AIATSL Bharti 2024 | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथे भरती.

AIATSL Bharti 2024 | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. 16, 17,18 आणि 19 एप्रिल 2024 या दिवशी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. डेप्युटी मॅनेजर, जूनियर ऑफिसर- टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, जूनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन या पदांसाठी जागा रिक्त आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला हजर राहावे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

AIATSL Bharti 2024

 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरती 74 जागांसाठी होणार आहे.
 • सदरील भरती मधील आवश्यक आणि रिक्त पदे खालील प्रमाणे.

AIATSL Bharti 2024 | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथील रिक्त पदे खालील प्रमाणे.

 1. डेप्युटी मॅनेजर
 2. जूनियर ऑफिसर- टेक्निकल
 3. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
 4. जूनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
 5. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
 6. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह
 7. हँडीमॅन
 8. हँडीवुमन
 • ड्युटी मॅनेजर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त पाहिजे त्याचप्रमाणे उमेदवाराकडे 16 वर्षाचा अनुभव पाहिजे.
 • जूनियर ऑफिसर- टेक्निकल या पदासाठी उमेदवाराने मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, उत्पादन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग यापैकी कोणत्याही शाखेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण झालेला पाहिजे.
 • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10+2+3 या पॅटर्ननुसार पदवी मिळवलेली पाहिजे.
 • जूनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10+2 या पॅटर्ननुसार पदवी मिळवलेली पाहिजे.
 • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी पास असला पाहिजे.
 • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, उत्पादन, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल यापैकी कोणत्याही एका शाखेत राज्य सरकार द्वारे मान्यताप्राप्त तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला पाहिजे.
 • हँडीमॅन या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून 10 वी उत्तीर्ण केली पाहिजे.
 • हँडीवुमन या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून 10 वी उत्तीर्ण केली पाहिजे.
 • डेप्युटी मॅनेजर या पदासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत असावे. त्यापेक्षा अधिक वयाचा उमेदवार नसावा.
 • डेप्युटी मॅनेजर हे पद सोडून इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत असावे. एससी आणि एसटी च्या उमेदवारांकरिता पाच वर्षे वयामध्ये सूट राहील. तर ओबीसीच्या उमेदवारांसाठी तीन वर्षे वयामध्ये सूट राहील.
 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथील भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला पगार 18,840 रुपये ते 45,000 रुपये दर महिना मिळेल.
 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण चंदिगड आणि डेहराडून एअरपोर्ट असेल.
 • सदरील भरती मध्ये उमेदवारांसाठी प्रवेश शुल्क ₹500 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, माझी कर्मचारी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
 • सदरील भरती मध्ये भाग घेण्याकरिता उमेदवाराने जाहिराती सोबत दिलेला अर्ज भरून मुलाखतीच्या ठिकाणी दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 ही आहे.
 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी नक्की वाचावी. जाहिरात पहा.
 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे साठी अर्ज करण्याकरिता अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवट दिलेला आहे. तो नमुना उमेदवारांनी वाचून त्यानुसारच अर्ज करावा.

AIATSL Bharti 2024 | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने मुलाखतीच्या ठिकाणी अर्ज जमा करायचे आहेत.
 • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे राबवण्यात आलेली नाही.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करत असताना अर्ज लिहिताना उमेदवाराकडून स्वतःची वैयक्तिक माहिती किंवा शैक्षणिक पात्रता यामध्ये काही चुकी झाली आणि उमेदवाराचा अर्ज बाद केला गेला तर याला एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
 • 19 एप्रिल 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख आहे.
 • एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

AIATSL Bharti 2024 | एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

 • एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरतीसाठी [ AIATSL Bharti 2024 ] ज्या उमेदवारांनी अर्ज करून मुलाखत दिलेली आहे असे उमेदवारच भरतीसाठी पात्र ठरतील.
 • अर्ज करणाऱ्या आणि मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही अशी सूचना एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये मुलाखती दरम्यान कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केल्यावर त्या उमेदवारावरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये मुलाखतीचे ठिकाण हे एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याकडून ठरवण्यात येईल. यामध्ये इतर कोणत्याही उमेदवारांनी हस्तक्षेप करू नये.
 • सदरील मुलाखतीकरिता उमेदवाराला त्या पदाच्या निगडित आणि संबंधित शैक्षणिक अटीच्या निगडित प्रश्न विचारले जातील. त्याची तयारी उमेदवाराने आधीच करून येणे गरजेचे आहे.
AIATSL Bharti 2024 | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [ AIATSL Bharti 2024 ] याच संस्थेचे नवीन एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड असे आहे.
 • एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड या संस्थेचे उद्दिष्ट जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हाताळणारी सेवा देणारी संस्था तयार करणे हा आहे.
 • या संस्थेद्वारे स्वतःचे सामर्थ्य आणि सुरक्षितता प्रत्येक वेळेस सुधारली जात आहे आणि दर दिवशी उत्कृष्ट बनत चालली आहे.
 • सुशिक्षित , प्रेरित आणि मोटिवेटेड आशा पद्धतीचा कर्मचारी वर्ग ग्राहकांच्या सेवेसाठी तयार करण्याचे काम सदरील संस्था करत आहे.
 • सदरील भरती मधील डेप्युटी मॅनेजर हे पद एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेड यांच्या विमानतळावरील होणाऱ्या सर्व कामाचे मुख्य पद असणार आहे. डेप्युटी मॅनेजर पदाच्या खाली काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम डेप्युटी मॅनेजर चे असते. विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ग्राहकांचे बॅग आणि इतर वस्तू व्यवस्थित शिफ्ट करून घेणे. हे डेप्युटी मॅनेजर चे काम राहील.
 • डेप्युटी मॅनेजर यांना तीन शिफ्टमध्ये काम राहील. त्यामध्ये नाईट शिफ्ट सुद्धा असेल. महिला उमेदवारांना नाईट शिफ्ट नसेल. आठवड्यातून एक दिवस सुट्टी राहील. डेप्युटी मॅनेजर याला पदोन्नतीसाठी कामामधील त्याची प्रगती आणि अनुभव गरजेचा राहणार आहे.
 • जूनियर ऑफिसर- टेक्निकल या पदाचे काम सर्व स्टाफला सुरक्षा सूचना देणे आणि त्याचे पालन करायला लावणे. फ्लाईट हँडल करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे काम जूनियर ऑफिसर टेक्निकल यांच्याकडे असते. हातकर्मचारी आणि फ्लाईट ऑपरेट करणारी कर्मचारी यांच्यात ताळमेळ साधायचे काम जूनियर ऑफिसर- टेक्निकल याच्याकडे असते.
 • जूनियर ऑफिसर- टेक्निकल यांना सर्वसाधारण सुट्टी, आजारी असल्यास सुट्टी, कामानिमित्त सुट्टी या प्रकारच्या सर्व सुट्ट्या मिळतील.
 • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी प्रवाशांचे विमानतळावर स्वागत करणे, बोर्डिंग आणि टर्मिनल चे सर्व काम बघणे, तिकीट चे रिझर्वेशन पाहणे, प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे हे काम आहे.
 • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह याचे काम रॅम्प सेवा व्यवस्थित देण्याचे आहे. विविध विमान सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी समन्वयक साधून त्यांना गरजेनुसार सेवा द्यायचे काम करणे. स्टेशन इन्चार्ज कडून कोणतीही जबाबदारी दिली तर ती पार पाडणे. वेळेवर बॅग ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही सर्व कामे असतात.
 • एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला अवजड वाहने जसे की ट्रॅक्टर, बस आणि ग्राउंड सर्विस इक्विपमेंट चालवायला येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ही सर्व वाहने मेंटेन ठेवणे त्याला जमले पाहिजे.
 • एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी उमेदवाराकडे HMV लायसन असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे RTO द्वारा घेण्यात येणारी ड्रायव्हिंग टेस्ट उमेदवार पास झालेला पाहिजे. ग्राहकांची सुरक्षा आणि विमानाची सुरक्षा यांना प्राधान्य उमेदवारांनी दिले पाहिजे.
 • हँडीमॅन आणि हँडीवुमन या पदासाठी प्रवाशांचे साहित्य, बॅग विमानातून आणि ट्रॉली मधून चढवणे उतरवणे हे काम असेल. विमानाची साफसफाई करणे, व्हीलचेअर चालवणे, मेकॅनिक चहा हाताखाली काम करणे इत्यादी कामे असणार आहेत.
 • सदरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला ग्रुप डिस्कशन मध्ये भाग घ्यायला लावला जाणार आहे. त्यामध्ये उमेदवाराचा प्रतिसाद कसा आहे यावरून देखील योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
 • सदरील मुलाखतीकरिता बाहेर गावावरून येणाऱ्या उमेदवारांनी स्वतःच्या प्रवासाची आणि राहण्याची सोय स्वखर्चाने करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतेही मानधन संस्था देणार नाही.
 • ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराला मुलाखती सोबतच अवजड वाहन चालवण्याची टेस्ट संस्थे कडून घेतली जाणार आहे.
 • जे उमेदवार ड्रायव्हिंग टेस्ट पास होतील आशा उमेदवारांनाच मुलाखतीसाठी पुढे पाठवले जाईल.
 • मुलाखत झाल्यानंतर निवड प्रक्रिया मुलाखतीच्या दिवशीच किंवा त्याच्या नंतरच्या दिवशी घेतली जाईल.
 • हँडीमॅन आणि हँडीवुमन या पदासाठी उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. जे उमेदवार या शारीरिक चाचणी मध्ये पास होतील अशाच उमेदवारांना मुलाखतीसाठी पुढे पाठवण्यात येईल.

देशातील महत्त्वाच्या संस्था आणि पब्लिक सेक्टर मधील कंपनी यांच्यामध्ये निघणाऱ्या भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment