[ Hair Loss Reasons ] आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच लोकांना चांगला आहार मिळत नाही. त्याचबरोबर त्यांना बऱ्याच तणावांना सामोरे जावे लागते. यामुळे बर्याच तरुणांमध्ये केस गळतीच्या समस्या दिसून आलेले आहेत. काही लोकांच्या डोक्यावरील केस गेलेले आहेत तर काही लोकांच्या शरीरावरील सुद्धा केस आहे जायला लागली आहे. केस गळती ही तात्पुरत्या स्वरूपाची सुद्धा असते आणि कायमस्वरूपी सुद्धा केस गळती असते. अनुवंशिकतेमुळे, हार्मोन्स मध्ये झालेल्या बदलामुळे, वैद्यकीय कारणामुळे, वयानुसार या सर्व गोष्टींमुळे लोक केस गळतीचे शिकार होत आहेत.
काही तरुणांमध्ये तर कायमस्वरूपी टक्कल पडलेल्या आपल्याला दिसते. आशा तरुणांचे केस जास्त प्रमाणात आणि कमी काळात जास्त गळालेले असतात. टक्कल पडण्याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणजे अनुवंशिकता आहे. बरेच लोक केस गळतीला थांबवणे महत्त्वाचे मानत नाहीत आणि केस गळतीवर उपचार सुद्धा घेत नाहीत. तर याच्या उलट काही लोक केस गळती थांबवण्यासाठी जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करतात. काही लोक टक्कल लपवण्यासाठी कॅप, हॅट आणि काही लोक तर चक्क बनावट केसांचा उपयोग करतात. जे लोक सकारात्मक आहेत असे लोकच केस गळतीवर योग्य तो उपचार घ्यायचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांची केस गळती थांबते आणि पुन्हा केस यायला सुरुवात होते.
कोणत्याही प्रकारची सौंदर्य प्रसाधने केस गळतीसाठी वापरण्या अगोदर वैद्यकीय चिकित्सा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच उपचार सुरू करावा.
[ Hair Loss Reasons ] केस गळतीचे प्रकार
मनुष्यामध्ये केस गळती विविध प्रकारे सुरुवात होते. केस गळती चा प्रकार हा केस गळती ज्या कारणामुळे होत आहे त्याच्यावर आधारित असतो. काही वेळेस केस गळती ही हळूहळू होते तर काही वेळेस केस गळती फास्ट आणि मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे केसा खालील त्वचेवर आणि संपूर्ण शरीरावर परिणाम व्हायला सुरुवात होते. केस गळतीचे प्रकार खालील प्रमाणे दिलेले आहेत.
- मेल पॅटर्न हेयर लॉस
- फीमेल पॅटर्न हेअर लॉस
- पॅची हेयर लॉस ( एलोपेशिया )
- ट्रॅक्शन एलोपेशिया
- फ्रंटल फिब्रुसिंग एलोपेशिया
[ Hair Loss Reasons ] केस गळतीची लक्षणे
- केस विरळ होणे – सुरुवातीला केस विरळ होणे हा एक केस गळती होण्याचे सामान्य लक्षण आहे. वयानुसार व्यक्तीचे केस विरळ व्हायला सुरुवात होते. कपाळाच्या वरच्या भागावर असणाऱ्या केसांना हेअर लाईन असे म्हणतात. पुरुषांमध्ये केस विरळ व्हायच्या वेळेस केस विरळ व्हायची सुरुवात हेअर लाईन पासून होते. महिलांमध्ये केस विरळ होण्याची शक्यता डोक्याच्या मध्यभागापासून असते. तर वयोवृद्ध महिलांमध्ये केस विरळ होण्याची शक्यता हेअर लाईन पासून असते.
- गोलाकार आकारात केस जाणे – लोकांचे केस एक गोलाकार आकारामध्ये जात असतात. त्यांच्या डोक्यावरील केसांमध्ये गोल आकारामध्ये टक्कल पडायला सुरुवात होते. डोक्या बरोबरच दाढीचे सुद्धा केस अशा पद्धतीने जायला सुरुवात होते. केसा खालची त्वचा खाज सुटणारी बनते. केस गळती च्या अगोदर केसाचे मूळ दुखणे चालू होते.
- अचानक केस गळती चालू होणे – व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक आणि मानसिक आघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होते. केसातून हळुवारपणे हात फिरवल्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात केस हातामध्ये येतात. केस धुताना किंवा केस विंचरताना मोठ्या प्रमाणात केस गळतात. अशा प्रकारची केस गळती ही मोठ्या प्रमाणात डोक्यावरील केस कमी करू शकते. परंतु अशा प्रकारची केस गळती तात्पुरत्या स्वरूपाची असते.
- संपूर्ण शरीरावरील केस गळती – काही वैद्यकीय कारणांमुळे म्हणजेच कॅन्सरच्या पेशंटला किमोथेरपी दिल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरावर वरील केस गळून पडतात. अशा प्रकारची केस गळती होणाऱ्या रुग्णांचे केस पुन्हा येतात.
- पॅच मध्ये केस गळती होणे – अशा प्रकारच्या केस गळती मध्ये केस थेट तुटून हातामध्ये येतात. त्यावेळेस त्या ठिकाणची जागा लालसर होते. त्या ठिकाणी खाज सुटते.
[ Hair Loss Reasons ] डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ?
सर्वच माणसांचे केस दररोज गळत असतात. पण हे किरकोळ स्वरूपाची गळत असतात. जर तुमच्या केस गळतीचे प्रमाण दैनंदिन केस गळती पेक्षा अधिक वाढले असेल. तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. महिलांमध्ये हेअर लाइन्स हळूहळू आत मध्ये सरकत चाललेली आहे. आशा महिलांना डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कायमस्वरूपी पडणाऱ्या टक्कल पासून तुम्ही वाचू शकता.
डॉक्टरांसोबत बोलताना तुम्हाला केस विंचरताना दररोज किती केस गळताना दिसत आहेत. किंवा केस धुताना किती केस गळत आहेत. याबद्दलची माहिती डॉक्टरांना देणे गरजेचे आहे. त्यानुसार डॉक्टर उपचार कसा करायचा ते ठरवतील.
[ Hair Loss Reasons ] केस गळतीची प्रमुख कारणे
सर्वसामान्य माणसांमध्ये दररोज 50 ते 100 केस गळत असतात. आणि त्या जागी नवीन केस येत असतात यामुळे लोकांना टक्कल पडत नाही आणि केस गळलेले समजत सुद्धा नाहीत. ज्यावेळेस गळालेल्या केसांच्या जागेवर नवीन केस येत नाहीत यावेळेस व्यक्तीला टक्कल पडायला सुरुवात होते. केस गळती हि एक पेक्षा अधिक कारणांवर अवलंबून असू शकते.
- अनुवंशिकता – टक्कल पडण्याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणजे वयानुसार केस गळती वाढत जाणे. अशा प्रकारच्या केस गळतीला मेल पॅटर्न आणि फीमेल पॅटर्न केस गळती असे म्हणतात. अशा प्रकारची केस गळती ही अनुवंशिकतेने नुसार होत असते. या केस गळतीच्या प्रकारामध्ये हेअर लाईन मागे सरकणे आणि डोक्यामध्ये टक्कल पडणे. यांसारख्या समस्या पुरुषांमध्ये दिसू लागतात. तर महिलांमध्ये केस विरळ होण्याची समस्या दिसते.
- हार्मोन मध्ये बदल होणे – केस गळती होण्याची काही कारणे असे आहेत की ज्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची केस गळती होते किंवा कायमस्वरूपी केस गळती होते. यामध्ये हार्मोन मध्ये होणारा बदलाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. गर्भावस्थेमध्ये, मूल जन्माला आल्यानंतर, थायरॉईडच्या समस्यांमुळे शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल घडतात. यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळती व्हायला सुरुवात होते.
- औषधे आणि सप्लीमेंट – गंभीर किंवा किरकोळ आजारामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी देण्यात आलेल्या औषधांमुळे सुद्धा व्यक्तीला गळतीची समस्या जाणवू शकते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये एखाद्या घटकाची कमतरता पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या सप्लीमेंट च्या आधी सेवनामुळे सुद्धा केस गळतीला सामोरे जावे लागते.
- तणाव – व्यक्तीच्या आयुष्यात आणि त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव असेल तर त्याच्या डोक्यावरील केस गळती मोठ्या प्रमाणात सुरू होते. कामाचा किंवा कौटुंबिक जबाबदारीचा तणाव हे मुख्य कारण तणावामुळे केस गळलेल्या व्यक्तींमध्ये दिसून आलेले आहे.
- हेअर स्टाईल – हेअर स्टाईल चेंज करणे. हेअर स्टाईल करण्या साठी सलून मध्ये विविध प्रकारच्या केसांवरती प्रक्रिया करणे. केसांना जेल लावणे. केसांना सतत वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने लावणे आणि विविध प्रकारच्या हेअर स्टाईल करणे यामुळे सुद्धा केस गळतीचे प्रकार होत आहेत.
[ Hair Loss Reasons ] केस गळतीसाठी कारणीभूत ठरणारे खालील घटक.
- कुटुंबातील इतर कोणत्यातरी सदस्याला टक्कल असणे.
- वय
- अचानक कमी झालेले वजन
- वैद्यकीय समस्या जसे की मधुमेह
- तणाव
- आहार पोषण युक्त नसणे
[ Hair Loss Reasons ] केस गळती होऊ नये म्हणून घ्यायचे दक्षता
केस गळती होऊ नये म्हणून सर्वांनीच काळजी घ्यावी. व्यवस्थित काळजी घेतली तर केस गळती कमी होते आणि काही वेळाने केस गळती पूर्णपणे बंद होते. आणि नव्याने केस यायला सुरुवात होतात. अनुवंशिकतेने होणारी केस गळती ही कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली तरीसुद्धा थांबत नाही. केस गळती व्हायला लागल्यावर खालील प्रकारची दक्षता घ्यावी.
- केसांना काळजीपूर्वक हाताळावे. केस विंचरत असताना मोठ्या दाताच्या कंगव्याने विंचरावे. खास करून जेव्हा केस ओले असतील त्यावेळेस. लहान दात्याच्या केस तुटण्याची शक्यता असते यामुळे अधिक केस गळू शकतात. केसांवर प्रक्रिया करताना गरम पाण्याने कोणतीही प्रक्रिया करू नये. किंवा जास्त गरम पाण्याने कधी डोके धू नये. केसांना इस्त्री करणे, केसांची स्ट्रेटनिंग करणे, केस कुरळी करणे यांसारख्या प्रक्रिया केसांवरती करू नये. यामुळे केस डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. केसाला रबर बँड लावताना केस जास्त ओढू नयेत.
- जर तुम्ही कोणत्याही आजारासंबंधी औषधे किंवा सप्लीमेंट घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कि या औषधांमुळे किंवा सप्लीमेंट मुळे केस गळती होईल का नाही याबाबत सल्ला घ्यावा.
- सूर्याच्या किरणांपासून केसांचा बचाव करावा. किंवा इतर कोणत्याही क्ष किरणांपासून केसांचा बचाव करावा.
- धूम्रपान करू नये. काही स्टडी मध्ये हे सिद्ध झाले आहे की धूम्रपानामुळे केस गळती होत असते.
- जर तुम्ही किमोथेरपी घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना कूलिंग कॅप संदर्भात माहिती विचारा या कॅपच्या वापरामुळे केस गळती होण्याची शक्यता कमी होते.
[ Hair Loss Reasons ] केस गळतीचे निदान.
केस गळतीचे निदान करण्यापूर्वी तुमचे डॉक्टर तुमची काही शारीरिक चाचणी घेतील आणि तुमच्या आहार पद्धती बद्दल माहिती विचारतील. तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणाला केस गळतीची समस्या आहे का याबद्दल माहिती विचारतील. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणता आजार आहे का याची सुद्धा माहिती विचारतील. त्यानंतर तुम्हाला काही खालील टेस्ट करायला लावतील.
- रक्ताची चाचणी – रक्ताच्या चाचणीमुळे केस गळती कशामुळे होत आहे यासंदर्भात माहिती मिळण्याचे सोपे होते.
- केस ओढणे – केस गळतीचे प्रमाण कितपत आहे हे पाहण्यासाठी तुमचे डॉक्टर काही डझन केस डोक्याच्या विविध भागातून ओढतील यामुळे केस कितपत विरळ होत चालले आहेत हे समजेल.
- स्काल्प बायोप्सी – डोक्यावरील केसांच्या खालील त्वचेला स्काल्प असे म्हणतात. जर डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते शोधण्यासाठी स्काल्प चा एक लहान तुकडा काढून मायक्रोस्कोप खाली चेक केला जातो. आणि कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन झाले आहे याबद्दल माहिती मिळवली जाते. आणि त्यानुसार पुढील उपचार ठरवले जातात.