[ Mickey Mouse ] मिकी माऊस ची यशोगाथा
[ Mickey Mouse ] वॉल्ट डिस्ने ही मनोरंजनावर आधारित असलेली कंपनी देशातील 176 वी मोठी कंपनी आहे. या कंपनीची वार्षिक विक्री 2340 कोटी डॉलर्स इतकी आहे. मनोरंजना वरती आधारित असणारी ही कंपनी किती मोठी आहे हे त्याच्या विक्री वरून समजते. या कंपनीची स्थापना करणारा व्यक्ती वॉल्टर एलियास डिस्ने हा आहे.
डिसेंबर 1966 रोजी वॉल्टर एलियास डिस्ने याचा मृत्यू झाला. त्याकाळी ” न्यूयॉर्क टाइम्स” या वृत्तपत्रातून आलेल्या माहितीनुसार वयाच्या 65 व्या वर्षी एका समुद्रकिनारी वॉल्टर याचा मृत्यू झाला होता. वॉल्टर डिस्ने याने आपल्या कलाकृतीतून मनोरंजना करिता एका उंदराची निर्मिती केली होती. तो त्या उंदराला मिकी माऊस असे म्हणत. या मिकी माऊसचे कार्टून्स पुढे जगभर खूप प्रसिद्ध झाले. त्याने त्याच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी केल्या पण त्याची ओळख ही शेवटपर्यंत मिकी माऊस वरूनच पडली. याची त्याला नेहमी खंत वाटत असे.
[ Mickey Mouse ] वॉल्टर डिस्ने आणि त्याची कलाकृती.
शिकागो मधील एका गरीब कुटुंबामध्ये 1901 रोजी वॉल्ट याचा जन्म झाला. त्याला लहानपणापासूनच व्यंगचित्र काढण्याची खूप आवड होती. रिकाम्या मिळणाऱ्या वेळेत तो लोकांची व्यंगचित्र काढत असे यामुळे त्याला काही पैसेही मिळत होते. त्याचबरोबर वॉल्ट हा त्याच्या वडिलांना शेतामध्ये मदत करत असे त्याचबरोबर वृत्तपत्र ही वाटत असे. पुढे जाऊन तो फ्रान्समध्ये ॲम्बुलन्स चालवू लागला. त्याच दरम्यान त्याला वेळ मिळाल्यानंतर तो रेडक्रॉस साठी काही कार्टून्स काढून देत होता. त्याकाळी कार्टून्स बनवण्यासाठी व्यंगचित्राची गरज होती. कारण हलणारे कार्टून्स पडद्यावर दाखवण्याकरिता त्याच्या हालचालीचे व्यंगचित्र कमी वेळात प्रेक्षकांच्या नजरेसमोरून फिरवल्या वरती.
[ Mickey Mouse ] एका पाठोपाठ हालचाल करणारी ही व्यंगचित्रे दाखवल्यामुळे चालते बोलते कार्टून्स तयार व्हायचे. त्यामुळे प्रेक्षकांना आपण स्थिर चित्र न पाहता जलद चित्र पाहत आहे असा भास होतो. वॉल्ट ने पुढे जाऊन कलेच्या वस्तू विकण्याचे दुकान सुरू केले. यामध्ये त्याच्या जोडीला त्याचा पार्टनर आयवर्क्स हा सुद्धा होता. त्या दोघांनी ” आयवर्क्स- डिस्ने” या नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या नावामुळे लोकांना असे वाटते की ही एक चष्मे विक्री करणारी किंवा बनवणारी कंपनी आहे. त्यामुळे त्यांनी तेथे चष्मे खरेदी करण्यासाठी कल दाखवला. या कारणामुळेच त्यांचा व्यवसाय यशस्वी होऊ शकला नाही. आणि काही महिन्यातच काही महिन्यातच कंपनी बंद करावी लागली.
यानंतर डिस्ने ने कॅन्सस सिटी येथे असणाऱ्या एका जाहिरात कंपनीमध्ये काम पत्करले. ॲनिमेशन कार्टून बनवणारी ही कंपनी सिनेमागृहात सिनेमा सुरू व्हायच्या अगोदर सिनेमाच्या नंतर मध्यंतराच्या कालावधीत लोकांना मनोरंजन करण्यासाठी ॲनिमेशन बनवत होती. या ठिकाणी काम करत करत डिस्ने ॲनिमेशन कशा प्रकारे बनवले जाते ते शिकला. पुढे जाऊन डिस्ने याने यामध्ये सुधारणा करण्याचे ठरवले.
[ Mickey Mouse ] ॲनिमेशन फिल्म तयार करण्याच्या व्यवसायात पदार्पण.
डिस्ने याने पुन्हा ॲनिमेशन फिल्म्स तयार करण्यात काम करण्याचे ठरवते. या वेळेस त्याने इतर कोठेही नोकरी न करता स्वतः त्या व्यवसायात पडण्याचे ठरवले. या व्यवसायामध्ये पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीला त्याला काही जाहिराती मध्ये ॲनिमेशन बनवण्याचे काम सुद्धा मिळाले. पण काही काळामुळे त्याच्या धंद्यात मंदी येऊ लागली आणि धंदा पूर्णपणे तोट्यात जाऊ लागला. त्याने नियुक्त केलेले जय व्यंगचित्रकार होते त्यांना वेळेवर पगार न पोचल्यामुळे. त्या सर्वांनी काम सोडून जाण्याचा निर्णय घेतला व तसे राजीनामे ही वॉल्ट कडे सोपवण्यात आले. पुढे जाऊन त्याने स्वतःचे राहते घर सोडले. आणि थोडाफार अन्न खाऊन आपले जीवन व्यतीत करू लागला. शेवट तो कंटाळून कॅलिफोर्नियामधील हॉलिवूड येथे गेला. त्यावेळेस त्याच्या डोक्यावरती 15,000 डॉलर्स इतके कर्ज होते. ते साल होते 1923.
त्या काळात हॉलिवूड हे चित्रपट निर्माण करणाऱ्या लोकांचे केंद्रस्थान झाले होते. त्यावेळेस हॉलीवूड येते बरेच लहान मोठे स्टुडिओ उभा राहिले होते. त्यानंतर व्यावसायिक स्पर्धेमुळे लहान लहान स्टुडिओ मोठ्या स्टुडिओ ने विकत घेतले. आता हॉलीवुड येथे आठ मोठे स्टुडिओ उरलेले होते. डिस्ने याला या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा होती पण त्याचा तोही प्रयत्न फसला आणि त्याला नोकरी मिळाली नाही. पुढे जाऊन आपण स्वतःच स्टुडिओ काढू असा त्यांनी निर्णय केला. त्याकाळी डिस्नेचा भाऊ रॉय हास्य रोगामुळे आजारी होता. त्यामुळे तो एका दवाखान्यात ऍडमिट होता. रॉय याचा सल्ला घेऊन हॉलीवूड मध्ये त्याने ” डिस्ने ब्रदर्स स्टुडिओ” सुरू केला. या स्टुडिओच्या मार्फत सिनेमाच्या सुरुवातीला आणि मध्यंतराच्या कालावधीत दाखवली जाणारे ॲनिमेशन फिल्म्स बनवत होता.
त्यानंतर त्याला हळूहळू ऑर्डर्स मिळू लागल्या एके दिवशी त्याला सहा कार्टून फिल्म्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला. रॉय या आपल्या भावाला त्याने हॉस्पिटल मधून बाहेर काढलं. 10 डॉलर्स इतके महिन्याला भाडे असणारा स्टुडिओ त्यांनी भाड्याने घेतला. यापुढे त्याने दोन कामगार ही कामाला ठेवले. त्या दोन कामगारांमध्ये आयवर्क्स नावाचा त्याचा पूर्वीचा साथीदारही होता. 1924 ते 1926 च्या दरम्यानच्या कालावधीत डिस्ने ब्रदर्स यांच्या हातात बरेच पैसे उरले. कारण या कालावधीमध्ये त्यांनी 100 हून अधिक फिल्म्स तयार केल्या होत्या. मिळालेल्या पैशातून त्यांनी हायपर एवेन्यू या हॉलिवूडमधील ठिकाणी एक मोठा स्टुडिओ उभा केला.
डिस्ने याने ” ओस्वालड” नावाच्या सशाची कार्टून फिल्म तयार केली. तयार केलेली फिल्म त्यांनी वितरकांना विकायला सुरुवात केली. प्रत्येक चित्रपटाला 2250 डॉलर्स वितरकांकडून डिस्ने याला मिळत होते.
[ Mickey Mouse ] मिकी माऊस ची कल्पना डोक्यात आली.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर डिस्ने ट्रेन ने कॅलिफोर्नियाला निघाला होता त्याच वेळी त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येत होत्या आणि त्याच वेळेस मिकी माऊस ची कल्पना त्याच्या डोक्यात आली. या गमतीशीर उंदराची कल्पना त्याच्या डोक्यात आल्यानंतर त्याने त्याला ” मोरटिमर” हे नाव ठेवले होते. पण त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याने त्या उंदराचे नाव ” मिकी माऊस” असे ठेवले. त्याच्या घरात सतत उंदीर पळापळ करत होते त्यावरूनच त्याला हि मिकी माऊस ची कल्पना लक्षात आली होती. ‘ प्लेन क्रेझी’ आणि ‘ गेलंपिन गॅशो’ प्रकारचे चित्रपट काढून झाल्यानंतर त्याने प्रथमच बोलका चित्रपट काढण्याचे ठरवले. या चित्रपटाचे नाव ‘ स्टीम बोट विली’ असे होते.
या चित्रपटामध्ये साऊंड असल्यामुळे ‘ साऊंड इफेक्ट’ साठी दिवस-रात्र मेहनत घेतली. हे करत असताना तू कित्येक वेळा अपयशी झाला. पण त्याने निराश होऊन कधी हार मानली नाही. आधीच्या अनुभवातून त्याला खूप काही शिकायला मिळाले होते त्यामध्ये चित्रपट कधीही विकायचा नाही तो भाड्याने द्यायचा असे त्याने ठरवले. चित्रपट भाड्याने द्यायचा असल्यामुळे कोणीही वितरक त्याच्यासाठी तयार होईना. शेवटी एक वितरण कसाबसा तयार झाला. आणि चित्रपट लोकांनी पाहिला सुरुवात केली. हा चित्रपट बघितल्यानंतर लोकांना अक्षरशः वेड लागले होते.
[ Mickey Mouse ] मिकी माऊसचे विविध चित्रपट बाजारात आले.
या चित्रपटानंतर डिस्ने ने मिकी माऊसचे पात्र असणारे भरपूर चित्रपट काढले आणि हे सर्व चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप गाजले. ‘ दि सिली सिम्फनीज’ हा शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट डिस्ने ने काढला. पण वितरकांकडून त्याला पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे दोघांच्यात हळूहळू वाद वाढू लागला. वाद इतका टोकाला गेला की डिस्ने याचा विश्वासू कामगार असलेला आयवर्क्स याला डिस्ने पासून तोडून वितरकांनी त्याच्याच विरोधात काम करायला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी डिस्ने पैसे मागण्यासाठी वितरकाकडे गेला असता त्याने डिस्ने याला नोकरीची ऑफर दिली. यामुळे डिस्ने खूप चिडला आणि त्यांनी नवीन वितरक शोधायला सुरुवात केली. शेवटी त्याने नवीन वितरक म्हणून कोलंबिया पिक्चर्स बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर डिस्ने याने खूप चित्रपट काढले आणि ते गाजले ही प्रत्येक चित्रपटाच्या मागे त्याला नफा 20000 ते 25,000 डॉलर्स इतका होत होता. आता 1934 पर्यंत डिस्ने याने 6 लाख 60 हजार 600 डॉलर्स इतका नफा सिनेमा निर्मिती मधून मिळवला होता. डिस्ने आता लोकांच्यात प्रसिद्ध होत चालला होता. त्याच्या या कामाचे कौतुक चार्ली चापलीन सहित अनेक मोठ्या दिग्गजांनी केले होते. तीन वर्षाच्या मेहनतीनंतर त्याने ‘ स्नो वाईट अँड सेवन ड्राफ्ट’ हा चित्रपट काढला होता.
हा चित्रपट ही सिनेमागृह मध्ये खूप चालला. समाजातील डावी विचारसरणी असणाऱ्या लोकांनी या चित्रपटाला उचलून धरले. या चित्रपटाची निर्मिती केली म्हणून डिस्ने याला अवार्ड्स मिळाले. या चित्रपटांमुळे डिस्ने याची प्रसिद्धी गगनाला भिडली. त्याकाळी सिनेमातील मिकी माऊस हे पात्र एवढे गाजले होते की मिकी माऊसच्या आकाराची स्कूल बॅग्स, वॉटर बॅग, साबण, सायकली, टी-शर्ट आणि इतर वस्तूंवरती मिकी माऊसची छबी दिसू लागली. मिकी माऊसचे पेटंट डिस्ने याच्याकडे असल्यामुळे त्याला या इतर उत्पादनातून ही बक्कळ पैसे मिळाले. आता मिकी माऊस जगभर प्रसिद्ध झाला होता.
[ Mickey Mouse ] टीव्हीचा शोध आणि मिकी माऊस ची प्रसिद्धी.
एडिसन याने टेलिव्हिजनचा शोध लावल्यानंतर घरोघरी टेलिव्हिजन करमणुकीचे साधन झाले. त्यामुळे डिस्ने याने तयार केलेले चित्रपट टेलिव्हिजन वरती दाखवायला सुरुवात केली. बिझनेस चा कार्यक्रम लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध झाला. त्याच्या या प्रसिद्ध कार्यक्रमाला अनेक कंपन्या स्पॉन्सर करण्यासाठी पुढे येऊ लागल्या. त्यामध्ये कोकाकोला, जॉन्सन अँड जॉन्सन अशा कंपन्या पुढे आल्या. डिस्नेलँड हा डिस्नेचा कार्यक्रम सात वर्षे दाखवण्यासाठी टिव्ही चैनल बरोबर त्याचा करार झाला. यापुढे त्याला सिनेमा निर्मिती करिता एक-दोन कोटी डॉलर्स इतके पैसे लागणार होते. याच काळात कॅलिफोर्निया मध्ये ‘ डिस्ने लँड’ एक मोठं पार्क तयार करण्यात आलं. हे पार्क उभे करण्यासाठी डिस्ने याला बराच विरोध झाला.
पण त्याने हार मानली नाही वयाची 50 वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याने या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी त्याने अनेक आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स आणि कामगार रोजगार मिळवून दिला. या सर्वांच्या अहोरात्र कष्टामुळे डिस्ने वर्ल्ड अस्तित्वात आलं. हे पार्क 1955 रोजी सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. सुरुवातीच्या काळात फक्त 200 लोकांनी या पार्कला भेट दिली होती. त्यानंतर दिवसेंदिवस भेट द्यायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. 1965 पर्यंत एकूण 5 कोटी अमेरिकन लोकांनी या पार्कला भेट दिली होती. या पार्कमध्ये जाहिराती लावण्यासाठी कंपन्या डिस्ने याला मोठ्या प्रमाणात पैसे देत होत्या.
या यशानंतर डिस्ने याने 27000 एकर जागा अमेरिकेच्या ओरलांडो, फ्लोरिडा येथे घेऊन 27000 एकरात ‘ डिस्ने वर्ल्ड’ उभा केलं. पण हे डिस्ने वर्ल्ड उभा होण्याआधीच 1966 रोजी वॉल्ट डिस्ने मरण पावला.
[ Mickey Mouse ] डिस्ने तयार केलेल्या या भल्या मोठ्या साम्राज्याचं श्रेय हे डिस्ने ला जात. त्याने खूप कठोर परिश्रम घेऊन कंपनी सुरू केली होती. आणि त्याला यशाच्या अति उच्च शिक्षित शिखरावर नेऊन पोहोचवले. ने याचा मृत्यूनंतर कंपनीतील सर्व वातावरण उदास झाले होते. डिस्ने कडे असणारे नवनिर्मिती आणि चैतन्य आता कंपनीमध्ये दिसत नव्हते. त्यामुळे आता कंपनीचे काय होणार ? असा विचार सर्वांपुढे आला.