[ BEL Bharti 2024 ] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे 517 जागा रिक्त.

BEL Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड येथे निघालेल्या भरती बद्दल माहिती घेणार आहोत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमार्फत 517 जागा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्व जागा एका पदासाठी रिक्त आहेत. आणि त्या पदाचे नाव प्रशिक्षणार्थी अभियंता असे आहे. 13 मार्च 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याकरता ऑनलाइन लिंक दिली आहे. त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने सांगितली आहे. ती पात्रता खालीलप्रमाणे.

BEL Bharti 2024

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेची भरती 517 जागांसाठी होणार आहे.
  • प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेने भरती सुरू केली आहे.

BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयाची आणि शिक्षणाची अट खालील प्रमाणे

  • प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी 55% गुणासह बी.ई / बी.टेक / एम.ई / एम.टेक यापैकी कोणतीही एक पदवी आवश्यक आहे. या पदवी बरोबरच पदवीची शाखा ही पुढीलपैकी कोणती एक असावी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, दूरसंचार, संप्रेषण, यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, संगणक, माहिती विज्ञान, माहिती तंत्रज्ञान . त्याचप्रमाणे SC,ST आणि PwBD या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी उत्तीर्ण श्रेणी आवश्यक आहे.
  • या भरती साठी दिलेली वयाची अट ही 28 ते 30 वर्षापर्यंत आहे. उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 28 ते 30 पर्यंत असणे गरजेचे आहे. SC/ST कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी पाच वर्षे वयाची सूट दिलेली आहे. OBC कॅटेगिरी च्या उमेदवारांसाठी तीन वर्षे वयाची सूट दिलेली आहे.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपये ते 40 हजार रुपये प्रतिमहा असे वेतन दिले जाईल.
  • या भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असेल.
  • या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमार्फत 150 रुपये + 18% जीएसटी इतके आहे. तर SC,ST, PWD या कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क नाही.
  • जे उमेदवार या भरती करिता इच्छुक आहेत. त्यांनी अर्ज करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेच्या वेबसाईट वरती भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 13 मार्च 2024 ही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी अर्ज करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेने लिंक दिली आहे. अर्ज करण्यासाठी लिंक वरती क्लिक करा.

BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मधील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • या भरती करता अर्ज करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेने ऑनलाइन पर्याय दिलेला आहे.
  • भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या संस्थेने ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा दिलेली नाही.
  • शिक्षणाची पदासाठीच्या भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती नाव, पत्ता, जन्मतारीख, पिनकोड व्यवस्थित आणि बरोबर भरावी. माहिती चुकल्यास भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही संस्था जबाबदार राहणार नाही.
  • 13 मार्च 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमार्फत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात पहावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • अंतिम तारखेच्या आत मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या परीक्षेसाठी पात्र असतील.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमार्फत अर्ज केलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.
  • परीक्षा केंद्र आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या वतीने परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • परीक्षा केंद्राचे ठिकाण हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही संस्था ठरवेल. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना संस्थेने दिलेले हॉल तिकीट असणे गरजेचे आहे.
  • प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी लागणारा अभ्यासक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे उमेदवारांनी तो पहावा.
BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पहा.
  • यासाठी सुरुवातीला भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या संस्थेने दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक असे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले हेडलाईन असणारे पेज ओपन होईल.
  • टोटल 21 टप्प्यांमध्ये आपल्याला या पेज वरील माहिती भरायची आहे.
  • सुरुवातीला तुम्हाला तुमचा ईमेल आयडी भरायचा आहे. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅनर द्वारे स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • यानंतर उमेदवारांनी आपले नाव 10वीच्या बोर्डाच्या मार्कशीट वरती जे आहे ते लिहायचे आहे. याच्यानंतर वडिलांचे नाव आणि जन्मतारीख भरायची आहे. उमेदवाराचे दहावीचे मार्कशीट स्कॅन करून जन्मतारखेच्या पुराव्यासाठी अपलोड करायचे आहे.
  • 1 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचे वय किती आहे हे त्या ठिकाणी भरायचे आहे. यानंतर लिंग आणि वैवाहिक स्टेटस काय आहे ते भरायचे आहे. हे झाल्यानंतर आपला धर्म कोणता ते भरायचे आहे.
  • उमेदवाराची कॅटेगरी कोणती आहे हे भरायचे आणि उमेदवार जर अपंग असेल तर त्या संदर्भात माहिती भरायची आहे. त्यामध्ये उमेदवार किती टक्के अपंग आहे याची माहिती द्यायची आहे.
  • उमेदवारांनी आपला कायमचा पत्ता, कायमचा जिल्हा आणि राज्य याच्या संदर्भातील माहिती भरायची आहे. जर उमेदवार सध्या याच्या व्यतिरिक्त कोठे राहत असेल तर तो पत्ता सुद्धा भरायचा आहे.
  • उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर अर्जामध्ये भरायचा आहे. त्याचप्रमाणे एखादा आणखीन मोबाईल नंबर सुद्धा भरायचा आहे. याच्यानंतर स्वतःचा मेल आयडी अर्जामध्ये भरायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी कोणती घेतली आहे यासंदर्भात माहिती द्यायची आहे. उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी कोणत्या शाखेमधून घेतली आहे यासंदर्भात माहिती द्यायची आहे. अभियांत्रिकी मध्ये उमेदवाराला किती टक्के गुण मिळाले हे अर्जामध्ये लिहायचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराचे पासिंग सर्टिफिकेट करून अपलोड करायचे आहे. उमेदवारांनी आपली अभियांत्रिकी पदवी कोणत्या वर्षी मिळवली याबद्दल माहिती लिहायची आहे.
  • अभियांत्रिकी पास झाल्यानंतर उमेदवाराने कोणत्या संस्थेमध्ये काम केले आणि कोणत्या पदावर काम केले त्याने किती वर्षे अनुभव घेतला आहे यासंदर्भातील माहिती भरायची आहे.
  • उमेदवाराने ज्या ठिकाणी अनुभव घेतला आहे अशा ठिकाणचा एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार सध्या त्या ठिकाणी काम करत आहे. याबद्दल माहिती लिहायची आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काम करत असताना भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याचा न हरकत प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावे.
  • उमेदवाराने परीक्षा फी भरण्यासाठी SBI बँकेमधून फी भरलेली रिसिप्ट घ्यावी आणि ती स्कॅन करून अपलोड करावी. हा एक फी भरलेला पुरावा म्हणून वापरण्यात येईल.
  • अर्ज करणारा उमेदवार हा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणारा असेल तर त्याने आपला एम्प्लॉयमेंट नंबर अर्जामध्ये भरावा.
  • शेवटच्या टप्प्यात दिलेल्या नियम व अटी मान्य करून उमेदवाराने अर्ज सबमिट करावा.
BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेबद्दल माहिती खालील प्रमाणे

 

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. ज्यामध्ये लष्कर आणि हवाई दल यामधील इलेक्ट्रॉनिक सेवा दिली जाते. हवाई दलासाठी आणि लष्करासाठी चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड द्वारे घेतले जाते. ही संस्था संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखेखाली चालते. याच कंपनीला बेल असेही म्हणतात. ही एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी आहे. या संस्थेची स्थापना 1954 रोजी झालेली आहे. या कंपनीला आज 70 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय हे बंगलोर येथे स्थित आहे. संपूर्ण जगामध्ये सेवा देण्यासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.

भानुप्रकाश श्रीवास्तव हे या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. दरवर्षी या संस्थेमार्फत 17400 कोटी इतका महसूल गोळा केला जातो. त्यातील 2986 कोटी निव्वळ नफा कंपनीला राहतो. कंपनीकडे स्वतःची मालमत्ता 35000 कोटी इतकी आहे. जवळपास 10000 कर्मचारी या कंपनीमध्ये काम करत आहेत.

संस्थेचे मुख्य कार्यालय हे बेंगलोर येथे आहे तर रिजनल ऑफिस नवी दिल्ली, मुंबई, कलकत्ता, विजाग या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स हे बेंगलोर, चेन्नई, पंचकुला, गाजियाबाद, पुणे, हैदराबाद, नवी मुंबई आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. संस्थेची परदेशातील कार्यालय न्यूयॉर्क, सिंगापूर, वियतनाम, म्यानमार, ओमान, श्रीलंका या ठिकाणी आहेत.

BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेमधील शेअर्स खालील प्रमाणे

कंपनीच्या भाग भांडवलामध्ये भांडवलदार आहेत. यापैकी 51.14% शेअर्स हे भारत सरकारकडे आहेत. तर 24.43% इतके शेअर्स म्युच्युअल फंड्स मध्ये आहेत. 15.73% इतके शेअर्स परदेशी गुंतवणूकदारा कडे आहेत. 7.5% शेअर्स हे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडे आहेत. 4% शेअर्स हे बँक ऑफ बडोदा कडे आहेत.

कंपनी द्वारे बनवण्यात येणाऱ्या उत्पादनापैकी प्रमुख उत्पादने म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, वोटर व्हेरिफाईड पेपर, ट्राफिक सिग्नल, रडार, टेलिफोन आणि वॉकी टॉकी, सेमीकंडक्टर, मिसाईल, सोनार किरणे, अग्निशामक यंत्रणा, दारू गोळे बनवण्यात मध्ये भागीदारी, इलेक्ट्रॉनिक टॅंक, सोलार पॉवर जनरेशन सिस्टीम इत्यादी उत्पादने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड संस्थेमार्फत घेतली जातात.

भारत सरकार मधील त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील भरती, मेगा भरती संदर्भातील अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. – क्लिक करा

Leave a Comment