MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती.

MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 15 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक ( सुरक्षा ), सहाय्यक महाव्यवस्थापक ( आरएस ), सहाय्यक व्यवस्थापक ( पीआर ), सहाय्यक व्यवस्थापक ( अग्निशामक ), उपअभियंता ( सुरक्षा ), कनिष्ठ अभियंता – II (E&M), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता – II ( सिविल ), सीनियर असिस्टंट ( एचआर ) या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जे उमेदवार सदरील भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी खालील माहिती वाचावी.

MMRCL Bharti 2024

  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 09 जागांसाठी भरती होणार आहे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मध्ये रिक्त असणारी पदे खालील प्रमाणे.

MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  1. सहाय्यक महाव्यवस्थापक ( सुरक्षा ) – एक जागा.
  2. सहाय्यक महाव्यवस्थापक ( आरएस ) – एक जागा.
  3. सहाय्यक व्यवस्थापक ( पीआर )  – एक जागा.
  4. सहाय्यक व्यवस्थापक ( अग्निशामक ) – एक जागा.
  5. उपअभियंता ( सुरक्षा ) – एक जागा.
  6. कनिष्ठ अभियंता – II (E&M) – एक जागा.
  7. अग्निशमन निरीक्षक – एक जागा.
  8. कनिष्ठ अभियंता – II ( सिविल ) – एक जागा.
  9. सीनियर असिस्टंट ( एचआर ) – एक जागा.
  • सहाय्यक महाव्यवस्थापक ( सुरक्षा ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल शाखेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी मिळवलेली असावी. त्याचप्रमाणे उमेदवाराने सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट किंवा प्रादेशिक कामगार संस्था यांच्याकडून सुरक्षते मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
  • सहाय्यक महाव्यवस्थापक ( आरएस ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ किंवा संस्थेमधून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमधून अभियांत्रिकी पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. ही पदवी पूर्णवेळ अभ्यासक्रमातून मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक व्यवस्थापक ( पीआर ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून मास मीडिया किंवा जर्नालिझम किंवा मास कमुनिकेशन या शाखेमधून पदवी मिळवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सदरील पदवीच्या समकक्ष इतर कोणती पदवी मिळवलेली असेल तरीसुद्धा चालेल.
  • सहाय्यक व्यवस्थापक ( अग्निशामक ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी ( पीसीएम ) ही पदवी तीन वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रमातून मिळवलेली पाहिजे. किंवा उमेदवाराने नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय येथून एक वर्षाचा डिप्लोमा केलेला पाहिजे. किंवा उमेदवाराने सरकारी मान्यताप्राप्त असणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील चार वर्षाची पूर्णवेळ पदवी मिळवलेली पाहिजे.
  • उपअभियंता ( सुरक्षा ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल मध्ये पूर्णवेळ चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूटच्या किंवा प्रादेशिक कामगार संस्था येथून सुरक्षा ते मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
  • कनिष्ठ अभियंता – II (E&M) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ किंवा संस्थेमधून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेमधून अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा पूर्णवेळ अभ्यासक्रमातून पूर्ण केलेला पाहिजे.
  • अग्निशमन निरीक्षक या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून तीन वर्षाची बीएससी पदवी मिळवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराने एक वर्षाचा अग्निसुरक्षा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे.
  • कनिष्ठ अभियंता – II ( सिविल ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठांमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून स्थापत्य अभियंता या शाखेमधून अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला पाहिजे.
  • सीनियर असिस्टंट ( एचआर ) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून PMIR / IRPM / LSW / MSW / HRM या शाखांमधून दोन वर्षे पूर्णवेळ मिळवलेली पदवी आणि इतर कोणत्याही शाखेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून मिळवलेली पदवी आवश्यक आहे.
  • सहाय्यक महाव्यवस्थापक ( सुरक्षा ), सहाय्यक महाव्यवस्थापक ( आरएस ) या दोन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • पहिल्या दोन पदा व्यतिरिक्त इतर सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मध्ये निवड होणाऱ्या नऊ उमेदवारांना दरमहा 34,020 रुपये ते 2,00,000 रुपये एवढा पगार देण्यात येईल.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क असणार नाही.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता संस्थेच्या संकेतस्थळाचा उपयोग करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याद्वारे अर्ज करण्याकरिता लिंक दिलेली आहे. त्या लिंकद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, पिनकोड, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि इतर वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक लिहायचे आहे. जर ही माहिती देताना यामध्ये काही चूक झाली आणि उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला तर याला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे 15 एप्रिल 2024 ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांची निवड करण्यात येईल. सदरील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीचे परीक्षा केंद्र आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे ठरवण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संकेतस्थळावर सदरील भरतीचा अभ्यासक्रम आणि अधिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे उमेदवाराने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती द्वारे निवड करण्यात आलेली सर्व पदे पाच वर्षाच्या करारा करिता भरण्यात येणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी [ MMRCL Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मार्च 2024 पासून मोजण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 16 मार्च 2024 पासून सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरू होईल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा पूर्णपणे हक्क मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडे आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत, उमेदवाराची पात्रता आणि उमेदवाराचा अनुभव यानुसार उमेदवाराची पदावर निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी सामोरे जावे लागणार आहे.
  • सदरील भरती मध्ये एससी, एसटी, ओबीसी, अपंग, माझी कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण देण्यात आलेले आहे. या आरक्षणासाठी उमेदवाराकडे जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, अपंगत्वाचा दाखला यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • एससी आणि एसटीच्या उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट राहील. ओबीसी उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षाची सूट राहील. अपंग उमेदवारांमध्ये एससी / एसटीच्या उमेदवारा करिता 10 वर्षे वयामध्ये सूट राहील. तर ओबीसी उमेदवारा करिता आठ वर्षे वयामध्ये सूट राहील. ओपन कॅटेगरी चा उमेदवारांकरिता तीन वर्षे वयामध्ये सूट राहील. माजी कर्मचारी यांच्याकरिता पाच वर्षे वयामध्ये सूट राहील.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या www.mmrcl.com या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर उमेदवारांनी Careers हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर MMRCL Recruitment Advertisement 2024-01. या पर्यायावरती अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी क्लिक करायचे आहे. याच्या व्यतिरिक्त अर्ज करण्याची कोणतीही पद्धत मान्य करण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचे आहे कारण भरतीच्या प्रक्रिये दरम्यान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून उमेदवाराला मोबाईल नंबर वरती आणि ईमेल आयडी वर महत्त्वाच्या अपडेट्स देण्यात येतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अपडेटेड रिजूम चे फोटो कॉपी, पासपोर्ट साईज फोटो ची स्कॅन कॉपी, शुल्क जमा केलेल्या पेमेंट स्लिप ची कॉपी या सर्व कॉपीज पीडीएफ मध्ये तयार करून अपलोड केलेल्या पाहिजेत.
  • अर्ज करणारे जे उमेदवार शासकीय कर्मचारी आहेत आशा उमेदवारांनी रिझ्युम, पासपोर्ट साईज फोटो, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ना हरकत दाखला, स्वयं स्वाक्षरी केलेली कागदपत्रे, कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र, सदर शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचा दंड लावला नाही असे प्रमाणपत्र. इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

[ MMRCL Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इतर भरती संदर्भात माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment