UPSC CMS Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कनिष्ठ स्केल पोस्ट, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, जनरल ड्युटी मेडिकल ग्रेड II या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याअगोदर संघ लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा येथील भरती मध्ये 827 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
- संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती मधील रिक्त पदांची नावे खालील प्रमाणे.
UPSC CMS Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 163 जागा
- रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 450 जागा
- नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी – 14 जागा
- पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्युटी मेडिकल ग्रेड II – 200 जागा
- वरील सर्व पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी मिळवलेली पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षापर्यंत पाहिजे. एससी आणि एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल. तर ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात येईल. अपंग उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात येईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
- संघ लोकसेवा आयोग येथील भरती मध्ये निवडून जाणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- संघ लोकसेवा आयोग येथील भरती साठी उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹200 आहे. एससी, एसटी, अपंग, महिला या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही.
- संघ लोकसेवा आयोग यांच्या संकेतस्थळा मार्फत उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- 30 एप्रिल 2024 ही संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- संघ लोकसेवा आयोगाद्वारे अर्ज करण्याकरिता लिंक देण्यात आलेली आहे उमेदवारांनी सदरील लिंक द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
UPSC CMS Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत संघ लोकसेवा आयोगाद्वारे राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक लिहायचे आहे. स्वतःची वैयक्तिक माहिती लिहिताना जर काही चुकी झाली आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला तर याला संघ लोकसेवा आयोग जबाबदार राहणार नाही.
- संघ लोकसेवा आयोग यांच्यामार्फत 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
- संघ लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
UPSC CMS Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार भरतीसाठी पात्र असतील. आणि त्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
- संघ लोकसेवा आयोग यांच्यामार्फत अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदरील भरतीच्या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती परीक्षा केंद्राद्वारे आणि संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र ठरवण्याचे काम संघ लोकसेवा आयोग करेल उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
- संघ लोकसेवा आयोग यांच्या संकेतस्थळावर सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम आणि माहिती दिलेली आहे उमेदवारांनी संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.
UPSC CMS Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी कम्बाईन मेडिकल सर्विसेस एक्झाम या परीक्षेची सर्व नियम आणि अटी वाचाव्यात.
- सदरील भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराच्या ओरिजनल डॉक्युमेंट द्वारे तपासण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी upsconline.nic.in. या वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वरती अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने वन टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. हे वन टाइम रजिस्ट्रेशन उमेदवाराने आयुष्यात एकदा करायचे आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी वन टाइम रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनी लॉगिन करून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला जर यामध्ये बदल करायचा असेल तर त्या उमेदवाराला आयुष्यात फक्त एकदाच सदरील रजिस्ट्रेशन मध्ये बदल करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी एकदा अर्ज भरला तर त्या उमेदवाराला नंतर अर्ज माघारी घेता येणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यांसारखे सरकारद्वारे दिलेले फोटो आयडेंटी कार्ड असणे आवश्यक आहे. यापैकी ज्या आयडी कार्ड चा उपयोग अर्ज भरण्यासाठी केलेला आहे ते आयडेंटी कार्ड परीक्षा देताना उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- सदरील परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांना समजवण्यात येते की चुकीच्या उत्तरा करिता निगेटिव्ह मार्किंग चा नियम सदरील परीक्षेमध्ये असणार आहे.
- सदरील भरती मध्ये उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर उमेदवार संघ लोकसेवा आयोगाच्या काउंटरला भेट देऊ शकतो किंवा No.011-23385271/011-23381125/011-23098543 या फोन नंबर वरती फोन करू शकतो. कृपया फोन करताना कामाच्या दिवशी सकाळी 10:00 वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत फोन करावा.
- सदरील परीक्षेमध्ये मोबाईल फोनचा उपयोग करण्यासाठी बंदी आहे. मोबाईल फोन स्विच ऑफ असेल तरीसुद्धा बसता येणार नाही. मोबाईल फोन व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस जसे की पेन ड्राईव्ह, स्मार्ट वॉच, कॅमेरा, ब्लूटूथ यांसारखे डिवाइस घेऊन परीक्षेला बसता येणार नाही. जर कोणत्याही उमेदवारा द्वारे असे डिवाइस परीक्षा केंद्रावर आणण्यात आले आणि परीक्षेला घेऊन बसण्यात आले तर अशा उमेदवारावर कारवाई म्हणून त्याला इथून पुढे संघ लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही.
- सदरील भरतीच्या परीक्षा करिता येताना उमेदवारांनी कोणतेही मौल्यवान वस्तू सोबत घेऊन यायचे नाही. कारण परीक्षा केंद्रावर बहुमूल्य वस्तू सुरक्षित ठेवण्याकरिता सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही बहुमूल्य वस्तू घेऊन येऊ नये.
- सदरील भरतीसाठी अर्ज भरताना वापरण्यात येणारा पासपोर्ट साईज फोटो अर्ज भरायच्या तारखेपासून 10 दिवस जुना नसावा. म्हणजेच 10 दिवसात पर्यंतचा काढलेला फोटो असावा.
- फोटोग्राफ वरती उमेदवाराचे नाव आणि फोटोग्राफ ज्या दिवशी काढलेला आहे त्यादिवशीची तारीख क्लिअरली मेन्शन केलेली पाहिजे.
- उमेदवाराने परीक्षा केंद्रावर येताना कमीत कमी 30 मिनिट अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.
- सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र पुढील शहरांमध्ये असणार आहे. यामध्ये आग्रातला, अहमदाबाद,आइजोल, बरेली, बेंगलोर, भोपाळ, चंदिगड, चेन्नई, कोटक, डेहराडून, दिल्ली, धारवाड, दिस्पुर , गंगटोक, हैदराबाद, इमफळ, इटानगर, जयपुर, जम्मू, जोरात, कोची, कोहिमा, कोलकत्ता, लखनऊ, मदुराई, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, पोर्ट ब्लेर, प्रयागराज, रायपुर, रांची, संभालपूर, शिलाँग, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, विशाखापट्टणम या शहरांमध्ये सदरील भरतीचे परीक्षा केंद्र असणार आहेत.
- परिस्थितीनुसार रिक्षा केंद्र बदलण्याचा हक्क संघ लोकसेवा आयोगाकडे आहे.
- जे उमेदवार सरकारी किंवा शासकीय संस्थांमध्ये नोकरी करत आहेत आशा उमेदवारांनी आपले अर्ज थेट लोकसेवा आयोगाकडे सादर करावेत.
- अर्ज भरत असताना प्रत्येक उमेदवाराने परीक्षा केंद्राचा विचार करूनच अर्ज भरावा. स्वतःला सोयीस्कर असणारे परीक्षा केंद्र अर्ज भरताना निवडायचे आहे.
- परीक्षा केंद्रावरील सुपरवायझर वरती कोणत्याही उमेदवाराने दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- संघाच्या संकेतस्थळावरून ज्या उमेदवारांनी एक पेक्षा जास्त हॉल तिकीट किंवा एडमिट कार्ड डाउनलोड केलेले आहेत उमेदवारांना फक्त एकच एडमिट कार्ड घेऊन परीक्षेला बसता येईल.
- सर्व उमेदवारांना सूचना करण्यात येते की सर्वांनी केलेल्या अर्जाची फोटो कॉपी स्वतः जवळ ठेवायची आहे जेणेकरून भविष्यात काही अडचण आली तर त्याचा उपयोग करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी [ UPSC CMS Bharti 2024 ] अर्ज केलेल्या उमेदवारांची दोन लेखी परीक्षा घेतल्या या लेखी परीक्षा प्रत्येकी दोन तासाच्या असतील आणि यांचे प्रत्येकी गुण 250 असतील.
- अपंग उमेदवाराला किंवा ज्या उमेदवाराला लिहिता येत नाही आशा उमेदवारांकरिता लेखकाची सुविधा पुरवण्यात आलेली आहे.
- सदरील भरती करिता पात्र होण्यासाठी आवश्यक गुण ठरवण्याचे काम संघ लोकसेवा आयोग यांच्या द्वारे केली जाईल.
- सदरील परीक्षेमध्ये जर उमेदवाराने एकाच प्रश्नाची दोन उत्तरे दिले असतील तर सदरील प्रश्नाचे उत्तर चुकीचे आहे असे समजले जाईल. त्यापैकी एक उत्तर बरोबर असले तरीसुद्धा निगेटिव्ह मार्क उमेदवाराला मिळेल.
- जर उमेदवाराने सदरील परीक्षेमध्ये प्रश्नाचे उत्तर काहीच लिहिले नसेल उत्तर रिकामी सोडली असेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू होणार नाही.
- सदरील परीक्षेमधील गणित सोडविण्याकरिता कॅल्क्युलेटर चा उपयोग उमेदवारांनी करू नये. कॅल्क्युलेटर चा उपयोग करणे किंवा कॅल्क्युलेटर परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास बंदी आहे. त्यामुळे उमेदवारांनी कॅल्क्युलेटर चा उपयोग करू नये.
[ UPSC CMS Bharti 2024 ] संघ लोकसेवा आयोग यांच्याद्वारे निघणाऱ्या सर्वप्रथम संदर्भात माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला नक्की भेट द्या. देण्यासाठी येथे क्लिक करा.