Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरती.

Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2024 ही बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विविध अधिकारी पदासाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी बँक ऑफ इंडियाच्या द्वारे जाहीर करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Bank of India Bharti 2024

 • बँक ऑफ इंडिया येथील भरती 143 पदांसाठी होणार आहे.
 • बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी रिक्त पदांची नावे खालील प्रमाणे आहेत.

Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

 1. क्रेडिट ऑफिसर (GBO)
 2. इकॉनॉमिस्ट
 3. इकॉनॉमिस्ट
 4. टेक्निकल ऍनालिस्ट
 5. लॉ ऑफिसर
 6. लॉ ऑफिसर
 7. चीप वेल्थ मॅनेजर
 8. डाटा सायंटिस्ट
 9. फुल स्टॅक डेव्हलपर
 10. डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर
 11. डाटा क्वालिटी डेव्हलपर
 12. डाटा गव्हर्नन्स एक्सपर्ट
 13. प्लॅटफॉर्म इंजीनियरिंग एक्सपर्ट
 14. लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर
 15. ओरॅकल डाटा ऍडमिनिस्ट्रेटर
 16. स्टॅटिस्टिएन
 17. सीनियर मॅनेजर – IT
 18. IT ( डाटा ॲनालिस्ट ) सीनियर मॅनेजर
 19. चीप मॅनेजर- IT ( डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर )
 20. चीफ मॅनेजर – IT ( क्लाऊड ऑपरेशन )
 21. चीफ मॅनेजर – IT ( नेटवर्क )
 22. चीफ मॅनेजर – IT ( सिस्टीम )
 23. चीफ मॅनेजर – IT ( इन्फ्रा )
 24. सीनियर मॅनेजर – IT ( डाटाबेस )
 25. सीनियर मॅनेजर – IT ( क्लाऊड ऑपरेशन )
 26. सीनियर मॅनेजर – IT ( नेटवर्क सेक्युरिटी / नेटवर्क ऑपरेशन )
 27. सीनियर मॅनेजर – IT ( विंडोज / सोलारीस )
 28. सीनियर मॅनेजर – IT ( इन्फ्रा )
 29. सीनियर मॅनेजर – IT ( डाटाबेस )
 30. सीनियर मॅनेजर – IT ( क्लाऊड ऑपरेशन )
 31. सीनियर मॅनेजर – IT ( नेटवर्क सेक्युरिटी / नेटवर्क ऑपरेशन )
 32. सीनियर मॅनेजर – IT ( विंडोज / सोलारीस )
 33. सीनियर मॅनेजर – IT ( इन्फ्रा )
 34. सीनियर मॅनेजर – IT ( एंड पॉइंट सिक्युरिटी मॅनेजर फोर टूल मॅनेजमेंट )
 35. सीनियर मॅनेजर – IT ( डाटा एनालिसिस )
 36. चीफ मॅनेजर – IT ( इन्फो सिक्युरिटी )
 37. सीनियर मॅनेजर – IT ( सिक्युरिटी एनालिसिस )
 38. सीनियर मॅनेजर – IT ( रिस्क अँड कंट्रोल )
 39. सीनियर मॅनेजर – IT ( फिनटेक )
 40. सीनियर मॅनेजर – IT ( डाटा एनालिसिस )
 • क्रेडिट ऑफिसर (GBO) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणासह पदवी मिळवलेली पाहिजे. त्यानंतर उमेदवाराने MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA  यापैकी कोणतीही एक पदवी मिळवलेली पाहिजे. ही पदवी मिळवताना उमेदवाराने बँकिंग किंवा बँकिंग आणि फायनान्स या शाखेतून मिळवलेली पाहिजे. किंवा उमेदवाराने सायन्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्स या शाखेमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
 • इकॉनॉमिस्ट या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. ज्या उमेदवारांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, जामिया मिलीया इस्लामिया युनिव्हर्सिटी, IGIDR यापैकी कोणत्याही संस्थेमधून पदवी मिळवलेली असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
 • टेक्निकल ऍनालिस्ट या पदासाठी भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे CMT पूर्ण पाहिजे.
 • लॉ ऑफिसर या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा लॉ चा कोर्स पूर्ण करून पदवी मिळवलेली पाहिजे.
 • चीप वेल्थ मॅनेजर या पदासाठी उमेदवाराने भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराने मार्केटिंग किंवा फायनान्स मधून एमबीए पदवी मिळवलेली पाहिजे.
 • डाटा सायंटिस्ट या पदासाठी उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या शाखेमधून 60% गुणासह बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा एमसीए / एमएससी ही पदवी कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून मिळवलेले पाहिजे.
 • फुल स्टॅक डेव्हलपर या पदासाठी उमेदवाराने 60% गुणासह बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स ( कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ) ही पदवी मिळवलेली पाहिजे किंवा कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेमधून एमसीए किंवा M.sc पदवी मिळवलेली पाहिजे.
 • डाटा क्वालिटी डेव्हलपर, डाटा गव्हर्नन्स एक्सपर्ट, प्लॅटफॉर्म इंजीनियरिंग एक्सपर्ट, लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर, ओरॅकल डाटा ऍडमिनिस्ट्रेटर, सीनियर मॅनेजर – IT,डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर या पदासाठी उमेदवाराने 60% गुणासह बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स ( कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ) ही पदवी मिळवलेली पाहिजे किंवा कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेमधून एमसीए किंवा M.sc पदवी मिळवलेली पाहिजे.
 • स्टॅटिस्टिएन या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ स्टॅटिस्टिक किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक या विषयांमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. या व्यतिरिक्त जे उमेदवार प्रीमियर स्टॅटिस्टिक युनिव्हर्सिटी मधून उत्तीर्ण झालेले आहेत आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
 • इतर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील भरती मध्ये रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • बँक ऑफ इंडिया येथील भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
 • सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रुपये परीक्षा शुल्क राहील. तर एससी, एसटी, अपंग या प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये परीक्षा शुल्क राहील.
 • पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याकरिता बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळाचा उपयोग करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • 10 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • बँक ऑफ इंडिया कडून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकरिता लिंक दिलेली आहे. त्याद्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायची कोणतीही पद्धत राबवण्यात आलेली नाही त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने कोणीही अर्ज करू नयेत.
 • बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना नवख्या उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जर माहिती भरताना काही चुकी झाली आणि उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला तर त्याला बँक ऑफ इंडिया जबाबदार राहणार नाही.
 • बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
 • बँक ऑफ इंडिया यांच्या संकेतस्थळावर सदरील भरती संदर्भात अधिक माहिती उपलब्ध आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.

Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

 • बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी जा उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरतीसाठी पात्र असतील.
 • बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरतीतील उमेदवारांनी भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर बँक ऑफ इंडिया द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्राची निवड बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे करण्यात येईल. या प्रक्रियेमध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.
 • बँक ऑफ इंडिया द्वारे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून दिलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
 • सदरील भरती [ Bank of India Bharti 2024 ] करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी एडमिट कार्ड वरती दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे. दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
 • उमेदवाराने परीक्षा केंद्रावर येताना एडमिट कार्ड, कॉल लेटर आणि आयडेंटी कार्ड सोबत घेऊन यायचे आहे. परीक्षा केंद्रावर जाताना उमेदवाराची ओळख पडताळणी केली जाईल.
 • पारदर्शक पाण्याची बाटली, साधा पेन, कॉल लेटर, एडमिट कार्ड, आयडेंटिटी कार्ड, जर उमेदवाराला लेखक पाहिजे असेल उत्तर लेखकाचा भरलेला फॉर्म या गोष्टी उमेदवार परीक्षेला घेऊन बसू शकतो.
 • परीक्षेसाठी उमेदवाराने आणलेले स्वतःचे वैयक्तिक साहित्य इतर कोणासोबतही शेअर करू नये.
 • उमेदवारांनी इतर उमेदवारांच्या मध्ये सामाजिक अंतर ठेवायचे आहे.
 • परीक्षा स्थळी सूचना दिल्यानंतर उमेदवारांनी एका लाईन मध्ये उभे राहायचे आहे.
 • परीक्षा केंद्रावर कोणत्याही गेटमधून आतमध्ये येत असताना उमेदवारांनी स्वतःचे मोबाईल फोन स्विच ऑफ करायचे आहेत आणि दिलेल्या ठिकाणी स्वतःचे मोबाईल फोन जमा करायचे आहेत.
 • उमेदवारांचे रजिस्ट्रेशन करताना उमेदवाराचा फोटो काढला जाईल, फोटो काढताना उमेदवार उभा असला पाहिजे, त्यानंतर उमेदवाराला रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल आणि सीट नंबर दिला जाईल.
 • उमेदवारांना कच्चे काम करण्यासाठी स्वतंत्र कागद पुरवला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी येताना कच्च्या कामासाठी कागद घेऊन यायचा नाही. कच्च्या कामासाठी कागद एकदाच पुरवला जाईल.
 • परीक्षा झाल्यानंतर परीक्षा केंद्र सोडताना उमेदवारांनी दिलेले कॉल लेटर परीक्षा केंद्रावर असलेल्या बॉक्समध्ये जमा करायचे आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी लेखकाचा उपयोग केलेला आहे. आशा उमेदवारांनी लेखकाचा फॉर्म परीक्षा केंद्र सोडताना जमा करायचा आहे.
 • परीक्षा संपल्यानंतर उमेदवाराने शिस्तीने परीक्षा केंद्राबाहेर पडायचे आहे. परीक्षा केंद्राबाहेर पडताना उमेदवारांनी गर्दी आणि गोंधळ करायचा नाही. कर्मचाऱ्या द्वारे दिलेल्या सूचना उमेदवारांनी पाळायचे आहेत.
 • स्कॅन केलेले फोटो, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हाताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र त्याचा फोटो या सर्वांच्या फाईल दिलेल्या सूचनेनुसार अर्ज भरण्याकरिता लागणार आहेत.
 • उमेदवाराने परीक्षा साठी येताना वैध आयडेंटिटी कार्ड म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घेऊन यायचे आहे.

[ Bank of India Bharti 2024 ] संपूर्ण भारत देशातील सरकारी बँक मधील नोकरीसाठी उमेदवारांनी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment