Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. त्या भरती संदर्भात महाराष्ट्र राज्य कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. 20 मार्च 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मध्ये एकूण 5347 जागा रिक्त आहेत. वितरण कंपनी लिमिटेड येथील भरती ही विद्युत सहाय्यक पदासाठी होणार आहे. सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती अवश्य वाचा.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे घेण्यात येणारी भरती ही 5347 जागांसाठी आहे.
- विद्युत सहाय्यक या पदासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ची भरती होणार आहे.
Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी द्वारे निघालेल्या भरतीतील पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.
- विद्युत सहाय्यक पदासाठी 10 + 2 बंधा मधील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- विद्युत सहाय्यक पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मागास वर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट आहे.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड विद्युत सहाय्यक म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला वेतन हे 15,000 रुपये ते 17 हजार रुपये इतके देण्यात येईल.
- पदावरती निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राहील.
- सदरील भरती मध्ये उमेदवारा करिता प्रवेश शुल्क 250 रुपये आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवार आणि अनाथ उमेदवारांसाठी 125 कृपया आहे.
- विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी द्वारे अर्ज भरण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी द्वारे घेण्यात येणाऱ्या भरती करिता खालील नियम वाचा.
- विद्युत सहाय्यक या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याची कोणती पद्धत महावितरण कंपनीद्वारे राबवण्यात आलेली नाही.
- सदरील पदाकरिता अर्ज भरत असताना उमेदवारांनी आपली स्वतःची माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, पिनकोड, शिक्षण यातील कोणतीही गोष्ट चुकीची भरली. तर त्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जबाबदार राहणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
- 20 मार्च 2024 ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवाराने पहावी.
Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र ठरू शकतात.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी द्वारे कोणत्याही प्रकारचा TA/DA उमेदवारांना देण्यात येणार नाही.
- सदरील भरती मध्ये उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला गेला. तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अर्ज केलेले उमेदवारच ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी देण्याकरिता पात्र असतील.
- सदरील भरती संदर्भात आवश्यक माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे.
Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी द्वारे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती उमेदवाराने क्लिक करावी. CLICK HERE
- वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महावितरण कंपनीचा लोगो दिसेल. त्याचप्रमाणे त्याच्याखाली महत्त्वाच्या भरत्या आणि महत्त्वाच्या तारखा दिसतील.
- उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी उजव्या बाजूला फॉर्म दिलेला आहे. जर उमेदवाराने रजिस्टर केले असेल. तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या भरून उमेदवार लॉगिन होऊ शकतो.
- नवीन उमेदवारांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरिता क्लिक फोर न्यू रजिस्ट्रेशन असे लिहिलेल्या पिवळ्या कलरच्या बटनावर क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर उमेदवारा समोर त्याची मूलभूत माहिती भरण्यासाठी अर्ज दिसेल. तो अर्ज उमेदवाराने भरायला सुरु करावा.
- सर्वप्रथम उमेदवारांनी स्वतःचे पहिले नाव लिहावे. त्याच्या खालच्या बाजूला पहिले नाव पुन्हा एकदा कन्फर्म लिहावे. त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे मिडल नेम लिहावे. त्याच्याखाली कन्फर्म मिडल नेम लिहावे. त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे आडनाव लिहावे. आणि पुन्हा एकदा कन्फर्म आडनाव लिहावे.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव लिहायचे आहे.
- उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर लिहावा. तो मोबाईल नंबर कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा लिहावा. उमेदवारांनी स्वतःच्या मोबाईल नंबर बरोबरच एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर अर्जामध्ये भरावा.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचा चालू ई-मेल आयडी अर्जामध्ये भरायचा आहे. त्यानंतर उमेदवाराने ई-मेल आयडी कन्फर्म करायचा आहे.
- उमेदवाराने सिक्युरिटी कोड भरून सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये उमेदवाराला स्वतःचा फोटो आयडेंटी साईज मधला आणि स्वतःची सही स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
- यानंतर उमेदवाराने अपलोड केलेला फोटो आणि सही स्वतःचीच आहे याचे कन्फर्मेशन देऊन नेक्स्ट बटन वर क्लिक करायचे आहे.
- उमेदवाराने अपलोड केलेला फोटो हा 4.5cm X 3.5 cm या साईज चा असला पाहिजे. अपलोड केला जाणारा फोटो हा कलर असला पाहिजे त्याचबरोबर त्याचे बॅकग्राऊंड हे पांढरे असले पाहिजे. फोटो काढताना उमेदवाराने चष्मा किंवा गॉगल घालू नये. अपलोड केल्या जाणाऱ्या फोटोची साईज 20 केबी ते 50 केबी पर्यंत पाहिजे.
- उमेदवाराने अपलोड केलेली सही ही पांढऱ्या कागदावरती काळा शाईच्या पेनने केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने डाव्या हाताचा अंगठा निळ्या किंवा काळा शाईने पांढऱ्या पेपर वरती उठवावा. उमेदवाराने परीक्षा स्थळी केलेली सही आणि अपलोड केलेली सही ही मॅच झाली नाही. तर उमेदवार बाद केला जाऊ शकतो.
- 140 X 60 Pixel या साईज चा सही चा फोटो अपलोड करावा.
Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती संदर्भातील अधिक माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरतीतील विद्युत सहाय्यक हे पद कंत्राटी भरती द्वारे भरण्यात येणार आहे.
- निवड झालेल्या उमेदवाराचा तीन वर्षाचा कंत्राटी करार राहील.
- या भरतीमध्ये खेळाडूंसाठी वयोमर्यादा मध्ये पाच वर्षे सूट राहील.
- उमेदवाराच्या वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या बोर्डाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले राहिले.
- निवड झालेल्या उमेदवाराला प्रथम वर्षी 15,000 रुपये वेतन देण्यात येईल. दुसऱ्या वर्षी 16,000 रुपये इतके वेतन देण्यात येईल. तिसऱ्या वर्षी उमेदवाराला 17 हजार रुपये वेतन देण्यात येईल.
- उमेदवाराला देण्यात येणाऱ्या पगारातून पीएफ, इन्कम टॅक्स वजा करून त्याला पगार देण्यात येईल.
- सदरील भरती मधील पदेही आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील उमेदवारांनाच आरक्षणाचा फायदा होईल.
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग याद्वारे उमेदवाराने परीक्षा शुल्क भरायची आहे.
- एकदा भरलेली प्रवेश शुल्क उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा. त्याचप्रमाणे त्याला मराठी भाषा व्यवस्थित बोलता यावी. ही अट आहे.
Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे निवड पद्धती खालील प्रमाणे.
- भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता ऑब्जेक्टिव्ह चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे स्वरूप ऑनलाइन राहील. ही चाचणी तांत्रिक क्षमता चाचणी असेल. सामान्य ज्ञान आणि पदासाठी आवश्यक असलेले ज्ञान या विषयावरती चाचणी राहील. इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांमध्ये ही चाचणी देण्यात येईल.
- या चाचणीचे एकूण गुण 150 असतील. 110 गुण हे तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान यावर असतील. 20 गुण हे तर्कशक्ती साठी असतील. 10 गुण हे संख्यात्मक अभियोग्यता साठी असतील. 10 गुण हे मराठी भाषेसाठी असतील.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड साठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन चाचणीसाठी वेळ हा 120 मिनिट इतका राहील.
- या ऑनलाईन चाचणी मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल. उमेदवाराने दिलेल्या चुकीच्या उत्तरा साठी उमेदवाराचे 0.25 इतके गुण कापले जातील. उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास त्याचा कोणताही गुण कापला जाणार नाही.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे यापूर्वी उमेदवाराने जर कंत्राटी काम केले असेल तर त्याला प्रति वर्ष कंत्राटी कामाचे दोन गुण असे गुण देण्यात येतील. उमेदवाराने पाच वर्षे काम केलेले असेल तर त्याला 10 गुण देण्यात येतील.
- महावितरण मध्ये यापूर्वी केलेल्या कामाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने अर्ज करताना स्वतःच्या अनुभवाचे प्रमाणपत्र अर्जाबरोबर जोडावे. त्याचा तपशील अर्जामध्ये लिहावा.
- सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारा कोणताही खोटा तपशील अर्जामध्ये भरण्यात आला तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- जर या भरतीमध्ये दोन उमेदवारांना सारखेच गुण मिळाले. तर या दोन्ही उमेदवारांच्या जन्मतारखा तपासल्या जातील. ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्या उमेदवाराला ही संधी दिली जाईल. या व्यतिरिक्त जर दोन पेक्षा अधिक उमेदवारांना सारखे गुण मिळाले असतील आणि त्यांच्या जन्मतारखा ही समान असतील तर त्यांचे दहावीचे बोर्डाचे मार्क तपासले जातील.
- उमेदवाराला दस्तावेज सादर करण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यावेळी जर उमेदवाराने दस्तावेज सादर केले नाहीत तर त्याची उमेदवारी रद्द होईल.
- या भरतीमध्ये उमेदवाराची निवड करण्याकरिता वरील प्रक्रियेचा वापर केला जाईल. पण भरतीच्या कोणत्याही टप्प्यात निवड प्रक्रिया बदलण्याचा पूर्णपणे अधिकार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड त्यांच्याकडे राहील.
- उमेदवारांनी अर्जाचा नमुना पाहण्यासाठी https://www.mahadiscom.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- ऑनलाइन तांत्रिक चाचणी क्षमता ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येणार आहे. ऑनलाइन तांत्रिक चाचणी क्षमता करिता देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रा वरती परीक्षा केंद्राबद्दल माहिती देण्यात येईल. जर त्या परीक्षा केंद्रावर ती उपलब्ध जागांपेक्षा जास्त उमेदवार झाले. तर उमेदवाराला जवळील दुसऱ्या परीक्षा केंद्रावरती जागा उपलब्ध करून दिली जाते.
महावितरण सारख्या महाराष्ट्र सरकारच्या आणि भारत सरकारच्या सरकारी संस्थांमधील रिक्त पदांच्या भरती करिता अर्ज करण्यासाठी किंवा या पदांच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमची वेबसाईट नोकरी फर्स्ट येथे भेट द्या – क्लिक करा.