[ Low Carb Diet ] ” लो कार्ब डाइट” म्हणजे काय ? याचा उपयोग कशासाठी होतो ?

[ Low Carb Diet ] “लो कार्ब डाइट” म्हणजे काय ?

[ Low carb Diet ] आहार विश्वामध्ये किंवा विविध घेण्यात येणाऱ्या आहार पद्धती मध्ये लो कार्ब डाइट ला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, थायरॉईडच्या समस्यां करिता, शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी लो कार्ब डाइट फॉलो करत असतात. पण ही आहार पद्धत फॉलो करण्यासाठी योग्य आहार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लो कार्ब डाइट म्हणजे आहारामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे याला लो कार्बोहायड्रेट डाइट असे म्हणतात. कार्बोहायड्रेटचे कमीत कमी सेवन करणे हे या आहार पद्धतीचे महत्त्वाचे उद्देश आहे. व्यक्तीसाठी कमीत कमी आवश्यक कार्बोहायड्रेटचे प्रमाण वेगवेगळे असते. पण विज्ञानानुसार असे कोणतेही तंत्र अजून विकसित झालेले नाही जे अचूक सांगू शकेल व्यक्तीला कमीत कमी किती कार्बोहायड्रेट्स ची गरज आहे. सर्वसामान्यपणे 50-100 ग्राम कार्बोहायड्रेट्स आहारात समाविष्ट असणाऱ्या डाइट ला ” लो कार्ब डाइट” असे म्हणतात. ज्या डाइट मध्ये 100-200 ग्राम कार्बोहायड्रेट आहारात समाविष्ट आहेत आशा डाइट ला ” मॉडरेट – कार्बन डायट” असे म्हटले जाते.

[ Low Carb Diet ] “लो कार्ब डाइट” चे फायदे खालील प्रमाणे

आज पर्यंत तुम्ही “लो कार्ब डाइट” चा उपयोग वजन कमी करण्यासाठी करतात असे ऐकले असेल. पण बरेच लोक स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी “लो कार्ब डाइट” चा उपयोग करत असतात. ज्या महिलांमध्ये हार्मोन इमबॅलन्स ची समस्या असते अशा महिलांना लो कार्बोहायड्रेट डाएटचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला पाहायला मिळत आहे. या आहार पद्धतीमुळे चांगली झोप लागणे, मानसिक तणाव कमी होणे, ध्यान लागणे अशा प्रकारचे फायदे पाहायला मिळत असतात.

लो कार्ब डाइट  चा उपयोग केल्यामुळे शरीरातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी होते. इन्सुलिन नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. या डाएट प्लॅन चा वापर सुरू केल्यापासून दोन ते तीन महिन्यांमध्ये रुग्णांची साखर नियंत्रणात राहते. साखर असणाऱ्या रुग्णांना वजन कमी करण्यासाठी लो कार्ब डाइट चा खूप फायदा होतो. टाईप 2 डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना या आहार पद्धतीचा फायदा होतो.

एका वयोवृद्ध माणसावर लो कार्ब डाइट वापरून पाहिली. त्या वृद्ध माणसाला लठ्ठपणाचा त्रास होता. त्यामुळे त्याच्या पोटावर आणि इतर अवयवांवर चरबी साठून राहत असे. त्यामुळे त्याला इतर आजारांना सामोरे जावे लागत होते. यातून वाचण्यासाठी त्याला लो कार्ब डाइट वापरायला दिली. यामुळे त्याच्या शरीरावरील फॅट पर्सेंटेज 9.7% ने एका महिन्यामध्ये कमी झालेले जाणवले.

[ Low Carb Diet ]  “लो कार्ब डाइट” च्या मर्यादा खालील प्रमाणे.

लो कार्ब डाइट ही डाइट इतर कोणत्याही डाइट पेक्षा जास्त आरोग्यदायी आहे असे कोठेही सिद्ध झालेले नाही. या डाएटच्या सुरुवात करताना पहिल्या एक ते तीन महिन्यापर्यंत रुग्णाला चांगला रिझल्ट दिसतो. पण आयुष्यभर हा डाएट फॉलो करणे योग्य आहे का नाही यासंदर्भात अजून माहिती उपलब्ध नाही. ज्यावेळेस डायबिटीज असणाऱ्या रुग्णाला वजन कमी करायचे असते त्यावेळेस लो कार्ब डाइट फॉलो केला जातो पण इतर डायट ने सुद्धा रुग्णाचे वजन कमी करता येते.

