्राक्षांचा उपयोग तुम्ही आहारामध्ये जरूर करत असाल. सकाळी नाश्ता सोबत द्राक्ष तुम्ही आजपर्यंत खाल्लेली असतील. ज्यावेळेस मुरमाच्या उपचार तुमच्या डोक्यात येत असेल त्यावेळेस द्राक्ष कधीच तुमच्या डोक्यात आलेली नसतील. पण द्राक्षांचा उपयोग चांगल्या प्रकारे आपण चेहऱ्यावरील मुरुमांसाठी करू शकतो. द्राक्षामध्ये बॅक्टेरिया असतात. ज्या बॅक्टेरिया मुळे चेहऱ्यावर मुरूम झालेले आहे आशा बॅक्टेरिया सोबत लढण्याचे काम आणि त्यांना संपवण्याचे काम द्राक्षा मधील बॅक्टेरिया करते. यामुळे मुरूम कमी व्हायला मदत होते.द्राक्षांचा उपयोग करताना दोन-तीन द्राक्ष घ्यावीत आणि ती मधून कट करावीत कट केलेली बाजू चेहऱ्यावरील मुरमावर लावावी आणि हळूहळू घासावी चेहऱ्यावर ज्या ठिकाणी मुरूम आहे अशा ठिकाणी द्राक्षातील ओलसरपणा पसरावा अशा पद्धतीने द्राक्ष लावावे.
- काकडी चा उपयोग -ज्या वेळेस तुम्ही सलून मध्ये जात असता त्यावेळेस चेहऱ्यावर फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यांवरती काकडी ठेवली जाते. याचे कारण म्हणजे डोळ्यांवर आलेला थकवा कमी करण्यासाठी काकडी चा उपयोग केला जातो. चेहऱ्यावरती काकडीच्या वापरामुळे चेहरा स्मूथ होतो, चेहऱ्याची जळजळ कमी होते, चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा ऐकणे मुळे दुखणारा त्रास कमी होतो.सुरुवातीला चेहऱ्यावरती मुरूम [ Home Remedies for Acne ] हलक्या स्वरूपाचे यायला सुरू होतात. या मुरमा वरती योग्य उपचार न केल्याने ते पुढील टप्प्यात जातात आणि आकाराने मोठे बनतात. हे मुरूम फोडल्यानंतर किंवा आपोआप फुटल्यानंतर त्यातून बाहेर आलेले द्रव्य चेहऱ्यावर पसरल्यावर त्यांच्यामुळे जास्त मुरूम चेहऱ्यावर यायला सुरुवात होते.काकडीच्या वापरामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि हायड्रेट राहते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम झालेला असेल तर त्याच्या उपचारासाठी काकडी चा उपयोग गुणकारी ठरू शकतो.
काकडी चा वापर करत असताना एक लहान काकडी मिक्सरमध्ये बारीक करावी त्यासोबत थोडे ओट्स टाकून ते सुद्धा बारीक करावेत. तयार झालेले मिश्रण दही मध्ये मिक्स करून चेहऱ्यावरती लावावे. 30 मिनिट हे मिश्रण चेहऱ्यावरती फेसपॅक म्हणून तसेच लावून ठेवावे. 30 मिनिटानंतर धुवून टाकावे.
- मधाचा उपयोग -[ Home Remedies for Acne ] मधाला आयुर्वेदामध्ये गुणकारी म्हटलेले आहे. मधामध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म असतात. काही लोक तर मधाचे दैनंदिन जीवनामध्ये सेवन करत आहेत. कफ होणे, खोकला येणे, घसा कोरडा पडणे यांसारख्या लक्षणांवरती उपाय म्हणून काही लोक मधाचा उपयोग करतात.प्रयोगशाळांमध्ये केलेल्या टेस्ट नुसार मधामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे भाजलेली जखम बरी करणे, अपघातामुळे झालेली जखम बरी करणे यासाठी मधाचा उपयोग फायदेशीर ठरतो. चेहऱ्यावरील इन्फेक्शन मुळे निर्माण होणाऱ्या मुरमांवर उपचारांसाठी सुद्धा मध गुणकारी आहे.[ Home Remedies for Acne ] मधाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी संपूर्ण चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर चेहऱ्यावरती मध लावून घ्यावे आणि तीस मिनिट तसेच वाळण्यासाठी ठेवावे. 30 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.
- ईस्ट आणि दही चा उपयोग – [ Home Remedies for Acne ] बऱ्याच रिसर्च नुसार असे सांगण्यात आलेले आहे की दूध आणि दुधाचे पदार्थ चेहऱ्याला ताजे तवाने ठेवण्यासाठी आणि ग्लोविंग बनवण्यासाठी महत्त्वाचे असतात. बरेच मॉइश्चरायझर, साबण, शाम्पू यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये दुधाचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. दुधापासून बनलेले दही सुद्धा चेहऱ्यासाठी चांगले असते. यामध्ये चांगल्या बॅक्टेरिया यांची संख्या अधिक असते. मुरूम ज्या बॅक्टेरियल पासून तयार होत आहे अशा बॅक्टेरिया सोबत लढण्याचे काम चांगल्या बॅक्टेरिया करतात.दही आणि ईस्ट चा फेसपॅक बनवताना एक तुमच्या ईस्ट घ्यावा आणि प्लेन दह्यामध्ये मिक्स करावा. त्यांचे मिश्रण बनवावे बनलेले मिश्रण चेहऱ्यावरती लावावे आणि पंधरा ते वीस मिनिट वाळण्यासाठी ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.
- ओट्स चा उपयोग -ओट्स हे एन्टीइन्फ्लामेंटरी आहे. त्यामुळे शरीरात ज्या ठिकाणी इन्फ्लामिशन सुरू आहे अशा ठिकाणी आराम पोहोचवण्याचे काम करते. त्वचेवर निर्माण झालेल्या रॅशेस, खाजवणे, जळजळणे, एक्झिमा यांसारख्या सुटका करण्याचे काम ओट्स करते. त्वचेचे रक्षण करणे, त्वचा हायड्रेट ठेवणे यांसारखे काम ओट्स करते. ज्या रुग्णांना त्वचेच्या किरकोळ समस्या आहेत अशा लोकांना ओट्स मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो.ओट्स फेस मास्क तयार करताना दोन चमचे ओट्स, एक चमचा बेकिंग सोडा, पेस्ट तयार करण्यासाठी आवश्यक पाणी, या सर्वांपासून तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर संपूर्ण लावावी आणि हलक्या हाताने रब करावी. आणि काही वेळानंतर धुवून टाकावी.
- हळदीचा उपयोग -भारतामध्ये लग्नापूर्वी नवरीची त्वचा चांगली दिसावी यासाठी हळदीचा फेस मास्क वापरला जातो. कारण हळदीमध्ये ऑंटी बॅक्टेरियल, एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. त्वचा मध्ये सकारात्मक बदल घडव ती ताकद हळदीमध्ये असते. मुरूम, पिंपल्स, स्किन टॅनिंग या सर्व समस्यांवरती हळद गुणकारी औषध आहे. हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी आवश्यक सामग्री किराणा मालाच्या दुकानांमध्ये उपलब्ध असते.हा फेस पॅक बनवताना अर्धा कप चण्याचे पीठ, दोन चमचे हळद पावडर, चंदन पावडर, तूप, बदामाचे तेल या सर्वांचा उपयोग करून पेस्ट तयार करावी आणि बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर ती लावावी. लावल्यानंतर पाच ते दहा मिनिट तसेच ठेवावी. तळहाताच्या बोटांनी हळूहळू चेहऱ्यावर मसाज करत फेस मास्क रिमूव करावा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. हळद चेहऱ्यावर लावल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका नाहीतर चेहरा पिवळा पडायची शक्यता असते.
- ग्रीन टी चा उपयोग -ग्रीन टी हे खूप जास्त एंटीऑक्सीडेंट आहे. याच्या वापरामुळे आरोग्य चांगले राहते. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर करण्यात येतो. चेहऱ्यावर मुरूम तयार करणाऱ्या बॅक्टेरिया सोबत लढण्याचे काम ग्रीन टी मध्ये असणारा पॉलिफिनॉल हा घटक करत असतो. ग्रीन टी पिल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतातच असे नाही. पण काही लोकांमध्ये ग्रीन टी सातत्याने एक ते दोन महिने पिल्यानंतर चेहऱ्यावरील मुरमाचे प्रमाण कमी झालेले दिसून आलेले आहे.ग्रीन टी पिण्यापेक्षा चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरील मुरूम लगेचच कमी झालेल्या आपल्याला दिसतात. चेहऱ्यावर ग्रीन टी लावल्यानंतर चेहऱ्यावरील एकने तयार करणाऱ्या बॅक्टेरिया संपवण्याचे काम ग्रीन टी करते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येत नाही. किंवा आलेले मुरूम हळूहळू कमी व्हायला सुरू होतात. ग्रीन टी तयार केल्यानंतर गार होईपर्यंत वाट पहावी. त्यानंतर ग्रीन टी संपूर्ण चेहऱ्यावरती लावावा चेहऱ्यावर लावल्यानंतर 30 मिनिट तसाच ठेवावा. 30 मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन काढावा.
या व्यतिरिक्त ग्रीन टी पासून बनवलेले फेस वॉश, मॉइश्चरायझर, क्रीम्स बाजारात मिळतात याचा उपयोग सुद्धा तुम्ही करू शकता.
- कोरफडीचा उपयोग -[ Home Remedies for Acne ] कोरफड ही एक निसर्गात मिळणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफडीच्या पानांमध्ये मिळणाऱ्या जेल पासून सौंदर्यप्रसाधने बनवले जातात. त्वचेवरील रॅशेस, इन्फेक्शन, जखम यांसारख्या गोष्टींपासून बचाव करण्यासाठी कोरफडीचा उपयोग केला जातो.कोरफड ही एक अँटीबॅक्टेरियल वनस्पती आहे. या वनस्पतीपासून मिळणाऱ्या जेल मध्ये खूप जास्त एमटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. चेहऱ्यावर मुरूम तयार करणाऱ्या बॅक्टेरिया ला संपवण्याचे काम कोरफड करते. यामुळे कोरफडीचा उपयोग मुरूम घालवण्यासाठी गुणकारी आहे.
चेहऱ्यावर कोरफडीचा वापर करत असताना कोरफडीच्या पानांमधील जेल काढावे. त्यात जेलचे तुकडे करून एकजीव करून त्याचे मिश्रण तयार करावे. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावरती लावावे अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
ज्या व्यक्तीला चेहऱ्यावरती मुरूम आहेत अशा व्यक्तींनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा या फेस मास्क चा उपयोग करावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होते.
- लिंबाचा उपयोग –[ Home Remedies for Acne ] सर्वांच्या स्वयंपाक घरात सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे लिंबू होय. लिंबू हे एक विटामिन सी चे प्रमाण जास्त असणारे फळ आहे. लिंबू हे एक अँटिऑक्सिडंट सुद्धा आहे. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी विटामिन सी ची खूप आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शरीर निरोगी राहण्यासाठी, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विटामिन सी ची आवश्यकता असते.लिंबामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीरावरती होणाऱ्या बॅक्टेरिया च्या आक्रमणांपासून शरीराचा बचाव होतो. चेहऱ्यावरील मुरूम साठी त्याचा फायदा होतो.
चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी लिंबाचा उपयोग करत असताना. लिंबाचा एक चमचा रस काढावा. काढलेल्या एक चमचा रस मध्ये दोन चमचे पाणी मिक्स करावे. आणि संपूर्ण चेहऱ्यावरती लावावे. चेहऱ्यावरती लावल्यानंतर 30 मिनिट वाळायला लावावेत. 30 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढावा.
ज्या लोकांना चेहऱ्यावर मुरूम आहेत असे लोक आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय करून पाहू शकतात.
[ Low Carb Diet ] ” लो कार्ब डाइट” म्हणजे काय ? याचा उपयोग कशासाठी होतो ?