[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न म्हणजे काय ? त्याचे 10 फायदे काय ?

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न म्हणजे काय ?

[ Sea Buckthorn ] हिमालयातील उंच पर्वतांमध्ये सापडणाऱ्या पिवळ्या आणि केसरी कलर च्या बेरीज ना सी बकथॉर्न असे म्हणतात. यालाच सुपर फूड असे सुद्धा म्हटले जाते. सी बकथॉर्न फळांमध्ये जवळपास सर्व प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स सापडतात त्यामुळे याच्या उत्पादनांना मागणी वाढलेली आहे. सैन्यदलातील सैनिकांमध्ये ऊर्जा संतुलित रहावी म्हणून या बेरीज चा उपयोग केला जातो. सी बकथॉर्न मध्ये विटामिन सी चे प्रमाण सर्वात जास्त आहे.

[ Sea Buckthorn ] त्याचबरोबर विटामिन ए चे प्रमाण सुद्धा खूप आहे. इतर विटामिन्स सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. सी बकथॉर्न फळा बरोबरच त्याची पाने, फुले, झाडाचे खोड ही सर्व औषधी मानली जातात. प्रामुख्याने युरोप आणि आशिया खंडामध्ये ही बेरी फळ मिळते. काही ठिकाणी सी बकथॉर्न ला हिप्पोफे रमनोइड्स असे सुद्धा म्हटले जाते. भारतामध्ये आणि जगामध्ये विविध कंपन्यांच्या द्वारे सी बकथॉर्न पासून अनेक उत्पादने बनवली जातात. त्यांचा उपयोग दैनंदिन आयुष्यात केला जातो.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न चे फायदे खालील प्रमाणे

 • विटामिनची कमतरता दूर करते –  आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये खूप कमी लोक आहाराकडे लक्ष देत आहेत. त्याचप्रमाणे सध्या बाजारात मिळणाऱ्या किंवा घरी तयार करण्यात येणाऱ्या आहारा मधून व्यक्तींना आवश्यक ते विटामिन आणि मिनरल मिळत नाही आहेत. त्यामुळे लोकांना व्हिटॅमिनची कमतरता भासत आहे. सर्व प्रकारचे विटामिन एकाच आहारातून मिळणे जवळपास अशक्य होते. पण आज सी बकथॉर्न च्या वापरामुळे मानवी शरीरातील जवळपास सर्व विटामिन आणि मिनरल ची कमतरता भरून निघत आहे. यामुळे ते बघताना ची मागणी वाढत आहे.
 • हृदयाचे आरोग्य सुधारते –  ब्लडप्रेशर कमी जास्त झाल्यामुळे त्याचप्रमाणे रक्तामध्ये तयार होणाऱ्या कोलेस्ट्रॉल च्या गाठींमुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो. आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. सी बकथॉर्न मध्ये Flavonoids नावाचा घटक असतो यामुळे ब्लडप्रेशर संतुलित राहते. त्याचप्रमाणे सी बकथॉर्न मध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट उपलब्ध असतात यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन रक्तवाहिन्या तील ब्लॉकेज कमी होते आणि रक्त प्रवाह सुरळीत चालायला लागतो. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालते.
 • जखम लवकर बरी होते – जखम लवकर बरी होते – प्राण्यांवर केलेल्या प्रयोगानुसार ज्या प्राण्यांच्या शरीरावरती जखम झालेली आहे आशा जखमेवर सी बकथॉर्न लावल्यानंतर जखम लवकर बरी झालेली दिसून येतो. त्याचप्रमाणे सी बकथॉर्न च्या तेलाचा उपयोग सुद्धा जखम बरी करण्यासाठी केला जातो.
 • मधुमेह पासून बचाव करते- रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होत असतो. शरीरामध्ये इन्सुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. सी बकथॉर्न च्या वापरामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते पाणी साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेहाचा धोका टळतो.
 • केसांसाठी अनेक फायदे – केसांसाठी आवश्यक असणारे सर्व घटक सी बकथॉर्न मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे केस गळणे, केस पांढरे होणे, केस विरळ होणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. ज्या लोकांचे केस गेलेले आहेत अशा लोकांनी सी बकथॉर्न तेलाचा उपयोग केल्यानंतर केस पुन्हा उगवलेली पाहायला मिळालेले आहेत. केसांमध्ये कोंडा होणे यासाठी सी बकथॉर्न पासून तयार केलेल्या शाम्पू चा उपयोग केला जातो.
 • त्वचेसाठी फायदा –  त्वचेच्या समस्यांवर ती मात करण्यासाठी त्वचेला आत मधून आणि बाहेरून पोषण मिळणे आवश्यक असते. सी बकथॉर्न मध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळे सी बकथॉर्न चे सेवन करणाऱ्या व्यक्तींना त्वचेच्या समस्या होत नाहीत. सी बकथॉर्न पासून तयार केलेले मॉइश्चरायझर, फेस वॉश, चेहऱ्याला लावायच्या क्रीम, स्क्रब यांसारख्या उत्पादनामुळे त्वचा अधिक चांगली बनते.
 • मानसिक तणावापासून सुटका – दैनंदिन कामाच्या तणावामुळे व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. त्याचप्रमाणे इतर काही समस्यांमुळे सुद्धा तणावाचा त्रास व्यक्तीला उद्भवू शकतो. सी बकथॉर्न चा उपयोग तणाव दूर करण्यासाठी केला जातो. याचा सेवनामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील तणाव कमी होण्यास मदत होते.
 • कॅन्सर पासून बचाव करते – शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या फ्री रॅडिकल ला निष्क्रिय करण्याचे काम सी बकथॉर्न करत असते. यामध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. आम्ही सर्वच आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न वापरण्यापूर्वी घ्यायची काळजी

 • ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी किंवा ऑपरेशन होण्यापूर्वी सी बकथॉर्न चा उपयोग करू नये. उपयोग केल्यानंतर अतिरिक्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. ऑपरेशन करायच्या अगोदर कमीत कमी दोन आठवडे सी बकथॉर्न चा उपयोग बंद करावा. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा लगेच सी बकथॉर्न उपयोग चालू करू नये.
 • गर्भावती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी सी बकथॉर्न चा उपयोग करू नये. यामुळे साईड इफेक्ट होण्याची अधिक शक्यता असते. यासंदर्भात रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • जुनाट आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी किंवा जुन्या आजारावरती उपचार सुरू असताना सी बकथॉर्न उपयोग करण्यापूर्वी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर कोणत्याही रुग्णाला सी बकथॉर्न चा वापर सप्लीमेंट म्हणून करायचा असेल तर अशा रुग्णांनी आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न ची निवड कशी करावी ?

 • सी बकथॉर्न डायरेक्ट वनस्पती स्वरूपात आणून त्याचे सेवन करणे शक्य नाही कारण ही वनस्पती फक्त हिमालयात आढळून येते. जर याचा उपयोग करायचा असेल तर कंपनीच्या द्वारे बाजारात उतरवले गेलेले उत्पादन विकत घेऊन त्याचा उपयोग करावा लागणार आहे.
 • बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सी बकथॉर्न च्या उत्पादनांपैकी उत्कृष्ट क्वालिटी चे सी बकथॉर्न विकत घेणे गरजेचे आहे. उत्पादन बनवणाऱ्या कंपनीकडे उत्पादन विक्री संदर्भात आणि त्याच्या गुणवत्ते संदर्भात प्रमाणपत्र आणि लायसन्स आहे का नाही हे तपासणे गरजेचे आहे.
 • सी बकथॉर्न च्या पॅकिंग वरती असणारी मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट चेक करूनच सी बकथॉर्न खरेदी करावे. एक्सपायरी डेट खूप लांबची असल्यास असे उत्पादन घेऊ नये.
 • सी बकथॉर्न खरेदी करताना एका महिन्याच्या वापरासाठी जेवढे लागणार आहे तेवढेच खरेदी करावे. उत्पादनाची कॉन्टिटी किती आहे त्यानुसार त्याची योग्य किंमत आहे का ? या सर्व बाबी तपासूनच सी बकथॉर्न उत्पादनांची खरेदी करावी.
 • कोणत्याही कंपनीचे सी बकथॉर्न विकत घेताना त्यामध्ये असणारे घटक तपासूनच विकत घ्यावे. या घटकांमध्ये ओमेगा 3, ओमेगा 7 यांचे प्रमाण अधिक असणाऱ्या उत्पादनांना पसंती द्यावी.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न मधील पोषक तत्वे खालीलप्रमाणे

सी बकथॉर्न मध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 , ओमेगा 7, ओमेगा 9 यांसारखे फॅटी ऍसिड असतात. निसर्गामध्ये सापडणाऱ्या सर्वच बेरी एंटीऑक्सीडेंट असतात पण सी बकथॉर्न बेरी मध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे विटामिन ए, विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन सी, विटामिन ई, बीटा कॅरोटीन, अमिनो ऍसिड, लायकोपिन यांसारखे महत्त्वाचे घटक सी बकथॉर्न मध्ये आढळून येत असतात. त्याचप्रमाणे शरीरासाठी आवश्यक असणारे खनिजे सुद्धा यामध्ये उपलब्ध असतात. सी बकथॉर्न मध्ये विटामिन बी12 नसते. विटामिन डी चे आवश्यक प्रमाण सी बकथॉर्न मध्ये असते.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न चे सेवन कशा प्रकारे करावे ?

बाजारामध्ये मिळणारा सी बकथॉर्न ज्यूस दोन चमचे एक ग्लास पाण्यामध्ये टाकावा आणि व्यवस्थित मिक्स करावा. सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण प्यावे. त्याचप्रमाणे सायंकाळी पुन्हा सकाळी पिले तेवढेच मिश्रण प्यावे. दिवसातून दोन वेळा सी बकथॉर्न ज्यूसचे सेवन करावे. सी बकथॉर्न चे विविध आजारांवर ती विविध ज्यूस बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी रुग्णांनी त्यांच्या गरजेनुसार ज्यूस ची निवड करावी. काही ज्यूसचे सेवन करण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्या संदर्भात माहिती ज्यूस च्या बॉक्स वरती लिहिलेली असते. ती वाचूनच त्याचे अनुकरण करावे.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न पासून तयार केलेले उत्पादने खालील प्रमाणे.

Sea Buckthorn

 • सी बकथॉर्न ज्यूस – सी बकथॉर्न बेरी पासून ज्यूस ची निर्मिती केली जाते. बेरी तोडल्या पासून सहा तासाच्या आत त्यांचा ज्यूस बनवला जातो. या ज्यूस मध्ये रंगासाठी कोणताही कलर वापरला जात नाही. फक्त ज्यूस टिकून राहण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरल्या जातात. या ज्यूस च्या कॉन्सन्ट्रेशन वरून त्याचे विविध प्रकार पडत आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये काही घटक मिक्स करून रुग्णांच्या समस्या सोडविण्याकरिता वापर करण्यात आलेला आहे.
 • सी बकथॉर्न ऑइल कॅप्सूल – सी बकथॉर्न च्या बियांपासून तेल बनवले जाते त्या तेलापासून कॅप्सूल तयार केल्या जातात. पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून या कॅप्सूल ची निर्मिती केली जाते. यामध्ये ओमेगा3, ओमेगा 7, ओमेगा 9 यांसारख्या फॅटी ऍसिड ची मात्रा भरपूर असते. त्याचप्रमाणे ज्यूस पेक्षा सोप्या पद्धतीने हाताळला जाऊ शकतात.
 • सी बकथॉर्न जाम – सध्या लहान मुलांमध्ये ब्रेड सोबत जाम खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण बाजारात मिळणाऱ्या जाम मध्ये कलर, साखर आणि फ्लेवर यांसारख्या गोष्टींचा अधिक वापर केला जातो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पोषकतत्वे नसतात. या सर्वांचा विचार करता सी बकथॉर्न चा उपयोग करून तयार केलेले पोषणयुक्त आरोग्यदायी जाम बाजारात आणलेली आहे.
 • सी बकथॉर्न शाम्पू – डोक्यावरील केसांना जास्त काळ मजबूत ठेवण्यासाठी आणि त्यांची गळती कमी होण्यासाठी पोषणयुक्त शाम्पू सी बकथॉर्न चा उपयोग करून बनवण्यात आलेला आहे. यामुळे केस मजबूत होतात. डोक्याखाली त्वचेवर कोंडा साठत नाही. त्वचा कोरडी पडत नाही.

सी बकथॉर्न संदर्भातील सर्व उत्पादनांची माहिती घेण्यासाठी BioSash India चा वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

[ Aloe Vera Benefits ] कोरफड वनस्पती पासून होणारे फायदे.

Leave a Comment