त्यामुळे लो कार्ब डाइट हा सर्वश्रेष्ठ डायट प्लॅन आहे असे म्हणू शकत नाही. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि मेंदूच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी कार्ब्स ची आवश्यकता असते. ह्या डायट प्लॅन मध्ये कार्ब कमी प्रमाणात असल्यामुळे शरीराला ऊर्जा निर्मितीसाठी कार्ब अपुरे पडते त्यामुळे शरीराला योग्य ती ऊर्जा मिळत नाही. लो कार्बोहायड्रेट डाइट आणि लो फॅट डाइट या दोन प्रकारांपैकी लो कार्बोहायड्रेट डाइट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. लो कार्बोहायड्रेट मुळे शरीरातील ग्लुकोज चे प्रमाण सुद्धा कमी होते.

लो कार्बोहायड्रेट डाइट ही सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल असे नाही काही लोकांसाठी ही डाइट त्रासदायक ठरू शकते. गर्भवती महिलांसाठी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी लो कार्बोहायड्रेट डाइट सुचवली जात नाही. अशा वेळेस वैद्यकीय चिकित्सा आणि आहार तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. गर्भवती महिलांना अधिक प्रोटीन सेवनासाठी दिल्यानंतर त्यांना त्याचा त्रास जाणवू लागतो. या कालावधीत शरीराला कार्बोहायड्रेट्स खाने खूप महत्त्वाचे असते. यामुळे तुम्ही शरीराचे ऐकले पाहिजे.

जर तुम्ही जास्त मेहनतीचे काम करत असाल किंवा व्यायाम करत असाल किंवा जिम मध्ये क्रॉस फिट करत असाल तर लो कार्बोहायड्रेट डाइट तुम्हाला पुरेपूर ऊर्जा देऊ शकत नाही. जर कोणतीही व्यक्ती मानसिक तणावातून जात असेल किंवा त्याच्या आयुष्यात डिवोर्स किंवा इतर कोणतीही घटना घडलेली असेल ज्यामुळे त्याला मानसिक तणाव आलेला असेल. किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे तणाव आलेला असेल अशा वेळेस ॲड्रेनल सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी जास्त कार्बोहायड्रेट ची आवश्यकता असते त्यामुळे अशा व्यक्तींनी लो कार्बोहायड्रेट फॉलो करू नये.

जर तुम्ही कोणत्याही जुनाट किंवा नवीन आजाराने ग्रसित असाल तर तुम्ही लो कार्बोहायड्रेट डाएट उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांशी संवाद साधावा. जर तुम्हाला किडनी संदर्भात कोणताही आजार असेल तर लो कार्बोहायड्रेट मध्ये प्रोटीनचे प्रमाण किती ठेवायचे यासंदर्भात आहार तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला हृदय संदर्भात काही आजार असेल तर तुम्ही लो कार्बोहायड्रेट डाइट फॉलो करू शकता. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होईल आणि हृदयाला रक्त प्रवाह सुरळीत चालू होईल.

लो कार्बोहायड्रेट डाएट मध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण असते यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. लो कार्बोहायड्रेट डाइट फॉलो करत असताना त्या डाइट मध्ये वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे. चांगल्या गुणवत्तेचे अन्नपदार्थ या डाइट मध्ये वापरावेत. जर तुम्हाला अति खाण्याची सवय असेल अशा अवस्थेत जर तुम्ही लो कार्बोहायड्रेट डाइट सुरू केला तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.

[ Low Carb Diet ] लो कार्ब डाइटचे प्रकार खालील प्रमाणे.

लो कार्ब डाइटचे कार्बोहायड्रेट च्या प्रमाणावरून, डाएट मध्ये वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांवर वरून, डाइट बनवणाऱ्या व्यक्ती वरून, डाएट ज्या व्यक्तींसाठी बनवायचे आहेत अशा व्यक्तींवर या डाइट चे विविध प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आहेत.

