Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरती 2024

Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस येथे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांकरिता भरती आयोजित केली आहे. भरतीची जाहिरात सोलापूर पोलिसांकडून प्रसिद्ध केलेली आहे. सदरील भरती ही 48 जागांसाठी होणार आहे. 31 मार्च 2024 ही सोलापूर भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 5 मार्च 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सोलापूर पोलीस भरती मध्ये अर्ज करण्याअगोदर खालील माहिती वाचा.

Solapur Police Bharti 2024

 • सोलापूर पोलीस भरती ही 48 जागांसाठी होणार आहे.
 • या भरतीमध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांसाठी अर्ज करायचा आहे.

Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरतीसाठी पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

 • पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी पास आहे. शैक्षणिक पात्रता अजून जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पहावी.
 • सदरील भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 33 वर्षे वय मर्यादा आहे. त्याचप्रमाणे अपंग विद्यार्थ्यांकरिता 45 वर्षापर्यंत वय मर्यादा आहे.
 • सदरील भरती मधून निवड झालेल्या पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदाच्या उमेदवारांना वेतन हे नियमानुसार राहील.
 • भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे सोलापूर ( महाराष्ट्र ) राहील.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 450 शुल्क राहील. तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क राहील.
 • सोलापूर पोलीस विभागाद्वारे अर्ज करण्याकरिता उमेदवारांसाठी ऑनलाइन पोर्टल दिलेले आहे. त्याचा उपयोग करूनच उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सोलापूर पोलीस भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे.
 • सोलापूर पोलीस विभागाकडून पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाण्यासाठी क्लिक करा.  पोलीस शिपाई  पोलीस शिपाई चालक 
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता सोलापूर पोलीस विभाग यांनी लिंग दिलेले आहे. अर्ज करण्यासाठी  क्लिक करा.

Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरतीसाठी खालील नियम वाचा.

 • सोलापूर पोलीस भरती करिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
 • सोलापूर पोलीस विभागामार्फत ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबवलेली नाही.
 • उमेदवारांनी अर्ज करताना स्वतःचे पूर्ण नाव आधार कार्ड नुसारच लिहावे, जन्मतारीख, वय, शिक्षण या सर्वांचा तपशील अर्जामध्ये बरोबर लिहावा. जर उमेदवाराकडून काही चुकले तर त्यास सोलापूर पोलीस विभाग जबाबदार राहणार नाही.
 • 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • सोलापूर पोलीस विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात. उमेदवारांनी डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.

Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच सोलापूर पोलीस भरतीसाठी पात्र असते.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांना भरतीसाठी येण्याकरिता कोणत्याही प्रकारचा TA / DA सोलापूर पोलीस विभागाकडून देण्यात येणार नाही.
 • सोलापूर पोलीस भरती मध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार घडला. तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी ठिकाण सोलापूर पोलीस विभागाद्वारे ठरवले जाईल.
 • वरील पोलीस भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने तो पाहूनच अर्ज करावा.
Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरती साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
 • सर्व महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी उमेदवारांकरिता एकाच ऑनलाइन पोर्टल वरून अर्ज भरायचा आहे.
 • सदरील अर्ज भरण्याची सुरुवात 5 मार्च 2024 पासून होणार आहे.
 • भरायला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करावी.
 • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये ” महाराष्ट्र राज्य पोलीस पोर्टल वरती आपले स्वागत ” असा लिहिलेला मजकूर दिसेल. त्याच्या खालीच पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याचे टप्पे दिसतील.
 • सर्वप्रथम ज्या उमेदवारांना अर्ज भरायचा आहे त्यांनी पोलीस भरती पोर्टल वरती स्वतःची नोंदणी करून घ्यावी.
 • उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करावे.
 • क्लिक केल्यानंतर उमेदवारा समोर नवीन विंडो ओपन होईल. ” महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 – 23″ असे हेडिंग तुम्हाला दिसेल. त्यानंतर खाली उमेदवाराची नोंदणी फॉर्म तुम्हाला दिसेल.
 • या अर्जामध्ये उमेदवाराने आपला चालू ईमेल आयडी भरायचा आहे. त्यानंतर पासवर्ड निवडायचा आहे. स्वतःचा चालू मोबाईल नंबर भरायचा आहे.
 • उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव भरायचे आहे. त्यानंतर देवनागरी भाषेमध्ये उमेदवाराने स्वतःचे नाव लिहायचे आहे. स्वतःच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे. लिंग निवडून आधार कार्डचा क्रमांक लिहायचा आहे.
 • यानंतर उमेदवाराने नियम व अटी मान्य करून आणि कॅपच्या फील करून रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे.
 • उमेदवाराने स्वतःला रजिस्टर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये होम पेज वरून लॉगिन करायचे आहे.
 • लॉगिन केलेल्या उमेदवाराने अर्ज भरायचा आहे. अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
 • यानंतर शेवटच्या टप्प्यात उमेदवाराने शुल्क भरायचे आहे.
Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
 1. SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
 2. जन्म दाखला
 3. रहिवासी प्रमाणपत्र
 4. जातीचे प्रमाणपत्र
 5. जात वैधता प्रमाणपत्र
 6. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT )
 7. खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती ( शासन निर्णय दिनांक. 17/3/2017 व 11/3/2019 प्रमाणे
 8. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
 9. माजी सैनिकां करिता डिस्चार्ज प्रमाणपत्र
 10. गृहरक्षक दला करिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र ( अर्ज करण्यासाठी जाहिरात दिनांक 1095 दिवस पूर्ण झाले पाहिजेत)
 11. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
 12. भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
 13. पोलीस पाल्य प्रमाणपत्र
 14. अनाथ असल्याचे प्रमाणपत्र
 15. अंशकालीन प्रमाणपत्र
 16. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र
 17. एनसीसी प्रमाणपत्र

भरती मधून उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर ही कागदपत्रे शासनाद्वारे पडताळली जातील.

Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरती करिता महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे.
 • सोलापूर पोलीस विभागामध्ये 16 जागा या पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत तर 32 जागा महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
 • दिनांक 05 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
 • Policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या दोन संकेतस्थळावरती पोलीस भरती संदर्भात माहिती उपलब्ध करून दिलेले आहे. उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील पदे ही पोलीस आयुक्त, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा.
 • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एका पदासाठी एका घटकांमध्ये अर्ज करू शकतो.
 • अर्ज भरत असताना उमेदवाराने अर्जामध्ये चुकीची माहिती लिहिली. तर उमेदवाराचा अर्ज कधीही बाद होऊ शकतो.
 • सोलापूर पोलीस भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. त्यामध्ये 50 गुण शारीरिक चाचणीची असणार आहेत. उमेदवाराला या चाचणीत पास होण्यासाठी कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
 • पोलीस शिपाई वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांना 25 गुणांची हलके वाहन चालवण्याची चाचणी आणि 25 गुणांची जीप सारखे वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागेल. या दोन चाचण्यांमध्ये कमीत कमी 40 टक्के गुण मिळाले तर उमेदवार पास होईल. या चाचणीचे गुण गुणवत्ता यादी काढताना ग्राह्य धरले जाणार नाहीत. या चाचणीमध्ये पास होणाऱ्या उमेदवाराची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
 • महाराष्ट्रातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे उमेदवाराने कोणत्या घटकात अर्ज भरायचा ? हे विचार करून निवडावे.
 • शारीरिक चाचणी आणि लिखित परीक्षा यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी बनवण्यात येईल. गुणवत्ता यादीत सहभागी असलेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळली जातील. कागदपत्र पडताळणीनंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. गृहविभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
 • सदरील भरती करता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आवश्यक कागदपत्रे त्याचप्रमाणे समांतर आरक्षण सर्व गोष्टी उमेदवाराने समजून घेऊन मगच अर्ज करावा.
 • कार्यालयाने शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा करिता नेमून दिलेल्या दिनांक नुसार उमेदवाराने चाचणीच्या स्थळी उपस्थित राहावे. उपस्थित न राहणाऱ्या उमेदवाराला भरती मधून बात करण्यात येईल.
 • अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी वेबसाईटवर जाऊन रिक्त असलेल्या पदांची माहिती घ्यावी. आरक्षणानुसार कोणाला किती पदे आहेत? याची माहिती घ्यावी. त्यानंतर अर्ज करावा. खुल्या वर्गातील उमेदवार मागास प्रवर्गातून अर्ज करू शकत नाहीत. मागास प्रवर्गातील उमेदवार खुल्या वर्गातून अर्ज करू शकतात.
Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस भरती करिता अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
 • अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे उमेदवाराने अर्ज भरण्याआधी क्रमानुसार तयार ठेवावीत.
 • अर्जदाराने आपला चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर संकेतस्थळावर ती नोंदवावा. कारण उमेदवाराला इथून पुढच्या सर्व अपडेट्स मेल आयडी आणि मोबाईल नंबर वर पुरवल्या जातील.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच घटकात एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येणार नाही. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या तीन पदांकरिता उमेदवार तीन वेगवेगळ्या घटकांमध्ये अर्ज करू शकतात.
 • प्रत्येक अर्जासाठी अर्जदाराने परीक्षा शुल्क स्वतंत्र भरणे बंधनकारक आहे.
 • सदरील भरतीसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेची तारीख संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
 • सोलापूर पोलीस विभागातील पोलीस शिपाई भरतीमध्ये एकूण 32 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी दहा जागा आहेत. महिलांसाठी 10 जागा आहेत. खेळाडूंसाठी दोन जागा आहेत. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी दोन जागा आहेत. माजी सैनिकांसाठी चार जागा आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी दोन जागा आहेत. गृहरक्षक दलातील उमेदवारासाठी दोन जागा आहेत.
 • सोलापूर पोलीस विभागातील पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये एकूण 16 जागा आहेत. त्यापैकी नऊ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. सहा जागा महिलांसाठी आहेत. माजी सैनिकांवरील उमेदवारांसाठी एक जागा आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये निघालेल्या सर्व पोलीस भरतीच्या अपडेट साठी नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment