MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड येथे भरती.

MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड या संस्थेमध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मॉयल लिमिटेड द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 21 मार्च 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक या पदांकरिता सदरची भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मॉयल लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

MOIL Limited Bharti 2024

 • मॉयल लिमिटेड या संस्थेमध्ये 44 जागांसाठी भरती निघालेली आहे.
 • मॉयल लिमिटेड संस्थेद्वारे पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक या पदांसाठी जागा रिक्त आहेत.

MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड येथील रिक्त पदांची माहिती खालील प्रमाणे.

 • मॉयल लिमिटेड येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी ( खाणकाम ) या पदासाठी एकूण तेरा जागा आहेत.
 • मॉयल लिमिटेड येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी ( मेकॅनिकल ) या पदासाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत.
 • मॉयल लिमिटेड येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी चार जागा रिक्त आहेत.
 • मॉयल लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( जिओलॉजी ) या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
 • मॉयल लिमिटेड येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी ( प्रक्रिया ) या पदासाठी तीन जागा रिक्त आहे.
 • मॉयल लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( मटेरियल ) या पदासाठी पाच जागा रिक्त आहे.
 • मॉयल लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( कंत्राटी व्यवस्थापन ) या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
 • मॉयल लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( Pers & Wel ) या पदासाठी पाच जागा रिक्त आहे.
 • मॉयल लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( फायनान्स ) या पदासाठी पाच जागा रिक्त आहे.
 • मॉयल लिमिटेड येथे मॅनेजर ( सर्वे ) या पदासाठी दोन जागा रिक्त आहे.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 ही आहे.
 • मॉयल लिमिटेड येथील भरतीसाठी वयाची अट पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
 • मॉयल लिमिटेड येथील भरती मध्ये एकूण 44 जागा भरायचे आहेत.
 • मॉयल लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
 • सदरील भरती करिता मॉयल लिमिटेड यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नाही.
 • सदरील भरती मधून निवडून आलेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे नागपुर असेल.
 • सदरील भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी मॉयल लिमिटेड द्वारे दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याकरिता येथे क्लिक करा.
 • मॉयल लिमिटेड द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 ही दिलेली आहे.
 • वरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मॉयल लिमिटेड द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 • मॉयल लिमिटेड द्वारे अर्ज करण्यासाठी संकेत स्थळ देण्यात आलेले आहे उमेदवाराने त्याद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

 • मॉयल लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत मॉयल लिमिटेड द्वारे उपलब्ध केलेली नाही.
 • उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्ज भरत असताना स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, पत्ता, पिनकोड, शैक्षणिक पात्रता यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यामध्ये भरताना कोणत्याही पद्धतीची चूक झाली तर त्याला मॉयल लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
 • 21 मार्च 2024 ही मॉयल लिमिटेड या संस्थे करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • मॉयल लिमिटेड या संस्थे करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरचा अर्ज करायचा आहे.

MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • मॉयल लिमिटेड येथे पदावरती नियुक्त होण्याकरिता उमेदवाराने भरतीमध्ये अर्ज करणे गरजेचे आहे.
 • मॉयल लिमिटेड संस्थेद्वारे कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रिये करिता TA/DA देण्यात येणार नाही. याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
 • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये किंवा अनुचित प्रकार करू नये. अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर मॉयल लिमिटेड द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीची प्रक्रिया ही मॉयल लिमिटेड संस्थेद्वारे ठरवण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवाराने या प्रक्रियेमध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप आणू नये.
 • वरील भरती संदर्भात संपूर्ण माहिती मॉयल लिमिटेड यांच्या संकेतस्थळावरती दिलेली आहे.
MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड या ठिकाणी अर्ज भरण्याकरिता खालील प्रक्रिया पहा.
 • मॉयल लिमिटेड येथील भरती साठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरती क्लिक करावी.
 • यानंतर समोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये डाव्या बाजूला मॉयल लिमिटेड या संस्थेचा लोगो आणि नाव दिसेल. उजव्या बाजूला राजमुद्रा दिसेल. तर मध्यभागी वेलकम टू मॉयल असे लिहिलेले दिसेल.
 • यानंतर खाली भरतीच्या जाहिराती शोधण्याकरिता भरतीची माहिती भरण्यासाठी रिकाम्या जागेत दिलेल्या दिसतील. पहिल्या क्रमांकावरती पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करण्याकरिता अप्लाय नाव अशा पद्धतीचे बटन दिसेल. त्या बटना वरती उमेदवाराने क्लिक करायचे आहे.
 • अप्लाय नाव वरती क्लिक केल्यानंतर उमेदवार आयबीपीएस ऑनलाइन च्या नवीन वेबसाईट वरती पोहचेल. या वेबसाईट वरती गेल्यानंतर वरच्या बाजूला मॉयल लिमिटेड लिहिलेले आहे का यासंदर्भात उमेदवाराने खात्री करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
 • खात्री झाल्यानंतर उमेदवाराने उजव्या बाजूला दिल्लीला लोगिन फॉर्म पहावा. आणि त्याच्यानंतर जर उमेदवाराने स्वतःचे रजिस्ट्रेशन या अगोदर केले असेल तर लॉगिन करून फॉर्म भरायला सुरुवात करावी. जर या अगोदर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्या उमेदवाराने उजव्या बाजूला लोगिन फॉर न्यू रजिस्ट्रेशन असे लिहिलेल्या पिवळ्या कलरच्या बटनावर क्लिक करायचे आहे.
 • यानंतर उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर फॉर्म मध्ये भरायचा आहे. त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
 • उमेदवाराने आधार कार्ड वर जे नाव आणि पत्ता लिहिलेला आहे तोच पत्ता आणि नाव अर्जामध्ये भरायचे आहे.
 • उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख आणि वय यासंदर्भातील माहिती योग्य आणि पुराव्यानिशी द्यावी.
 • उमेदवाराने वडिलांचे आणि आईचे नाव अगदी बरोबर लिहायचे आहे.
 • उमेदवाराने जर स्वतःच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला असेल तर त्याबाबतचे राजपत्र अपलोड करायचे आहे.
 • अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा पाहिजे.
MOIL Limited Bharti 2024 | मॉयल लिमिटेड या संस्थे संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
 • मॉयल लिमिटेड ही कंपनी मिनीरत्न कॅटेगरी -1 मधील कंपनी आहे. सन 1962 रोजी या कंपनीची स्थापना झालेली होती. सुरुवातीला याचे नाव मॅंगनीज और ( इंडिया ) लिमिटेड असे होते. त्यानंतर 2010 रोजी या संस्थेचे नाव मॉयल लिमिटेड असे करण्यात आले. 1896 रोजी ब्रिटिश सरकारद्वारे स्थापन केलेल्या सीपीएमओ कंपनीचे रूपांतर 1962 रोजी भारत सरकार बरोबर करार झाल्यानंतर मॅगनीज और इंडिया लिमिटेड यामध्ये झाले. आणि 2010 ला त्याचे रूपांतर मॉयल लिमिटेड मध्ये झाले.
 • मॉयल लिमिटेड या कंपनीमध्ये भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि मध्यप्रदेश सरकार यांचे मिळून 51% भांडवल आहे. राहिलेले 49% भांडवल सीपीएमओ चे आहे. 1977 रोजी सीपीएमओ कडे असणारे 49% भांडवल हक्क भारत सरकारने खरेदी केला आणि ही कंपनी 100% सरकारी कंपनी म्हणून झाली. स्टील मंत्रालयाद्वारे या संस्थेची देखभाल केली जाते.
 • 2010 रोजी राष्ट्रीय शेअर बाजार आणि बॉम्बे शेअर बाजार येथे मॉयल लिमिटेड या संस्थेचे शेअर लिस्ट करण्यात आले. शेअर बाजारात दाखल झाल्यानंतर भारत सरकारचे 71.51 % शेअर्स कंपनीत होते तर महाराष्ट्र सरकारचे 4.62% शेअर्स होते तर मध्यप्रदेश सरकारचे 3.81% शेअर्स होते. आणि लोकांकडे सदरील संस्थेचे एकूण 20% शेअर्स होते.
 • आज सध्याला महाराष्ट्रातील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात त्याचप्रमाणे मध्यप्रदेश मधील बालाघाट जिल्ह्यामध्ये मॉयल लिमिटेड या संस्थेची खानी कार्यरत आहेत. बालाघाट येथील खान संस्थेची सर्वात मोठी खान आहे. जमिनीपासून 435 मीटर खोल बालाघाट ची खान आहे. बॅटरी मध्ये वापरण्यात येणारे मॅग्नेशियम डायऑक्साईड हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामधील डोंगरी बुजुर्ग खान या ठिकाणी मिळते.
 • पशुखाद्यात करिता आणि खतांसाठी मॅगनीज ऑक्साईड मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून वापरले जाते. भारतामधील मॅंगनीज धातूची 46% गरज मॉयल लिमिटेड या संस्थेद्वारे पूर्ण करण्यात येते. आज सध्याला प्रत्येक वर्षी मॉयल लिमिटेड या संस्थेमध्ये 1.3 मिलियन टन इतके मॅंगनीज ऑक्साईडचे उत्पन्न होते. दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे.
 • मॉयल लिमिटेड ही संस्था विविध ग्रेडचे मॅंगनीज प्रोड्यूस करत असते. यामध्ये फेरो मॅंगनीज च्या उत्पादनाकरिता हाय ग्रेड धातूची आवश्यकता असते. सिलको मॅंगनीज च्या उत्पादनाकरिता मिडीयम ग्रेड धातूची आवश्यकता आहे. गरम धातू आणि बॅटरीतील सेल करिता डायऑक्साईड उत्पादनासाठी ब्लास्ट फर्नेस ग्रेड आवश्यक आहे.
 • इलेक्ट्रोलाईट मॅगनीज डायऑक्साईड ज्या निर्मिती करिता 1500 MT वार्षिक कॅपॅसिटी असणारा वनस्पतीवर आधारित असा सेटअप आहे. कंपनीद्वारे उत्पादित केले जाणारे इलेक्ट्रोलाईट मॅग्नीज डायऑक्साईड हे उच्च क्वालिटीचे आणि बाजारात सर्वमान्य असणारे असे आहे.
 • फेरो मॅगनीज उत्पादनाकरिता 12000 MT वार्षिक उत्पादन क्षमतेचा प्लांट मॉयल लिमिटेड या संस्थे कडे आहे.
 • मध्यप्रदेश मधील राटेड हिल्स, जिल्हा- देवास येथे 15.2 MW वीज निर्मितीचा पवनचक्क्यांचा प्रोजेक्ट आहे. तर नागडा हिल्स येथे 4.8 MW वीज निर्मितीचा पवनचक्की यांचा प्रोजेक्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील आणि भारतातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांमधील नोकर भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता येथे क्लिक करा.

Leave a Comment