Goa Home Guard Bharti 2024 | गोवा येथे होमगार्ड पदासाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती करिता गोवा सरकार यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी 02 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरती मध्ये होमगार्ड पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. तरी पात्रताधारक उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- गोवा सरकारची ही भरती 143 जागांकरिता होणार आहे.
- गोवा सरकारची होणारी सदरील भरती ही होमगार्ड पदासाठी आहे.
Goa Home Guard Bharti 2024 | गोवा येथील होमगार्ड पदाकरिता शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.
- होमगार्ड किंवा स्वयंसेवक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे.
- होमगार्ड भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 2 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 50 वर्षे पर्यंत असले पाहिजे.
- गोवा सरकार द्वारे निघालेल्या होमगार्डच्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला प्रतिदिन 878 रुपये मानधन देण्यात येईल.
- गोवा सरकार द्वारे निघालेल्या होमगार्डच्या भरतीमध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाण गोवा राहील.
- सदरील भरती करिता उमेदवारांकडून ₹20 परीक्षा शुल्क गोवा सरकार द्वारे घेण्यात येणार आहे.
- सदरील भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज करायचा आहे.
- होमगार्ड भरतीसाठी गोवा सरकारद्वारे 2 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
- उमेदवाराने सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी गोवा सरकारद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- गोवा सरकारच्या होमगार्ड भरती करिता उमेदवारांनी “होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा.” या पत्त्यावर अर्ज करावा.
Goa Home Guard Bharti 2024 | गोवा होमगार्ड पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
- सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत गोवा सरकारद्वारे उपलब्ध केलेली नाही.
- गोवा होमगार्ड भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःची माहिती जसे की जन्मतारीख, नाव, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर यासारख्या गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. यामध्ये जर काही चूक झाली तर त्याला गोवा सरकार जबाबदार राहणार नाही.
- 2 एप्रिल 2024 सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- गोवा सरकार तर्फे होमगार्ड पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Goa Home Guard Bharti 2024 | गोवा होमगार्ड भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- गोवा होमगार्ड भरतीसाठी [ Goa Home Guard Bharti 2024] अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
- गोवा होमगार्ड भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA गोवा सरकार तर्फे दिला जाणार नाही.
- सदरील भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर गोवा सरकार कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- होमगार्ड निवडीची संपूर्ण प्रक्रिया ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार गोवा सरकार यांच्याकडे आहे. इतर कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करू नये.
- होमगार्ड निवडी संदर्भात संपूर्ण माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.
Goa Home Guard Bharti 2024 | गोवा होमगार्ड भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- गोवा गार्ड आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत सदरील भरती आयोजित केलेली आहे.
- सदरील भरती मध्ये होमगार्ड म्हणून निवड झालेल्या उमेदवाराची नोकरीचे ठिकाण पुढील तीन वर्षांकरिता पणजी हे राहील.
- ज्या उमेदवाराने याआधी होमगार्ड म्हणून काम केलेले आहे आशा उमेदवारांनी या भरती करिता अर्ज करू नये.
- सदरील भरती [ Goa Home Guard Bharti 2024] करिता पुरुषांची उंची कमीत कमी 5 फुट 5 इंच असली पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांची कमीत कमी उंची 4 फुट 11 इंच असली पाहिजे.
- होमगार्ड भरती करिता शारीरिक चाचणी होईल. त्यामध्ये पुरुषांनी 1 किलोमीटर अंतर पाच मिनिट 30 सेकंद मध्ये पूर्ण करायचे आहे. तर महिलांनी 800 मीटर हे अंतर पाच मिनिट 30 सेकंद मध्ये पूर्ण करायचे आहे.
- होमगार्ड भरती साठी अर्ज करणारा उमेदवार 2 एप्रिल 2024 पासून मागील पंधरा वर्षे गोवा राज्याचा रहिवासी असावा.
- ” होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, दुसरा मजला, गोवा रिझर्व पोलीस कॅम्प, पणजी गोवा ” या ठिकाणावरून उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी 2:00 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भरतीचे अर्ज घ्यायचे आहेत.
- सदरील पत्त्यावरून अर्ज खरेदी करताना उमेदवारांनी प्रत्येक अर्जा करिता ₹20 इतके पैसे द्यायचे आहेत.
- उमेदवाराने केलेला अर्ज आणि अर्जाचा नमुना याच्या मध्ये फरक आढळल्यास उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर ती रद्द करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जासोबत कोणतेही कागदपत्र किंवा प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नाही.
- ज्यावेळेस उमेदवाराची निवड होईल त्यानंतर च्या प्रक्रियेमध्ये उमेदवाराची सर्व कागदपत्रे पडताळली जातील.
- रहिवासी प्रमाणपत्र, नामांकित विद्यापीठातून किंवा महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रमाणपत्र, 15 वर्ष गोव्याचा रहिवासी असल्याचा पुरावा, इतर शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, क्रीडा प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र, माझी कर्मचारी प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे उमेदवाराची तपासली जातील यामध्ये पात्र ठरलेला उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी निवडला जाईल.
- सदरील भरती करिता उमेदवाराने पत्राद्वारे आणि कुरियर द्वारे केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराने स्वतः दिलेल्या पत्त्यावर ती उपस्थित राहून अर्ज करायचा आहे.
- उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यांची झेरॉक्स काढून ट्रू कॉपी बनवून ठेवायचे आहेत.
- उमेदवाराला त्याच्या उंचीप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुरुषांमध्ये 5 फ्ट 6 इंच उंची असणाऱ्या उमेदवाराला अर्धा गुण देण्यात येणार आहे. तर महिलांमध्ये 5 फुट उंची असणाऱ्या महिलांना अर्धा गुण देण्यात येणार आहे. तिथून पुढे प्रत्येक इंच करिता एक गुण असे गुण वाढवण्यात येणार आहेत.
- लेखी परीक्षा ही 35 गुणांची असणार आहे. यामध्ये उमेदवाराला जास्तीत जास्त 35 गुण मिळू शकतात.
- तोंडी परीक्षा ही 15 गुणांची असणार आहे. यामध्ये उमेदवाराला एकूण 15 गुण मिळणार आहेत.
- उमेदवाराला आठवी पास असणे आवश्यक आहे. पण त्यापेक्षा त्याची शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर त्याला अधिक गुण मिळणार आहेत. जर उमेदवार नववी पास असेल तर त्याला एक गुण मिळणार आहे. उमेदवाराचे शिक्षण 10वी पूर्ण असेल तर त्याला 03 गुण मिळणार आहे. उमेदवार 12 वी पास असेल तर त्याला पाच गुण मिळणार आहे. उमेदवार जर पदवीधर असेल तर त्याला 10 गुण मिळणार आहेत. अशा पद्धतीने जास्त शिकणाऱ्या उमेदवाराला जास्तीत जास्त 10 गुण ज्यादा मिळू शकतात.
- कार्पेंटर, इलेक्ट्रिशन, मोटार मेकॅनिक, वेल्डिंग, ब्लॅकस्मिथ, ऑटो एलेक्ट्रिशियन यापैकी कोणत्याही शाखेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा पूर्ण केला असल्यास उमेदवाराला पाच गुण जास्त मिळतील.
- उमेदवाराकडे संगणक प्रशिक्षणाचा सहा महिन्यापासून अधिक कालावधीचा कोणताही कोर्स मान्यताप्राप्त संस्थेमधून पूर्ण झाला असेल तर पाच गुण अधिक मिळतील.
- उमेदवाराकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याचे हे गुण त्याला मिळतील. हलके वाहन चालवण्याचा लायसन असेल तर त्याला तीन गुण मिळतील. जड वाहन चालवण्याचा लायसन असेल तर पाच गुण मिळतील.
- उमेदवार खेळाडू असेल तर त्याला त्याचे गुण मिळतील. जर उमेदवार शाळा किंवा कॉलेज पातळीवर खेळ खेळत असेल तर त्याला दोन गुण जास्त मिळतील. उमेदवार राज्य पातळीवर खेळला असेल तर त्याला एकूण तीन गुण ज्यादा मिळतील. उमेदवार राष्ट्रीय पातळीवर खेळणार असेल तर त्याला पाच गुण जास्त मिळतील.
- उमेदवाराकडे ए ग्रेड चे एनसीसी सर्टिफिकेट असेल तर त्याला दोन गुण जास्त मिळतील. उमेदवाराकडे बी ग्रेड चे एनसीसी सर्टिफिकेट असेल तर त्याला तीन गुण जास्त मिळतील. उमेदवाराकडे सी ग्रेड चे एनसीसी सर्टिफिकेट असेल तर त्याला पाच गुण ज्यादा मिळतील.
- अर्ज करणारा उमेदवार माझी कामगार असेल तर त्याला 10 गुण जास्त मिळतील.
- 35 मार्काची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामध्ये एकूण तीन विषय असणार आहेत. पहिला म्हणजे सामान्य ज्ञान, दुसरा सामान्य इंग्लिश आणि तिसरा गणित. सामान्य ज्ञान 15 मार्काची असेल. सामान्य इंग्लिश 10 मार्क साठी असेल. गणित विषय 10 मार्क साठी असेल.
- लेखी परीक्षेमध्ये पास होण्याकरिता उमेदवाराला 40 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे 35 मार्क पैकी पास होण्याकरिता उमेदवाराला बारा गुण मिळणे आवश्यक आहे. जर उमेदवाराला 12 मार्क सुद्धा मिळाले नाहीत तर तो उमेदवार नापास म्हणून घोषित करण्यात येईल आणि पुढील प्रक्रियेमध्ये त्याला सहभागी होता येणार नाही.
- होमगार्ड म्हणून सिलेक्ट होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला पोलीस ट्रेनिंग स्कूल येथे 45 दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे.
- सदरील भरती करिता देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवाराला ठरल्याप्रमाणे मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे निवड झालेल्या उमेदवाराला गोवा राज्यामध्ये कोठेही काम करावे लागेल.
- गोवा सरकारद्वारे होणाऱ्या होमगार्ड भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी https://citizen.goapolice.gov/ या वेबसाईटला भेट द्यावी.
- उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास त्याने संस्थेला ई-मेल द्वारे कळवावे. Email:- commandanthgcd@goapolice.gov.in
- +9108322220019 या मोबाईल नंबर वरती कोणतीही शंका असल्यास उमेदवाराने फोन करून कळवावे. त्याचप्रमाणे सदरील भरती करिता संस्थेचा फॅक्स नंबर +9108322425534 हा आहे.
- लेखी गुण आणि इतर गुण मिळून 100 गुण होत आहेत. त्यापैकी जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवारांचे सिलेक्शन सदरील भरती मध्ये होणार आहे.
- इझीलडा डिसूजा, डेप्युटी कमांडंट जनरल होमगार्ड & डेप्युटी डायरेक्टर, सिव्हिल डिफेन्स, पणजी- गोवा यांच्या नेतृत्वाखाली सदरील भरती मध्ये उमेदवारांची निवड होणार आहे.
होमगार्ड पदा प्रमाणे इतर सर्व सरकारमधील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.