[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस म्हणजे काय ? लक्षणे काय ?

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस हा पचनसंस्थे संबंधित आजार आहे. या आजारामध्ये पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, जुलाब, पोटामध्ये गॅस तयार होणे, अपचन यांसारखी लक्षणे दिसतात. जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हा आजार उद्भवत असतो. या आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही योग्य औषधे आणि आहार घेऊन करू शकता. लाइफस्टाइल मध्ये सकारात्मक बदल केल्यामुळे सुद्धा आजाराची लक्षणे कमी होतात.

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस आणि त्याचे प्रकार खालील प्रमाणे.

[ Irritable Bowel Syndrome ] मानवी शरीराच्या पचनसंस्थेवर ठराविक लक्षणा द्वारे प्रभावित करणाऱ्या आजाराला आयबीएस असे म्हणतात. या आजाराचा परिणाम पचनसंस्थेतील आतड्यांवर प्रामुख्याने होत असतो. ज्या व्यक्तींना आयबीएस झालेला आहे. अशा व्यक्तींमध्ये पोटात दुखणे, सतत जुलाब होणे, बद्धकोष्ठता होणे, किंवा दोन्हीही होणे यांसारखी लक्षणे दिसतात. परंतु या आजारामुळे पचनसंस्थेतील कोणत्याही आतड्याला इजा होत नाही. किंवा या आजारामुळे कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत नाही.

हा आजार जुनाट आणि जास्त काळ चालणारा असल्यामुळे बरेच लोक या आजाराशी दोन हात करताना आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करतात किंवा चांगल्या प्रकारचे मेडिसिन आणि सप्लीमेंट चा उपयोग करतात.

आयबीएस च्या लक्षणांनुसार आयबीएस चे एकूण तीन प्रकार पडतात. ते तीन प्रकार खालील प्रमाणे आहेत.

 1. आयबीएस डायरिया – या प्रकारामध्ये रुग्णाला सतत जुलाब होण्याची समस्या होत असते. यामुळे या प्रकाराला आयबीएस डायरिया असे म्हटले आहे.
 2. आयबीएस कॉन्स्टिपेशन – या प्रकारच्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता जाणवत असते. यामुळेच या प्रकाराचे नाव आयबीएस कॉन्स्टिपेशन असे ठेवण्यात आलेला आहे.
 3. आयबीएस विथ मिक्स बोवेल हॅबिट – या प्रकारच्या आजारामध्ये रुग्णांना जुलाब आणि बद्धकोष्ठता असे दोन्ही लक्षणे दिसतात.

अमेरिकेमधील एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15 टक्के लोकांना आयबीएस ची समस्या आहे. पचनसंस्थेतील आजारांपैकी सामान्य आजारांपैकी हा एक महत्त्वाचा आजार आहे. आजाराची लागण झालेल्या लोकांपैकी फक्त पाच ते सात टक्के या आजाराचा योग्य उपचार घेत असतात.

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस ची लक्षणे खालील प्रमाणे

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस ची लक्षणे ही प्रत्येक आयपीएसच्या प्रकारामध्ये वेगवेगळी आहेत. ही लक्षणे रुग्णांमध्ये कायम दिसत नाहीत. ठराविक प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर किंवा तणावामुळे लक्षणे तीव्र व्हायला सुरुवात होतात. इतर वेळी रुग्णांची लक्षणे नाहीशी असतात.

 1. पोटामध्ये दुखणे – सर्व प्रकारच्या आयबीएस च्या रुग्णांमध्ये पोटामध्ये दुखण्याचे लक्षण कायम असते. बऱ्याच वेळेला पोटामध्ये जास्त दुखल्या नंतर रुग्णाला शौचाला जावे लागते. त्यानंतरच पोटातील दुखणे थांबते.
 2. पोटामध्ये गॅस निर्माण होणे – आयबीएस च्या रुग्णांमध्ये पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे काही रुग्णांमध्ये पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची समस्या दिसून येते. तर काही रुग्णांमध्ये गॅस निर्माण होण्याची समस्या दिसत नाही.
 3. जुलाब होणे – आयबीएस डायरिया या प्रकारच्या रुग्णांमध्ये जुलाब होण्याचे लक्षण जास्त सामान्य असते. दिवसातून सुरुवातीच्या काळात कमीत कमी चार ते पाच वेळा जुलाब होत असतात.
 4. बद्धकोष्ठता – आयबीएस कॉन्स्टिपेशन या प्रकारच्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता आढळते. यामुळे व्यक्तीच्या मूड वरती सुद्धा बराच परिणाम होतो.
 5. वजन कमी होणे – आयबीएस आजारामध्ये रुग्णाला सतत पचना संदर्भात तक्रारी होत असतात त्याचप्रमाणे सतत जुलाब सुद्धा होत असतात यामुळे रुग्णाचे वजन कमी होत असते. काही रुग्णांच्या वर्षामध्ये 10kg कमी झालेले पाहायला मिळाले आहे. तर काही रुग्णांच्या मध्ये एका महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालेले पाहायला मिळालेले आहे.
 6. ताप येणे – आयबीएस च्या रुग्णांमध्ये ताप येण्याचे प्रमाण सामान्य आहे. परंतु या रुग्णांना येणारा ताप जास्त तीव्र नसतो. नॉर्मल ताप या रुग्णांना येत असतो. रुग्णाचे शरीर सतत गरम राहत असते.
 7. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे – आयबीएस च्या रुग्णांचे पोटाचे आरोग्य सतत बिघडत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत चाललेली असते. यामुळे त्यांना सतत व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते.
 8. विटामिन ची कमतरता निर्माण होणे – आयबीएस च्या पेशंट मध्ये पोट बिघडण्याची समस्या जास्त असते त्यामुळे खाल्लेले अन्न विघटन होऊन त्यातील घटक शरीराला लागत नाहीत. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन आणि मिनरल ची कमतरता भासते. ही कमतरता भरून काढण्यासाठी रुग्णाला मल्टी विटामिन च्या गोळ्या दिल्या जातात.
 9. ॲनिमिया – ॲनिमिया हा शरीरातील आयर्न कमी झाल्यानंतर होणारा आजार आहे. आयबीएस च्या पेशंट मध्ये काही प्रमाणात ॲनिमिया असल्याचे दिसून आलेले आहे. कारण शरीराला आवश्यक आयर्न आयबीएस मध्ये पेशंटच्या शरीरात शोषला जात नाही त्यामुळे आयर्नची कमतरता निर्माण होते आणि पेशंटला ऍनिमिया होतो.
 10. झोप न लागणे – पोटाचा आणि मेंदूचा थेट संबंध असल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे त्याची लक्षणे मेंदूमध्ये सुद्धा दिसू लागतात. यामुळे विचाराची प्रक्रिया जास्त होते आणि झोप लागत नाही.
 11. नैराश्य आणि चिंता – आयबीएस हा आजार दीर्घकाळ चालणार आहे. त्यामुळे रुग्णाला त्याच्या आरोग्याविषयी चिंता वाटायला सुरुवात होते. आणि याच चिंतेचे रूपांतर काही महिन्यांनी नैराश्य मध्ये होते. डोक्यामध्ये सतत तेच विचार चालल्यामुळे नैराश्य अजून वाढायला लागते.

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस आजाराच्या निदानासाठी खालील तपासण्या कराव्यात.

ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शारीरिक तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाणार तेव्हा तुमची लक्षणे आयबीएस आजाराची निगडित आहेत का यासंदर्भात डॉक्टर विचार करतील आणि त्यानंतर जर तुमची लक्षणे आयबीएस आजाराशी निगडित असतील तर तुम्हाला चाचणी करण्यासाठी सांगतील. या चाचण्यांमध्ये विविध प्रकारच्या तपासण्या आहेत. ज्यामुळे पोटातील अवयव आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित आहे का नाही यासंदर्भात माहिती मिळते.

Irritable Bowel Syndrome

आयबीएस पेशंटला खालील तपासण्या करायला सांगितल्या जातात.

 1. कोलोनोस्कोपी – कोलोनोस्कोपी द्वारे मोठ्या आतड्याचे परीक्षण केले जाते. यामध्ये मोठ्या आतड्याला जर काही इन्फेक्शन झाले असेल, काही इजा झाली असेल, सूज आली असेल तर दुर्बिणीद्वारे पाहिले जाते. मोठ्या आतड्याची सध्याची परिस्थिती कोलोनोस्कोपी द्वारे लक्षात येते.
 2. सिटीस्कॅन – सिटीस्कॅन द्वारे पोटातील अवयवांची माहिती लक्षात येते. यामध्ये जर आतड्याला सूज असेल तर लगेच समजते. जेव्हा पोटात तीव्र दुखू लागते तेव्हा पोटाचा सिटीस्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
 3. इंडोस्कोपी – इंडॉस्कॉपी मध्ये तोंडाद्वारे एक लहान पाईप ज्या पाईपला समोर कॅमेरा बसवलेला असतो अशी पाईप पोटामध्ये सोडली जाते याच्या द्वारे अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड यांना काही इजा झाली आहे का नाही याबद्दल माहिती मिळवली जाते.
 4. लॅक्टोज इंटोलरन्स टेस्ट – शरीरामध्ये दुधापासून तयार झालेले पदार्थ पचवण्यासाठी लॅक्टोज नावाचे एन्झाईम असते. जर तुमच्या शरीरामध्ये लॅक्टोज नावाचे एन्झाईम तयार होत नसेल तर दुधाचे पदार्थ व्यवस्थित पचणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला आयपीएस च्या पेशंट प्रमाणेच त्रास व्हायला सुरुवात होते. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला दूध आणि दुधाचे पदार्थ खाण्यासाठी डॉक्टर बंद करतील.
 5. स्टूल टेस्ट – आयपीएस आजार असणाऱ्या व्यक्तीची संडास ची चाचणी सुद्धा केली जाते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ शरीराला लागत आहेत की नाहीत. हे समजते त्याचबरोबर इतर कोणते आजार रुग्णाला आहेत का नाहीत हे सुद्धा समजते.

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस आजारावरती उपचार

आयबीएस च्या आजारावर उपचार करत असताना मुख्य आजारावरती उपचार करण्याबरोबरच त्याच्या इतर लक्षणांवर ती सुद्धा उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले बनते जीवनशैली सुधारते. आयबीएस आजार तीव्र स्वरूपाचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते औषधे घ्यावीत. त्याचप्रमाणे जर आयबीएस सुरुवातीच्या टप्प्यात असेल आणि त्याची लक्षणे एवढी जास्त तीव्र नसतील तर जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल केल्यामुळे सुद्धा आयबीएस ची लक्षणे कमी होतात. यासाठी खालील नियम पाळा.

 • आयबीएस आजारातील व्यक्तींनी गहू, दूध आणि साखर यांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.
 • आयबीएस आजारातील व्यक्तींनी फास्ट फूड, हॉटेल मधील अन्नपदार्थ, ढाब्या वरील पंजाबी डिशेस, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
 • आयबीएस च्या पेशंटने मांसाहार टाळावा.
 • आयबीएस आजाराच्या पेशंटने मद्यपान, धूम्रपान किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये.
 • आयबीएस आजाराच्या पेशंटने पुरेशी झोप घ्यावी.
 • आयबीएस आजाराच्या पेशंटने फायबर युक्त पदार्थ खावेत.
 • आयबीएस आजाराच्या पेशंटने शरीर हायड्रेट राहावे म्हणून योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
 • आयबीएस आजाराच्या पेशंटने दररोज व्यायाम करावा.
 • जास्त प्रमाणात कॉफी पिऊ नये किंवा कॅफेन युक्त पदार्थ खाऊ नयेत.
 • ताजे आणि शिजवलेले अन्न खावे.

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस आजारावरती वापरण्यात येणारे सप्लीमेंट

आयबीएस आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी आणि रुग्णाची जीवनशैली व्यवस्थित चालण्यासाठी रुग्णाला काही सप्लीमेंट दिले जातात. ते सप्लीमेंट खालील प्रमाणे.

 1. फायबर सप्लीमेंट – रुग्णाच्या आहारामध्ये जर फायबर युक्त पदार्थांचा समावेश करून सुद्धा रुग्णाला बद्धकोष्ठता होत असेल तर रुग्णाला सुटका मिळवण्याकरिता फायबर सप्लीमेंट दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने इसाबगोल हा घटक असतो.
 2. लेक्साटीव्ह सप्लीमेंट – हे सप्लीमेंट सुद्धा बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी दिले जाते. जेव्हा फायबर सप्लीमेंट देऊन सुद्धा काहीच फरक पडत नाही तेव्हा हे सप्लीमेंट दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड सारखे घटक असतात.
 3. अँटि डायरियल मेडिसिन – आयबीएस च्या रुग्णांमध्ये जुलाब होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते. जुलाब थांबवण्यासाठी अँटि डायरियल मेडिसिन डॉक्टर द्वारे दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने लोप्रामाईड नावाचा घटक असतो. यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते.
 4. अँटि डिप्रेशन मेडिसिन – आयबीएस पेशंटचे पोट दीर्घकाळ बिघडलेले असल्यामुळे त्याचा मेंदू सुद्धा नीट काम करत नाही त्यामुळे असे रुग्ण डिप्रेशनमध्ये जातात. यार दोघांना डिप्रेशन प्रमाणेच झोप न लागण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी डिप्रेशन घालवण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी अँटि डिप्रेशन मेडिसिन रुग्णाला द्यावी लागतात.
[ Benefits of Exercise ] व्यायाम करण्याचे 13 फायदे .

Leave a Comment