CIL Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड भरती.

CIL Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड द्वारे रिक्त पदांकरिता भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 63 जागांकरिता ही भरती होणार आहे. या भरतीसाठी कोल इंडिया लिमिटेड या कंपनीद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 11 एप्रिल 2024 ही कोल इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय विशेषज्ञ या पदांकरिता सदरील भरती होणार आहे. या भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे कोल इंडिया लिमिटेड संदर्भातील खालील माहिती वाचावी.

CIL Bharti 2024

  • सदरील भरती ही 63 जागांसाठी होणार आहे.
  • कोल इंडिया लिमिटेड द्वारे घेण्यात येणारी भरती वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय विशेषज्ञ या पदासाठी होणार आहे.

CIL Bharti 2024 | इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीतील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

  • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त संस्था किंवा कॉलेजमधून एमबीबीएस ही पदवी प्राप्त पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराचा खाजगी प्रॅक्टिस/सेल्फ-क्लिनिकचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे.
  • वैद्यकीय विशेषज्ञ या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालील प्रमाणे.
  1. जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी आणि पल्मोनरी मेडिसिन – मान्यताप्राप्त महाविद्यालय / संस्था मधून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे किंवा डीएनबी मधून कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता अनुभवासह MBBS गरजेचे आहे.
  2. इतर तज्ञांसाठी वरील शैक्षणिक पात्रता व्यतिरिक्त कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणे गरजेचे आहे.
  3. ट्विटरशिप चा कालावधी हा पात्रता नंतरचा अनुभव धरला जाईल. पण अनुभव हा नॅशनल मेडिकल कौन्सिल किंवा मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्था इथूनच घेतलेला पाहिजे.
  4. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या फेलोशिप कोर्सचा कालावधी पोस्ट पात्रता अनुभव म्हणून स्वीकारला जाईल.
  5. अनुभवामध्ये खाजगी प्रॅक्टिस किंवा स्वतःच्या क्लिनिक मधील अनुभव सुद्धा पात्रता नंतरचा अनुभव मानला जाऊ शकतो.
  • वैद्यकीय अधिकारी पदासाठी वय 31 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असले पाहिजे. SC/ST च्या उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट राहील. तर ओबीसी साठी तीन वर्षे सूट राहील.
  • सदरील पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन हे 60,000 रुपये ते 2 लाख रुपये पर्यंत देण्यात येईल.
  • कोल इंडिया लिमिटेड  येथे निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे नागपुर असेल.
  • सदरील भरतीत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क साठी जाहिरात पहा.
  • कोल इंडिया लिमिटेड च्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • कोल इंडिया लिमिटेड च्या भरतीसाठी 11 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • कोल इंडिया लिमिटेड च्या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “महाव्यवस्थापक(कार्मिक)/ HoD(EE), येथे कार्यकारी आस्थापना विभाग, २ रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र- 440001.” या पत्त्यावर पाठवावा.

CIL Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा.

  • कोल इंडिया लिमिटेड द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज भरायचे आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणती पद्धत कोल इंडिया लिमिटेड द्वारे राबवलेली नाही.
  • उमेदवाराने ऑफलाइन अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये जन्मतारीख, स्वतःचे नाव, पत्ता आणि वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरावी. जर यातील कोणतीही माहिती चुकीची आढळली. त्याला कोल इंडिया लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
  • 11 एप्रिल 2024 ही या भरतीची शेवटची तारीख आहे.
  • कोल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात पहावी.

CIL Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र असणार आहेत.
  • कोल इंडिया लिमिटेड द्वारे कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराकडून अनुचित प्रकार करण्यात आला. तर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती कोल इंडिया लिमिटेड द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • उमेदवाराने परीक्षा केंद्रावर येताना कोल इंडिया लिमिटेड द्वारे दिलेले हॉल तिकीट घेऊनच उपस्थित राहावे.
  • कोल इंडिया लिमिटेड च्या भरती करिता लागणारी आवश्यक माहिती संकेतस्थळावरती दिलेली आहे. उमेदवारांची काळजीपूर्वक वाचावी.
CIL Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड च्या भरती करिता अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे.
  • कोल इंडिया लिमिटेड च्या भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवाराने स्वतःचा अर्ज पोस्टाद्वारे  दिलेल्या पत्त्यावर ती पोहोचवायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज “महाव्यवस्थापक(कार्मिक)/ HoD(EE), येथे कार्यकारी आस्थापना विभाग, २ रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र- 440001.” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • उमेदवाराने पाठवलेला अर्ज 11 एप्रिल 2024 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर ती पोहोचला पाहिजे. यानंतर पोहोचणाऱ्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने म्हणजेच ई-मेल, उपस्थित राहून, कुरियर द्वारे मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एका उमेदवारांनी एका पदासाठी अर्ज करावा. एकाच वेळेस वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय विशेषज्ञ या दोन्ही पदांसाठी केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यावेळेस उमेदवाराचा अर्ज हा वैद्यकीय विशेषज्ञ या पदासाठी फक्त ग्राह्य धरला जाईल.
  • कोल इंडिया लिमिटेड च्या जाहिराती मध्ये सांगितलेली कागदपत्रे उमेदवारांनी अर्जासोबत जोडावेत.
  • जे उमेदवार कोल इंडिया लिमिटेड च्या मुलाखतीसाठी निवडले जातील. त्या उमेदवारांनी मुलाखतीला येताना बरोबर ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन येणे. त्याचबरोबर प्रत्येक डॉक्युमेंट चे दोन कॉपीज तयार करून घेऊन यावे.
  • मुलाखतीसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराकडे ओरिजनल डॉक्युमेंट नसतील. किंवा जाहिरातीत दिलेल्या कागदपत्राची एखादं जरी ओरिजनल कागदपत्र नसेल. त्याचबरोबर उमेदवाराचा अर्ज अर्धवट भरलेला असेल तर त्या उमेदवाराला भरतीतून बाद करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी [ CIL Bharti 2024 ] दिलेला अर्ज कशा पद्धतीने भरायचा याबद्दल माहिती खालील प्रमाणे.
  1. जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला ऑल इंडिया लिमिटेड एप्लीकेशन फॉर मेडिकल एक्झिक्युटिव्ह असा फॉर्म दिसेल. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
  2. या फॉर्मच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे. आणि त्याच्याखाली तुमची सही करायची आहे.
  3. यानंतर उमेदवारांसमोर खालील चार पर्याय उपलब्ध असतील त्यामध्ये Sr Medical Officer (E-3 Grade), Medical Specialist (E-3 Grade), Sr.Medical Specialist (E-4 Grade), Sr.Medical Officer – Dental (E-3 Grade) हे चार पर्याय आहेत. यापैकी कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. तो पर्याय उमेदवाराने निवडायचा आहे.
  4. यानंतर उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार लिहावे.
  5. यानंतर उमेदवाराने स्वतःच्या वडिलांचे नाव अथवा पतीचे नाव लिहायचे आहे.
  6. उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख अंकामध्ये सर्वप्रथम लिहायचे आहे. त्यानंतर तीच जन्मतारीख शब्दांमध्ये लिहायचीआहे.
  7. 30 जानेवारी 2024 रोजी स्वतःचे असणारे वय उमेदवाराने लिहायचे आहे.
  8. नंतर उमेदवाराने स्वतःचा आधार नंबर किंवा पॅन कार्ड नंबर दोन्हीपैकी एक लिहायचा आहे.
  9. यानंतर उमेदवारांनी स्वतःचे लिंग लिहायचे आहे.
  10. उमेदवाराने स्वतःचा चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे.
  11. उमेदवाराने स्वतःची नागरिकत्व अर्जामध्ये भरायचे आहे.
  12. उमेदवाराने स्वतः विवाहित आहे की अविवाहित आहे याबद्दल माहिती लिहायची आहे.
  13. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा धर्म लिहायचा आहे.
  14. उमेदवाराने स्वतःची जात प्रवर्ग आणि जात प्रमाणपत्राचा नंबर अर्जामध्ये लिहायचा आहे.त्याचबरोबर जात प्रमाणपत्र कधी मिळाले ती तारीख लिहायची आहे..
  15. अर्ज करणारा उमेदवार जर अपंग असेल त्याची माहिती त्याने अर्जामध्ये द्यावी. त्याचबरोबर अपंगत्वाचा दाखला सोबत जोडावा. अपंगत्वाचा दाखला कोणाकडून घेतला आहे. याबद्दलची माहिती लिहावी.
  16. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता दोन्ही अर्जामध्ये लिहायचा आहे.
  17. यानंतर उमेदवाराने स्वतःचा शैक्षणिक तपशील लिहायचा आहे. यामध्ये पूर्ण केलेल्या पदवीचे नाव. कोणत्या विद्यापीठातून पदवी पूर्ण केली त्या विद्यापीठाचे नाव. कॉलेज किंवा संस्थेचे नाव. संस्थेमध्ये ऍडमिशन घेतले त्या महिन्याचे आणि वर्षाची माहिती, पदवी पास झाला त्यावेळेस चा महिना आणि वर्ष याची माहिती, पदवी मध्ये मिळालेले मार्क्स या सर्वांची माहिती अर्जामध्ये लिहायचे आहे.
  18. वरील पदवी व्यतिरिक्त उमेदवाराने इतर कोणत्या पदव्या पूर्ण केले असतील तर त्या संदर्भातील माहिती लिहावी.
  19. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने यापूर्वी ज्या ठिकाणी काम केलेले आहेत. त्याचा अनुभव आणि अनुभवाचे प्रमाणपत्र अर्जामध्ये नमूद करावे.
  20. उमेदवारा वरती कोणताही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल असेल. तर त्या गुन्हा संदर्भातील संपूर्ण माहिती अर्जामध्ये लिहावी. यामध्ये संबंधित कोर्टाचे नाव, केस क्रमांक, IPC चे कोणते कलम दाखल आहेत यासंदर्भातील माहिती
  21. यानंतर उमेदवाराने स्वतःचे सेल्फ डिक्लेरेशन देऊन सही करावी.
CIL Bharti 2024 | कोल इंडिया लिमिटेड द्वारे घेण्यात येणाऱ्या भरती साठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
  1. उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो ( फोटो तीन आठवड्यापेक्षा जुना नसावा ).
  2. जन्मतारखेचा पुरावा असलेले कागदपत्र.
  3. MBBS प्रमाणपत्र किंवा BDS प्रमाणपत्र या व्यतिरिक्त पदव्युत्तर शिक्षण झाले असेल तर त्याचे प्रमाणपत्र.
  4. MCI / DCI / State Medical Council यांच्याकडे नोंदणी झालेले प्रमाणपत्र.
  5. जातीचा दाखला.
  6. दिव्यांग उमेदवारांकरिता अपंगत्वाचा दाखला.
  7. नॉन क्रिमिलेयर दाखला.
  8. CGPA सर्टिफिकेट.
  9. अनुभव प्रमाणपत्र. अनुभव प्रमाणपत्रात कामावर नियुक्त झालेली तारीख आणि काम सोडल्याची तारीख दोन्ही व्यवस्थित नमूद असावे.
  10. वरील पदवी MBBS किंवा BDS पूर्ण करण्यासाठी उमेदवाराला किती प्रयत्न करावे लागले याबाबतचा पुरावा.

भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध संस्थेमधील भरती च्या अपडेट साठी उमेदवारांनी नोकरी 1st या संकेतस्थळाला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment