[ Benefits of Exercise ] व्यायाम करण्याचे 13 फायदे .

[ Benefits of Exercise ] दररोज व्यायाम केल्यामुळे आरोग्य चांगले राहते. दररोज व्यायाम केल्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. जर कोणत्याही व्यक्तीला मानसिक तणाव किंवा मेंदूशी संबंधित काही त्रास असेल तर दररोज व्यायाम केल्याने तो त्रास किंवा मानसिक तणाव हळूहळू कमी व्हायला लागतो. व्यायाम केल्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि त्यामुळे त्यांची कार्य व्यवस्थित चालतात. या कारणामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला आजार होण्याची शक्यता कमी असते.

व्यायाम करत असताना हाडाची आणि मांस पेशींची हालचाल होत असते यामुळे हाडांचे आरोग्य चांगली राहते तसेच मांस पेशीं मजबूत बनतात. सर्वसामान्य व्यक्तीला दैनंदिन काम करताना कंटाळा येत असतो त्याचप्रमाणे शारीरिक अडचणींमुळे दैनंदिन कामे व्यवस्थित होत नाहीत. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला दैनंदिन कामे करताना कंटाळा येत नाही किंवा कोणतेही शारीरिक अडचण येत नाही त्यामुळे अशा व्यक्तीची दैनंदिन कामे सुरळीत चालतात.

Benefits of Exercise

[ Benefits of Exercise ]  दैनंदिन जीवनामध्ये कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य सुरळीतपणे काम करत असल्याचे आपण पाहतच आहोत. तर याविरुद्ध ज्या व्यक्तीचे काम दिवसभर एका जागेवर बसून आहे अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होत असतात. कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तींचे वजन नियंत्रणात असते तर याउलट एकाच जागेवर बसून काम करणाऱ्या व्यक्तीचे वजन वाढलेले असते.

कोणत्याही वयाच्या व्यक्तीला जर त्याच्या आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर व्यायाम करून ती व्यक्ती स्वतःचे आरोग्य सुधारू शकते. यामध्ये वजन कमी होणे, आहार नियंत्रणात राहणे, तणाव आणि नैराश्य कमी होणे, त्वचेचे आरोग्य सुधारणे, हाडे मजबूत होता, मांस पेशी बळकट होतात यांसारखे फायदे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला पोहोचत असतात.

[ Benefits of Exercise ] व्यायामाचे फायदे खालील प्रमाणे

  1. तणाव आणि नैराश्य कमी होते –   व्यायाम केल्यामुळे शरीराची हालचाल जास्त होत असते. यामुळे शरीरामध्ये इंडोरफिन्स नावाचे हार्मोनियम वाढत असते. या हार्मोन्स मुळे शरीरामध्ये आनंद निर्माण व्हायला मदत होत असते. त्याचप्रमाणे शरीरात तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असते. यामुळे शरीरातील मानसिक तणाव आणि नैराश्य कमी होऊन व्यक्ती आनंदी राहायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे व्यायाम केल्यामुळे मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर चे काम चांगले चालते यामुळे मेंदू कार्यक्षम बनतो. आणि मानसिक आजार व्हायचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर लक्षात न राहणे, अल्झायमर यांसारख्या आजारांचा धोका टळतो.
  2. वजन कमी जास्त करण्यास मदत होते – कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहायचे असेल तर त्याचे वजन प्रमाणात असावे लागते. म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त वजन नसावे किंवा प्रमाणापेक्षा कमी वजन सुद्धा नसावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायामाची खूप जास्त गरज असते. वजन कमी करण्यासाठी असणाऱ्या व्यायामाबरोबर योग्य आहार घेतल्यानंतर वजन कमी होते. त्याचबरोबर कमी झालेले वजन वाढवण्यासाठी सुद्धा वजन वाढवण्याचे व्यायाम केल्यामुळे आणि आहार व्यवस्थित घेतल्यावर वजन वाढते. प्रत्येक व्यक्तीचे महिलांचे आणि पुरुषांचे योग्य वजन किती असावे हे प्रत्येकाने BMI उपयोग करून शोधावे. आणि तेवढे वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  3. हृदयरोगाचा धोका कमी होतो – दररोज व्यायाम केल्यामुळे हृदयाचा व्यायाम सुद्धा होतो त्यामुळे हृदय निरोगी राहते. त्याचबरोबर दररोज व्यायाम केल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो आणि हृदयाला रक्त पोहोचते त्यामुळे हृदयाचे आरोग्य व्यवस्थित राहते. रक्तामध्ये असलेल्या चरबीच्या प्रमाणाला कोलेस्ट्रॉल असे म्हणतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या द्वारे वाहणारा रक्तपुरवठा बंद होतो किंवा कमी होतो यामुळे हार्ट अटॅक येण्याची संभावना जास्त असते. नियमित व्यायाम केल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्तपुरवठा सुरळीत चालतो. यामुळे हार्ट अटॅक चे प्रमाण कमी होते. ज्या व्यक्तींचे ब्लडप्रेशर कमी-जास्त होत असते अशा व्यक्तींनी व्यायाम केल्यानंतर त्यांचे ब्लडप्रेशर व्यवस्थित होऊ शकते. यामुळे हृदय सुरळीत काम करते. आणि हृदय विकाराचे धोके कमी होतात.
  4. मधुमेहाचा धोका कमी होतो –  [ Benefits of Exercise ]  रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह होत असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे बरेच घटक आहेत जसे की लठ्ठ असणे, व्यायाम न करणे, अनुवंशिक यांसारखे बरेच घटक असतात यामुळे मधुमेह व्यक्तीला होत असतो. मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन तयार न होणे. त्यामुळेच ज्या व्यक्तीची साखर वाढलेली आहे अशा व्यक्तींना इंजेक्शनद्वारे इन्सुलिन दिले जाते. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे वजन नियंत्रणात असते त्याचप्रमाणे त्याचे सर्व हार्मोन्स व्यवस्थित काम करत असतात. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे सर्व ग्रंथी व्यवस्थित काम करत असल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन प्रमाणात तयार होत असते यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.
  5. संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो – [ Benefits of Exercise सर्दी खोकल्यापासून कोरोना किंवा स्वाइन फ्लूसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारांपासून बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनलेली असते. यामुळेच कोरोना काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आलेला होता. त्वचेच्या संसर्गजन्य आजारांपैकी खरुज आणि इतर इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी सुद्धा त्वचेची रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते. जर त्वचेची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल आपण या आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकतो.
  6. कर्करोगापासून बचाव – कर्करोगापासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये कर्करोग तयार करणाऱ्या फ्री रॅडिकल्स ला निष्क्रिय करणे गरजेचे असते. व्यायाम करणाऱ्या व्यक्ती मध्ये फ्री रॅडिकल्स जास्त तयार होत नाहीत. किंवा झाले तरीसुद्धा त्यांच्याद्वारे शरीराला नुकसान जास्त होत नाही. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्तनाचा कर्करोग, मोठ्या आतड्याचा कर्करोग, किडनीचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, लिव्हरचा कर्करोग यांसारखे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
  7. हाडे आणि मांस पेशी बळकट बनतात – [ Benefits of Exercise ]व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील हाडे मजबूत बनतात त्याचप्रमाणे माऊस पैसे सुद्धा बळकट बनत असतात. व्यायाम करत असताना हाडांची हालचाल सतत होत असते. त्याचप्रमाणे हाडांना लागलेली झीज या हालचालीमुळे कमी व्हायला सुरुवात होते. रक्तातील हाडासाठी आवश्यक घटक हाडांना पोहोचतात. त्यामुळे हाडे बळकट बनतात. तसेच व्यायाम करत असताना मांसपेशी वरती तणाव येत असतो. यामुळे मांसपेशी आकुंचन प्रसरण पावत असतात. या कारणामुळे मांसपेशी ची साईज वाढते आणि त्यांना बळकटी मिळते.
  8. दैनंदिन कामात मदत होते – [ Benefits of Exercise ]  व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील सर्व अवयवांची हालचाल होत असल्यामुळे शरीर लवचिक बनते. दररोज व्यायाम केल्यामुळे शरीराचा स्टॅमिना व्यवस्थित तयार होतो. यानंतर शरीर बळकट होते. जे व्यक्ती व्यायाम करत नाहीत अशा व्यक्तींना दैनंदिन आयुष्यात काम करत असताना शरीराची हालचाल पटापट होत नाही किंवा काम करत असताना शारीरिक आणि मानसिक अडचणी येतात. याउलट व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात दैनंदिन काम करत असताना त्याला सर्व कामे पटापट उरकतात आणि यशस्वी रित्या पूर्ण पडतात. काम करण्याचा कंटाळा अशा व्यक्तीमध्ये आढळत नाही.
  9. आयुष्यमान वाढते – निरोगी व्यक्तीचे आयुष्यमान रोगी व्यक्तीपेक्षा जास्त असते त्याचप्रमाणे त्याचे आयुष्य सुंदर व चांगले असते. त्यामुळे आयुष्यमान वाढवायचे असेल तर निरोगी असणे खूप गरजेचे असते. व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये रोग होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर कोणताही आजार झाला तरी तो लगेच बरा होतो. याउलट व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीला आजार होण्याची संभावना जास्त असते. त्यामुळे अशा व्यक्तीचे आयुष्यमान आजार झाल्यानंतर कमी होते. जर तुम्हाला निरोगी आणि जास्त काळ जगायचे असेल तर व्यायाम करणे गरजेचे आहे.
  10. जुनाट आजारांमध्ये फायदा – [ Benefits of Exercise ]बऱ्याच व्यक्तींना जुनाट आजार असतात. ज्या आजारांवर ती उपचार घेऊन सुद्धा ते आजार बरे होत नाहीत. अशा आजारांवर ती मात करण्यासाठी किंवा त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामाचा खूप फायदा होतो. ज्या व्यक्तींमध्ये वर्षानुवर्षे नैराश्य आहे अशा व्यक्तींमध्ये बऱ्याच औषधे घेऊन सुद्धा काही फायदा होत नाही. अशा व्यक्तींना व्यायाम केल्यानंतर तणाव कमी झालेल्या चा आणि नैराश्य कमी झालेले अनुभूती येते. त्याचप्रमाणे संधिवात असणाऱ्या व्यक्तींमध्ये ठराविक स्नायूंची हालचाल व्यवस्थित होत नाही अशा वेळेस सातत्याने व्यायाम केल्यानंतर अशा रुग्णांना फायदा पोचतो.
  11. अन्नपचनास मदत करते – ज्या व्यक्तींचे मेटाबोलिजम फास्ट असते अशा व्यक्तींची पचन होण्याची शक्ती सुद्धा चांगली असते. पण ज्या व्यक्तींचे मेटाबोलिजम स्लो असते अशा व्यक्तींची पचनशक्ती एवढी चांगली नसते. जर पचनशक्ती वाढवायची असेल तर व्यायाम करणे गरजेचे आहे. योगासनामुळे आणि प्राणायामामुळे व्यक्तीची मोठ्या प्रमाणात पचनशक्ती वाढते आणि पचन क्रिया चांगली होते. खाल्लेले अन्न पचायला लागते. मेटाबोलिजम फास्ट होते आणि शरीरावरती कोणत्याही प्रकारची चरबी साठत नाही. परिणामी शरीर लठ्ठ होत नाही.
  12. शरीरातील ऊर्जा वाढते –  व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी खाल्लेल्या कॅलरीज बर्न होणे खूप गरजेचे असते. यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होत असते. जर जास्त कॅलरीज खाल्ल्या आणि व्यायाम केला नाही तर त्या कॅलरीज चे रूपांतर फॅट मध्ये होते आणि चरबी च्या स्वरूपात फॅट शरीरावरती साठते. दररोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील कॅलरीज नेहमीपेक्षा जास्त बर्न होत असतात त्यामुळे अशी व्यक्ती नेहमीपेक्षा जास्त ऊर्जावान असते.
  13. त्वचेचे आरोग्य सुधारते –  शरीरामधील ऑक्सीडेंट स्ट्रेस मुळे त्वचेला हानी पोहोचत असते. शरीरातील एंटीऑक्सीडेंट फ्री रॅडिकल मुळे होणाऱ्या हानीला कमी करत नसतील तर शरीरामध्ये ऑक्सीडेंट स्ट्रेस निर्माण होतो. फ्री रॅडिकल मुळे निर्माण होणारा ऑक्सीडेंट स्ट्रेस व्यायाम केल्यामुळे कमी होतो आणि त्वचेच्या सेल्सला होणारी हानी कमी होते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
[ Benefits of Multivitamin ] मल्टीविटामिन कॅप्सूल चे 10 फायदे

Leave a Comment