RRB Bharti 2024 | भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती

RRB Bharti 2024 | भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता जाहिरात रेल्वे मंडळाकडून प्रसिद्ध झालेली आहे. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. सदरील भरती ही तंत्रज्ञ ग्रेड – 1 आणि तंत्रज्ञ ग्रेड- 3 या पदाकरिता होणार आहे. या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या पोर्टल वरती अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

RRB Bharti 2024

 • भारतीय रेल्वे मंडळाद्वारे घेण्यात येणारी भरती ही 9144 जागांसाठी होणार आहे.
 • भारतीय रेल्वे मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये तंत्रज्ञ ग्रेड-1 आणि तंत्रज्ञ ग्रेड-3 ही पदे भरली जाणार आहेत.

RRB Bharti 2024 | भारतीय रेल्वे मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीतील पदांची शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे आहेत.

 • तंत्रज्ञ ग्रेड-1 या पदाकरिता उमेदवाराची 10 वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे त्याचप्रमाणे उमेदवाराचा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण झाला पाहिजे.
 • तंत्रज्ञ ग्रेड – 3 या पदाकरिता संबंधित क्षेत्रात पदवी पाहिजे.
 • तंत्रज्ञ ग्रेड – 1 या पदाकरिता सुरुवातीला पगार 29200 रुपये इतका असेल.
 • तंत्रज्ञ ग्रेड – 3 या पदाकरिता सुरुवातीला पगार 19900 रुपये इतका असेल.
 • भारतीय रेल्वे मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहील.
 • सदरील भरती करिता प्रवेश शुल्क 500 रुपये आहे. एससी, एसटी, ईबीसी या कॅटेगरी च्या उमेदवारांना आणि ट्रान्सजेंडर आणि महिलांना 250 रुपये शुल्क आहे.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता रेल्वे मंडळाद्वारे देण्यात आलेल्या पोर्टल वरूनच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • 8 एप्रिल 2024 ही रेल्वे मंडळाद्वारे देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • सदरील भरती करिता रेल्वे महामंडळाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात पहा.
 • उमेदवाराने इतर कोणत्याही ऑनलाइन लिंग द्वारे अर्ज करू नये. अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट ही आहे. क्लिक करा

RRB Bharti 2024 | भारतीय रेल्वे मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • भारतीय रेल्वे मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवाराने इतर कोणत्याही मार्गाने अर्ज न करता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत भारतीय रेल्वे मंडळाद्वारे राबवलेली नाही.
 • भारतीय रेल्वे भरती करिता अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना कोणत्याही पद्धतीची चुकीची माहिती लिहू नये त्यामध्ये स्वतःबद्दल लिहायची माहिती उमेदवारांनी बरोबर लिहावी. त्यात काय चुकले तर भारतीय रेल्वे भरती विभाग जबाबदार असणार नाही.
 • 8 एप्रिल 2024 ही तारीख भारतीय रेल्वे भरती विभागाद्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख सांगण्यात आलेली आहे.
 • भारतीय रेल्वे भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी रेल्वे विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पूर्णपणे वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

RRB Bharti 2024 | भारतीय रेल्वे भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील महत्त्वपूर्ण सूचना वाचाव्या.

 • भारतीय रेल्वे भरतीमध्ये [ RRB Bharti 2024]  निवड होण्याकरिता उमेदवाराला सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. याशिवाय त्याला भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
 • TA/DA भारतीय रेल्वे भरती मार्फत कोणत्याही उमेदवाराला देण्यात येणार नाही. याची दक्षता सर्व अर्ज केलेल्या उमेदवारांनी घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये उमेदवारा द्वारे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर त्या उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. किंवा भारतीय रेल्वे भरती आयोगामार्फत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
 • सदरील भरतीची प्रक्रिया पूर्णपणे भारतीय रेल्वे भरती मार्फत ठरवण्यात येईल. भारतीय रेल्वे परीक्षेचे केंद्र सुद्धा संस्थेमार्फत ठरवले जाईल.
 • सदरील भरतीच्या परीक्षा करिता अभ्यासक्रम भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरती दिलेला आहे उमेदवारांनी तो पूर्णपणे पहावा.
RRB Bharti 2024 | भारतीय रेल्वे भरती करिता महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
 • CEN मध्ये दिलेली संपूर्ण माहिती अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच ऑनलाइन अर्ज करावा.
 • भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक पात्रता अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण केलेले असावे. जे उमेदवार शेवटच्या वर्षात शिकत आहेत किंवा ज्या उमेदवारांचा निकाल अजून लागलेला नाही असे उमेदवार अर्ज भरण्याकरिता पात्र होणार नाहीत.
 • भारतीय रेल्वे विभागाच्या भरतीमध्ये [RRB Bharti 2024]  एकाच उमेदवाराला एकाहून अधिक पदाकरिता अर्ज करायचा असेल तर त्या उमेदवाराने सेपरेट अर्ज करावेत. आणि शुल्क सुद्धा प्रत्येकाला अर्जाचा सेपरेट भरावा.
 • सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता दिलेल्या जाहिरातीमध्ये आहे त्यानुसारच असावी. उमेदवाराने अर्जामध्ये भरलेल्या माहिती आणि जाहिरातीमधील आवश्यक पात्रता जुळून आल्यानंतरच उमेदवार ग्राह्य धरला जाईल. त्याचप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवाराकडे आवश्यक मार्कशीट, प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. उमेदवाराची सर्व कागदपत्रे भारतीय रेल्वे कडून तपासली जातील. आणि पडताळणी नंतरच त्याचा निवड करण्याकरिता विचार केला जाईल.
 • SC/ST/OBC/EWS/EBC या कॅटेगरी च्या उमेदवारांना फी साठी सवलत पाहिजे असेल तर उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे 8 एप्रिल 2024 म्हणजेच अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्जासोबत जोडावेत.
 • अर्ज करणारा उमेदवार मेडिकली फिट पाहिजे. मेडिकली फिट नसणाऱ्या उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. त्यामुळे मेडिकली फिट नसणाऱ्या उमेदवाराकडे दुसरा कोणता पर्याय नाही.
 • तंत्रज्ञान ग्रेड – 1 या पदाकरिता वय वर्ष 18 ते 36 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान ग्रेड – 2 या पदाकरिता वयाची अट 18 वर्षे ते 33 वर्षे इतकी आहे.
 • भारतीय रेल्वे या ठिकाणी निघालेल्या भरती मध्ये जाहिरातीत दाखवलेली जी पदांची संख्या आहे ती कमी जास्त होऊ शकते. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचा वैयक्तिक मोबाईल असावा त्याचप्रमाणे स्वतःचा वैयक्तिक ईमेल आयडी असावा. भरती दरम्यान या दोन माध्यमाच्या द्वारे उमेदवारा बरोबर संवाद साधण्यात येईल.
 • रेल्वे भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवाराला नवीन अकाउंट क्रिएट करावे लागते. जर उमेदवार CEN No 01/2024 याकरिता रजिस्टर असेल तर उमेदवारांनी रजिस्टर केलेल्या युजरनेम आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करून अर्ज भरू शकता. पण नवीन उमेदवारांना सुरुवातीला अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर त्यांनी अर्ज करावा.
 • एकदा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला अकाउंट ओपनिंग च्या वेळेस भरलेला ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि निवडलेले RRB याच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी बदलायचे असतील. तर बदलता येतील पण त्यासाठी मोडिफिकेशन शुल्क 250 रुपये उमेदवाराला द्यावे लागेल.
 • सदरील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. त्यामध्ये जर एक प्रश्न चुकला तर त्याकरिता 1/3 इतके निगेटिव्ह मार्क मिळणार आहेत.
 • परीक्षा केंद्रामध्ये प्रतिबंधित असणाऱ्या सर्व वस्तू म्हणजेच मोबाईल फोन, ब्लूटूथ, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच, बांगड्या, चैन, ब्रासलेट, पाकीट, पर्स, बेल्ट, बूट, धातूच्या इतर वस्तू यांसारख्या गोष्टी परीक्षा केंद्रावरती घेऊन यायच्या नाहीत. स्टेशनरी साहित्य जसे की पेन, पेन्सिल इत्यादी उमेदवारांनी घेऊन येऊ नये यापैकी कोणत्याही वस्तू परीक्षा हॉलमध्ये उमेदवाराने आणल्यास त्याला प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
 • परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांनी कोणत्याही महागड्या गोष्टी किंवा मौल्यवान वस्तू आणू नयेत कारण परीक्षा केंद्रावरती या सर्व वस्तू करिता लॉकर्स उपलब्ध करून दिले जाणार नाहीत.
 • सदरील भरती मध्ये काही बदल करण्यात आला तर तो बदल रेल्वे विभागाच्या आधुनिक वेबसाईट वरती सांगण्यात येईल त्यामुळे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी रेल्वे विभागाची वेबसाईट तपासत रहावे त्याचप्रमाणे इतर चुकीची माहिती देणाऱ्या वेबसाईट कडे लक्ष देऊ नये.
 • भारतीय रेल्वे विभागाद्वारे उमेदवाराची पडताळणी केली जाते. पण त्याआधी उमेदवाराला सर्व परीक्षा पास होणे गरजेचे आहे. जर उमेदवार निवड परीक्षेमध्ये उत्तीर्ण असेल तरच उमेदवाराची कागदपत्रांची पडताळणी सुरू केली जाते.
 • उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली आहे की नाही याची तपासणी उमेदवाराच्या प्रमाणपत्रा वरून करण्याचे काम भारतीय रेल्वे करत असते.
 • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवार दिलेली शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वैद्यकीय पात्रता, इत्यादी गोष्टी पूर्ण करीत असेल त्यात उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी घ्यावा. उमेदवाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून झालेले पाहिजे. उमेदवार जर सदरील कोर्स मधून पास झाला नसेल तर त्याला अर्ज करता येणार नाही.
 • अर्ज करणारा कोणताही उमेदवार जर पूर्वीपासून भारतीय रेल्वेमध्ये सेवा बजावत असेल तर त्या उमेदवाराने सदरील भरती करिता अर्ज करू नये. आशा उमेदवाराचा अर्ज आढळला तर तो बात करण्यात येईल.
 • अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला सरकारी नोकरीवरून निलंबित केलेले असेल असा उमेदवार या परीक्षे करिता अर्ज करू शकत नाही.
 • उमेदवाराच्या दहावीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेट वरती जे नाव आणि जन्मतारीख आहे तेच नाव आणि जन्मतारीख उमेदवारांनी अर्ज भरताना लिहावे. जर उमेदवाराने स्वतःच्या नावामध्ये काही बदल केला असेल तर तसे राजपत्र उमेदवाराने सादर करावे.
 • उमेदवाराने सर्व कागदपत्रांवरती संलग्न सही करायची आहेत. सेपरेट अक्षराची सही उमेदवारांनी केली असल्यास ती सही ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवाराने सर्व ठिकाणी एकच सही करावी. उमेदवाराची अर्ज भरण्याच्या वेळेस अपलोड केलेली सही आणि परीक्षा हॉलमध्ये केलेली सही मॅच झाली नाही तर उमेदवाराचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
 • निवड झालेल्या उमेदवाराला जास्त कालावधीकरिता प्रशिक्षण काळा मधून जावे लागेल. या कालावधीत उमेदवाराला ठराविक पगार मिळेल. उमेदवाराला पूर्ण पगार नोकरीला नियुक्त झाल्यापासून सुरू होईल.
 • वरील भरती मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा किंवा भरतीची तारीख पुढे ढकलण्याचा अथवा संपूर्ण भारतीय रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार भारतीय रेल्वे विभागाकडे आहे.

भारतीय रेल्वे मधील सर्व भरत्या त्याचप्रमाणे भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व संस्थांमधील भरती संदर्भातील अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment