Bharti Sahakari Bank Bharti 2024 | भारती सहकारी बँक येथे भरती.

Bharti Sahakari Bank Bharti 2024 | भारती सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारती सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक या पदाचा रिक्त जागा भरण्याकरिता भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करण्यापूर्वी भारती सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध केलेली भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरचा अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

Bharti Sahakari Bank Bharti 2024

 • सहाय्यक महाव्यवस्थापक या पदाच्या एकूण दोन जागा रिक्त आहेत.
 • भारती सहकारी बँक येथील भरती सहाय्यक महाव्यवस्थापक या पदाकरिता होणार आहे.

Bharti Sahakari Bank Bharti 2024 | भारती सहकारी बँक, भरती येथील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 • सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी उमेदवाराकडे बीकॉम किंवा एम.कॉम CA IIB ही पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवार हा बँक कर्मचारी असावा आणि त्याच्याकडे संगणकाबद्दल मूलभूत ज्ञान असावे. त्याचबरोबर उमेदवाराचे कम्युनिकेशन स्किल चांगले असावेत.
 • वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नागरी सहकारी बँकेत काम केलेला 15 वर्षाचा अनुभव कमीत कमी असावा. त्यातील पाच वर्षाचा अनुभव हा हेड ऑफिस ला उच्च पदावर काम केलेला असावा. त्यामध्ये उमेदवाराकडे बँकेच्या विविध डिपार्टमेंट बद्दल माहिती असावी. ॲडव्हान्स, रिकवरी, खाते, केवायसी या ठिकाणी काम केलेला अनुभव उमेदवाराकडे असावा. बँकेत संदर्भात नवनवीन येणारे कायदे उमेदवाराला माहीत असावे. सहकारी बँकांसाठी आरबीआय ने काढलेल्या नियमावली संदर्भात उमेदवाराला सर्व माहिती असावी.
 • भारतीय सहकारी बँक येथे महाव्यवस्थापक म्हणून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला नियमानुसार पगार मिळेल.
 • सदरील भरती मध्ये पदावर निवड होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण पुणे राहील.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेश शुल्क नसणार आहे.
 • भारती सहकारी बँक, सदाशिव पेठ, पुणे या संस्थेच्या ई-मेल ऍड्रेस वर उमेदवारांनी स्वतःचा अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे.
 • भारती सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वाचावी. जाहिरात पहा.
 • hradmin@bharatibankpune.com या ईमेल एड्रेस वर उमेदवारांनी स्वतःचा अर्ज पाठवायचा आहे.

Bharti Sahakari Bank Bharti 2024 | भारतीय सहकारी बँक, पुणे येथील भरती करिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • सदरील भरती करिता उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत.
 • ऑफलाइन किंवा ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करण्याची कोणतीही पद्धत भारती सहकारी बँक यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही.
 • सदरील भरती करिता अर्ज ईमेल द्वारे करत असताना उमेदवाराने स्वतःची संपूर्ण माहिती बरोबर लिहायचे आहे. जर त्यामध्ये काही चूक आढळली आणि त्यामुळे अर्ज बाद करण्यात आला. तर त्याला भारती सहकारी बँक जबाबदार राहणार नाही.
 • ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे.
 • भारती सहकारी बँक यांच्या ईमेल एड्रेस वर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Bharti Sahakari Bank Bharti 2024 | भारती सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • भारती सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
 • भारती सहकारी बँक येथील भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला कसल्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये पदावर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराने राजकीय दबाव आणू नये. त्याचप्रमाणे भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केल्यावर त्या उमेदवारावर भारती सहकारी बँक यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीची निवड प्रक्रिया भारती सहकारी बँक यांच्यामार्फत ठरवण्यात येईल. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने हस्तक्षेप करू नये.
 • सदरील भरती संदर्भात अर्ज करण्यापूर्वी अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Bharti Sahakari Bank Bharti 2024 | भारती सहकारी बँक येथील भरती करिता महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
 • सदरील बँकेचे हेड ऑफिस हे “13, सदाशिव पेठ, भारती विद्यापीठ भवन, पहिला मजला, L.B.S मार्ग, पुणे – 411 030 ” या पत्त्यावर आहे.
 • सदरील बँक ही पुणे स्थित आहे. या बँकेची वार्षिक उलाढाल 2000 कोटी इतके होते.
 • 8 सप्टेंबर 1971 रोजी भारतीय सहकारी बँक ची स्थापना झालेली आहे.
 • भारती विद्यापीठ संस्थेचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांना सुरुवातीच्या काळात प्रिंटिंग प्रेस च्या व्यवसायाकरिता 25000 रुपयाचे लोन पाहिजे होते त्यासाठी त्यांनी आसपासच्या बँकांमधून चौकशी सुरू केली. पण कर्ज मिळवण्याकरिता खूपच अडचणींना सामोरे त्यांना जावे लागले. त्यावर पर्याय म्हणून भारती सहकारी बँक ची स्थापना करण्यात आली.
 • 29 एप्रिल 1999 रोजी भारती सहकारी बँक मल्टीस्टेट करण्यात आली.
 • बँकेचे शेअर होल्डर, ग्राहक, कर्मचारी, संस्थापक, शुभचिंतक हे सर्वजण बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचे आणि यशाचे भागीदार आहेत.
 • भारती सहकारी बँक या बँकेच्या नवनवीन शाखा पुण्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात निघायला सुरुवात झाल्या. यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकासासाठी मदत करणे हे बँकेचे ध्येय बनत गेले. सामाजिक समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक दृष्ट्या चालना देणे बँकेचे काम होते.
 • भारती सहकारी बँक चे एकूण 2 लाख ग्राहक आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय 2000 कोटी हून अधिक आहे. आज बँकेच्या एकूण 23 शाखा आहेत. या 23 शाखा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि नवी मुंबई, आणि दिल्लीमध्ये सुद्धा बँकेच्या शाखा आहेत. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा पाहता बँकेने NEFT, RTGS आणि नेट बँकिंग या सुविधा ग्राहका साठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 • प्रत्येक प्रदेशामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात बँकेच्या शाखा सुरु करून तेथील लोकांना आर्थिक दृष्ट्या सुदृढ करणे हे बँकेचे ध्येय आहे.
 • भारती सहकारी बँक यांची सांगली येथील शाखा भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, वानलेसवाडी, सांगली या ठिकाणी आहे.
 • सदरील बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत. आणि दुपारी 2:00 वाजल्यापासून सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.
 • [ Bharti Sahakari Bank Bharti 2024 ] भारती सहकारी बँक दर रविवारी बंद असते. त्याचप्रमाणे महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असते.
 • भारती सहकारी बँक यांच्या शाखा भारतीय विद्यापीठ भवन, आकुर्डी, वडगाव धायरी, कात्रज धनकवडी, सांगली शहर, कडेगाव, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, विटा, पाचगणी, अंबक, मलकापूर कराड, नवी दिल्ली, पलूस, भिलवाडी, इस्लामपूर, तासगाव, कोथरूड, वरळी, सातारा, बाणेर, हडपसर या ठिकाणी आहेत.
 • सदरील बँकेमध्ये NEFT / RTGS, नेट बँकिंग, लॉकर, ज्येष्ठ नागरिकांकरिता सुविधा यांसारख्या सोयी दिलेल्या आहेत.
 • भारती सहकारी बँक मध्ये सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट असे दोन्ही खाते सुरु करण्यात येतात.
 • भारती सहकारी बँक मध्ये टर्म डिपॉझिट सर्विस मध्ये री इन्व्हेस्टमेंट डिपॉझिट, मंथली इन्कम साठी डिपॉझिट, कोर्टली इन्कम साठी डिपॉझिट यासारख्या फिक्स डिपॉझिट स्कीम आहेत.
 • भारती सहकारी बँक मध्ये कर्जासाठी विशेष योजना आहेत. त्यामध्ये वस्तूपूर्ती योजना, ॲडव्हान्स अगेन्स्ट गोल्ड लोन, पर्सनल लोन, भारती वेहिकल लोन, हायपोथेसिस लोन, मोरगेज लोन, covid-19 पॉलिसी यांसारख्या योजना कर्जासाठी राबवलेल्या आहेत.
 • भारती सहकारी बँकेचे चेअरमन श्री भाऊ भगवत कड हे आहेत.
 • ग्राहकांचे मौल्यवान दागिने, शेअरची कागदपत्रे, महत्त्वाचे दस्तावेज, आणि इतर मौल्यवान गोष्टी जपून ठेवण्याकरिता भारती सहकारी बँकेने लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लॉकर सुविधा प्रत्येक शाखे करिता नाही आहे.
 • बँकेच्या निवडक शाखांमध्ये लॉकर उपलब्ध आहेत. जे ग्राहक लॉकर सुविधा करिता प्रथम अर्ज करतील आशा ग्राहकांनाच बँकेची लॉकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 • सदरील लॉकर सुविधा करिता ग्राहका कडून काही रक्कम आकारली जाणार आहे . यामध्ये लॉकर चे तीन वर्षाचे भाडे त्याचबरोबर काही कारणास्तव लॉकर तोडायला लागला तर त्याचे चार्जेस यामध्ये समाविष्ट आहेत.
 • ग्राहकांच्या सोयीनुसार लॉकर वैयक्तिक किंवा सामायिक देण्यात येतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
 • ग्राहकांना मिळालेल्या बँकेच्या लॉकर वापरण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या कार्यालयीन वेळेत सुट्टीचा दिवस सोडून उपस्थित राहणे गरजेचे आहे.
 • सदरील बँकेच्या लॉकर साठी अर्ज करण्याची फी फक्त ₹100 आहे.
 • भारती सहकारी बँक मध्ये बँकेचा वैयक्तिक आयटी विभाग आहे. या विभागाद्वारे बँकेची माहिती आणि तंत्रज्ञान सुरळीत चालू ठेवण्याचे काम केले जाते. बँकेच्या CBS सॉफ्टवेअर, टेक्निकल इशू या सर्वांचे निवारण बँकेच्या आयटी टीम कडून केले जाते.
 • भारती सहकारी बँक येथे कायदा सल्लागार विभाग आहे. त्याद्वारे बँकेला कायदेशीर सल्ला आणि कायदेशीर कामांमध्ये मदत केली जाते.
 • त्याचप्रमाणे बँकेमध्ये रिकवरी डिपार्टमेंट सुद्धा आहे या डिपार्टमेंटच्या द्वारे ज्या ग्राहकांनी घेतलेले कर्ज परतफेड केलेले नाही आशा ग्राहकांकडून पैसे रिकव्हर करण्याचे काम भारती सहकारी बँक च्या रिकवरी डिपार्टमेंट द्वारे केले जाते. रिकव्हरी डिपार्टमेंट द्वारे ग्राहकाला कर्जाचे पैसे भरण्यासाठी सुलभ हप्ते दिले जातात.
 • मोरगेज लोन करिता सरकारी कर्मचारी, डॉक्टर, वकील, शिक्षक यांसारख्या त्याचप्रमाणे आयकर भरणारा कोणताही उमेदवार मोरगेज लोन करिता अप्लाय करू शकतो. यासाठी ओळख पत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट या सर्व गोष्टी असणे आवश्यक आहे.
 • सदरील बँकेमध्ये पर्सनल लोन सोप्या पद्धतीने, कमी कागदपत्रांमध्ये आणि जलदरीत्या मिळण्याची सोय करून दिलेली आहे. जे ग्राहक पगार धारक आहेत, व्यावसायिक आहेत अशा सर्वांना 5 लाखापर्यंत पर्सनल लोन बँकेद्वारे देण्यात येते.

[ Bharti Sahakari Bank Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी, खाजगी, सरकारी बँक आणि पतसंस्थेमधील रिक्त पदांच्या भरती करिता माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment