NHAI Bharti 2024 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे भरती.

NHAI Bharti 2024 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे विविध पदांकरिता भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 ही आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर ऑफलाइन जमा करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 ही आहे. उपमहाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदांकरिता सदरील भरती होणार आहे. तरी भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याअगोदर प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NHAI Bharti 2024

 • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत होणारी भरती एकूण 63 जागांसाठी होणार आहे.
 • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये उप महाव्यवस्थापक ( प्रशासन ), उपमहाव्यवस्थापक ( कायदेशीर ), उपमहाव्यवस्थापक ( तांत्रिक ), व्यवस्थापक ( तांत्रिक ) या पदांसाठी सदरील भरती होणार आहे.

NHAI Bharti 2024 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 • उप महाव्यवस्थापक ( प्रशासन ) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थे कडून पदवी प्राप्त झालेली पाहिजे.
 • उप महाव्यवस्थापक ( कायदेशीर ) या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संस्था याच्यातून कायद्याची पदवी प्राप्त झालेली पाहिजे.
 • उप महाव्यवस्थापक ( तांत्रिक) या पदाकरिता स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून प्राप्त झालेली पाहिजे.
 • व्यवस्थापक ( तांत्रिक) या पदाकरिता स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून प्राप्त झालेली पाहिजे.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयाची अट 56 वर्षापर्यंत आहे.
 • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार 78 हजार 800 रुपये ते 2 लाख 9 हजार 200 रुपये पर्यंत असणार आहे.
 • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
 • सदरील भरती करिता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
 • सदरील भरती करिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा.
 • नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून दिल्या गेलेल्या वेबसाईट वरूनच उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

NHAI Bharti 2024 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • सदरील भरती [ NHAI Bharti 2024 ] करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्याची प्रिंट ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे.
 • सदरील भरती करिता पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची पद्धत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही.
 • सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती जसे की ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, पत्ता, नाव यांसारख्या गोष्टी व्यवस्थित आणि बरोबर लिहायचे आहेत. जर यामध्ये काही चुकीचे आढळले तर त्याला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहणार नाही.
 • 15 एप्रिल 2024 ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची 04 मे 2024 ही शेवटची तारीख आहे.
 • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे.

NHAI Bharti 2024 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • ज्या उमेदवारांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची निवड केली जाईल.
 • TA / DA कोणत्याही उमेदवाराला न देण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून घेण्यात आलेला आहे.
 • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने निवड होण्याकरिता दबाव आणू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार करू नये. उमेदवाराने जरा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीची निवड प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे आहे. त्यामुळे यात इतर कोणी हस्तक्षेप करू नये.
 • सदरील भरतीची [ NHAI Bharti 2024 ] अधिक माहिती मिळवण्याकरिता संस्थेच्या संकेतस्थळावर ती उमेदवारांनी भेट द्यावी.
NHAI Bharti 2024 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
 • उपमहाव्यवस्थापक ( प्रशासन ) या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. उपमहाव्यवस्थापक ( कायदेशीर ) या पदासाठी एकूण एक जागा रिक्त आहे. उपमहाव्यवस्थापक ( तांत्रिक ) या पदाकरिता एकूण 30 जागा रिक्त आहेत. व्यवस्थापक ( तांत्रिक ) या पदासाठी एकूण 30 जागा रिक्त आहे.
 • वरील भरतीसाठी दिलेल्या जागा गरजेनुसार कमी जास्त करण्याचा पूर्णपणे अधिकार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे आहे.
 • सदरील भरती मधील उपमहाव्यवस्थापक हे पद ” ग्रुप ए” कॅटेगिरी आहे. या पदाला सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे.
 • उपमहाव्यवस्थापक या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयाची पदवी पाहिजे त्याचबरोबर नऊ वर्ष काम केलेल्या अनुभव पाहिजे.
 • केंद्र सरकार किंवा भारत सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा विद्यापीठ किंवा नामांकित रिसर्च इन्स्टिट्यूट जय भारत सरकारशी संलग्न आहेत किंवा पब्लिक सेक्टर किंवा सेमी गव्हर्मेंट किंवा ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन या सर्वांमधून जर कोणताही अधिकारी फेर नियुक्त सदरील भरती मधील पदांवर करायचा असेल तर त्याला काही नियम आहेत.
 • शासनातील अधिकाऱ्याचे सदरील भरती मध्ये फेर नियुक्ती करत असताना उमेदवाराकडे सदरील पदा च्या सामान दुसरे पद असले पाहिजे. त्या उमेदवाराला ग्रेड पे 7600 रुपये मिळाला पाहिजे. त्या उमेदवाराच्या पदाला सातवे वेतन आयोग लागू पाहिजे.
 • शासनातील अधिकाऱ्याचे सदरील भरती मध्ये फेर नियुक्ती करत असताना उमेदवाराने सेवेमध्ये चार वर्षे पूर्ण केलेली पाहिजेत. त्याला ग्रेड पे 6600 रुपये असला पाहिजे.
 • उपमहाव्यवस्थापक ( कायदेशीर ) या पदासाठी एक जागा शिल्लक आहे त्यामध्ये पोस्ट ग्रुप ए साठी आहे. सदरील पोस्ट करिता ग्रेड पे 7600 रुपये आहे. सातव्या वेतन आयोगानुसार याला पगार मिळेल. त्याचप्रमाणे सरकारी संस्थेमधील इतर सम पदावरील व्यक्तीची नेमणूक करणे आहे.
 • उपमहाव्यवस्थापक ( कायदेशीर ) या पदासाठी उमेदवारांनी नऊ वर्ष केंद्र शासनात किंवा राज्य शासनात किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा युनिव्हर्सिटी किंवा पब्लिक सेक्टर केव्हा सेमी गव्हर्मेंट किंवा ऑटोनॉमस कॉलेज या ठिकाणी सम पदावर काम केलेला अनुभव पाहिजे.
 • उपमहाव्यवस्थापक ( तांत्रिक ) या पदासाठी 30 जागा रिक्त आहेत. ही पोस्ट ग्रुप ए ची पोस्ट आहे. सदरील पदाकरिता ग्रेड पे 7600 रुपये आहे. उमेदवाराने नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी ची पदवी घेतलेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, हायवे, रोड आणि पूल या क्षेत्रामध्ये काम केलेला सहा वर्षाचा अनुभव पाहिजे.
 • केंद्रशासन / राज्य शासन/ केंद्रशासित प्रदेश / विद्यापीठ / निमसरकारी संस्था / ऑटोनॉमस कॉलेज या ठिकाणी सम पदावर काम केलेला अनुभव असलेला उमेदवार सदरील पदाकरिता पुनर भरती करायचा आहे.
 • व्यवस्थापक ( तांत्रिक ) या पदासाठी एकूण 30 जागा रिक्त आहेत. सदरील पद हे ग्रुप ए चे पद आहे. या पदासाठी ग्रेड पे 6600 रुपये देण्यात येणार आहे. सदरील भरतीत सरकारी खात्यात काम केलेल्या उमेदवाराला नेमणूक द्यायची आहे. उमेदवाराचे वय 56 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. त्याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असली पाहिजे. उमेदवाराकडे इन्फ्रास्ट्रक्चर, हायवे, रोड आणि ब्रिज यासंदर्भातील प्रोजेक्ट मध्ये 3 वर्ष काम केलेल्या चा अनुभव असला पाहिजे.
 • ऑनलाइन अर्जाची प्रत ऑफलाइन जमा करण्याची तारीख भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून दोन दिवस वाढवण्याची शक्यता आहे.
 • सदरील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण भारतभर काम करावे लागेल. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण भारतभर काम करायची तयारी असेल तरच अर्ज करावा.
 • ज्या उमेदवारांनी सदरील ची जाहिरात पाहून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज माघारी घेता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना जॉइनिंग लेटर मिळेल. मिळालेले अपॉइंटमेंट लेटर कोणत्याही उमेदवाराला रद्द करता येणार नाही. जर उमेदवाराने अपॉइंटमेंट लेटर रद्द केले तर त्याला इथून पुढे दोन वर्ष भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
 • अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ज्या उमेदवारांचे वय 56 वर्षापेक्षा अधिक होत असेल त्या उमेदवारांनी अर्ज करू नये. त्याचप्रमाणे निवृत्त होण्यासाठी दोन वर्षे कमी असणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
 • एससी / एसटी / अल्पसंख्यांक / महिला / अपंग या कॅटेगरी चा सर्व उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
 • सदरील भरती ची जाहिरात कोणत्याही प्रसंगी कोणत्याही वेळेला उमेदवारांना पूर्वसूचना न देता रद्द केली जाऊ शकते. कोणतेही कारण त्याबाबत दिले जाणार नाही.
 • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या http://www.nhai.gov.xn--in-02t/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 • यूजर आयडी ठरवणे, पासवर्ड बनवणे, स्वतःचे पूर्ण नाव, फोन नंबर, ई-मेल आयडी, आधार कार्ड नंबर या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतःचे रजिस्ट्रेशन संकेतस्थळावरती करू शकता.
 • उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो, डिजिटल सिग्नेचर, शैक्षणिक कागदपत्रे, अपॉइंटमेंट लेटर किंवा प्रमोशन लेटर या सर्व गोष्टी व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
 • अर्ज भरण्याकरिता उमेदवाराने बनवलेला युजर आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून लॉगिन करायचे आहे आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.

भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्थांमधील भरती संदर्भात माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी आमच्या नोकरी फर्स्ट या वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment