[ Warner Brothers ] वॉर्नर ब्रदर्स

[ Warner Brothers ] वॉर्नर ब्रदर यांच्याबद्दल माहिती खालील प्रमाणे.

[ Warner Brothers ]  वॉर्नर ब्रदर्स आणि त्यांच्या सिनेमा क्षेत्रात असणारे व्यवसायाने एकेकाळी मोठा धुमाकूळ घातला होता. वॉर्नर ब्रदर्स ने जर स्वतःच्या आयुष्यावर चित्रपट काढला असता तर त्या चित्रपटाने खूप धुमाकूळ घातला असता. त्यांच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. प्रेम प्रकरण, गाड्याचे अपघात, राग, द्वेष, गरिबी श्रीमंती, घरातील भांडण या सर्वांनी भरलेले त्यांचे आयुष्य रोमांचकारी होते. आयुष्यात चढ-उतार असावा तर वॉर्नर ब्रदर्स सारखा.

[ Warner Brothers ]  वॉर्नर ब्रदर्स मध्ये चार भाऊ होते. त्यामध्ये हॅरी, जॅक, सॅम आणि अबे या चौघांचा समावेश होता. पई आणि बेन वॉर्नर यांच्या एक डझन मुलांपैकी हे चार मुले होती. पोलंडमधील असणारे हे कुटुंब 1883 रोजी आपल्या गुरांना सहित अमेरिकेला येऊन थडकले. त्यांचं मूळ आडनाव काय होतं हे कोणालाच माहीत नाही. पण अमेरिकेत आल्यानंतर तेथील इमिग्रेशन ऑफिसरने त्यांचे आडनाव वॉर्नर असे संबोधले. तेच आडनाव पुढे रुजू झाले. त्यांच्या वडिलांनी मरेपर्यंत स्वतःचा जुना आडनाव कधी कोणाला सांगितलंच नाही.

अमेरिकेतील बाल्टिमोर या शहरामध्ये त्यांनी चांभाराचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी बऱ्यापैकी पैसे कमावले आणि स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावला. यानंतर वॉर्नर कुटुंबीय कॅनडा येथे स्थायिक झाले. कॅनडामध्ये स्थायिक झाल्यानंतरच त्यांचे दोन भाऊ सॅम आणि जॅक यांचा जन्म झाला.

[ Warner Brothers ] त्यांच्या कुटुंबात त्यांचा एक घोडा सुद्धा होता. त्या घोड्याची घोडा गाडी बनवून ती सगळी भावंड त्यात विविध प्रकारच्या वस्तू भरत असत. आणि या वस्तू विकण्यासाठी गावोगावी ते फिरत असत. यामध्ये त्यांना खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत असत. ऊन, वारा, पाऊस यांना तोंड द्यावे लागत असत. एकदा रात्री घोडा गाडी मधील त्यांच्या सर्व वस्तू चोरीला गेल्या. यामुळे निराश झालेल्या वॉर्नर बंधूंनी पुन्हा बूट दुरुस्ती करणे आणि धान्य विकणे हा व्यवसाय अमेरिकेमधील यंग टाऊन येथे सुरू केला. त्याही व्यवसायात त्यांना काही जम बसेना.

[ Warner Brothers ] वॉर्नर ब्रदर यांचा चित्रपट क्षेत्रात उतरण्याचा निर्णय.

कंटाळून वॉर्नर बंधू पेन्सिलवेनिया या ठिकाणी आले. त्यावेळेस वॉर्नर बंधूंचे वय जेमतेम 20 वर्षे इतके असेल. त्यांच्यामधील ॲबे हा साबण विक्रीचा व्यवसाय करत होता. आज काळात वॉर्नर ब्रदर्स मध्ये चित्रपटाबद्दल आकर्षण वाढले. इथेच या बंधूंना चित्रपटाचा नाद लागला. याच काळात सिनेमा व्यवसायात उतरण्याचा निर्णय वॉर्नर ब्रदर्स ने केला. हॅरी, जॅक, सॅम आणि ॲबे या चौघांनी स्वतःजवळ जमवलेले पैसे एकत्र केले. चौघांकडून ही एकत्र केलेले पैसे हे अपुरे पडत होते.

त्यामुळे त्यांनी वडिलांकडून पैसे मागायचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाला वडिलांनी नकार दिला आणि कसलेही पैसे त्यांना दिले नाही. शेवटी त्यांनी व्याजाने पैसे घ्यायचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी त्यांचं आवडतं घड्याळ आणि घोडा या दोन गोष्टी गहाण ठेवल्या. मिळाल्यानंतर त्यांनी पहिला प्रोजेक्ट 1000 डॉलर्स मध्ये विकत घेतला. आणि अंधाऱ्या खोलीत प्रोजेक्टर बसवून त्यात ते लोकांना सिनेमा दाखवू लागले.

त्यांनी विकत घेतलेला प्रोजेक्टर बरोबरच ‘ द ग्रेट ट्रेन रॉबरी’ हा चित्रपट त्यांना मोफत मिळाला होता. हा चित्रपट ही ते लोकांना दाखवत असे. या चित्रपटातील दृश्यांमुळे वॉर्नर बंधूंच्या चित्रपट गृहाला गर्दी वाढतच गेली. यामध्ये ट्रेन वर पडलेला दरोडा दाखवला आहे. सिनेमातील अभिनेत्रीला रेल्वेच्या रुळाला बांधलेले दाखवले आहे. तिच्यावरून गाडी जाणार तोपर्यंत अभिनेता येऊन तिला वाचवतो. असा काही तो चित्रपट होता.

[ Warner Brothers ]  प्रोजेक्टर चा सर्व काम सॅम सांभाळायचा. जाहिरातीचे काम ॲबे याच्याकडे होते. या सगळ्यांमध्ये त्यांची बहीण ही सहभागी होती तिचं नाव रोझ असे होतं. सिनेमा सुरू असताना काही तांत्रिक कारणामुळे मध्येच बंद पडला तर प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी जॅक स्टेजवर जाऊन नृत्य करत होता. तर त्यांची बहीण त्यावेळेस पियानो वाजवून दाखवत होती. असला बालिशपणा बघून कोणाला तरी हा पोरा पोरांचा खेळच वाटला असता. पण या चित्रपटगृहातून त्यांची चांगली कमाई होत होती वॉर्नर बंधूंनी त्यांच्या कमावत्या नोकऱ्या सोडल्या होत्या. त्यांनी या व्यवसायातून भरपूर पैसा कमावला. पुढे हाच प्रोजेक्टर त्या भावंडांचं वेगवेगळे होण्यास कारणीभूत होणार होता.

[ Warner Brothers ] सिनेमा क्षेत्राची सुरुवात.

सिनेमाचे तंत्र नवीन आले असल्यामुळे बऱ्याच लोकांनी अजून सिनेमा पाहिला नव्हता. सिनेमा पाहण्यासाठी एकदा खुर्चीत बसले की त्यांना उठून वाटत नव्हतं. मग पुढील शोच ही ते तिकीट काढत असत. यामुळे वॉर्नर ब्रदर्स ने अधिक पैसे कमावले. सिनेमा सुरू करण्यासाठी त्यांनी गहाण ठेवलेले घड्याळ आणि घोडा आलेल्या पैशातून सोडवला. या काळी त्यांच्याकडे दोन मोठे प्रश्न होते. म्हणजे ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या कमी पडत असत. मग त्या खुर्च्या ते शेजारील स्मशानभूमी तून तात्पुरत्या स्वरूपाची मागून आणत असत. कोणाचा जर मृत्यू झालेला असेल तर स्मशान भूमीत खुर्च्यांची गरज पडत होती त्यामुळे त्यादिवशी मग सिनेमागृह बंद राहत होते.

चांगल्या दर्जाचे चित्रपट त्यांना सिनेमागृहात लावण्यासाठी मिळत नव्हते. चांगल्या दर्जाचे चित्रपट आपल्या सिनेमागृहात लागावे म्हणून त्यांनी वितरक व्हायचे ठरवले. त्यावेळी वितरकांचा धंदा हा चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपट विकत घेऊन सिनेमागृहा ला विकणे हा होता. या धंद्यात त्यांची बहीण त्यांच्या बरोबरीला नव्हती. सिनेमाचे वितरक होणे हे त्यांना फायद्याचे पडले होते. वितरक झाल्यापासून पहिल्या आठवड्यातच त्यांनी 2500 डॉलर्स नफा कमावला होता. शेवटी त्यांनी स्वतःचं सिनेमागृह 40,000 डॉलर्स इतक्या किमतीत विकल.

प्रोजेक्टर चा शोध एडिसन याने लावला असल्यामुळे 1960 रोजी त्याने निर्माण होणाऱ्या सर्व चित्रपटांवरती स्वतःची मालकी सांगितली. या कारणामुळे वॉर्नर ब्रदर्स सह इतर चित्रपट वितरकांचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे वॉर्नर ब्रदर्स याही व्यवसायातून बाहेर पडले.

[ Warner Brothers ] एडिसन आणि वॉर्नर ब्रदर्स यांच्यातील वाद.

1912 रोजी या खटल्याचा निकाल लागला आणि एडिसन हा खटला हरला आणि न्यायालयाने वितरकांना पुन्हा चित्रपट वितरण करायची परवानगी दिली. पण त्याच वेळी इतर कोणावरही अवलंबून न राहता वॉर्नर ब्रदर्स ने स्वतः सिनेमा निर्माण करायचे ठरवले होते. वॉर्नर ब्रदर हे अमेरिकेतील हॉलिवूड याल अनोळख्या गावात पोहोचले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात 1917 रोजी त्यांनी एक नवीन माहितीपट सुरू केला नाव होतं ‘ माय फोर इयर्स इन जर्मनी’ .

अमेरिका आणि जर्मनी मधील वार मुळे जर्मनी विरुद्धच्या भावनांना अमेरिकेत फारच उत आलेला होता. त्यामुळे लोकांनी या सिनेमाला पसंती दिली. त्यामुळे ही फिल्म खूपच गाजली आणि प्रसिद्ध झाली. त्याकाळी सिनेमाचा व्यवसाय चक्क आठ लाख डॉलर्स इतका झाला होता आणि त्यामध्ये एक लाख तीस हजार डॉलर्स इतका नफा वॉर्नर ब्रदर्स ला राहिला होता. आता वॉर्नर ब्रदर्स ची ओळख सिनेमा निर्मिते म्हणून संपूर्ण जगात झाली होती.

मिळालेल्या पैशातून वॉर्नर ब्रदर्स यांनी एक स्टुडिओ विकत घेतला. आता त्या स्टुडिओमध्ये ते नवीन नवीन चित्रपटाची निर्मिती करू लागले. पुढच्या तीन वर्षांमध्ये त्यांनी जेवढे जेवढे चित्रपट बनवलेले होते ते सर्व फेल गेले. यामुळे 1920 रोजी या मंडळींचे सर्व भांडवल बुडीत गेले.

[ Warner Brothers ] वॉर्नर ब्रदर्स यांनी दिले चित्रपटाला आवाज.

यापुढे वॉर्नर बंधूंनी सिनेमा क्षेत्रात नवीन तंत्र आणण्याचं ठरवलं त्यामध्ये त्यांनी पडद्यावरील चित्रांना आवाज देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आवाजासाठी नवीन यंत्र आणले. न्यूयॉर्क मधील सिनेमागृहात लोकांनी या चित्रपटाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. जगातील पहिला बोलणारा चित्रपट म्हणून वॉर्नर ब्रदर्सच्या ” दि जॅझ सिंगर” या चित्रपटाची नोंद झाली.

बोलणारे चित्रपट असल्यामुळे आता चित्रपटगृहामध्ये साऊंड सिस्टिम ची व्यवस्था करणे गरजेचे होते. जुन्या चित्रपटगृहामध्ये साऊंड सिस्टिम ही नव्हती त्यामुळे साऊंड सिस्टिम अरेंज करण्यासाठी मालकांना त्रास होत होता. आतापर्यंत सर्व सिनेमे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात होते. वॉर्नर ब्रदर्स ने ” ऑन विथ दि शो” हा पहिला रंगीत चित्रपट काढला.

[ Warner Brothers ] यापुढे सिनेमा क्षेत्रात व्यवसाय वाढावा यासाठी वॉर्नर बंधूंनी चित्रपटगृह विकत घ्यायला सुरुवात केली. शिवाय त्यांनी स्वतः बरीच सिनेमागृह बांधली. आतापर्यंत त्यांनी जवळपास 100 च्या आसपास सिनेमागृह बांधलेली आहेत. त्यांनी बांधलेली सिनेमागृह ही भव्य आणि अतिशय देखणी आहेत. स्वतः काढलेले चित्रपट आणि इतरांचे हे चित्रपट आपल्या सिनेमागृह गृहात दाखवता येतील अशी त्यामागची कल्पना होती.

पुढे टेलिव्हिजनच्या निर्मितीमुळे लोक सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घरीच टेलिव्हिजन वरती चित्रपट पाहत होते. यामुळे वॉर्नर ब्रदर्स चा व्यवसाय बऱ्याच प्रमाणात बसला. जॅक वॉर्नर चा तर टीव्ही वरती खूपच राग होता. त्याच्यासमोर टीव्ही हा शब्द उच्चारायला सुद्धा परवानगी नव्हती. वॉर्नर बंधूंनी जेवढे सिनेमा निर्माण केले त्याच सिनेमामध्ये कोठेच त्यांनी टीव्ही सेट दाखवला नाही. पुढे जाऊन वॉर्नर ही खूप मोठी बनली. आता आपण कंपनीची उलाढाल बघूया. 689 कोटी डॉलर्स इतकी उलाढाल 2000 रोजी होती. त्यामध्ये वॉर्नर ब्रदर यांचा नफा 123 कोटी डॉलर्स इतका होता. त्यावेळी त्यांच्याकडे 15,000 कर्मचारी जगभरातून काम करत होते.

Warner Brothers

1990 च्या दशकात लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेला ” हॅरी पॉटर” या सिनेमाचे सर्व हक्क वॉर्नर ब्रदर्स यांनी विकत घेतले. कोणत्याही चित्रपटाने एवढे यश मिळवले नव्हते तेवढे यश हॅरी पॉटर या सिनेमाने मिळवले. सिनेमाच्या सात भागांपैकी सातवा भाग हा 2011साली प्रसिद्ध झाला.

2000 सालाच्या सुमारास ऑनलाइन आणि इंटरनेटशी संबंधित असणाऱ्या कंपन्या तोंडवर काढत होत्या. या कंपन्यांशी पार्टनरशिप करून आपण आपला फायदा उठवून घ्यायचा असे वॉर्नर यांनी ठरवले. त्या काळच्या “अमेरिकन ऑनलाईन” या कंपनी सोबत त्यांनी विलीनीकरण करायचं ठरवलं. पण लवकरच डॉट कॉम बबल फुटला आणि अमेरिकन ऑनलाईन बरोबरच वॉर्नर ब्रदर्स लाही त्याचा आर्थिक फटका बसला.

[ Warner Brothers ]  2019 रोजी अमेरिकेमध्ये जवळपास 10,000 तर इतर देशात 2000 कर्मचारी वॉर्नर ब्रदर्स साठी काम करत होते. ज्यावेळेस कंपनीकडे जास्त काम असेल त्यावेळेस हा आकडा वाढतो. कंपनीने जवळपास 400 कोटी डॉलर्सचा आकडा 10 वेळा पार केला होता. 2020-21 रोजी कंपनीचे उत्पन्न हे 150% वाढले होते. 2020 रोजी 2.59 कोटी डॉलर्स इतकं कंपनीचे उत्पन्न होतं. तर 2021 रोजी कंपनीचे उत्पन्न हे 66.3 कोटी डॉलर्स इतके होते.

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न म्हणजे काय ? त्याचे 10 फायदे काय ?

Leave a Comment