Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह विभाग येथे 513 जागांकरिता भरती.

Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 31 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पोलीस शिपाई या पदाच्या जागांकरिता सदरील भरती होणार आहे. या पदाकरिता उमेदवाराने वेबसाईट चा उपयोग करून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

Maharashtra Karagruh Vibhag Bharti

 • महाराष्ट्र कारागृह विभागाची ही भरती 513 पदांकरिता होणार आहे.
 • महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याद्वारे घेण्यात येणारी भरती पोलीस शिपाई या पदाकरिता होणार आहे.

Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह विभाग येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि महत्त्वाच्या अटी खालीलप्रमाणे.

 • कारागृह पोलीस शिपाई पदासाठी 12 वी पास असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचा.[Maharashtra Karagruh Police Bharti]
 • महाराष्ट्र कारागृह पोलीस शिपाई या पदावरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
 • महाराष्ट्र कारागृह विभाग येथील भरतीसाठी निवड होणाऱ्या उमेदवारा करिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.
 • महाराष्ट्र कारागृह विभाग येथील भरतीसाठी परीक्षा शुल्क 450 रुपये इतका आहे. तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 350 रुपये इतका आहे.
 • पात्र उमेदवारा करिता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कारागृह विभाग यांच्याद्वारे संकेतस्थळ देण्यात आलेली आहे. उमेदवार आणि त्याद्वारे चा अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरती करिता अर्ज भरण्याची सुरुवात 5 मार्च 2024 पासून होईल असे महाराष्ट्र कारागृह विभागाद्वारे सांगण्यात आलेले आहे.
 • महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याद्वारे 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्या अगोदर महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचा. जाहिरात पहा

Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह पोलीस या भरती करिता अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • महाराष्ट्र कारागृह पोलीस या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • सदरील भरती करिता ऑफलाइन अर्ज करायची कोणतीही पद्धत महाराष्ट्र कारागृह विभागाद्वारे राबवलेली नाही.
 • अर्ज भरत असताना प्रत्येक उमेदवाराने अर्जामधील सर्व माहिती बरोबर लिहायचे आहे त्यामध्ये काही चूक झाली तर त्याला महाराष्ट्र पोलीस कारागृह प्रशासन जबाबदार राहणार नाही.
 • महाराष्ट्र कारागृह विभागाद्वारे 31 मार्च 2024 या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र कारागृह विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
 • महाराष्ट्र कारागृह भरती विभाग येथे निवड होण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अर्ज करणे गरजेचे आहे.
 • सदरील भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA न देण्याचा निर्णय महाराष्ट्र कारागृह विभागाने घेतलेला आहे.
 • आज-काल पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये गैरप्रकार उमेदवाराकडून घडलेल्या च्या गोष्टी बघायला मिळत आहेत. सदरील भरती मध्ये उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई महाराष्ट्र कारागृह विभागात द्वारे करण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये उमेदवाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया पूर्णपणे महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याकडे आहे. उमेदवारांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या वेळेनुसार हजर राहावे.
 • सदरील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील.
 • महाराष्ट्र कारागृह शिपाई ( सेवाप्रवेश) नियम, 2011 आणि या नियमांमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेला बदल त्याचप्रमाणे दिनांक 15 जानेवारी 2016 च्या आदेशानुसार सदरील भरती आहे.
 • वरील जागा ह्या कारागृह पश्चिम विभाग, पुणे येथील आहेत.
 • महाराष्ट्र कारागृह विभागातील रिक्त जागा ह्या अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवर 2022-23 या वर्षातील भरल्या जाणार आहेत.
 • सदरील भरती मध्ये कारागृह विभागाच्या एकूण 1800 जागा भरण्यात येणार आहेत.
 • सदरील भरती मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कारागृह विभागाच्या एकूण 1800 जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पश्चिम विभाग, पुणे येथील 513 जागा भरायचे आहेत.
 • www.policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 5 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 या कालावधी दरम्यान ऑनलाइन भरायचा आहे.
 • कारागृह विभागाच्या भरतीमध्ये उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रातील एकाच घटकांमध्ये अर्ज करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवाराने आपल्या कास्ट करिता ज्या घटकांमध्ये जास्त जागा आहेत तेथे अर्ज करावा.
 • सदरील फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्यामुळे हा फॉर्म भरताना उमेदवाराने अपूर्ण भरला किंवा भरलेली माहिती निवड समितीला समजली नाही तर असा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
 • कारागृह विभागातील पोलीस शिपाई या पदाच्या भरती करिता उमेदवाराची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक चाचणीची तारीख प्रत्येक घटकात वेगवेगळे राहील. पण शारीरिक चाचणीनंतर घेण्यात येणाऱ्या लेखी चाचणी ची वेळ आणि तारीख संपूर्ण महाराष्ट्रातील घटकांमध्ये एकच राहील आणि एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी विचार करून करावा.
 • महाराष्ट्र पोलीस कारागृह भरती करिता पोलीस शिपाई या पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी मध्ये उमेदवाराला कमीत कमी 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. तरच उमेदवार भरतीसाठी पात्र होईल. त्याचप्रमाणे उमेदवाराची 100 मार्काची लेखी चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी चाचणी मध्ये उमेदवाराला एकूण गुणांच्या 40% मार्क मिळणे आवश्यक आहे. लेखी चाचणी मध्ये उमेदवाराला जर 40% पेक्षा कमी गुण असतील तर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.
 • महाराष्ट्रातील सर्व पोलीस घटकांमध्ये त्याचप्रमाणे बँड्समन, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह विभागातील पोलीस शिपाई या सर्व पदांकरिता लेखी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी घेण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी दखल घेऊनच अर्ज करावा.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी या दोन परीक्षा झाल्यानंतर त्या दोन्हीचे गुण आणि त्यातून निघालेल्या निकषावर उमेदवाराची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रत्येक प्रवर्गातील आरक्षण लक्षात घेऊन बनवण्यात येईल. त्याचप्रमाणे या यादीमध्ये ज्या उमेदवाराचे नाव असेल त्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळली जातील. कागदपत्रे पडताळणी मध्ये उमेदवार बाद करण्यात आला तर पुढील यादी मध्ये त्या उमेदवाराचे नाव ग्राह्य धरले जाणार नाही. कागदपत्री पडताळणीत योग्य ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल. यानंतर गृहविभाग, शासन निर्णय दि. 10-11-2020 नुसार उमेदवाराची अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
 • कारागृह विभागाच्या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरून ची जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी. आणि जाहिरात मध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, परीक्षा शुल्क, कागदपत्रे, अर्ज करण्याची तारीख, अर्ज करण्याची अंतिम तारीख, आरक्षणासंदर्भातील तरतुदी या सर्व गोष्टी उमेदवाराने काळजीपूर्वक वाचून त्यानंतरच अर्ज करावा.
 • कारागृह विभागाच्या सदरील भरती मध्ये समांतर आणि अनाथ यांच्याकरिता 1% आरक्षण लक्षात घेऊनच सदरील जागा काढलेल्या आहेत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराने शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी या दोन्ही चाचण्यांना वेळेवर उपस्थित राहायचे आहे. जर उमेदवार या चाचण्यांना गैरहजर राहिला तर त्याला निवड प्रक्रियेतून बात करण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने निवड समितीद्वारे चाचण्या करिता देण्यात आलेली वेळ आणि दिनांक नीट लक्षात ठेवायचे आहे आणि दिलेल्या वेळेत हजर राहायचे आहे.
 • सर्व उमेदवारांनी भरती करिता अर्ज करत असताना आपल्या कॅटेगरी ला कोठे जास्त जागा आहेत याचा विचार करून अर्ज करायचा आहे. आणि त्यानुसारच अर्ज करायचा आहे. मागास प्रवर्गातील उमेदवार खुल्या वर्गाकरिता अर्ज करू शकतात. पण खुल्या वर्गातील उमेदवार मागास प्रवर्गासाठी अर्ज करू शकत नाहीत.
 • पुढील काळात जाहिरातीमधील दिलेल्या पदांच्या जागेमध्ये काही बदल झाले म्हणजेच जागा कमी जास्त झाल्या तर त्याची पूर्ण माहिती संकेतस्थळावरती दिली जाईल. उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर वारंवार संकेतस्थळाला भेट द्यावी.
 • सर्वोच्च न्यायालयात शासनाने दाखल केलेल्या पदोन्नती वरील आरक्षणासंदर्भात याचिका क्रमांक 28306/2017 च्या निर्णयाबाबत अधीन राहून समितीने पदांची संख्यान ठरवलेली आहे. जर यापैकी कोणत्याही परिस्थितीत किंवा निकालानंतर सदरील पदांची संख्या ही कमी जास्त होऊ शकते. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
Maharashtra Karagruh Police Bharti | महाराष्ट्र कारागृह विभाग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
 • कारागृह पोलीस शिपाई भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन व इतर कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने अर्ज उमेदवाराला करता येणार नाही.
 • सदरील भरती करिता महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याद्वारे देण्यात आलेल्या संकेतस्थळावरून च उमेदवारांनी अर्ज करावा.
 • दिनांक 4 मार्च 2024 रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून म्हणजेच 5 मार्च 2024 पासून महाराष्ट्र कारागृह पोलीस भरती करिता अर्ज करण्यात येणार आहेत.
 • सदरील भरती करिता उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2024 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंतच अर्ज करता येणार आहेत. 1 मार्च 2024 सुरू झाल्यापासून उमेदवाराला अर्ज करता येणार नाहीत.
 • पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून भरतीमध्ये सहकार्य करतो किंवा इतर काही फायदा करून देतो यासाठी कोणीही कोणत्याही प्रकारची मागणी केली. तर त्या उमेदवाराने तात्काळ अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी संपर्क साधून सदरील व्यक्तीची तक्रार करायची आहे. या व्यतिरिक्त उमेदवार अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतात.

महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील आणि इतर सरकारी नोकरी संदर्भात अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment