[ Macdonald Story ] मॅकडॉनाल्ड्स च्या यशाची कहाणी

[ Macdonald Story ] मॅकडॉनाल्ड्स च्या यशाची कहाणी

[ Macdonald Story ] कॉलेजमधील तरुण-तरुणींची गर्दी आज-काल भारतातील मॅकडोनाल्ड सच्या प्रत्येक शाखेत आपल्याला आज दिसत आहे. मॅकडोनाल्ड्स हे आजच्या तरुणाईचे विरंगुळा केंद्रच बनले आहे. मॅकडोनाल्ड मध्ये नजर फिरवली असता शेकडो तरुण-तरुणी मॅकडोनाल्ड च्या आसपास गर्दी करताना आपल्याला दिसतात. अमेरिकन खाद्यसंस्कृतीचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे मॅकडोनाल्ड आज देशभरात प्रसिद्ध आहे. मॅकडोनाल्ड च्या आत मध्ये गेल्यानंतर काही काळासाठी आपण अमेरिकेतच आलो आहोत असा अनुभव येतो. कारण म्हणजे ग्राहक आत मध्ये आल्यापासून त्याच्या सेवेसाठी असणाऱ्या खुर्च्या, टेबल, काऊंटर, मेनू कार्ड, त्या मेनू कार्ड वरील सर्व पदार्थ आणि पदार्थ बनवायची पद्धत यासंदर्भात विशिष्ट नियम आहेत. एवढेच काय तेथे काम करणाऱ्या स्टाफचा गणवेशही जगभर सारखा आहे. यामुळे जगभरातील सर्व मॅकडोनाल्ड चा शाखा समांतर असल्याचा अनुभव येतो.

मॅकडोनाल्ड्स यार रेस्टॉरंटच्या शाखा जगभरातील प्रत्येक मुख्य शहरात आहेत. आकडेवारीनुसार 2020 रोजी 100 पेक्षा अधिक देशांमध्ये मॅकडोनाल्ड च्या एकूण 38000 च्या वर शाखा होत्या. दिवसेंदिवस मॅकडोनाल्ड च्या वाढणाऱ्या प्रसिद्धीमुळे ही संख्या आता वाढतच चाललेली आहे. जगभरातील 6.9 कोटी लोक दररोज मॅकडोनाल्ड च्या पदार्थांचा आस्वाद घेतात.

[ Macdonald Story ] मॅकडॉनाल्ड्सचा प्रवास

हा व्यवसाय एवढा अवाढव्य वाढला तरी कसा ? या व्यावसायिक साम्राज्याच्या पाठीमागे दोन लोक आहेत. रिचर्ड मॅकडोनाल्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड. या दोघांची पार्श्वभूमी बघायला गेले तर सर्वसामान्यांपेक्षा ही बेताचीच होती. या दोघांची डिक आणि मॅक अशी टोपण नावे होती. त्यांचा जन्म न्यू हॅम्पशायर येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. आर्थिक परिस्थिती ही सर्वसामान्य होती. त्यांचे वडील हे फोरमन म्हणून एका बुटाच्या कंपनीत काम करत होते.

पण 1929 रोजी देशात आर्थिक मंदी आली आणि यामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, त्यांच्या वडिलांची नोकरी याच मंदीत गेली. घराची जबाबदारी रिचर्ड आणि मॉरिस यांच्यावर आली. दोघांनाही सिनेमात काम करण्याची आवड असल्यामुळे सिनेमात काम मिळेल या हेतूने दोघेही हॉलीवुड ला गेले. पण तिथे त्यांना अभिनेत्याचं काम मिळण्याऐवजी हमाली करायचं काम मिळाल्या. सिनेमाच्या सेटवरून सामान इकडून तिकडून नेण्याचे काम ते दोघेही करत होते. यामुळे सिनेमात काम करायची त्या दोघांची स्वप्ने भंग झाली. सिनेमा क्षेत्रातच काम करायचं म्हणून त्या दोघांनी ग्लेनव्ह्यू या ठिकाणी सिनेमागृह चालू केले.

सगळीकडे निराशा मिळते त्या पद्धतीने हे सिनेमागृह ही त्यांना लवकरच बंद करावा लागला. आता त्यांच्या सर्व आशा धुळीस होत्या. जगभरात नाव पोचवू पाहणाऱ्या या दोघांनाही आता आपले नाव गल्लीत ही प्रसिद्ध होणार नाही याच्यावर विश्वास बसू लागला होता याच परिस्थितीत 1937 रोजी ‘पासाडोना’ या कॅलिफोर्निया येथील ठिकाणी एक स्टँड हॉट डॉग विकण्यासाठी सुरू केले. पावभाजीच्या गाडी सारखच ते एक स्टॅन्ड होतं.

पण पदार्थ बनवताना स्वच्छता ते काटेकोरपणे पाळत असत. हळूहळू त्यांच्या स्टँड समोर ग्राहकांची गर्दी वाढू लागली कारण त्यांनी बनवलेल्या पदार्थांची चव उत्कृष्ट दर्जाचे होते. या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून त्यांनी कॅलिफोर्निया येथे मॅकडोनाल्ड चे पहिले फास्ट फूड उपहारगृह चालू केले. त्याचे नाव त्यांनी ” मॅकडोनाल्ड हॅम्बर्ग ” असे ठेवले या रेस्टॉरंटची जागा जेमतेम 600 चौरस फूट होती. फास्ट फूड मिळेल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या रेस्टॉरंट मध्ये ग्राहकांना पदार्थ खाण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असे त्यामुळे फास्ट फूड या संकल्पनेला काहीच अर्थ राहिला नव्हता मात्र दिल्यानंतर काही क्षणात ऑर्डर काउंटरवर मिळत असे.

[ Macdonald Story ]  मॅकडॉनाल्ड्सच्या यशाचे कारण

त्यांच्या या रेस्टॉरंटच्या यशाचे कारण सांगायचे झाले तर ते रेस्टॉरंट किती सोप्या पद्धतीने चालवतात यावरून समजते. मेनू मध्ये जवळपास आठ ते 10 पदार्थ होते आणि ते बनवण्याची प्रक्रिया चक्क पद्धतशीरपणे लिहून काढलेली होती. आणि पदार्थ बनवणाऱ्या सर्व शेफना ही प्रक्रिया तंतोतंत पाळण्याचे आदेश होते. बर्गर कशा पद्धतीने बनवायचा त्यामध्ये किती बटाटे वापरायचे तू किती वेळ तळायचा तळताना त्याचा योग्य तो रंग कसा आणायचा इत्यादी गोष्टी अगदी हुबेहूब कशा पाळायच्या याबाबत नियमावली होती. त्यामुळे सर्व मॅकडोनाल्ड मध्ये प्रत्येक पदार्थाची चव सारखेच मिळत असे.

त्यामुळे ग्राहकाच्या मर्जीनुसार किंवा आग्रहानुसार पदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला जात नसे. आज 2024 रोजी सुद्धा पदार्थ बनवण्याच्या प्रक्रिया पूर्वी जशा होत्या तशाच आज पाळल्या जातात. मॅकडोनाल्ड मध्ये बर्गर मिळतो त्यातील हॅम बर्गर मधील पट्टी ही मांसाहारी असते. त्यात मांसाचे प्रमाण 19 टक्के इतके असते. त्या बर्गर चा व्यास हा 3.875 इंच एवढा असतो तर त्याचे वजन सुद्धा नियोजित असते. पुढे त्यांनी बन पावावर तीळ असलेला ‘ बिग मॅक’ नावाचा एक प्रकार चालू केला. यामध्ये बन पावावर तीळ किती लावावे याचा सुद्धा नियम होता त्यानुसार प्रत्येक बन पावावर एकूण 178 तिळ लावले जात असत.

थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीमध्ये गाड्यांची निर्मिती ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने मॅकडोनाल्ड मध्ये पदार्थांची निर्मिती होत असे. गाड्यांमध्ये फोर्ड आणि खाद्यपदार्थांमध्ये मॅकडोनाल्ड असे म्हणण्यास काही हरकत नव्हती. पदार्थ निर्मितीची प्रक्रिया एवढी फास्ट होती की ऑर्डर दिल्यापासून गिराईक बिल भरेपर्यंत पदार्थ त्याच्या हातात असे त्यामुळे ग्राहकांमध्ये एक समाधानाचे वातावरण होते.

1950 सालापासून मॅकडोनाल्ड बंधूनी व्यवसाय वाढविण्यासाठी त्याची जोरदार मार्केटिंग सुरू केली त्यामध्ये ” आमचे 10 लाख बर्गर आजपर्यंत खपले आहेत” अशा मोठमोठ्या पाट्या सगळीकडे लावायला सुरुवात केली. आणि आपल्या शाखांच्या फ्रॅंचाईजी वाढवायला सुरू केल्या. यामध्ये त्यांनी फ्रॅंचाईजी मालकाला स्वतःचं नाव वापरायला दिलं आणि आपल्यासारखीच प्रक्रिया त्यालाही पाळायला सांगितली. जशा इतर कंपनीच्या फ्रॅंचाईजी ऑपरेट होत असतात त्यातलाच हा प्रकार.

1952 रोजी, अशीच एक फ्रॅंचाईजी त्यांनी फिनिक्स येथे चालू केली. त्याच वर्षी प्रसिद्ध असणाऱ्या ‘ अमेरिकन रेस्टॉरंट’ या मासिकात मॅकडोनाल्ड ची स्टोरी छापून आली होती. यामुळे मॅकडोनाल्ड खूपच प्रसिद्धीच्या झोता मध्ये आले होते. त्यावेळी त्यांची वार्षिक उलाढाल ही लाखो डॉलर्स मध्ये होत असे वर्षभरात3.5 लाख डॉलर्स ची पदार्थ विक्री होत असे तर त्यावर 1 लाख डॉलर्स नफा राहत असे.

हे सर्व सुरू असताना एका नवीन व्यक्तीची या धंद्यामध्ये एंट्री झाली त्याचं नाव रेमंड क्रोक असे होते. तो मिल्कशेक बनवण्याचे यंत्र तयार करत असे. मॅकडोनाल्ड स ने त्याला एक दिवशी आठ यंत्रांची ऑर्डर दिली. या आठ यंत्रांचा ही लोक करणार तरी काय? हे पाहण्यासाठी रेमंड क्रोक याने मॅकडोनाल्ड च्या रेस्टॉरंट ला भेट देण्याचे ठरवले आणि ही भेट ऐतिहासिक भेट ठरली. आणि रेस्टॉरंट पाहताच रेमंड क्रॉक हा रेस्टॉरंटच्या प्रेमात पडला. मॅकडोनाल्ड ची असणारी स्वच्छता, पदार्थ बनवण्याच्या पद्धती आणि रेस्टॉरंट चालवण्याची पद्धत पाहून तो आश्चर्यचकित झाला. मॅकडोनाल्ड विकत घेण्याची त्याची इच्छा झाली. त्यामुळे त्याने मॅकडोनाल्ड बंधूंना किंमत विचारली. त्यावेळेस मॅकडोनाल्ड बंधूंनी 27 लाख डॉलर्स एवढी किंमत रेमंड याला सांगितली. एवढी किंमत पाहून तो चांगलाच संतापला. व्यवहार फिस्कटला.

[ Macdonald Story ] मॅकडॉनाल्ड्सच्या शाखांचा विस्तार

[ Macdonald Story ]  पण मॅकडोनाल्ड या उपहारगृहाचा शाखा अमेरिकेवर पसरल्या होत्या या शाखांमधून सुद्धा चांगला व्यवसाय मिळू शकतो हे त्या वेळेस रेमंड ला समजलं होतं. पण 27 लाख डॉलर्स एवढी रक्कम त्याला एकट्याला जमवणे शक्य नव्हते. हे पैसे मिळवण्यासाठी त्याला मदत केली मॅकडोनाल्ड मध्येच मॅनेजर असणाऱ्या हॅरी सोनीबॉन याने त्याने पैसे मिळवण्यासाठी एक नवीन युक्ती शोधली ” फ्रॅंचाईजी रियालिटी कॉर्पोरेशन” नावाने एक कंपनी सुरू केली.

वेगवेगळ्या शहरांमधील मोक्याच्या जागा विकत घेऊन त्या भाड्याने देणे हे या कंपनीचे काम होते. यातून मिळालेल्या पैशांमधून रेमंड आणि हॅरी यांनी मॅकडोनाल्ड कंपनी ठरलेल्या किमतीत म्हणजेच 27 लाख डॉलर्स एवढ्यात विकत घेतली. मॅकडोनाल्ड च्या शाखा वाढवण्यासाठी त्यांना रियालिटी कॉर्पोरेशन कंपनीचा चांगला फायदा झाला. कंपनीच्या जागा उपलब्ध असल्यामुळे फ्रॅंचाईजी ला जागेसाठी लागणारे पैसे वाचवण्यात आले. यामुळे दोन्ही बाजूने नफा येऊ लागला एक म्हणजे फ्रॅंचाईजी मधून मिळणारा पैसा आणि दुसरा म्हणजे जागेचे भाडे.

Macdonald Story

[ Macdonald Story ]  यापुढे मॅकडोनाल्ड च्या नवीन नवीन फ्रॅंचाईजी सुरू होऊ लागल्या. 1965 रोजी शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स आले. कंपनीचे शेअर्स ज्यावेळेस शेअर बाजारात आले त्यावेळी कंपनीच्या फक्त 1000 शाखा होत्या. 1971 रोजी कंपनीच्या शाखा दुप्पट म्हणजेच 2000 झाल्या. यानंतर रेमंड क्रॉक याचा 1984 रोजी मृत्यू झाला तेव्हा एकूण 8000 शाखा होत्या. आज देशभरात 20,000 शाखा आहेत. पहिल्यापेक्षा आज मेनू ही थोडा वाढलेला आहे. पण स्वच्छता आजही तशीच आहे शाखेमध्ये एक ही माशी सापडणार नाही अशी. या स्वच्छतेचे श्रेय जातं ते म्हणजे मॅकडोनाल्ड बंधू आणि रेमंड क्रॉक यांना. कधीकधी रेमंड क्रोक हा मॅकडोनाल्ड च्या एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाई आणि तेथे साफसफाई करत असत अशा कहाण्या मॅकडोनाल्ड च्या कर्मचाऱ्यांकडून सांगितल्या जात.

[ Macdonald Story ] मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये जाणाऱ्यांनी रेस्टॉरंटच्या बाहेर बाकड्यावर बसलेला जोकर नक्की पाहिला असेल. मुलांना खेळण्यासाठी, करमणुकीसाठी आणि आपल्या पदार्थांचा खप वाढवण्यासाठी या जोकर ची निर्मिती करण्यात आलेली होती. मॅकडोनाल्ड चा खरा करता धरता असणारा विलार्ड स्कॉट हा त्यावेळी रेडिओ वरती एका जोकर ची भूमिका पार पाडायचा. मुलांमध्ये या जोकर चे आकर्षण होते. त्याच वेळी मॅकडोनाल्ड च्या जाहिरातीसाठी स्कॉट याने रोनाल्डो मॅकडोनाल्ड ची निर्मिती केली. नंतर याचे स्वरूप थोडे बदलले अनेक जण जोकर बनून मॅकडोनाल्ड चे काम करायचे या यामध्ये मुलांची करमणूक करणे हा त्यांचा हेतू होता. कालांतराने मॅकडोनाल्ड जोकर चा पुतळा प्रत्येक शाखेच्या बाहेर ठेवण्याची प्रथा चालू झाली.

[ Warner Brothers ] वॉर्नर ब्रदर्स

Leave a Comment