 • किटो डायट – वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येणारा हा प्रसिद्ध डाएट प्लॅन आहे. या डाइट प्लान मध्ये संपूर्ण दिवसांमध्ये 50 ग्रॅम पेक्षा कमी कार्बोहायड्रेट खायचे असतात. त्याचबरोबर प्रोटीन सुद्धा खायचे असते. किटो डायट मध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त फॅट खायचे असते. याच डाएट प्लॅन ला केटोजनिक डाइट असे सुद्धा म्हटले जाते. भारतीय लोकांच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर प्रोटीनचे प्रमाण कमी असते यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. याउलट किटो डायट मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अगदी कमी असते त्याचबरोबर प्रोटीनचे प्रमाण जास्त असते यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आरोग्य सुधारते.
 • पारंपारिक लो कार्बोहायड्रेट डाइट – किटो डायट ही खूप स्ट्रिक्ट असते. याचे पालन करणे बऱ्याच लोकांना जमत नाही म्हणून ते लोक पारंपारिक लो कार्बोहायड्रेट डाइट कडे वळतात. या डाएटमध्ये किटो डायट पेक्षा अधिक कार्बोहायड्रेट्स चे सेवन डाइट करणारी व्यक्ती करू शकते. या डाएट प्लॅन मध्ये एका दिवसात 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंत कार्बोहायड्रेट्स खाऊ शकता. त्याचबरोबर फायबर आणि प्रोटीन सुद्धा खाऊ शकता.
 • ॲटकिन्स डाइट प्लॅन – डॉ. ॲटकिन्स यांच्याद्वारे 1970 मध्ये या डाएट प्लॅन ची निर्मिती झाली होती. हा डायट प्लॅन प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी तयार केलेला होता. यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. सुरुवातीला या डाएट प्लॅन मध्ये कार्बोहायड्रेटचे कमी प्रमाण घ्यायला लावतात. त्यानंतर थोडे थोडे कार्बोहायड्रेटचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवले जाते. पूर्व नियोजित अशी डायट प्लॅन ज्या लोकांना आवडते त्या लोकांमध्ये ही डाइट प्लान खूप लोकप्रिय आहे.
 • डुकन डाइट प्लॅन – या डाएट प्लॅन चे एकूण चार टप्पे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये व्यक्तीचे वजन कमी करण्याकडे लक्ष दिले जाते. तर दुसऱ्या दोन टप्प्यांमध्ये व्यक्तीचे वजन मेंटेन ठेवण्याकडे लक्ष दिले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे. अशा पदार्थांचा समावेश केला जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण वाढवले जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये सेलिब्रेशन मिल त्या व्यक्तीला दिले जाते. सेलिब्रेशन मिल पहिल्या आठवड्यात एकदा आणि दुसऱ्या आठवड्यात एकदा अशा प्रकारे दिले जाते. चौथ्या टप्प्यामध्ये व्यक्तीचे वजन संतुलित राहण्यासाठी आहार दिला जातो. सदरील डाइट ही आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. आणि त्यांनी सांगेल त्या पद्धतीनेच दररोजचे आहारासाठी लागणारे पदार्थ बनवावेत.
 • पॅलिओ डाइट प्लॅन – या डाएट प्लॅन ला लो कार्बोहायड्रेट प्लॅन म्हणणे कठीण आहे. कारण यामध्ये धान्य खाण्यास सक्त मनाई आहे. पण कार्बोहायड्रेट च्या इतर प्रकारांपैकी असणारे रताळे, बटाटा, इतर कंदमुळे यांसारखे प्रकार तुम्ही खाऊ शकता. या पद्धतीने ही डायट प्लॅन फॉलो केली जाते.

[ Low Carb Diet ] खालील अन्नपदार्थ लो कार्बोहायड्रेट डाएट मध्ये वापरले जातात.

 • पालेभाज्या
 • मटन, चिकन
 • मासे
 • लोणी
 • जवस
 • नारळाचे तेल
 • बटर
 • दही
 • ड्राय फ्रुट्स
 • लहान फळे
 • डार्क चॉकलेट

[ Low Carb Diet ] खालील अन्नपदार्थ लो कार्बोहायड्रेट डाएट मध्ये वापरू नयेत.

Low Carb Diet

 • चिप्स, वेफर्स, बिस्किटे
 • भात
 • गहू, ब्रेड
 • दूध

[ Mickey Mouse ] मिकी माऊस आणि वॉल्टर डिस्ने

Leave a Comment