UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथे भरती 2024

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगाद्वारे विविध प्रकारच्या जागांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात संघ लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 11 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची आयोगाद्वारे दिलेली शेवटची तारीख आहे. वैज्ञानिक – बी ( मेकॅनिकल), मानववंशशास्त्रज्ञ ( शारीरिक मानववंश शास्त्रज्ञ विभाग ), सहाय्यक प्राध्यापक ( अनेस्थेसियोलॉजी ), सहाय्यक प्राध्यापक ( कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी), सहाय्यक प्राध्यापक ( नियोनॅटोलॉजी ), सहाय्यक प्रोफेसर ( न्यूरोलॉजी ), सहाय्यक प्राध्यापक ( प्रसूती व स्त्री रोग तज्ञ), सहाय्यक प्राध्यापक ( शरीर औषध आणि पुनर्वसन ), सहाय्यक कार्यकारी अभियंता, वैज्ञानिक ‘ बी’ ( स्थापत्य अभियांत्रिकी), वैज्ञानिक ‘ बी’ ( इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन), सहाय्यक संचालक ( सुरक्षा) या पदांकरिता सदरील भरती होणार आहे. तरी भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी संघ लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

UPSC Bharti 2024

 • संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये 147 पदे रिक्त आहेत.
 • सदरील भरती मध्ये घेण्यात येणाऱ्या रिक्त पदांची नावे खालील प्रमाणे.

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 1. वैज्ञानिक – बी ( मेकॅनिकल)
 2. मानववंशशास्त्रज्ञ ( शारीरिक मानववंश शास्त्रज्ञ विभाग )
 3. सहाय्यक प्राध्यापक ( अनेस्थेसियोलॉजी )
 4. सहाय्यक प्राध्यापक ( कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी)
 5. सहाय्यक प्राध्यापक ( नियोनॅटोलॉजी )
 6. सहाय्यक प्रोफेसर ( न्यूरोलॉजी )
 7. सहाय्यक प्राध्यापक ( प्रसूती व स्त्री रोग तज्ञ)
 8. सहाय्यक प्राध्यापक ( शरीर औषध आणि पुनर्वसन )
 9. सहाय्यक कार्यकारी अभियंता
 10. वैज्ञानिक ‘ बी’ ( स्थापत्य अभियांत्रिकी)
 11. वैज्ञानिक ‘ बी’ ( इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन)
 12. सहाय्यक संचालक ( सुरक्षा)
 • वैज्ञानिक – बी ( मेकॅनिकल) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ कुस्ती मधून शास्त्रातील पदव्युत्तर पदवी पाहिजे किंवा ही पदवी नसेल तर उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा मेटलर्जी अभियांत्रिकी मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी पाहिजे.
 • मानववंशशास्त्रज्ञ ( शारीरिक मानववंश शास्त्रज्ञ विभाग ) या पदासाठी उमेदवाराकडे 50% पेक्षा जास्त गुणाची मानववंश शास्त्रात पदव्युत्तर पदवी पाहिजे. त्याचप्रमाणे अंतिम वर्षी भौतिक मानववंशशास्त्र किंवा जैविक मानववंशशास्त्र हे दोन विषय असायला पाहिजेत.
 • सहाय्यक प्राध्यापक ( अनेस्थेसियोलॉजी ) एमबीबीएस पदवी , डॉक्टर ऑफ मेडिसिन (अनेस्थेसियोलॉजी), एमएस ((अनेस्थेसियोलॉजी), डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (अनेस्थेसियोलॉजी) यापैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे.
 • सहाय्यक प्राध्यापक ( कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जरी) या पदाकरिता उमेदवाराची एमबीबीएस पदवी पूर्ण पाहिजे किंवा पदव्युत्तर पदवी त्याच्याकडे पाहिजे.
 • सहाय्यक प्राध्यापक ( नियोनॅटोलॉजी ) या पदाकरिता उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी पाहिजे त्याचबरोबर उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असली पाहिजे.
 • सहाय्यक प्रोफेसर ( न्यूरोलॉजी ) या पदाकरिता उमेदवाराकडे एमबीबीएस ही पदवी पाहिजे त्याचबरोबर उमेदवाराची पदव्युत्तर पदवी पूर्ण झाली पाहिजे.
 • सहाय्यक प्राध्यापक ( प्रसूती व स्त्री रोग तज्ञ) या पदाकरिता उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे.
 • सहाय्यक प्राध्यापक ( शरीर औषध आणि पुनर्वसन ) या पदाकरिता उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी बरोबर पदव्युत्तर पदवी पाहिजे.
 • सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदाकरिता उमेदवाराकडे ड्रिलिंग, मायनिंग, इलेक्ट्रिकल, सिविल यापैकी कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी बॅचलर पदवी पाहिजे. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कृषी अभियांत्रिकी किंवा पेट्रोलियम तंत्रज्ञान यामध्ये पदवी प्राप्त पाहिजे.
 • वैज्ञानिक ‘ बी’ ( स्थापत्य अभियांत्रिकी) या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थे कडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त पाहिजे.
 • वैज्ञानिक ‘ बी’ ( इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन) या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अभीयांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी पाहिजे.
 • सहाय्यक संचालक ( सुरक्षा) या पदाकरिता उमेदवाराकडे मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल / मरीन / उत्पादन / औद्योगिक / इन्स्ट्रुमेंटेशन / सिव्हिल इंजिनीअरिंग / आर्किटेक्चर / टेक्सटाईल केमिस्ट्री / टेक्सटाईल टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची बॅचलर डिग्री.
 • वैज्ञानिक-बी (मेकॅनिकल), सहाय्यक प्राध्यापक (अनेस्थेसियोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (कार्डिओ व्हॅस्कुलर आणि थोरॅसिक सर्जरी), सहाय्यक प्राध्यापक (नियोनॅटोलॉजी), सहाय्यक प्रोफेसर (न्युरोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (प्रसूती व स्त्रीरोग), सहाय्यक प्राध्यापक (शारीरिक औषध आणि पुनर्वसन) या पदांकरिता उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत पाहिजे.
 • सहाय्यक कार्यकारी अभियंता, वैज्ञानिक ‘बी’ (स्थापत्य अभियांत्रिकी), वैज्ञानिक ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन), सहाय्यक संचालक (सुरक्षा) या पदांकरिता उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत पाहिजे.
 • मानववंशशास्त्रज्ञ (शारीरिक मानववंशशास्त्र विभाग) या पदासाठी उमेदवाराचे वय 38 वर्ष पर्यंत पाहिजे.
 • एससी / एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता पाच वयामध्ये वर्षे सूट राहील. तर ओबीसी उमेदवारा करिता वयामध्ये तीन वर्षे सूट राहील. अपंग उमेदवारांसाठी वयामध्ये 10 वर्षे सूट राहील.
 • संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार दिला जाईल.
 • सदरील भरती मधून निवडून येणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
 • सदरील भरती करिता संघ लोकसेवा आयोगा द्वारे उमेदवारांकडून 25 रुपये परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एससी / एसटी / अपंग / महिला यांच्याकरिता कोणताही प्रवेश शुल्क नाही.
 • जे उमेदवार भरतीसाठी पात्र आहेत त्या उमेदवारांनी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरती जाऊन भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरती करिता आयोगाद्वारे 11 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्याआधी उमेदवाराने संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • संघ लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज करा.

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत संघ लोकसेवा आयोगामार्फत राबवलेली नाही.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवाराने स्वतःची संपूर्ण माहिती बरोबर लिहायचे आहे. जर या माहितीमध्ये कोणतीही चूक झाली आणि त्यामुळे द्वारा चा अर्ज बाद झाला तर त्याला संघ लोकसेवा आयोग जबाबदार राहणार नाही.
 • सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 ही आहे.
 • संघ लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

 • संघ लोकसेवा आयोग येथे निवड होण्याकरिता उमेदवारांनी सर्वप्रथम भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे.
 • संघ लोकसेवा आयोग येथील भरती करिता कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • संघ लोकसेवा आयोग येथील भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केल्यास त्या उमेदवारावर आयोगामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी परीक्षा केंद्र हे संघ लोकसेवा आयोगामार्फत ठरविण्यात येईल. यामध्ये कोणत्याही उमेदवाराने हस्तक्षेप करू नये.
 • सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरती दिलेला आहे. उमेदवाराने तो पहावा.
UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
 • संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या लिंक द्वारे ऑनलाइन अर्ज करावा. इतर कोणत्याही मार्गाने केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
 • उमेदवाराने स्वतःची सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे हे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये जन्माचा दाखला, शैक्षणिक पुरावे, नॅशनॅलिटी यांसारख्या गोष्टींचा समावेश असावा. अपलोड करण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट ची साईज 1mb पेक्षा जास्त नसावी.
 • उमेदवाराने जन्माचा पुरावा म्हणून दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा बोर्डाकडून इशू केलेले इतर कोणत्याही सर्टिफिकेट जोडायचे आहे. या व्यतिरिक्त जन्माचा दाखला आणि बोर्ड सर्टिफिकेट वरील जन्मतारीख दोन्ही समान असायला पाहिजे. वेगळी असेल तर उमेदवाराचा चा अर्ज रद्द होईल.
 • उमेदवाराने पूर्ण केलेल्या डिग्री किंवा डिप्लोमा चे सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाईल. उमेदवाराकडे डिग्री नसेल तर त्या डिग्रीचे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असावे. एस सर्टिफिकेट उमेदवाराने अपलोड करावे.
 • जाहिरातीमध्ये दिलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि उमेदवाराची झालेले शिक्षण हे दोन्ही समांतर असेल तर त्या संदर्भात समांतर लेटर उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
 • सदरील भरती मध्ये अर्ज करणारा उमेदवार SC/ST/OBC कॅटेगिरी चा असेल आणि त्याला आरक्षण हवे असेल तर त्या उमेदवाराने स्वतःच्या जातीचा दाखला, आणि जात पडताळणीचा दाखला उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
 • सदरील भरती मध्ये अर्ज करणारा उमेदवार अपंग असेल आणि त्या उमेदवाराला अपंगत्वाचे आरक्षण पाहिजे असेल तर त्या उमेदवाराकडे राज्य सरकारद्वारे किंवा केंद्र सरकारद्वारे दिलेला अपंगत्वाचा दाखला असला पाहिजे.
 • उमेदवाराकडे असलेले कोणतेही डॉक्युमेंट हिंदी किंवा इंग्रजी भाषा व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये असेल तर त्याचे रूपांतर राजपत्र द्वारे किंवा नोटरी द्वारे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये करून घ्यावे.
 • उमेदवाराने अर्जामध्ये आपला चालू ई-मेल ऍड्रेस टाकायचा आहे. कारण इथून पुढे संघ लोकसेवा आयोग उमेदवारा बरोबर ई-मेल द्वारे सर्व संपर्क करणार आहे. मुलाखतीची तारीख, कागदपत्रे पडताळणी ची तारीख या सर्व तारखा उमेदवाराला ई-मेलद्वारे कळवल्या जातील.
 • सदरील भरती [ UPSC Bharti 2024 }मध्ये ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्या प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज व सेपरेट फी जमा करायची आहे.
 • उमेदवाराने ऑनलाइन फॉर्म भरून झाल्यानंतर त्या फॉर्म ची प्रिंट आउट काढणे गरजेचे आहे. उमेदवारांनी स्वतःजवळ ठेवावे.
 • ऑनलाइन अर्जाची काढलेली प्रिंट उमेदवाराने संघ लोकसेवा आयोगाकडे जमा करायची नाही. ती प्रिंट उमेदवाराने स्वतःजवळ ठेवायचे आहे. आणि मुलाखतीच्या दिवशी अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रे मुलाखतीला घेऊन यावे.

UPSC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या सर्व प्रकारच्या भरतीची माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment