ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथे भरती.

ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था द्वारे भरती घोषित करण्यात आलेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती ही नऊ जागांकरिता होणार आहे. वैद्यकीय अधिकारी ( गट- अ ) आणि वैद्यकीय अधिकारी( गट- ब) या दोन पदांकरिता सदरील भरती होणार आहे. तरी भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ESIS Bharti 2024

  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती नऊ जागांकरिता होणार आहे.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती वैद्यकीय अधिकारी ( गट- अ) आणि वैद्यकीय अधिकारी ( गट- ब) या पदांकरिता होणार आहे.

Table of Contents

ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरतीच्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  • वैद्यकीय अधिकारी (गट-अ) या पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण एमबीबीएस पूर्ण पाहिजे.
  • वैद्यकीय अधिकारी (गट- ब) या पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण एमबीबीएस पूर्ण पाहिजे.
  • सदरील भरती करिता वयाची अट पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता वैद्यकीय अधिकारी या पदासाठी नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
  • सदरील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे अमरावती राहील.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
  • सदरील भरती करिता पात्र उमेदवाराने कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • 22 मार्च 2024 ही कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय द्वारे घोषित केलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता प्रसिद्ध झालेली जाहिरात पहा. जाहिरात पहा
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-राज्य कामगार विमा सोसायटी, मोतीनगर, अमरावती – ४००६०६” या पत्त्यावर अर्ज करावा.

ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय यांच्याद्वारे राबवण्यात आलेली नाही.
  • सदरील भरती करिता अर्ज भरत असताना उमेदवाराने स्वतःची माहिती जसे की जन्मतारीख, नाव, शिक्षणाचा तपशील, पत्ता, पिनकोड यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर या गोष्टी भरताना काही चुकले तर त्यास राज्य विमा संस्था रुग्णालय जबाबदार राहणार नाही.
  • 22 मार्च 2024 ही कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय यांच्याकडून देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने वाचावी त्यानुसारच अर्ज करावा.

ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवाराने खालील नियम वाचावे.

  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांचीच निवड होईल.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय द्वारे उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही.
  • कोणत्याही उमेदवारा द्वारे कर्मचारी विमा संस्था रुग्णालय द्वारे घेण्यात येणाऱ्या भरती मध्ये अनुचित प्रकार करण्यात आला तर त्या उमेदवारावर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीची प्रक्रिया ही कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्याद्वारे ठरवली जाईल. उमेदवाराने त्याचे पालन करावे.
  • सदरील भरतीची पूर्ण प्रक्रिया ही कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय यांच्या संकेतस्थळावर ती दिलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय भरतीसाठी नियम व अटी खालील प्रमाणे.
  • सदरील भरतीतील पदेही कंत्राटी तत्त्वावर थेट मुलाखत द्वारे भरायचे आहेत.
  • सदरील भरती करिता उमेदवाराची निवड 11 म
  • हिन्याच्या कालावधीकरिता अटी व शर्ती मान्यतेवर होणार आहे.
  • 29 फेब्रुवारी 2024 या तारखेला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 57 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • शासन निर्णय 29-5-2020 नुसार कंत्राटी तत्त्वानुसार नियुक्ती झालेल्या वैद्यकीय अधिकारी (गट -अ) या पदाच्या उमेदवाराला दरमहा मानधन दिले जाईल.
  • सदरील पदाकरिता नियुक्त झालेला उमेदवार 11 महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर भरलेला आहे. पण त्या अगोदर त्या पदाकरिता कायमस्वरूपी चा उमेदवार मिळाला किंवा उमेदवाराचा 11 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तर सदरील उमेदवाराला पदावरून कमी करण्यात येईल.
  • सदरील भरतीतील उमेदवाराची निवड ही कंत्राटी पद्धतीवर होणार आहे त्यामुळे नियमित वैद्यकीय अधिकाऱ्या सारखे नियम व अटी कंत्राटी उमेदवाराला लागू होणार नाहीत. त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन, विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, वार्षिक वेतन वाढ यांसारख्या गोष्टी कंत्राटी उमेदवाराला लागू होणार नाहीत.
  • सदरील भरतीतील उमेदवारांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे भविष्यात कायमस्वरूपी कामावर घेण्याचा आग्रह उमेदवाराने करू नये.
  • भविष्यात जेव्हा सदरील पदाकरिता कायमस्वरूपी उमेदवार नेमायचा असेल आणि त्यावेळेस कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी जागा मिळाली तर त्याला कंत्राटी पद्धतीची नोकरी सोडावी लागेल.
  • तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपाच्या भरतीमध्ये नियुक्त केलेला उमेदवार त्याचा अनुभव ज्यावेळेस कायमस्वरूपी ची भरती निघेल त्या भरतीत ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील कंत्राटी भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवाराकडून कोणताही गैरप्रकार घडला. किंवा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्याच्या हातून घडला. किंवा कोणत्याही गैरप्रकाराला त्याच्याकडून प्रोत्साहन दिले गेले तर अशा उमेदवाराला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात येईल.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या कोणत्याही उमेदवाराला काम सोडायचे असेल तर एक महिना अगोदर कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय यांच्याकडे निवेदन द्यायला लागेल. असे केले नाही तर एक महिन्याचे मानधन भरावे लागेल आणि त्यानंतर आपण काम सोडू शकता.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने मुख्यालयाच्या ठिकाणी निवासी राहायचे आहे.
  • उमेदवाराने कामावरती रुजू व्हायच्या अगोदर वरील सर्व अटी मान्य असल्याचे ₹100 चा स्टॅम्प पेपर वरती लिहून द्यायचे.
  • भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने विहित नमुन्यात आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • “वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय महा- राकावी सोसायटी ( महाराष्ट्र शासन), C/o सतीश शिरभाते, माणिक हाइट्स, मोतीनगर, अमरावती – 400 606” या पत्त्यावरती उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 22 मार्च 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचवायचा आहे.
  • दिनांक 28 मार्च 2024 या दिवशी सदरील भरतीची मुलाखत सकाळी 11:00 वाजता आयोजित केली आहे. उमेदवाराने मुलाखतीसाठी “वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय महा- राकावी सोसायटी ( महाराष्ट्र शासन), C/o सतीश शिरभाते, माणिक हाइट्स, मोतीनगर, अमरावती – 400 606” या पत्त्यावरती हजर राहायचे आहे.
  • कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारा वरती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा.
  • गैरवर्तन करणारा अधिकारी त्याचप्रमाणे संपामध्ये समाविष्ट असणारे अधिकारी यांना सदरील पदाकरिता अर्ज करता येणार नाही.
ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथे अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी फॉर्म जाहिरात च्या शेवटच्या पानावर दिलेला आहे उमेदवाराने तो भरावा.
  • अर्जाच्या उजव्या बाजूला उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने पहिल्या क्रमांकावर ती स्वतःची पूर्ण नाव इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये लिहायचे आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावरती उमेदवाराने वडिलांचे नाव लिहायचे आहे. महिला उमेदवारास असल्यास पतीचे नाव लिहायचे आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर ती उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख दिवस महिने आणि वर्ष या स्वरूपात लिहायचे आहे.
  • चौथ्या का क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा धर्म लिहायचा आहे.
  • पाचव्या क्रमांकावरती उमेदवाराने स्वतःची जात आणि प्रवर्ग लिहायचा आहे.
  • सहाव्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि स्वतःचा चालू मोबाईल नंबर लिहायचा आहे.
  • सातव्या क्रमांकावरती उमेदवाराने सध्या वास्तवास असणारा स्वतःचा पत्ता लिहायचा आहे.
  • आठव्या क्रमांकावरती उमेदवाराने स्वतःचा कायमस्वरूपीचा पत्ता लिहायचा आहे.
  • त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नवव्या क्रमांकाला स्वतःचे लिंग निवडायचे आहे.
  • दहाव्या क्रमांकावर उमेदवाराने स्टेट मेडिकल कौन्सिल कडे रजिस्टर केलेल्या ची तारीख लिहायची आहे.
  • अकराव्या क्रमांकावर उमेदवाराला कोणत्या ठिकाणी काम करायचे आहे याबद्दल माहिती लिहायची आहे.
  • 12 व्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक पात्रता लिहायचे आहे. त्यामध्ये पदवी ज्या महाविद्यालयातून मिळवली त्या महाविद्यालयाचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे. विद्यापीठाचे नाव लिहायचे आहे. महाविद्यालयातील कालावधी ची दिनांक लिहायचे आहे. कोणत्या वर्षी पास झाला याबद्दलची माहिती लिहायची आहे. त्याचप्रमाणे मिळालेली टक्केवारी लिहायची आहे.
  • 13 व्या क्रमांकावर उमेदवाराने स्वतःचा अनुभव लिहायचा आहे. त्यामध्ये त्याने कोणत्या पदावर काम केले. कोणत्या संस्थेमध्ये काम केले. कामाचा कालावधी. या सर्वां बाबतचा तपशील द्यायचा आहे.
ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
  1. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा स्टेट मेडिकल कौन्सिल यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेल्याचे वैध प्रमाणपत्र.
  2. वयाच्या पुराव्या करिता दहावीचे सर्टिफिकेट आवश्यक.
  3. शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेल्या चा पुरावा एमबीबीएस प्रमाणपत्र किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र.
  4. अनुभव प्रमाणपत्र
  5. प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र
  6. जात पडताळणी प्रमाणपत्र
  7. आधार कार्ड आणि पॅन कार्डची प्रत.
  8. मार्कशीट
  9. करार पूर्ण झालेल्या चे सर्टिफिकेट.

वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती जमा करण्यापूर्वी सेल्फ अटेस्टेड कराव्यात. यानंतर उमेदवाराला आतापर्यंत अर्जामध्ये लिहिलेली संपूर्ण माहिती बरोबर लिहिलेली आहे असे घोषित करून सही करायची आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील भरतीची माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment