[ Aloe Vera Benefits ] कोरफड वनस्पती पासून होणारे फायदे.

[ Aloe Vera Benefits ] कोरफड वनस्पती संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

[ Aloe Vera Benefits ] कोरफड ही एक काटेरी झुडूप असणारी वनस्पती आहे. याचा रंग हिरवा असतो. कोरफडीच्या पानांमध्ये रसाळ द्रव्य असते. या द्रव्या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे पोषक द्रव्य कोरफडीचा जेलमध्ये असतात. याचा उपयोग सौंदर्य शास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हामुळे काळी पडलेली त्वचा पुन्हा सुधरवण्यासाठी कोरफडीच्या जेलचा उपयोग केला जातो. जखम बर्‍या करणाऱ्या बऱ्याच मलम मध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. त्वचेवर येणाऱ्या रॅशेस त्याचप्रमाणे सूज आलेल्या भागांसाठी कोरफडीचा उपयोग फायदेशीर ठरतो. बद्धकोष्ठता, दमा, शुगर यांसारख्या आजारांवर उपचार म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. कोरफडी मध्ये विविध प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात त्याचा उपयोग करून मानवी शरीरातील कमजोरी दूर करण्यात येते.

आयुर्वेदामध्ये कोरफडीला एक महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणून स्थान प्राप्त झालेले आहे. संस्कृत मध्ये कोरफडीला घृत कुमारी असे म्हणतात. तर इंग्रजी मध्ये एलोवेरा असे म्हटले जाते. कोरफडीच्या रसामध्ये पोषक तत्व असतात त्यामुळे कोरफडीच्या रसाला आरोग्यदायी असे म्हटले जाते. प्रामुख्याने कोरफडीच्या रसामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी 1, विटामिन बी 2, विटामिन बी 3, विटामिन बी 6 यांसारखे विटामिन भरपूर मात्रा मध्ये कोरफडी मध्ये असतात. विटामिन्स बरोबरच कोरफडी मध्ये खनिजांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यांसारखे खनिज कोरफडी मध्ये मोठ्या प्रमाणात आढळले जातात. फोलिक ऍसिडचे प्रमाण सुद्धा कोरफडी मध्ये भरपूर असते. ज्या व्यक्तींच्या शरीरात विटामिन ची कमतरता आहे अशा व्यक्तींनी दररोज कोरफडीचे सेवन केल्याचे फायद्याचे ठरू शकते.

[ Aloe Vera Benefits ] कोरफडीच्या सेवनामुळे होणारे फायदे खालील प्रमाणे.

  • आतड्यांना होणारा फायदा   कोरफडी मध्ये अंतीबॅक्टरियल प्रॉपर्टी असते त्यामुळे याच्या सेवनामुळे आतड्यांना झालेली कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते. आतड्यांना झालेल्या जखमा म्हणजेच अल्सर मध्ये कोरफडीचा उपयोग फायदेशीर ठरतो. कोरफडी मध्ये डायजेस्टिव्ह एक्झाम सुद्धा असतात यामुळे बद्धकोष्ठता, आतड्याला सूज येणे, चिडचिडपणा यासारख्या समस्यांवर गुणकारी उपाय म्हणून उपयोग केला जातो. पचनशक्ती वाढवण्यास कोरफडीची मदत होते. पचना संदर्भातील तक्रारी कमी होण्यास कोरफडीचा फायदा होतो.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवते –  कोरफडीच्या दररोजच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोरफडी मध्ये पॉलिसेकेराइड्स नावाचा घटक असतो ज्यामुळे शरीरात मध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात कोठेही इन्फेक्शन होत असल्यास पांढऱ्या पेशी त्याच्याशी लढण्यास सक्षम असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती शरीरातील वाढते.
  • वजन कमी करण्यास मदत करते – ज्या व्यक्तींचे मेटाबोलिजम कमी आहे अशा व्यक्तींच्या शरीरावर चरबी साठण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांचे वजन सुद्धा इतरांच्या तुलनेत अधिक वाढत असते. अशा व्यक्तींनी जर कोरफडीचे सेवन केले तर त्यांची पचनशक्ती सुधारून मेटाबोलिजम वाढते आणि यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारची चरबी साठत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.
  • विटामिन सी चे प्रमाण वाढवते –  बऱ्याच व्यक्तींच्या शरीरामध्ये विटामिन सी चे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरफडी मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. जर दररोज कोरफडीचे सेवन केले तर तीन महिन्याच्या आतच विटामिन सी ची पातळी सुधारते. बाजारात मिळणाऱ्या महागड्या सप्लीमेंट पेक्षा कोरफडीचे सेवन करणे फायदेशीर आहे.
  • रक्तातील साखर कमी करते – शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यानंतर रक्तातील साखर वाढत असते. याच इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्याचे काम कोरफडीच्या रसा द्वारे केले जाते. कोरफडीचा रस हा इतर रसा सारखा गोड नसतो. म्हणजेच त्यामध्ये साखर नसते. यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास कोरफडीचा उपयोग केला जातो. स्वादुपिंड निरोगी राहण्यासाठी सुद्धा कोरफडीचा रसाचा उपयोग केला जातो.
  • त्वचेसाठी फायदेशीर –  त्वचा टवटवीत राहण्यासाठी त्याचप्रमाणे त्वचावर सुरकुत्या न पडण्यासाठी, त्वचा जवान राहण्यासाठी शरीरामध्ये कोलेजन नावाचा घटक असणे गरजेचे असते. कोरफडीच्या वापरामुळे त्वचेतील कोलेजन विकसित होते त्याचे प्रमाण वाढते. ज्या व्यक्तींना वया आधीच त्वचेवर सुरकुत्या आलेल्या आहेत अशा व्यक्तींनी कोरफडीच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
  • एंटी ऑक्सीडेंट – एंटी ऑक्सीडेंट हा माणसाच्या आहारामधील खूप महत्त्वाचा घटक आहे. ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनत असते. शरीरात निर्माण होणाऱ्या फ्री रॅडिकल ला निष्क्रिय करण्याचे काम एंटीऑक्सीडेंट करत असते. यामुळे शरीर गंभीर आजारांपासून दूर राहते. पण धावपळीच्या जीवनात आहारातील एंटीऑक्सीडेंट हा घटक दुर्मिळ होत चाललेला आहे. कोरफडी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. याच्या सेवनामुळे शरीराला एंटीऑक्सीडेंट मिळतात. आणि त्यांची कमी पूर्ण होते.
  • जखम बरी होण्यास मदत होते –  अपघातामुळे झालेली एखादी जखम, कापल्यामुळे झालेले एखादी जखम किंवा भाजल्यामुळे झालेली जखम बरी करण्यासाठी कोरफडीच्या जेलचा उपयोग केला जातो. कोरफडी मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते. जखमेवर लावणाऱ्या अनेक मलम मध्ये कोरफडीचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो.
  • तोंडाचे आरोग्य सुधारते – कोरफडी मध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असल्यामुळे तोंडामध्ये झालेले कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते. दातांमध्ये कीड निर्माण करणारे जंतू त्यामुळे नष्ट होतात. तोंडामध्ये झालेला अल्सर बरा करण्यास सुद्धा कोरफडीची मदत होते.
  • केसांच्या समस्या कमी करते – कोरफडीच्या सेवनामुळे केसांना आवश्यक असणारे पोषक तत्व मिळतात. त्याचप्रमाणे कोरफड केसांवरती लावल्यानंतर केसांचे गळणे कमी होते. केसांमधील कोंडा कमी होतो. केस मुळापासून मजबूत बनतात. केस चमकदार बनतात. केसात संबंधित कोणत्याही समस्यांमध्ये कोरफडीचा उपयोग केल्यानंतर रुग्णांना फायदाच पोहोचतो.
  • कोलेस्ट्रॉल कमी करते – कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण होय. कोरफडीच्या वापरामुळे लिव्हर मधून बाहेर पडणारे चरबीचे प्रमाण 30% पर्यंत कमी होते. आणि त्यामुळे रक्तामध्ये चरबी साठत नाही परिणामी कोरफडीच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
  • स्किन टॅनिंग कमी करते – उन्हात काम केल्यामुळे किंवा दिवसभर उन्हात राहिल्यामुळे त्वचा काळी पडत असते. त्याला स्किन टॅनिंग असे म्हणतात. ही काळी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी बनवण्याकरिता कोरफडीच्या जेलचा उपयोग केला जातो. उन्हामुळे काळी पडलेल्या त्वचेवर कोरफडीचे जेल लावल्यानंतर टॅनिंग कमी व्हायला सुरुवात होते. आणि काही दिवसातच त्वचा पहिल्यासारखी होते.

[ Aloe Vera Benefits ] कोरफडीचे सेवन कशा प्रकारे करावे ?

  • कोरफडीच्या पानांच्या आतील गर बाजूला काढून स्वच्छ धुऊन घेऊन त्याचे खाण्यायोग्य तुकडे करावेत आणि उपाशीपोटी खावे.
  • बऱ्याच लोकांना थेट कोरफडीचा गर खाणे त्रासदायक वाटते. त्यांनी कोरफडीच्या घराचे बारीक तुकडे करून दह्यामध्ये मिसळून किंवा कोशिंबिरी मध्ये टाकून सेवन करू शकता.
  • कोरफडीचे वेगवेगळे ज्यूस सध्या मार्केटमध्ये मिळत आहेत. त्यातील चांगल्या कंपनीचा ज्यूस निवडून त्याचे सेवन सुद्धा तुम्ही करू शकता.
  • कोरफडीचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स करून त्याचे एकजीव मिश्रण बनवून उपाशीपोटी पिल्याने सुद्धा फायदा होतो.
  • फळांचा रस तयार करत असताना त्यामध्ये कोरफडीचा वापर केला तर खूप फायदेशीर ठरू शकतो.

[ Aloe Vera Benefits ] कोरफडीची घरी लागवड कशी करावी ?

कोरफड ही कमी पाण्यात येणारी वनस्पती आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे झाडांना देण्याकरिता जास्त पाणी नाही असे लोक सुद्धा कोरफडीची लागवड करू शकतात. कोरफड ही काटेरी झुडूप असल्यामुळे त्याची लागवड घराबाहेरील अंगणात एखाद्या कोपऱ्यामध्ये करावी किंवा गच्ची वर एखाद्या कोपऱ्यात त्याची लागवड करू शकता. यामुळे त्याच्या काट्यांचा त्रास लोकांना होणार नाही. एकदा ही वनस्पती लावल्यानंतर याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. कोरफडीचे मुळे जमिनीमध्ये जास्त खोल जात नाहीत. त्यामुळे तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा कोरफडीचे रोप लावू शकता.

कोरफडीची पाने ही खूप जाड असतात कारण त्यामध्ये द्रव्य युक्त घर असतो. आणि पानांना वरच्या बाजूने काटे असतात. एकदा पानांची वाढ झाली की ब्लेडच्या सहाय्याने अशी पाने कापून घ्यावीत आणि त्यांचा उपयोग करायला सुरु करावा. कोरफडीला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. जास्त पाणी मिळाल्यामुळे कोरफड जळून जाऊ शकते. यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य सोय केलेली असावी.

[ Aloe Vera Benefits ] कोरफडीचे जेल घरी बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे.

कोरफडीचे जेल घरी बनवण्यासाठी लावलेल्या कोरफडीचे मोठे पान ब्लेडच्या साह्याने कट करून घ्यावे. कट केलेले कोरफडीचे पान काही काळ तसेच ठेवावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने कोरफडीचे पान धुऊन घ्यावे. पानाच्या वरील हिरवी बाजू ब्लेडच्या साह्याने कापून सेपरेट करावी. त्यानंतर आत मध्ये तुम्हाला कोरफडीचे जेल दिसेल. ते कापून पानांपासून वेगळे करावे. या जेलचा उपयोग तुम्ही थेट करू शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवून एक आठवड्यापर्यंत याचा उपयोग करू शकता.

[ Aloe Vera Benefits ] कोरफडीच्या सेवनामुळे होणारे साइड इफेक्ट्स

Aloe Vera Benefits

  • कोरफडीच्या पानांपासून तयार झालेले लेटेक्स बद्धकोष्टता साठी वापरले जाते. पण याच्या नियमित सेवनामुळे पोटाचे विकार वाढू शकतात.
  • कोरफड खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना एलर्जी झाल्याचे दिसलेले आहे. त्यामुळे अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरफडीचे सेवन करू नये.
  • कोरफडीच्या गराचे सेवन 12 वर्षाच्या आतील लहान मुलांनी करू नये. यामुळे जुलाब होणे किंवा पोटाच्या समस्या होण्याचे प्रमाण वाढू शकते.
  • गरोदर स्त्रियांनी किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी जर कोरफडीचे सेवन केले तर ते त्यांना त्रासदायक ठरू शकते.
  • एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावताना नेहमी रात्री झोपण्यापूर्वी लावावे. दिवसा उन्हामध्ये फिरण्या पूर्वी जर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावले तर चेहरा खूप जास्त काळा पडू शकतो.
[ Parker Pens ] पार्कर पेन चे यश

Leave a Comment